रंगभूमी.com बद्दल थोडसं…

नमस्कार!!!

रंगभूमीशी निगडित ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी या Online रंगमंचावर तुमचं  स्वागत आहे. हजारो लाखो कलाकार आणि तितकेच रसिक प्रेक्षक मिळून रंगभूमीचा विकास होतो. म्हणूनच, रंगभूमीशी संबंधित बातम्या, येणारी नवीन नाटके, त्यांची समिक्षणे तसंच कलाकारांशी मारलेल्या गप्पा हे सगळं तमाम रसिक प्रेक्षकांपर्यंत वेळोवेळी पोहोचवण्याचा प्रयत्न म्हणजे रंगभूमी.com. कट्टर नाट्यप्रेमींसाठी तर ही मेजवानीच आहे. पण, आमचा प्रयत्न जास्तीत जास्त वाचकांमध्ये नाटकाची रुची निर्माण करण्याचाच असेल. रंगभूमीचे संस्कार येणाऱ्या पिढ्यांवर होणे खूप महत्वाचे आहे असं आम्हाला वाटतं. प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिलेली काही ऐतिहासिक नाटके, नाटकांचे प्रकार आणि नाटकांमधील कलाकारांनी त्यांच्या सशक्त अभिनयाच्या जोरावर उभा केलेला इतिहास! 

हे सगळं वैभव येणाऱ्या पिढीकडे संक्रमित करण्यापासून आज जर आपण मागे हटलो तर येणाऱ्या पिढ्यांना या जिवंत कलाकृतींचा आनंद लुटता येणार नाही आणि असं झालेलं वर्तमान पिढीसाठी योग्य ठरणार नाही. म्हणूनच तुमची साथ या प्रवासात अनिवार्य आहे. वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करत रहा. जर तुम्हाला रंगभूमीशी संबंधित काही शंका असतील, प्रश्न असतील तर आम्हाला [email protected] या ई-मेल ID वर नक्की पाठवा. तसच, रंगभूमी.com (rangabhoomi.com) वर कोणत्या प्रकारचे लेखन वाचायला आवडेल तेही कळवा.

TwitterInstagramFacebook

तसंच, आम्ही या वेबसाइटवर करत असलेले काम आपल्याला आवडत असल्यास, कृपया खालील बटण वापरुन यथाइच्छा, यथाशक्ती देणगी देऊन ही वेबसाइट सुरू ठेवण्यास सहकार्य करा. मूल्य कितीही लहान असो वा जास्त, ती रंगभूमी.com सुरू ठेवण्यास मदतीचा हात ठरू शकते.


संपादक: प्रेषित देवरुखकर

कार्यकारी संपादक: गायत्री टंकसाळी-देवरुखकर

नाट्य समीक्षक: अभिषेक अरविंद महाडिक

विशेष सहाय्य: माला टंकसाळी

विशेष आभार: अक्षय पाथरे


आपल्यालाही रंगभूमी.com च्या टीममध्ये सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही [email protected] या ई-मेल ID वर संपर्क साधू शकता.