Author: रंगभूमी.com टीम

रंगभूमीवर प्रचंड गाजलेले ‘चारचौघी’ हे नाटक ३१ वर्षांनी पुन्हा एकदा नव्या संचात रंगभूमीवर येत आहे. ‘जिगीषा’ या नाट्यसंस्थेतर्फे हे नाटक नव्याने सादर होत आहे. या नाटकाचा शुभारंभ शनिवार, १७ सप्टेंबर रोजी मुंबईच्या दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात होणार आहे. https://www.youtube.com/watch?v=CJvMt2qDBZs ‘चारचौघी’ या नाटकाच्या नव्या संचात रोहिणी हट्टंगडी, कादंबरी कदम, पर्ण पेठे, श्रेयस राजे, निनाद लिमये, पार्थ केतकर आणि मुक्ता बर्वे या कलाकारांच्या भूमिका आहेत. या नाटकाचे निर्माते श्रीपाद पद्माकर असून, सूत्रधार प्रणित बोडके आहेत. या नाटकाचे लेखन प्रशांत दळवी यांनी केले असून, दिग्दर्शन चंद्रकांत कुलकर्णी यांनी केले आहे. अशोक पत्की यांचे संगीत, संदेश बेंद्रे यांचे नेपथ्य, रवी-रसिक यांची प्रकाशयोजना या नाटकाला लाभली आहे.…

Read More

झपूर्झा तेजस्वी दशक महोत्सव २०२२, १६ सप्टेंबर दुपारी ४:३० पासून गडकरी रंगायतन, ठाणे येथे साजरा होणार आहे. झपूर्झाचा पहिल्या टप्प्यात काव्ययोग कार्यक्रम पार पडला आहे. हा कार्यक्रम कवितेवर होता. झपूर्झा दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात १२ नाट्यविष्कार असणार आहेत. तसेच व्यास क्रीएशन प्रकाशित ‘शब्दझपूर्झा’ नावाचा अंक दरवर्षीप्रमाणे सादर करणार आहे. झपूर्झाची तयारी जोरात सुरू झाली आहे. १० वं वर्ष असल्याकारणाने सर्व गोष्टीचा समावेश झपूर्झा मध्ये करण्यात आला आहे. गेले कित्येक दिवस आम्ही रंगभूमी.com च्या माध्यमातून तुम्हाला झपूर्झा तेजस्वी दशक महोत्सवाबद्दल अपडेट्स देत आहोत. १२ वेगवेगळे नाट्याविष्कार प्रेक्षकांना या महोत्सवात पाहायला मिळणार आहेत. एकाच दिवशी एकाच तिकिटात प्रेक्षकांना या सोहळ्याचा आस्वाद घेता…

Read More

नाशिककरांसाठी एक खास मेजवानी आहे. एक मनोरंजक नाटक नाशिककरांच्या भेटीस येत आहे. ‘प्रेम करावं पण जपून’ या नाटकाचा एक खास प्रयोग २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता महाकवी कालिदास कलामंदिर, नाशिक येथे सादर होणार आहे.  आनंदाची बातमी म्हणजे या नाटकाची तिकिटं तुम्हाला रंगभूमी.com वेबसाईटवर बुक करता येणार आहेत. Book Tickets — ‘प्रेम करावं पण जपून’ नाशिक प्रयोग पुढील लिंकवर क्लिक करा आणि आजच या नाटकाची तिकिटे बुक करा. ‘प्रेम करावं पण जपून’ नाटक सारांश आजपर्यंत प्रेमाची कथा सांगणारी किंवा प्रेमावर भाष्य करणारी बरीच नाटकं येऊन गेली आहेत. पण प्रेमाकडे एका वेगळ्या नजरेने बघणारं आणि आजकालच्या जगातल्या प्रेमसंबंधांबद्दल आपले डोळे उघडणारं एक नवीन…

Read More

रविवार दिनांक २१ ऑगस्ट, २०२२ रोजी सकाळी ११ वाजता डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात प्रेक्षकांना एकाच तिकिटात दोन लघुनाटिका बघता येणार आहेत. या प्रयोगाची तिकिटे आपल्याच वेबसाईटवर उपलब्ध आहेत. पुढील लिंकवर क्लिक करून तुम्ही प्रयोगाची तिकिटे बुक करू शकता. नाट्यदिंडी (भगदाड + नवरा आला वेशीपाशी) याचे तिकीट बुकिंग नवरा आला वेशीपाशी आपलं दुःख कुणालाच कळणार नाही, कुणी ते समजूनच घेऊच शकत नाही, असं प्रत्येकाला आपल्या कुठल्यातरी दुःखाबद्दल वाटत असतंच ना…? तेव्हा ते दुःख ऐकून, समजून घेऊन त्यावर फुंकर घालणारं कुणीतरी भेटायची आपल्याला गरज असते आणि त्यात ज्याला आपण दुःख म्हणतोय ते मुळात दुःखच नाही असं काहीतरी सांगणारं समजावणारं कुणीतरी आपल्याला…

Read More

श्री. विजयकुमार अणावकर यांनी पाठवलेली प्रतिक्रिया मराठी रंगभूमी, सिनेमा आणि टीव्ही मालिका या तिहेरी प्लॅटफॉर्मवर सराईतपणे वावरणारा नामवंत ज्येष्ठ विनोदी कलाकार प्रदीप पटवर्धन याच्या अचानक जाण्याने कलाजगतात मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. त्यांच्या अभिनयाच्या उत्स्फूर्त शैलीमुळे रंगमंचावर ऊर्जा सळसळत असलेली पहायला मिळे. ‘मोरूची मावशी’ या लोकप्रिय नाटकाने एकेकाळी रंगमंचावर धुमाकूळ घातला होता, त्यामध्ये प्रदीप पटवर्धन यांनी साकारलेला ‘भैया’ देखील तोडीसतोड भाव खाऊन लोकप्रिय झाला होता. टूरटूर, दिली सुपारी बायकोची, चल काहीतरीच काय! सारख्या अनेक नाटकातील त्यांच्या विनोदी भूमिका गाजल्या होत्या. तसेच जमलं हो जमलं, एक फुल चार हाफ, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय आणि नवरा माझा नवसाचा इत्यादी मराठी चित्रपटात देखील त्यांनी अभिनयाची…

Read More

मकरंद साठे लिखित आणि आलोक राजवाडे दिग्दर्शित ‘प्रस्थान उर्फ EXIT’ हे क्लबचर निर्मित, राखाडी स्टुडिओ प्रस्तुत एक नवं कोरं नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. द बॉक्स, पुणे येथे या नाटकाचे ४ सलग प्रयोग सादर होणार आहेत. या नाटकाचा विषय अतिशय हटके असून प्रेक्षकांना काहीतरी खूप सुंदर असं १ तास आणि ४० मिनिटांच्या प्रयोगात बघायला मिळणार आहे, असं कथानक ऐकून वाटतंय. निव्वळ एक कथासूत्र म्हणून पाहायचे झाले तर ही गोष्ट आहे एका वयोवृद्ध जोडप्याची आणि यमदूताची. यातील पुरुष रेल्वेमधून निवृत्त झालेला उच्चपदस्थ अधिकारी आह आणि केवळ फॅसिझमच जगाला वाचू शकतो अशा मताचा आहे तर स्त्री ही खूप शिकलेली, वाचन असलेली आणि राजकीय विचारधारांचा अभ्यास असलेली…

Read More

शाईन क्रीएशन्स सादर करीत आहेत एकाच तिकिटात दोन एकांकिका! या एकांकिका आहेत ‘मी… श्रीकृष्ण पेंडसे’ आणि ‘नाटक बसते आहे’! या दोन्ही एकांकिका डॉ. शुक्लिमा पोटे यांनी दिग्दर्शित केल्या आहेत. या एकांकिकांचे सादरीकरण २४ जुलै रोजी सुदर्शन रंगमंच, पुणे येथे सायंकाळी ६:३० वाजल्यापासून सुरू होणार आहे. सादर होणाऱ्या एकांकिका मी… श्रीकृष्ण पेंडसे लेखक — विनोद भट दिग्दर्शिका — डॉ.शुक्लिमा पोटे एका पावसाळी आणि गडगडाटाच्या रात्री असहाय्य, स्वत:ला सज्जन भासवणारा एक माणूस (श्रीकृष्ण पेंडसे) नंदन आणि शुभदा कारखानीस यांच्या घरी येतो. स्वतःला जंटलमन म्हणवणाऱ्या पेंडसेची भिकार्‍यासारखी अवस्था का झाली असेल…? कारखानीस जोडप्याची ही उत्सुकता, त्यांना पेंडसेच्या रोमांचकारी आणि सत्यप्रवासाचे दर्शन घडवते. पुढे…

Read More

अजेय म्हणजे हटके! अजेय म्हणजे नाविन्य! अजेय म्हणजे नवनवीन संकल्पनांचा बहर! असं म्हटलं तर अगदी समर्पक होईल. गेली १४ वर्ष अजेय संस्था ठाण्यामधे रंगभूमी , नाटक , मराठी भाषा संवर्धन या साऱ्यासाठी तसेच अशा अनेकानेक सामाजिक उपक्रमांसाठी कार्यरत आहे. यंदा झपूर्झाचे १०वे वर्ष आहे. अजेय संस्थेतर्फे दरवर्षी झपूर्झा हा नाट्यमहोत्स सादर करण्यात येतो. दरवर्षी काहीतरी वेगळी थीम घेऊन हा झपूर्झा रसिकांच्या भेटीला येतो. यात अनेक नाट्याविष्कार सादर होतात. यंदाही ‘तेज’ ही संकल्पना घेऊन झपूर्झा रसिक प्रेक्षकांसाठी सज्ज होत आहे.एकदा का झपूर्झा हे नाव ऐकलं की अजेय कलाकारांच्या अंगात जणू झपूर्झा फीवर चढायला लागतो.  डॅा.क्षितिज कुलकर्णींच्या संकल्पनेला साकार रूप देण्यासाठी संस्थेत…

Read More

आपलं घर, अहमदनगर ही संस्था गेल्या चार वर्षांपासून महाराष्ट्रातील अहमदनगरमध्ये कार्यरत आहे. नगरमधील कॉलेजवयीन मुलांनी आपल्या शहरात प्रायोगिक नाट्य चळवळ निर्माण व्हावी तसेच वेगवेगळे नाट्यप्रयोग करता यावेत या विचाराने या संस्थेची स्थापना केली. चार वर्षांच्या कालावधीत संस्थेने अनेक उपक्रम अहमदनगर शहरात तसेच महाराष्ट्रात राबवले आहेत. विशेषत: नाट्यक्षेत्रात आपलं घर, अहमदनगर काम करते. याच संस्थेने पुण्यात येत्या १६ जुलैला, ‘सहल’ आणि ‘खैरलांजी: एपिसोड टू’ या दोन दर्जेदार नाट्यप्रयोगांचं आयोजन केलेलं आहे. सहल आणि खैरलांजी दोन्ही नाट्यप्रयोग महाराष्ट्रभर नावाजलेले आहेत. शनिवार दिनांक १६ जुलै रोजी भरत नाट्य मंदिर, पुणे येथे सायंकाळी ६ वाजल्यापासून या एकांकिकांचे सलग सादरीकरण होणार आहे. तिकीट बुकिंगसाठी पुढील क्रमांकावर…

Read More

नुकत्याच मिळालेल्या वृत्तानुसार, रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या ‘दादा, एक गुड न्यूज आहे’ या नाटकातून ऋता दुर्गुळे या अभिनेत्रीने एक्झिट घेतलेली आहे. ऋताच्या या एक्झिटमागचं कारण अद्याप उघडकीस आलेलं नाही. परंतु, नुकतीच लग्नबंधनात अडकलेली ऋता तिच्या चित्रपटांच्या प्रोमोशनमुळे हा निर्णय घेत असावी असा अंदाज बांधण्यात येत आहे. ऋताचा हा permanent ब्रेक आहे की temporary… हा खुलासाही अद्याप झालेला नाही. काही दिवसात सगळ्या गोष्टींचा खुलासा होईल. त्यामुळे आमच्यासोबत राहा. Hruta leaves ‘Dada, Ek Good News Aahe’ Marathi Natak ऋता दुर्गुळे हिचे टाईमपास ३ आणि अनन्या असे २ चित्रपट सध्या प्रदर्शित व्हायच्या मार्गावर आहेत. या दोन्ही चित्रपटांची सर्वत्र जाहिरातही सुरू असल्याचं दिसून…

Read More

अजेय संस्थेचा ‘काव्ययोग’ सोहळा दु. ३ ते रा. ८:३० या वेळेत मराठी ग्रंथ संग्रहालय स्टेशन रोड येथे पार पडला. याच सोहळ्याचा आढावा घेणारा हा लेख तुमच्यासमोर सादर आहे. प्रमुख पाहुण्या म्हणून आम्ही सिद्ध लेखिका अध्यक्षा प्रा. पद्मा हुशिंग आणि काव्यवयोग म.पां.भावे स्मृती पुरस्कार अंतिमफेरी साठी परीक्षक म्हणून कवी विकास भावे आणि कवी रामदास खरे उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन साधना पाटील यांनी केलं असून प्रास्ताविक डॉ. क्षितिज कुलकर्णी यांनी केले. झपुर्झा नाट्य चळवळीचा प्रवास, त्यातली स्वतःची भूमिका, झपुर्झा २०२२ विषयी, म.पां.भावे स्मृती पुरस्कार आणि काव्ययोगचे महत्व आशा मुद्द्यांविषयी प्रास्ताविकात स्पष्टता दिली. अभिनेत्याला एक दृष्टी असावी, हे vision तयार करण्याचं काम…

Read More

आरोग्यम धनसंपदा या मालाडमधील संस्थेने आपला २०वा वर्धापन दिन साजरा २६ एप्रिल २०२२ रोजी साजरा केला. योग, व्यायाम, नृत्य, संगीत, खेळ या विविध क्षेत्रात आरोग्यम धनसंपदा संस्थेने आजपर्यंत महत्वपूर्ण योगदान दिले आहे.  २० व्या वर्धापन दिनी संस्थेने ‘आरोग्यम धनसंपदा प्रायोगिक कलामंच’ची स्थापना करून रंगकर्मींसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. ‘आरोग्यम धनसंपदा प्रायोगिक कलामंच’तर्फे पहिला उपक्रम आज जाहीर करण्यात आला आहे. हा उपक्रम म्हणजे रंगकर्मी प्रशिक्षण शिबीर! रंगकर्मी प्रशिक्षण शिबीर नाटक ही एक सांघिक कला आहे. आपण जेव्हा एखादे नाटक पाहतो आणि ते आपल्याला खूप आवडतं. तेव्हा नाटकाच्या लेखन-दिग्दर्शनासोबतच आणखी महत्त्वाच्या घटकांचा एकत्रित परिणाम आपल्यावर झालेला असतो. नाटकाच्या प्रयोगाचा परिणाम साधण्यासाठी आवश्यक घटक १. अभिनेता-अभिनेत्री २. …

Read More