Close Menu
रंगभूमी.com
    Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp Telegram RSS
    • Home
    • About Us
    • Subscribe
    • Donate
    • Advertise
    • Contact Us
    Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp Telegram RSS
    रंगभूमी.com
    • Home
    • Book Tickets
    • Marathi Natak Info
    • Shows Calendar
    • News
      7 vi pass natak cover

      ७ वी पास — मीना नाईक आणि प्राजक्त देशमुख यांचं नवीन नाटक!

      November 30, 2023
      62nd maharashtra marathi rajya natya spardha competition

      ६२ वी महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा — हौशी मराठी नाट्य स्पर्धा २०२३-२०२४

      August 23, 2023
      vaibhav mangle summer heat facebook post

      आधीच उकाडा आणि त्यात संतापाचा वणवा! — “कुठे आणि कशी मागावी दाद!”, वैभव मांगलेंचा सवाल

      May 16, 2023
      ncpa pratibimb natya utsav 2023 cover

      प्रतिबिंब मराठी नाट्य उत्सव — नाटकं बघण्यासाठी, शिकण्यासाठी आणि जगण्यासाठी आयोजिलेला नाट्योत्सव!

      May 1, 2023
      Natyadarbar

      नाट्यदरबार — दर्जेदार नाट्यानुभवांची रंगतदार मैफल!

      April 26, 2023
    • Reviews
      ek zhunj vaaryaashi cover

      एक झुंज वाऱ्याशी [प्रेक्षक प्रतिक्रिया] — एक वास्तववादी कलाकृती

      August 23, 2023
      devmanus marathi natak cover 2

      देवमाणूस — युद्धाची भीषणता दाखवणारं वास्तवदर्शी चित्रण

      April 29, 2023
      sad sakharam natak

      भावभावना परत मिळवण्यासाठी भावनिक गुंत्यात अडकलेला ‘Sad सखाराम’ [Review]

      January 17, 2023
      Aamne Saamne Marathi Natak

      आमने सामने — दोन संसाराची हटके गोष्ट

      December 30, 2022
      Andhe Jahaan Ke Andhe Raaste Marathi Natak Review

      अंधे जहाँ के अंधे रास्ते [Review] — शहराच्या घाणीत अडकलेल्या मॅनहोल सफाई कर्मचाऱ्यांची कथा

      June 30, 2022
    • Podcast
    • Opinion
      ek zhunj vaaryaashi cover

      एक झुंज वाऱ्याशी [प्रेक्षक प्रतिक्रिया] — एक वास्तववादी कलाकृती

      August 23, 2023
      Me Swara Aani Te Dogha Marathi Natak Review

      मी स्वरा आणि ते दोघं! [प्रेक्षक प्रतिक्रिया] — मराठी रंगभूमीला नवनवीन विषय साकारण्यासाठी मार्गदर्शक ठरणारे नाटक!

      June 16, 2023
      sad sakharam natak

      भावभावना परत मिळवण्यासाठी भावनिक गुंत्यात अडकलेला ‘Sad सखाराम’ [Review]

      January 17, 2023
      Aamne Saamne Marathi Natak

      आमने सामने — दोन संसाराची हटके गोष्ट

      December 30, 2022
      Pradeep Patwardhan Moruchi Mavshi Prashant Damle

      चटका लावणारी ‘एक्झिट’

      August 11, 2022
    • Events
      natya parishad yashwant matunga opening 2023 cover

      कलाकारा तू ‘यशवंत’ हो!

      June 15, 2023
      ncpa pratibimb natya utsav 2023 cover

      प्रतिबिंब मराठी नाट्य उत्सव — नाटकं बघण्यासाठी, शिकण्यासाठी आणि जगण्यासाठी आयोजिलेला नाट्योत्सव!

      May 1, 2023
      Natyadarbar

      नाट्यदरबार — दर्जेदार नाट्यानुभवांची रंगतदार मैफल!

      April 26, 2023
      mushafiri cover 2

      पु.लंसोबत एका बहुरंगी ‘मुशाफिरी’चा आस्वाद घ्यायला चला!

      March 17, 2023
      arogyam dhanasampada prayogik kalamanch opening cover

      मकरंद देशपांडे यांच्या हस्ते ‘आरोग्यम धनसंपदा प्रायोगिक कलामंचाचे’ उद्घाटन — प्रायोगिक नाट्यमहोत्सवाने कलामंचाचा शुभारंभ

      October 17, 2022
    • रंगभूमी.com
      • About Us
      • Subscribe to Us
      • Advertise Here
      • Contact Us
    रंगभूमी.com
    Home»Events»मराठी नाट्य कलाकार संघातर्फे ८ व्या जागतिक रंगकर्मी दिवसाचे आयोजन — रंगकर्मींसाठी कलाकार दत्तक योजनेची घोषणा
    Events 3 Mins Read

    मराठी नाट्य कलाकार संघातर्फे ८ व्या जागतिक रंगकर्मी दिवसाचे आयोजन — रंगकर्मींसाठी कलाकार दत्तक योजनेची घोषणा

    By गायत्री देवरुखकरNovember 26, 2021Updated:December 16, 2021
    ८ वा जागतिक रंगकर्मी दिवस • २५ नोव्हेंबर, २०२१
    Share
    WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    २५ नोव्हेंबर, २०२१ रोजी प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहामध्ये एक दिमाखदार सोहळा पार पडला, ज्याचे नाव होते ‘रंगबरसे’ आणि निमित्त होते ८ वा जागतिक रंगकर्मी दिवस! हा सोहळा मराठी नाट्य कलाकार संघ व आरती आर्ट अकादमी च्या सहयोगाने आयोजित करण्यात आला होता. मराठी नाट्य कलाकार संघाचे अध्यक्ष माननीय प्रदीप कबरे यांच्या मार्गदर्शनाखाली, संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेते कै. भालचंद्र पेंढारकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या उपस्थितीत २५ नोव्हेंबरला २०१४ साली यशवंत नाटय़मंदिरात मराठी कलाकार संघाच्या वतीने पहिला जागतिक रंगकर्मी दिन साजरा झाला होता. कोरोनाचे संकट उद्भवल्यामुळे गतवर्षी रंगकर्मी दिन साजरा झाला नाही. मात्र या वर्षी प्रचंड उत्साहात हा सोहळा पार पडला. गेल्या सात वर्षांत भालचंद्र पेंढारकर, मधुकर तोरडमल, गंगाराम गवाणकर, विक्रम गोखले, किशोर प्रधान आणि दिलीप प्रभावळकर यांचा या दिवशी सत्कार करण्यात आला होता. या वर्षीचे सन्मानमूर्ती अशोक सराफ मामा होते.

    अशोक सराफ यांच्या सोबत मराठी नाट्य कलाकार संघाचे कार्यवाह प्रमुख सुशांत शेलार तसेच समीर चौघुले, सुनील बर्वे, मीरा मोडक, अर्चना नेवरेकर, जयवंत वाडकर, मानसी जोशी व मेघा घाटगे अशा काही आपल्या लाडक्या कलाकारांचीही कार्यक्रमाला उपस्थिती होती. उत्सवमूर्ती अशोक मामांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सोहळ्याला सुरुवात झाली. त्यांनतर नाट्यसंगीताचा एक सुंदर कर्यक्रम झाला. सर्वच गाणी अप्रतिमरीत्या सादर झाली. भालचंद्र पेंढारकर यांचे सुपुत्र ज्ञानेश पेंढारकर यांनी गायलेल्या ‘आई तुझी आठवण येते’ या गाण्याची येथे विशेष नोंद करावीशी वाटते. त्यांचे स्वर आणि सूर दोन्ही प्रेक्षकांच्या मनात घर करून गेले. या छोट्याशा पण अविस्मरणीय नाट्य संगीत कार्यक्रमानंतर संघाचे कार्यवाह प्रमुख सुशांत शेलार यांनी मनोगत व्यक्त केले. एकंदर सोहळा आणि नाट्य कलाकार संघाबद्दल बोलताना सुशांत शेलार म्हणाले की, “प्रत्येक कलाकाराने नाट्य कलाकार संघाशी जोडले गेले पाहिजे. नाट्य कलाकार संघाची प्रगती होण्यासाठी सगळ्यांची मदत अपेक्षित आहे. लॉकडाऊनच्या काळात नाट्य कलाकार संघातर्फे बऱ्याच गरजू कलावंतांना मदतीचा हात मिळाला. मी आज या सोहळ्याच्या निमित्ताने आवाहन करू इच्छितो की प्रत्येक कलाकाराने त्याच्या एका per day चे पैसे गरजू नाट्यकर्मींसाठी संघाकडे द्यावेत. जेणेकरून रंगकर्मींसाठी विमा योजना किंवा रंगकर्मींसाठी इतर काही फायदेशीर योजना अंमलात आणता येतील.”

    YouTube player

    कलाकार दत्तक योजना

    त्यानंतर, प्रदीप कबरे यांनी मंचावर येऊन, कलाकार दत्तक योजनेची संकल्पना प्रेक्षकांसमोर मांडली. या योजनेत कलाकार अथवा प्रेक्षकच गरजू कलाकारांच्या मदतीसाठी उतरणार असल्याचे कबरे यांनी स्पष्ट केले. बरीच वर्षे रंगभूमीसाठी काम करत आलेल्या परंतु आता वयोमानानुसार थकलेल्या व आर्थिकरीत्या मदतीची गरज असलेल्या काही रंगकर्मींसाठी इतर रंगकर्मी अथवा इच्छुक प्रेक्षकांकडून आर्थिक मदत देणगी स्वरूपात उभी करणे, असे या योजनेचे सर्वसाधारण रूप असणार आहे. जमेची बाजू म्हणजे मदत म्हणून आलेली रक्कम सर्वांसमक्ष, धनादेश स्वरूपात संबंधित रंगकर्मींना संबंधित दात्यांच्या हातून प्रदान करण्यात आली. तुम्हीही या योजनेत सहभागी होऊन तुमचा खारीचा वाट उचलू शकता. तुम्ही इच्छुक असाल तर आम्हाला hello@rangabhoomi.com या ई-मेल आयडीवर कळवा. आम्ही तुमचा संदेश नक्कीच प्रदीप कबरे यांच्यापर्यंत पोहोचवू.

    YouTube player
    YouTube player

    कलाकार दत्तक योजनेच्या घोषणेनंतर, माननीय भालचंद्र पेंढारकर यांच्या YouTube वरील प्रस्तुत डॉक्युमेंटरीचा उल्लेख करण्यात आला. वाचकांनी ही डॉक्युमेंटरी नक्की बघावी.

    YouTube player

    दिल धक धक करे पुस्तक प्रकाशन

    त्यांनतर प्रदीप कबरे लिखित ‘दिल धक धक करे‘ या पुस्तकाचे उत्सवमूर्ती अशोक सराफ यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. जागतिक रंगकर्मी दिवस असल्यामुळे उपस्थित कलाकारांना रंगमंचावर बोलवून संगीत खुर्चीचा एक खेळही रंगला.

    ‘दिल धक धक करे’ पुस्तक प्रकाशन

    आणि या संपूर्ण सोहळ्यावर सोन्याचा कळस चढवावा तसे एक शेवटचे सदर प्रेक्षकांच्या भेटीस आले, ते म्हणजे अशोक सराफ यांची लाईव्ह मुलाखत. या मुलाखतीचे होस्ट अर्थातच प्रदीप कबरे होते. जवळपास ४० मिनिटे सुरू असलेल्या या रंगतदार मैफिलीमुळे कार्यक्रमाचा नूरच पालटून गेला.

    प्रदीप काबरे यांनी समस्त प्रेक्षकवर्ग आणि रंगकर्मी वर्गाला दत्तक योजनेसाठी आवाहन करताना असेही नमूद केले की ही मदत न समजून ज्येष्ठ रंगकर्मींप्रती आपण व्यक्त केलेली कृतज्ञता समजावी. आम्ही नाट्य कलाकार संघ व त्याच्याशी संबंधित सहकाऱ्यांना त्यांच्या नवीन उपक्रमासाठी शुभेच्छा देतो व तुम्हीही कलाकार दत्तक योजनेत लवकरच सहभागी व्हाल अशी सदिच्छा व्यक्त करतो.

    ह्या कार्यक्रमातील ईतर व्हिडिओ पाहण्यासाठी रंगभूमी.com च्या YouTube Channel ला Subscribe करायला विसरु नका.

    Natak Tickets Online Booking
    Ashok Saraf Kalakar Dattak Yojana Pradeep Kabre Sameer Choughule Sunil barve Sushant Shelar कलाकार दत्तक योजना जयवंत वाडकर दिल धक धक करे भालचंद्र पेंढारकर मानसी जोशी मीरा मोडक मेघा घाटगे
    Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Telegram Reddit Tumblr Email
    Previous Articleनाटकाच्या तालमीसाठी हक्काची जागा नाही — रंगकर्मींची शोकांतिका
    Next Article हौस माझी पुरवा [Review] — सहकुटुंब अनुभवावा असा हास्यरसाचा बूस्टर डोस

    Related Posts

    Amar Photo Studio Marathi Natak Info

    ‘अमर फोटो स्टुडिओ’ शेवटच्याकाही मोजक्या प्रयोगांसह पुन्हा रंगभूमीवर!

    December 31, 2022
    Eka Lagnachi Pudhchi Goshta 500th Show

    ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ नाटकाच्या ५०० व्या प्रयोगानिमित्त प्रशांत दामले यांचे मनोगत

    May 31, 2022
    Eka Lagnachi Pudhchi Goshta — Marathi Natak

    ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ नाटकाचा ५०० वा प्रयोग! — मान्यवरांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचे आयोजन

    May 29, 2022

    Leave A Reply Cancel Reply

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

    रंगभूमी.com
    Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp Telegram RSS
    © 2023 रंगभूमी.com. Powered by iXyr Media.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.