Monday, November 29, 2021

नवरा आला वेशीपाशी [प्रायोगिक दीर्घांक] — शुभारंभाचा प्रयोग

नाट्यगृहे सुरू झाल्यानंतर व्यावसायिक रंगभूमीसोबतच प्रायोगिक रंगभूमीवरील प्रयोगांनाही नव्या जोमाने सुरुवात झाली आहे. पद्मविजय प्रोडक्शन, करनाटकू व राधा क्रीएशन्स (आदित्य संजयराव आणि हृषिकेश गिरीश कुलकर्णी) निर्मित ‘नवरा आला वेशीपाशी‘ या प्रायोगिक दीर्घांकाचेही रंगभूमीवर लवकरच पदार्पण होणार आहे.

यश नवले आणि राजरत्न भोजने लिखित-दिग्दर्शित ‘नवरा आला वेशीपाशी’ या दीर्घांकाचा शुभारंभाचा प्रयोग येत्या २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ८ वाजता आचार्य अत्रे रंगमंदिर, कल्याण येथे सादर होणार आहे. यश नवले यांनी रंगभूमी.com च्या टीमशी या दीर्घांकाबद्दल बोलताना सांगितले की, “आपलं दुःख कुणालाच कळणार नाही, कुणी ते समजूनच घेऊच शकत नाही, असं प्रत्येकाला आपल्या कुठल्यातरी दुःखाबद्दल वाटत असतंच ना…? तेव्हा ते दुःख ऐकून, समजून घेऊन त्यावर फुंकर घालणारं कुणीतरी भेटायची आपल्याला गरज असते आणि त्यात ज्याला आपण दुःख म्हणतोय ते मुळात दुःखच नाही असं काहीतरी सांगणारं समजावणारं कुणीतरी आपल्याला भेटलं तर सोन्याहून पिवळं. एकमेकांशी लग्न ठरलेल्या अशाच दोन अनोळखींची गोष्ट म्हणजे, ‘नवरा आला वेशीपाशी’. कुणाचं दुःख, काय दुःख आणि कोण त्यावर कशी फुंकर घालणार? हसत-खेळत आणि थोडं मनाला चटका लावत हीच गोष्ट अनुभवण्यासाठी नक्की बघायला या.”

प्रस्तुत दीर्घांकाचे तिकीट दर फक्त १००/- व १५०/- रुपये असून फोन बुकींगसाठी ८१०४०६२४९८, ७८४१९१६४५४ क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच ऑनलाईन बुकींगसाठी www.ticketkhidakee.com या वेबसाईटचाही वापर करू शकता.

सुखदुःखाचा खेळ कुणालाच चुकलेला नाही. पण प्रत्येक व्यक्ती त्या खेळाला कसं सामोरं जाते, हे मात्र महत्वाचं! असा काहीसा संदेश देणारा हा दीर्घांक सर्व प्रेक्षकांनी नाट्यगृहात जाऊन नक्की बघावा.

तुमचे प्रोत्साहन लाख मोलाचे

आम्हाला आशा आहे की तुम्हाला प्रस्तुत लेख आवडला असेल व यापुढेही आमचे लेख वाचण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल. तुम्हाला काही छोटीशी रक्कम रंगभूमी.com च्या प्रोत्साहनार्थ देणगी स्वरुपात द्यायची असेल तर आम्ही त्याचे स्वागत करू.

- जाहिरात -spot_img

More articles

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

— जाहिरात —

Latest Articles