आपल्या वाचनात बऱ्याच कथा, एकांकिका येत असतात. कधी आपल्याला त्या आवडतात तर कधी नाही आवडत. वाचताना जेवढी मजा आली तेवढी त्या कथेचं सादरीकरण बघताना येईलच असं नाही. ‘नवरा आला वेशीपाशी’ दीर्घांकाचे यश नवले आणि राजरत्न भोजने यांनी केलेले लेखन लॉकडाउनच्या काळात माझ्या वाचनात आले होते. लेखन वाचून मला ते मनापासून आवडलेही होते आणि हल्लीच मला यश नवले आणि राजरत्न भोजने लिखित-दिग्दर्शित ‘नवरा आला वेशीपाशी’ हा दीर्घांक नाट्यगृहात पाहण्याची संधी मिळाली. मला सांगावयास अत्यंत आनंद होत आहे की दीर्घांकाचे लेखन जितके सुंदर आहे तितक्याच सुंदरपणे ते नाट्यरूपात सादरही करण्यात आले आहे. त्याबद्दल, या नाटकाचे लेखक-दिग्दर्शक यश नवले आणि राजरत्न भोजने यांचे मन:पूर्वक…
Author: गायत्री देवरुखकर
आजच्या काळात अभिनयाचे तांत्रिक शिक्षण घेऊनच सिने-नाट्यसृष्टीत पदार्पण करण्याचा मानस बरेच तरुण व्यक्त करताना दिसतात. अशा तरुण पिढीच्या अभिनयकौशल्याला वाव मिळावा म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ललित कला केंद्र गुरूकुल आणि अभिनय, कल्याण या संस्था एकत्रितपणे आपल्यासाठी घेऊन येत आहेत ‘अभिनय प्रमाणपत्र अभ्यासक्रम’! Abhinay Pramanpatra Abhyaskram अभिनय, कल्याण गेली २२ वर्षे मराठी रंगभूमीवर सातत्याने नव-नवीन प्रयोग सादर करीत आली आहे. नाट्यविषयक उपक्रम राबवत आली आहे. भारतभर संस्थेने स्वत:चा प्रेक्षक वर्ग निर्माण केला आहे. संस्थेच्या वाटचालीत आता नवा टप्पा सुरू होतोय. अभिनय, कल्याण संस्थेचे अध्यक्ष अभिजीत झुंजारराव यांनी आमच्या टीमशी बोलताना सांगितले की, “सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ललित कला केंद्र गुरूकुल…
कुर्रर्रर्रर्र — निखळ मनोरंजनाची हमखास डिलिव्हरी! लोकहो! नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका नव्या कोऱ्या नाटकाने मुंबईमधील नाट्यगृहांमध्ये हाऊसफुल्ल धुमशान घातलं आहे. या तुफान नाटकाचं नाव आहे कुर्रर्रर्रर्र! व्ही. आर. प्रोडकशन आणि प्रग्यास क्रिएशन्स निर्मित ‘कुर्रर्रर्रर्र’ हे नाटक म्हणजे प्रेक्षकांसाठी, सहकुटुंब आनंद घ्यावा, अशी मनोरंजनाची हमखास डिलिव्हरी आहे. आपल्या सर्वांचेच लाडके कलाकार विशाखा सुभेदार, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर आणि पॅडी कांबळे या धुरंधर विनोदवीरांनी नाटकाच्या विषयाचे गांभीर्य राखत प्रेक्षकांना मनमुराद हसवले आहे. या नाटकात प्रेक्षकांसाठी बरीच ‘surprises’ आहेत. ती मी इथे न उलगडलेलीच बरी! नाटक बघताना या मध्ये मध्ये येणाऱ्या ‘twist’ ची बातच काही और आहे. Kurrrr Marathi Natak Synopsis अक्षर (प्रसाद…
शासनाच्या आदेशानुसार आता ५०% प्रेक्षक उपस्थितीत नाटकं बघता येत आहेत. तब्बल दीड वर्षानंतर रंगभूमी पुनर्जिवित झाली आहे. रंगकर्मींना आज प्रेक्षकांच्या सहकार्याची जेवढी गरज आहे तेवढीच प्रेक्षकांनाही नाटकातून होणाऱ्या निखळ मनोरंजनाची गरज आहे. म्हणूनच, प्रेक्षक आणि रंगकर्मींमधील दुवा बनत आम्ही तुम्हाला एक सुवर्णसंधी देत आहोत. एक अनोखी स्पर्धा आयोजित करत आहोत. या स्पर्धेमध्ये या महिन्यात सहभागी होणार आहेत ४ नाट्यगृहे, ४ प्रयोग, १ दर्जेदार नाटक आणि लाखो प्रेक्षक! आम्ही दर महिन्यात एका नाटकाची दोन तिकिटे जिंकण्याची तुम्हाला संधी देणार आहोत. या महिन्यातील नाटक आहे कल्याणी पाठारे लिखित आणि अद्वैत दादरकर दिग्दर्शित दोन अंकी नाटक ‘दादा, एक गुड न्यूज आहे’. या नाटकाचे…
प्रग्यास क्रिएशन्स आणि व्ही. आर. प्रोडकशन्स या नाट्यसंस्थांची नवीन निर्मिती म्हणजेच ‘कुर्रर्रर्रर्र’ हे नाटक ४ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या नाटकाचे लेखक-दिग्दर्शक प्रसाद खांडेकर आहेत. तर पूनम जाधव आणि विशाखा सुभेदार या नाटकाच्या निर्मात्या आहेत. या नाटकाच्या निमित्ताने विशाखा सुभेदार प्रथमच निर्मातीच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, विशाखा सुभेदार आणि पंढरीनाथ (पॅडी) कांबळे हे अभिनेते या नाटकात आपल्याला दिसणार आहेत. नेपथ्य संदेश बेंद्रे यांनी केलेले असून संगीत अमीर हडकर यांचं आहे. नाटकाचे सूत्रधार अनेक नाटकांचे व्यवस्थापक गोट्या सावंत हे आहेत. रंगभूमी.com च्या संपूर्ण टीमने ‘कुर्रर्रर्रर्र’ च्या सर्व कलाकारांशी नाटकाची तालीम सुरु असताना भेट घेतली. नाटकाचे…
हौस माझी पुरवा — सहकुटुंब अनुभवावा असा हास्यरसाचा बूस्टर डोस लॉकडाऊनमध्ये घरी बसून कंटाळलेल्या प्रेक्षकांना ज्या ‘booster dose’ ची गरज होती तो बूस्टर डोस म्हणजे ‘हौस माझी पुरवा’ हे नाटक! तुम्ही जर लॉकडाऊनला वैतागलाय आणि आता संपूर्ण कुटुंबासोबत तुम्हाला काहीतरी ‘refreshing’ बघावंसं वाटतंय तर तुमच्यासाठी संतोष पवार लिखित-दिग्दर्शित ‘हौस माझी पुरवा’ हे नाटक उत्तम पर्याय आहे. सध्याच्या राजकीय व सामाजिक ज्वलंत विषयांवर विनोदाच्या अंगाने पण, सडेतोड भाष्य करणारं हे नाटक प्रेक्षकांना ३ तास खिळवून ठेवतं. लोकशाहीचं आजच्या काळात काय महत्व आहे हे हास्याच्या कोषातून लोकांना समजावयाचा संतोष पवार यांचा हा प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे. https://www.youtube.com/watch?v=S6QTjHvnRXQ Haus Mazi Purva Marathi Natak Review नाटकाची…
गेला माधव कुणीकडे, प्रियतमा, भ्रमाचा भोपळा अशा गाजलेल्या मराठी नाटकांतील अभिनेत्री सौ. माधवी गोगटे यांचे वयाच्या ५८ व्या वर्षी निधन झाले आहे. मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनाच्या संसर्गामुळे त्यांचे निधन झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या बातमीमुळे संपूर्ण नाट्य, चित्रपट व मालिकांच्या विश्वात शोककळा पसरली आहे. अभिनेते प्रशांत दामले यांच्यासह ‘गेला माधव कुणीकडे’ तसेच ‘अंदाज आपला आपला’, ‘भ्रमाचा भोपळा’ ही त्यांची काही गाजलेली नाटकं. प्रशांत दामले यांनी फेसबूकवर त्यांच्या या लाडक्या सह-अभिनेत्रीला श्रद्धांजली देत म्हटले आहे की, “सौ माधवी गोगटे… माझी आवडती सहकलाकार. गेला माधव कुणीकडे, प्रियतमा, बे दुणे पाच, लेकुरे उदंड जाली… जवळ…
नाट्यगृहे सुरू झाल्यानंतर व्यावसायिक रंगभूमीसोबतच प्रायोगिक रंगभूमीवरील प्रयोगांनाही नव्या जोमाने सुरुवात झाली आहे. पद्मविजय प्रोडक्शन, करनाटकू व राधा क्रीएशन्स (आदित्य संजयराव आणि हृषिकेश गिरीश कुलकर्णी) निर्मित ‘नवरा आला वेशीपाशी’ या प्रायोगिक दीर्घांकाचेही रंगभूमीवर लवकरच पदार्पण होणार आहे. यश नवले आणि राजरत्न भोजने लिखित-दिग्दर्शित ‘नवरा आला वेशीपाशी’ या दीर्घांकाचा शुभारंभाचा प्रयोग येत्या २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ८ वाजता आचार्य अत्रे रंगमंदिर, कल्याण येथे सादर होणार आहे. यश नवले यांनी रंगभूमी.com च्या टीमशी या दीर्घांकाबद्दल बोलताना सांगितले की, “आपलं दुःख कुणालाच कळणार नाही, कुणी ते समजूनच घेऊच शकत नाही, असं प्रत्येकाला आपल्या कुठल्यातरी दुःखाबद्दल वाटत असतंच ना…? तेव्हा ते दुःख ऐकून, समजून…
लॉकडाऊनच्या विळख्यातून नुकतीच बाहेर पडलेली रंगभूमी हळूहळू उजळू लागलेली आहे. सर्वच रंगकर्मी नव्या उमेदीने, नव्या उत्साहाने आपल्या मनोरंजनासाठी कंबर कसून तयार होताना दिसतायत. अशातच प्रेक्षकांच्या भेटीस आतुर अशा बऱ्याच नाटकांचे प्रयोग लवकरच सुरू होणार आहेत. असंच एक तग धरून बसलेलं नाटक म्हणजे झी नाट्य गौरव पुरस्कृत ‘बार्दो’! शंतनू चंदात्रे लिखित आणि अनुप माने दिग्दर्शित बार्दो या नाटकाला झी नाट्य गौरव २०२० मध्ये सर्वाधिक ५ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. सर्वोत्कृष्ट लेखन – शंतनू चंदात्रे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन – अनुप माने सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना – यश नवले सर्वोत्कृष्ट नेपथ्य – अमेय भालेराव आणि सर्वोत्कृष्ट लक्षवेधी नाटक बार्दो या नाटकाचा पहिला प्रयोग शनिवार दि.…
सर्वकाही पूर्वपदावर येत असल्याचे चित्र सद्ध्या दिसून येत आहे. लसीकरण प्रक्रियेनेही वेग धरला आहे. अशातच रंगभूमीदेखील पुन्हा नव्याने जोमात सुरू होईल अशी आशा प्रत्येकाला वाटत आहे. आम्ही हीच आशा व्यक्त करत नाट्यप्रेमी व नाट्यकर्मींसाठी एक छोटासा उपक्रम घेऊन येत आहोत, ज्याचं नाव आहे ‘नाट्यReel’! आपल्या सर्वांना माहीतच आहे की इंस्टाग्राम ऍपवरील reel सद्ध्या खूपच चर्चेत आहे. पण नाटकातील संवाद घेऊन कोणी फारसे reel बनवलेले दिसत नाहीत. Reel म्हणजे १५ ते ३० सेकंदाचे छोटे व्हिडिओज. तुम्ही पुढील सूचनांचा वापर करून आमच्या या उपक्रमात सहभागी होऊ शकता. आमच्या इंस्टाग्राम अकाउंटला पुढील लिंकवर follow करा. https://instagram.com/myrangabhoomiतुमच्या आवडीच्या एखाद्या नाटक अथवा एकांकिकेतील कोणत्याही सीनचा…
हिंद-मराठी संस्थेने सर्व कवींसाठी स्वरचित कविता सादर करून पारितोषिक जिंकण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. सगळ्यांना माहीत आहे की प्रत्येकाच्या मनात एक कवी लपलेला असतो. त्याच कवीला आवाहन करून लवकरात लवकर या स्पर्धेत सहभागी व्हा! काव्यगंध स्पर्धेत मराठी आणि हिंदी भाषेतील कविता स्वीकारल्या जाणार आहेत. या स्पर्धेचे नियम व अटी पुढीलप्रमाणे असणार आहेत. स्पर्धेची प्रवेश फी २५/- असून विजेत्यांना पुढीलप्रमाणे पारितोषिके देण्यात येणार आहेत. प्रवेशाची अंतिम तारीख १८ जुलै असून काहीही शंका अथवा अडचण असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधावा. व्हिडिओ कसे पाठवाल? व्हिडिओ पाठवण्यासाठी तुम्ही पुढे दिलेल्या बटनवर क्लिक करून फॉर्म भरू शकता किंवा [email protected] या इमेल आयडीवर सादरीकरणाचे व्हिडिओ…
नाट्य, मालिका व सिनेसृष्टीतील तब्बल चाळीस वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीमध्ये अभिनेता, नाट्य निर्माता आणि दिग्दर्शक अशा विविध भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा बहुगुणी कलाकार म्हणजे विनय आपटे. ७ डिसेंबर, २०१३ रोजी हा गुणी कलाकाराचे दुःखद निधन झाले. १७ जून रोजी विनय आपटे यांची जयंती आहे. हेच औचित्य साधून १७ जून, २०२१ रोजी ‘विनय आपटे प्रतिष्ठान’तर्फे एक ऑनलाईन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विजय केंकरे, संजय जाधव, सतीश राजवाडे, सुलेखा तळवलकर, नितीन वैद्य, भरत दाभोळकर अशा दिग्गज कलाकार मंडळींचा या परिसंवादात सहभाग असणार आहे. तसेच, अजित भुरे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहेत. प्रेक्षकांना ‘विनय आपटे प्रतिष्ठान’ च्या फेसबूक पेजवर १७ जून, २०२१ रोजी…
![नवरा आला वेशीपाशी [Review] — एका लग्नाची गोष्ट सुरु होण्यापूर्वीची गोष्ट Navra Aala Veshipashi - Marathi Natak](https://www.rangabhoomi.com/wp-content/uploads/2021/12/navra-aala-veshipashi-2-1-1200x575.jpg)

![कुर्रर्रर्रर्र [Review] — निखळ मनोरंजनाची हमखास डिलिव्हरी! Kurrrr Marathi Natak Review](https://www.rangabhoomi.com/wp-content/uploads/2021/12/kurrrrnatak-review-feature-1536x864.jpg)


![हौस माझी पुरवा [Review] — सहकुटुंब अनुभवावा असा हास्यरसाचा बूस्टर डोस Haus Mazi Purva Marathi Natak Review](https://www.rangabhoomi.com/wp-content/uploads/2021/11/haus-maajhi-purva-marathi-natak-review-featured2-1536x864.jpg)

![नवरा आला वेशीपाशी [प्रायोगिक दीर्घांक] — शुभारंभाचा प्रयोग नवरा आला वेशीपाशी मराठी नाटक](https://www.rangabhoomi.com/wp-content/uploads/2021/11/navra-aala-veshipaashi-featured-1536x864.jpg)



