Author: रंगभूमी.com

Online एकपात्री अभिनय स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचलेल्या सर्व स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन! स्पर्धेच्या निकालामध्ये तुमचे नाव जाहीर नाही झाले म्हणून हताश होऊ नका. रंगभूमी.com कडून विजेत्यांसोबत अजून एक पारितोषिक जिंकण्याची संधी तुम्हाला मिळत आहे. हे पारितोषिक पूर्णपणे स्पर्धकांनी Facebook आणि YouTube वर गोळा केलेल्या चाहत्यांच्या पाठिंब्यावर अवलंबून असेल. म्हणूनच या पारितोषिकाला “विशेष लक्षवेधी पारितोषिक” या नावाने घोषित करण्याचे आम्ही ठरवले आहे. मोठ्या संख्येने चाहत्यांचे लक्ष वेधून घ्या आणि हे पारितोषिक जिंका. आम्ही अंतिम फेरीमध्ये पोहोचलेल्या सर्व स्पर्धकांचे व्हिडिओज रंगभूमी.com च्या Facebook पेज आणि YouTube चॅनलवर प्रकाशित केले आहेत. तुमचे वैयक्तिक व्हिडिओज तुम्हाला पुढील Playlist मध्ये मिळतील. YouTube → https://www.youtube.com/playlist?list=PLOzHSEMrkV4dj6SpTYhCPD2jJFBoRxmGP या सर्व…

Read More

मी आणि रंगभूमी… नमस्कार मित्रांनो,  मी रंगभूषाकार रंगभूषा आणि कलाकार ह्यांच नातं खरंच अतुलनीय असे आहे असं म्हणायला हरकत नाही, बरोबर नां…?? कां…??? आणि कसे..???? कलाकार रंगमंचावर प्रवेश करण्याआधी चेह-याला रंग लावून प्रवेश करतो.  कारण अभिनय, आपली अदाकारी आणि भूमिकेला साजेशी रंगभूषा शेवटच्या प्रेक्षकापर्यंत पोहोचणे आवश्यक असते. आणि ते काम रंगभूषा व त्याचा अभिनय करीत असतात. आता मी रंगभूषाकार कसा झालो? खरं म्हणजे मी अभिनेता. एका बालनाटकात छोटाशी भूमिका करीत होतो. दोन दिवस अगोदर लेखक श्री. बबन परब ह्यांना एका प्रसिद्ध रंगभूषाकाराने येणार नसल्याचे कळवले. लगेचच आम्ही ओळखीच्या, जास्त नाही पण चार / पाच लोकांना विचारणा केली. काही रंगभूषाकार तयार…

Read More

रात्रीचे ११.५० झाले होते… नितीन केबिन मध्ये बसून भिंतीवर टांगलेल्या कॅलेंडर कडे एकटक पाहत विचार करत होता.. त्याच्या डोळ्यात एक प्रकारची भीती दिसत होती… संपूर्ण ऑफिस मध्ये फक्त तो एकटाच होता… नितीन पेशाने civil engineer… महिन्याभरापूर्वीच त्याला कंपनीचं CEO हे पद मिळालं होतं तेही अपघातानेच… कारण मागील महिन्यातच त्याचे बॉस म्हणजेच आधीचे CEO यांचा अपघाती मृत्यू झाला होता आणि आपसूकच त्याला हे पद मिळालं होतं… नितीन गेली ५ वर्ष या कंपनीत काम करत होता… त्यामुळे साहजिकच कंपनीच्या एकूण एक गोष्टी तो जाणून होता… तो CEO चा जणू काही तो Right Hand च बनून गेला होता. कंपनीचा CEO नितीनला न विचारता कंपनीशी…

Read More

काही दिवसांपूर्वी रंगभूमी.com वेबसाईटवर आम्ही Online एकपात्री अभिनय स्पर्धा आयोजित केली होती. वेबसाईट सुरू होऊन एक महिनाही झालेला नसताना स्पर्धेला इतका उदंड प्रतिसाद मिळवून दिल्याबद्दल आम्ही रंगभूमी.com च्या वाचकांचे आभारी आहोत. Online एकपात्री अभिनय स्पर्धेमध्ये प्रवेश घेण्यासाठी जो भरघोस प्रतिसाद आम्हाला मिळाला त्या प्रतिसादामुळेच स्पर्धेचा निकाल घोषित करण्यासाठी परीक्षकांना थोडा जास्त अवधी देणे आम्हाला हिताचे वाटले. म्हणूनच, स्पर्धेचा निकाल आम्ही थोडा पुढे ढकलत आहोत. या स्पर्धेचा निकाल आता १ मे, २०२० रोजी म्हणजेच महाराष्ट्र दिनी सायंकाळी ७ वाजता रंगभूमी.com च्या YouTube चॅनेल वर जाहीर होणार आहे. तरीही निकाल बघण्यासाठी रंगभूमी.com च्या YouTube चॅनेल वर आत्ताच Subscribe करा. अजून एक महत्वाची…

Read More

प्रकाशयोजनाकार उन्मेष वीरकर यांच्या अनुभवाची शिदोरी एखादा सिनेमा जर यशस्वी करायचा असेल तर तुमचा छायाचित्रकार (कॅमेरामन) आणि संकलनकार (एडिटर) हे खुप महत्वाचे घटक असतात. छायाचित्रकार दिग्दर्शकाला सिनेमाद्वारे काय सांगायचे आहे हे टिपत असतो आणि संकलनकार सिनेमाची लय, गती यांचा योग्य समन्वय साधून सिनेमा दिग्दर्शकाच्या हवाली करतो. किंबहुना असंच म्हटलं जातं सिनेमा हा नेहेमी एडिटिंग टेबलवरच बनतो.  म्हणूनच विदू विनोद चोप्रा, सत्यजित रे यांच्यासारखे एडिटिंगवर वर्चत्व असलेले दिग्दर्शक खूप यशस्वी झाले. सिनेमा क्षेत्रातील छायाचित्रकार आणि संकलनकार या भूमिका नाट्यक्षेत्रामध्ये प्रकाशयोजनाकार हा एकटा पार पाडत असतो.  रंगमंचावर अनेक कलाकार असताना बाकी सर्व कलाकारांना कमी प्रकाशात ठेऊन, फक्त एका कलाकारांवर फोकस करून संपूर्ण…

Read More

कोरोनाच्या lockdown मुळे घरात बसलोय. उगाचच भूतकाळाबद्दल विचार करायला लागलो आणि अचानक आठवण आली की कॉलेजात असताना मला वाचनाचा जबरदस्त छंद होता. जो आता माझ्या बाबतीत जवळ जवळ नामशेष झालायं. कारण एकच – संसारात पडलो आणि निवृत्तीनंतर आळस. मग ठरवलं – वाचन सुरु करायचं. घरातली सर्व वर्तमानपत्रं काढली. माझी एक सवय, मी वर्तमानपत्र शेवटच्या पानापासून वाचायला सुरुवात करतो. त्याप्रमाणे म.टा. च्या १५ मार्चच्या अंकाचं शेवटचं पान समोर घेतलं. प्रथमेश राणे लिखित लेखाचा मथळा पाहिला, “चित्रपटांना ‘कंटेनर थियेटर’ चे दिवस” हा लेख वाचून काढला. सिंधुदुर्ग फिल्म फेस्टिवल मध्ये ही संकल्पना उदयास आली असं लेखकाने लिहिलंय. ‘कंटेनर थियेटर’ म्हणजे फिरते थियेटर म्हणजेच टुरिंग टॉकीज – मोबाईल थियेटर. शहरातील थियेटरमध्ये, शहराबाहेरील…

Read More

अलिकडच्या काळातील नाट्य/सिनेसृष्टीला श्री. विजय कदम हे नाव काही नवीन नाही. आपल्या हजरजबाबी विनोदी अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांची मने केव्हांच जिंकली आहेत. अगदी लहान असल्यापासून त्यांच्यातील अभिनयाचे गुण विकसित होत गेले. सुप्रसिद्ध संगीतकार राम कदम हे त्यांचे वडील. परळच्या डॉ. शिरोडकर हायस्कुलमध्ये असताना शाळेच्या पाच दिवसीय गणेशोत्सवात प्रत्येक वर्गाचे नाटक वा नृत्यांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम होत असत. त्यात ते नाटकांमध्ये हिरिरीने भाग घेऊन वर्गाला व स्वतःला उत्तम पारितोषिक मिळवून देत असंत. त्याचीच पुनरावृत्ती पुढे दिवाळीच्या सुट्टीनंतर होणाऱ्या स्नेहसंम्मेलनातील कार्यक्रमाच्या वेळी होत असे. तेव्हाही हिरिरीने नाट्यप्रवेशात भाग घेऊन ते चमकत असत. आताचे सुप्रसिद्ध कलाकार श्री. नागेश मोर्वेकर यांचीही त्यांना तेंव्हा उत्तम साथ…

Read More

मराठी माणूस आणी रंगभूमी किंवा नाटक यांचं नातं केवळ अजोड आहे. पाण्याशिवाय मासा जिवंत राहू शकत नाही, तसंच मराठी माणूस नाटकाशिवाय जगणं अशक्य! मराठी रंगभूमी आज चौफेर घोडदौड करत आहे. या सर्वामागे कलाकार, तंत्रज्ञ त्याचप्रमाणे बॅकस्टेज कलाकार यांचंही योगदान मोठं आहे. काही दशकांपूर्वी कै. बालगंधर्व, मा. दिनानाथ, अशा मातब्बर कलाकारांनी संगीत नाटकांच्या रूपाने रंगभूमीला सुवर्णकाळात नेऊन ठेवले. कालांतराने तंत्रज्ञानात प्रगती झाली. मूकपट, बोलपट, चित्रपट आले. पडद्यावर हलणारी, बोलणारी चित्रे पाहून प्रेक्षक हरखून गेला. सिनेमा थियेटरकडे वळलेला प्रेक्षकांचा वाढता ओघ थांबवण्याचे व त्याला पुन्हा रंगभूमीकडे वळवण्याचे मोठे दिव्य नाट्यकर्मींना करावे लागले. पुढे चीन, पाकिस्तान या पारंपारिक शत्रूंनी लावलेली युद्धे, त्यामुळे निर्माण…

Read More