Author: रंगभूमी.com

नुकताच २७ मार्च रोजी पार पडलेला जागतिक रंगभूमी दिन यंदा सर्व रंगकर्मींनी जोशात साजरा केला. कोविडच्या संकटामुळे काही काळ स्थगित झालेली नाट्यसृष्टी नव्याने उजळू लागल्यामुळे रंगकर्मींमध्ये दिसणारा हा उत्साह स्वाभाविकही होता. अशा या दिवशी पीटर सेलर्स या पिटस्बर्ग, पेनसिल्वानिया, यूएसए येथील संगीतिका, नाटक आणि महोत्सव दिग्दर्शक यांनी सर्व नाट्यदर्दींना जागतिक रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा देत एक महत्वाचा संदेशही दिला आहे. ज्येष्ठ लेखक, नाट्य प्रशिक्षक व दिग्दर्शक संभाजी सावंत यांनी हा संदेश अनुवादित करून आपल्यापर्यंत पोहोचवला आहे. हा संदेश तमाम नाट्यप्रेमींसाठी अतिशय महत्वाचा आहे. प्रस्तुत संदेश नक्की वाचा! मूळ लेखक: पीटर सेलर्स अनुवाद: संभाजी सावंत मित्रहो, काळ विलक्षण उद्भवला आहे! आज अवघं…

Read More

नाटकाच्या शेवटी कथानकाला ट्विस्ट देत गूढ उकलणारी रहस्यमय नाटकं पसंत करणारा एक खास प्रेक्षकवर्ग आहे. अशा प्रेक्षकवर्गासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. श्वेता पेंडसे लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित ’38, कृष्ण व्हिला’ ही एक रोमांचक नाट्यकृती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. १९ मार्च रोजी या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग सादर होणार आहे. या नाटकात गिरीश ओक आणि श्वेता पेंडसे हे कलाकार असणार आहेत. इतर कलाकारांबद्दल अद्याप उलगडा करण्यात आलेला नाही. जाणून घ्या काय आहे  डॉ. गिरीश ओक यांचे बहारदार चिवित्रांगण! कथानकाबद्दल थोडंसं… ’38 कृष्ण व्हिला’ नाटकामध्ये गिरीश ओक ‘देवदत्त कामत’ या भूमिकेत आपल्यासमोर येणार आहेत. देवदत्त कामत यांच्यावर नंदिनी चित्रे ही…

Read More

गौरी थिएटर निर्मित आणि प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन प्रकाशित ‘सारखं काहीतरी होतंय!’ या आगामी नाटकाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. नाटकाची चर्चा होण्यामागे बरीच कारणं आहेत. सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे हास्यसम्राट प्रशांत दामले या नाटकातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार आहेत. दुसरं कारण म्हणजे या नाटकाचा लेखक-दिग्दर्शक असणार आहे आपल्या सगळ्यांचाच लाडका संकर्षण कऱ्हाडे! तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे या नाटकाच्या निमित्ताने आपली अत्यतं प्रिय अशी प्रशांत दामले आणि वर्षा उसगांवकर ही जोडी आपल्या भेटीस येणार आहे. आता याहून आनंदाची बातमी! ‘सारखं काहीतरी होतंय!’ या नाटकाच्या शुभारंभाची तारीख जाहीर झालेली आहे. शुक्रवारी, २५ मार्च रोजी या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग…

Read More

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या राज्य नाट्य हौशी स्पर्धा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर २०२१ साली घेता आल्या नव्हत्या. यंदाचे या स्पर्धेचे हीरक महोत्सवी वर्ष असणार आहे. आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा यंदा होत असल्याने त्यास विशेष महत्त्व असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी सांगितले. मराठी, हिंदी, संस्कृत तसेच बालनाट्य, संगीतनाट्य व दिव्यांग बालनाट्य अशा सहा वेगळ्या प्रकारांमधून राज्यातील ३४ केंद्रांवर या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या या हीरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धेचा राज्यस्तरीय उद्घाटन सोहळा सोमवारी २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली.…

Read More

अस्तित्व आयोजित ‘कल्पना एक आविष्कार अनेक’ या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या स्पर्धेचे २०२१ हे ३५ वे वर्ष होते. पण त्याहून आनंदाची गोष्ट म्हणजे अस्तित्व या संस्थेलाही २७ डिसेंबर, २०२१ रोजी २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. नाट्यदर्पण संस्थेने सुरू केलेली ‘कल्पना एक आविष्कार अनेक’ ही स्पर्धा अस्तित्व संस्थेने पुनर्जिवीत केली याबद्दल या संस्थेच्या सर्व सहकाऱ्यांचे मानावे तितके आभार कमीच आहेत. १८ डिसेंबर, २०२१ रोजी पार पडलेल्या एकदिवसीय अंतिम फेरीचा आढावा घेणारा हा व्हिडिओ बघायला विसरु नका. कल्पना एक आविष्कार अनेक २०२१ व्हिडिओ https://www.youtube.com/watch?v=90MiVC-ZhyE आजच्या या २५ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने अस्तित्व संस्थेतर्फे येणाऱ्या २०२२ वर्षातील स्पर्धेसाठी पुढील शब्दात स्पर्धकांना जास्तीत जास्त प्रमाणात स्पर्धेत…

Read More

मंडळी, आपण वेगवेगळ्या नाट्यगृहांमध्ये भव्य दिव्य स्वरुपात सुमारे ३ दिवस ते अगदी महिनाभर सुरू राहणारे नाट्यमहोत्सव बघत आलो आहोत. परंतु, एखाद्या गावामध्ये, जिथे एकही नाट्यगृह नाही अशा ठिकाणी एक माणूस नाट्यमहोत्सव आयोजित करण्याचे धाडस करतो हे ऐकूनच किती भारावून जायला होतं. अशीच एक कल्पना चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथील प्रा. परसू गावडे यांच्या डोक्यात आली आणि त्यातून चंदगडी नाट्य महोत्सवाचा आरंभ झाला. कोरोनाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर चंदगडी नाट्यमहोत्सवाची तिसरी घंटा ९ जानेवारीपासून वाजणार आहे. चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथे यंदा चौथा चंदगडी नाट्यमहोत्सव होत आहे. ग्रामीण भागातील नाट्यरसिकांना महाराष्ट्र्भरातील नाट्यपरंपरा बघता यावी यासाठी या नाट्यमहोत्सवाची सुरूवात केल्याचे प्रा. परसू गावडे सांगतात. तालुक्यात एकही खुले…

Read More

[Please check the updated news at bottom of this article] राज्यात कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही. तसेच, ओमायक्रोनचे नवीन संकट डोक्यावर येऊन उभे राहिले आहे. ओमायक्रोनचे बाधित रुग्णांच्या आकड्यातही वाढ होताना दिसत आहे. त्यामुळेच या सगळ्या गोष्टींचा विचार करुन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी राज्य नाट्य स्पर्धा पुन्हा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धा काही दिवसांपूर्वी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्याबद्दलचा संपूर्ण तपशील तुम्हाला पुढील लिंकवर वाचता येईल. राज्य नाट्य स्पर्धेच्या प्रवेशिका दाखल करण्यासाठी व सादरीकरणासाठी १५ दिवसांची मुदतवाढ कोरोना आणि ओमायक्रोनचे रुग्ण वाढताना दिसत असल्याने ही स्पर्धा मे आणि…

Read More

२५ नोव्हेंबर, २०२१ रोजी प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहामध्ये एक दिमाखदार सोहळा पार पडला, ज्याचे नाव होते ‘रंगबरसे’ आणि निमित्त होते ८ वा जागतिक रंगकर्मी दिवस! हा सोहळा मराठी नाट्य कलाकार संघ व आरती आर्ट अकादमी च्या सहयोगाने आयोजित करण्यात आला होता. मराठी नाट्य कलाकार संघाचे अध्यक्ष माननीय प्रदीप कबरे यांच्या मार्गदर्शनाखाली, संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेते कै. भालचंद्र पेंढारकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या उपस्थितीत २५ नोव्हेंबरला २०१४ साली यशवंत नाटय़मंदिरात मराठी कलाकार संघाच्या वतीने पहिला जागतिक रंगकर्मी दिन साजरा झाला होता. कोरोनाचे संकट उद्भवल्यामुळे गतवर्षी रंगकर्मी दिन साजरा झाला नाही. मात्र या वर्षी प्रचंड उत्साहात हा सोहळा पार पडला. गेल्या सात वर्षांत…

Read More

तब्बल दीड वर्षे प्रेक्षकवर्ग नाट्यगृहात जाऊन नाट्याविष्काराचा जिवंत अनुभव घेण्यासाठी हपापलेला होता. आज सरकारने ५०% आरक्षणासह नाटक दाखवायला मान्यता दिली आहे. त्यामुळे, रंगकर्मी थोडे आशावादी झाले आहेत आणि गेल्या दीड वर्षात झालेलं नुकसान विसरून, नव्या ताकदीने प्रेक्षकांच्या सेवेसाठी हजार झाले आहेत. ५०% आरक्षणाच्या अटीमुळे रंगकर्मींचे आजही नुकसान होत आहे आणि त्याबद्दल ते वारंवार आपल्याला बोलूनही दाखवत आहेत. अशा या दोलायमान परिस्थितीत काही कलाकारांवर याही पलीकडले एक नवे संकट कोसळले आहे. या रंगकर्मींना नाटकाच्या तालमी करण्यासाठी जागा नाही आणि जी जागा सांस्कृतिक कार्यासाठी उपलब्ध आहे ती त्यांना वापरता येत नाही. कल्याणमधील वायले नगर, खडकपाडा येथील सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आरक्षित करण्यात आलेल्या जमिनीवर…

Read More

रंगभूमी पुन्हा एकदा तिसरी घंटा, बटाटे वड्यांचा सुगंध, भव्य-दिव्य सेट आणि रंगीबेरंगी दिव्यांच्या रोषणाईत उजळून निघू लागली आहे. लॉकडाऊनमुळे लोकांमध्ये आलेली उदासीनता व नैराश्य दूर करण्यासाठी सर्वच नाट्यकर्मी नेटाने कामाला लागलेले दिसत आहेत. अशातच, संतोष पवारही प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी घेऊन येत आहेत एक बहारदार नाटक ‘हौस माझी पुरवा’! या नाटकाचा, म्हणजेच हौस माझी पुरवा [Review] तुम्ही येथे वाचू शकता. हौस माझी पुरवा – शुभारंभाचा प्रयोग संतोष पवार लिखित-दिग्दर्शित या नाटकात संतोष पवार, अंशुमन विचारे यांच्यासोबत प्राप्ती बने, अमोल सुर्यवंशी, हर्षदा बामणे या नवोदित कलाकारही आपल्या भेटीस येणार आहेत. नाटकाची कथा, संकल्पना व निर्मिती अजय राजाराम विचारे यांची आहे. या नाटकाचा शुभारंभाचा…

Read More

भाऊ-बहिणीच्या निर्मळ नात्याची ‘गुडन्यूज’! दादा, एक गुडन्यूज आहे ‘भाऊ-बहिण’ हे नातं इतकं स्पेशल असतं कि त्यात असणारे प्रेम नातेसंबंधांच्या पातळीवर खूप निर्मळ असते. मला स्वत:ला दोन मोठ्या बहिणी असल्याने या नात्याविषयी माझ्या मनात कायम जिव्हाळा आहे. पण एखाद्याला ‘दादा’ म्हणणारी एक छोटी बहिण आयुष्यात असली कि त्यात जबाबदारी सोबत बहिणीवर असलेले प्रेम, आयुष्यात एक वेगळीच मजा आणते. तिचे लाड आणि सगळे हट्ट पुरवताना त्या नात्यातील गोडवा द्विगुणित होत असतो. पण जर त्याच खोडकर बहिणीने आपल्या मोठ्या दादाला एक दिवस येऊन ‘दादा, मी प्रेग्नंट आहे’ असं सांगितलं तर? तर साध्या भोळ्या दादाची जी काही भंबेरी उडते ती पाहणे म्हणजेच नाटक ‘दादा,…

Read More

वसई गावातील संदेश नायक यांचे ‘नायक्स फूड कोर्ट’ तिथल्या रुचकर मिष्टांन्नांसाठी तर प्रसिद्ध होतेच. पण आता ते अजून एका गोष्टीसाठी प्रसिद्ध झाले आहे. हॉटेलमध्ये सादर होणाऱ्या नाट्य कलाकृतींसाठी! संदेश नायक यांना अभिनय व दिग्दर्शनाचीही आवड आहे. लॉकडाऊनमुळे बराच काळ काहीच नाट्य उपक्रम करता न आल्यामुळे संदेश नायक यांनी त्यांच्या हॉटेलमध्येच ‘प्रयत्न रंगमंच, वसई’ या संस्थेतर्फे कलाकारांसाठी खुला रंगमंच उभा करून दिला आहे. पालघर जिल्ह्यातील वसई गावात संदेश नायक यांनी हा अभिनव प्रयोग यशस्वीरीत्या करून दाखवला आहे. एवढंच नाही तर हे करताना त्यांनी कोविड संबंधित सगळी खबरदारीही बाळगली आहे. त्यांच्याच हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर काही सुंदर नाट्य कलाकृतींचे सादरीकरण केले जाते. उपलब्ध…

Read More