Author: रंगभूमी.com

अजेय संस्था ठाण्यात गेली नऊ वर्ष झपूर्झा नाट्यचळवळ सादर करत आली आहे. यंदाचे झपूर्झा चे १० वे वर्ष. झपूर्झा दशक महोत्सव वर्ष आहे, एका थीमवर आधारित नृत्य व नाट्यविष्कार झपूर्झा मध्ये सादर होतात. स्पर्धात्मक वातावरणा बाहेर कलाकारांना त्यांची कला सादर करता यावी, त्याचा आनंद कलाकारांना व प्रेक्षकांना मिळवा आणि या संपूर्ण प्रक्रियेतून नवोदित कलाकारांना कला सादरीकरणा संदर्भात अनेक नवीन गोष्टी शिकता याव्यात ही झपूर्झा ची मूळ संकल्पना. झपूर्झा नाट्य चळवळी ची संकल्पना लेखक, दिग्दर्शक डॉ.क्षितिज कुलकर्णी यांची असूनअध्यक्ष गौरव संभूस आहेत अजेय टीम आयोजन, व्यवस्थापन व प्रोडक्शन बघत आली आहे. झपूर्झा यावर्षी १०व्या वर्षात पदार्पण करत आहे. या घटनेचं विशेष…

Read More

Update 11/10/2022: मिरा-भाईंदरमध्ये नव्या नाट्यगृहाचे उद्घाटन — उद्घाटन सोहळ्यात वाद होऊनही कार्यक्रम यशस्वी रंगभूमी आणि रंगभूमीवर सादर होणाऱ्या विविध कलाकृती यांचा आस्वाद घेण्यासाठी जास्तीत जास्त नाट्यगृहे बांधणं आणि त्यांचं योग्य संगोपन होणं हे खूप महत्वाचं आहे. रंगभूमी.com तर्फे आम्ही नाटकाबद्दल प्रेक्षकांशी संवाद साधतो तेव्हा कित्येकदा, “अमुक नाट्यगृह आमच्या घरापासून नजीक असल्यामुळे आम्ही आजवर नवीन जागा घेण्याचा विचारही केला नाही.”, अशाप्रकारच्या प्रतिक्रिया ऐकून पराकोटीचं समाधान मिळतं. मिरा-भाईंदर शहरातील रसिक प्रेक्षकांसाठीही आज आम्ही अशीच एक खुशखबर घेऊन आलो आहोत. गेले बरेच दिवस रखडलेल्या मिरा-भाईंदर महापालिकेच्या नाट्यगृहाच्‍या उदघाटनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचा मुहूर्त मिळाला आहे! २७ जुलै रोजी हे नाट्यगृह सुरू केले…

Read More

झपूर्झा हा अजेय संस्थेचा वार्षिक इव्हेंट. स्पर्धात्मक वातावरणाच्या बाहेर नव्या कलाकारांना सादरीकरण करता यावं, त्यासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध व्हावा हा या मागचा हेतू. दरवर्षी झपूर्झामध्ये जास्तीत जास्त नवे कलाकार सहभागी होतात. अभिनय, ध्वनीसंयोजन, प्रकाशयोजना, नेपथ्य, व्यवस्थापन अश्या विभागात ही रस असणारे तरुण कलाकार सहभागी होऊ शकतात. आजही म्हणजेच झपूर्झा च्या १०व्या वर्षात ही उद्देश कायम आहे. गेल्या नऊ वर्षात झपूर्झा ही अतिशय महत्त्वाची नाट्य चळवळ म्हणून नावारूपाला आली आहे. संपूर्ण झपूर्झा एकाच थीमवर आधारित असतो. नाट्याविष्कार, नृत्यनाट्य, नृत्याविष्कार यातून त्याच विषयाच्या वेगवेगळ्या बाजू समोर मांडल्या जातात. झपूर्झाची संकल्पना लेखक, दिग्दर्शन डॉ. क्षितिज कुलकर्णी यांची असून निर्माता गौरव संभूस आहेत. तसेच, अजेयची संपूर्ण…

Read More

दीर्घ कवितेचे रसमय सादरीकरण अनुभवण्याचा सुवर्णयोग प्रेक्षकांसाठी चालून आला आहे. या कार्यक्रमांतर्गत, रानकवी पद्मश्री ना. धों. महानोर यांच्या लेखणीतून साकारलेल्या ‘अजिंठा’ या दीर्घ कवितेचे रंगमंचीय सादरीकरण अक्षय वाटवे, माधवी तोडकर, उदय रामदास हे कलाकार करतात. या प्रयोगाची काही खास वैशिष्ट्ये  • मातीशी नातं सांगणाऱ्या लोकसंगीताचा वापर • नाट्यानुभव देणारं अभिवाचन • पूरक प्रकाशयोजना आणि वैशिष्ट्यपूर्ण ध्वनी संयोजन • पार्श्वसंगीतासाठी देशी आणि परदेशी लोकवांद्यांचा वापर • प्रत्यक्ष मंचावर ‘उदू’ या आफ्रिकन आणि ‘दॉयरा’या पर्शियन वाद्यांची साथसंगत तसेच या दीर्घ कवितेतील  • पाण्यास बिलगले ऊन रंग विखरून, • मन चिंब पावसाळी झाडात रंग ओले, • पानं कानात सांगतात, पानं पांगतात, • तळपायावर…

Read More

महाराष्ट्रातील अलिबाग येथील PNP नाट्यगृहाला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दल वाहनं वेळेत घटनास्थळी पोहोचली आहेत. आग लागण्याचं नेमकं अद्याप समोर आलेलं नाही. तरीही नाट्यगृहात वेल्डिंगचे काम सुरू होते व त्यामुळे ही घटना घडली असावी, असे सांगितले जात आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही असे आमच्या प्रतिनिधीला कळले आहे. आजूबाजूच्या परिसरातील रहिवाशीही आग विझविण्याचा प्रयत्न करीत आहेत. https://www.instagram.com/p/Ce2jv5CpOrP/ https://twitter.com/myrangabhoomi/status/1537101504082894849

Read More

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या राज्य नाट्य हौशी स्पर्धा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर २०२१ साली घेता आल्या नव्हत्या. यंदा मात्र स्पर्धेच्या हीरक महोत्सवी वर्षी ‘आजादी का अमृत महोत्सव’ या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा दणक्यात पार पडली. मराठी, हिंदी, संस्कृत तसेच बालनाट्य, संगीतनाट्य व दिव्यांग बालनाट्य अशा सहा वेगळ्या प्रकारांमधून राज्यातील ३४ केंद्रांवर या स्पर्धा घेण्यात आल्या. हिंदी व मराठी भाषेतील नाट्य स्पर्धांचा निकाल जाहीर झालेला आहे व तो पुढीलप्रमाणे आहे. महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा २०२२ — मराठी नाटकांचे निकाल श्री विघ्नहर्ता प्रतिष्ठान (मुंबई) या संस्थेच्या ‘इन द सेल ऑफ सर्व्हायव्हल’ या नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झाले आहे. साईकला कला क्रीडा…

Read More

‘मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं!’, असं म्हणत आपल्याला खऱ्या अर्थाने जगणं शिकवणारा सर्वांचा लाडका अभिनेता प्रशांत दामले आणि त्याचं प्रेक्षकांचं तितकंच लाडकं असलेलं नाटक ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’! आज या नाटकाचे ५०० प्रयोग पूर्ण होणार आहेत. तमाम रसिक प्रेक्षकांचे प्रेम संपादित करून रंगभूमीचा बादशाह ठरलेल्या प्रशांत दामले या चतुरस्त्र अभिनेत्याच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. अर्थात, या महत्वाच्या टप्प्याचं संपूर्ण श्रेय नाटकाच्या संपूर्ण टीमला जातं. प्रशांत दामले, कविता मेढेकर, अतुल तोडणकर, मृणाल चेंबूरकर, प्रतीक्षा शिवणकर, राजसिंह देशमुख व पराग डांगे अभिनीत आणि प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन व गौरी थिएटर्स निर्मित आणि सरगम प्रकाशित ‘एका लग्नाची…

Read More

तुम्हालाही एखाद्या नाट्यानुभवाबद्दल तुमची प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पाठवायची असेल तर ती [email protected] या ई-मेल आयडीवर पाठवू शकता. नवनवीन नाटकांची इत्यंभूत माहिती देणाऱ्या आमच्या YouTube चॅनेलला नक्की भेट द्या! श्री. विजयकुमार अणावकर यांनी पाठवलेली प्रतिक्रिया ‘कुर्रर्रर्रर्र’कुरीत विनोदी नाटक अलीकडच्या काळात रंगभूमीवर विनोदी नाटकांची लाट नव्याने उभारी घेत असतानाच प्रसाद खांडेकर लिखित आणि दिग्दर्शित ‘कुर्रर्रर्रर्र’ या नाटकाने गंभीर विषयाला  हलक्याफुलक्या विनोदाची झालर लावून प्रेक्षकाना आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे. बाळंतपण आणि मातृत्व यामधील सुंदर क्षण या नाटकात हळुवार विनोदाने साकारले आहेत. अक्षर आणि पूजा यांच्या लग्नाला पाच वर्षे झालेली असून देखील त्यांना बाळ होत नाही. पूजाला लागलेली बाळाची हुरहूर आणि बाळासाठी तिच्यामागे लागलेला आईचा…

Read More

नुकताच २७ मार्च रोजी पार पडलेला जागतिक रंगभूमी दिन यंदा सर्व रंगकर्मींनी जोशात साजरा केला. कोविडच्या संकटामुळे काही काळ स्थगित झालेली नाट्यसृष्टी नव्याने उजळू लागल्यामुळे रंगकर्मींमध्ये दिसणारा हा उत्साह स्वाभाविकही होता. अशा या दिवशी पीटर सेलर्स या पिटस्बर्ग, पेनसिल्वानिया, यूएसए येथील संगीतिका, नाटक आणि महोत्सव दिग्दर्शक यांनी सर्व नाट्यदर्दींना जागतिक रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा देत एक महत्वाचा संदेशही दिला आहे. ज्येष्ठ लेखक, नाट्य प्रशिक्षक व दिग्दर्शक संभाजी सावंत यांनी हा संदेश अनुवादित करून आपल्यापर्यंत पोहोचवला आहे. हा संदेश तमाम नाट्यप्रेमींसाठी अतिशय महत्वाचा आहे. प्रस्तुत संदेश नक्की वाचा! मूळ लेखक: पीटर सेलर्स अनुवाद: संभाजी सावंत मित्रहो, काळ विलक्षण उद्भवला आहे! आज अवघं…

Read More

नाटकाच्या शेवटी कथानकाला ट्विस्ट देत गूढ उकलणारी रहस्यमय नाटकं पसंत करणारा एक खास प्रेक्षकवर्ग आहे. अशा प्रेक्षकवर्गासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. श्वेता पेंडसे लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित ’38, कृष्ण व्हिला’ ही एक रोमांचक नाट्यकृती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. १९ मार्च रोजी या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग सादर होणार आहे. या नाटकात गिरीश ओक आणि श्वेता पेंडसे हे कलाकार असणार आहेत. इतर कलाकारांबद्दल अद्याप उलगडा करण्यात आलेला नाही. जाणून घ्या काय आहे  डॉ. गिरीश ओक यांचे बहारदार चिवित्रांगण! कथानकाबद्दल थोडंसं… ’38 कृष्ण व्हिला’ नाटकामध्ये गिरीश ओक ‘देवदत्त कामत’ या भूमिकेत आपल्यासमोर येणार आहेत. देवदत्त कामत यांच्यावर नंदिनी चित्रे ही…

Read More

गौरी थिएटर निर्मित आणि प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन प्रकाशित ‘सारखं काहीतरी होतंय!’ या आगामी नाटकाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. नाटकाची चर्चा होण्यामागे बरीच कारणं आहेत. सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे हास्यसम्राट प्रशांत दामले या नाटकातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार आहेत. दुसरं कारण म्हणजे या नाटकाचा लेखक-दिग्दर्शक असणार आहे आपल्या सगळ्यांचाच लाडका संकर्षण कऱ्हाडे! तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे या नाटकाच्या निमित्ताने आपली अत्यतं प्रिय अशी प्रशांत दामले आणि वर्षा उसगांवकर ही जोडी आपल्या भेटीस येणार आहे. आता याहून आनंदाची बातमी! ‘सारखं काहीतरी होतंय!’ या नाटकाच्या शुभारंभाची तारीख जाहीर झालेली आहे. शुक्रवारी, २५ मार्च रोजी या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग…

Read More

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या राज्य नाट्य हौशी स्पर्धा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर २०२१ साली घेता आल्या नव्हत्या. यंदाचे या स्पर्धेचे हीरक महोत्सवी वर्ष असणार आहे. आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा यंदा होत असल्याने त्यास विशेष महत्त्व असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी सांगितले. मराठी, हिंदी, संस्कृत तसेच बालनाट्य, संगीतनाट्य व दिव्यांग बालनाट्य अशा सहा वेगळ्या प्रकारांमधून राज्यातील ३४ केंद्रांवर या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या या हीरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धेचा राज्यस्तरीय उद्घाटन सोहळा सोमवारी २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली.…

Read More