Author: गायत्री देवरुखकर

१०० वर्षांची सांस्कृतिक परंपरा लाभलेलं दामोदर नाट्यगृह नामशेष होईल की काय अशी भीती निर्माण झाली आहे. दामोदर नाट्यगृह आणि सहकारी मनोरंजन मंडळ नोव्हेंबर २०२३ पासून दामोदर नाट्यगृह वाचवण्यासाठी सोशल सर्विस लीगशी झगडा करत आहेत. परंतु, पुनर्बांधणीचे गाजर दाखवत हे नाट्यगृह जमीनदोस्त करण्याचा घाट आहे, असे लक्षात आल्याने रंगकर्मींमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. सहकारी मनोरंजन मंडळाने अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेकडे या प्रकरणाबद्दल दाद मागितली. नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी या प्रकरणासंबंधी पत्रकार परिषद बोलावली. त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना २८ मे पर्यंतची मुदत देत, ‘दामोदर नाट्यगृहासंबंधी एकदाच चर्चा करुन विषय संपवावा. नाहीतर उपोषणाला बसू’, असा इशारा दिला आहे. दामोदर नाट्यगृहाच्या अस्तित्वावर…

Read More

भारतीय संस्कृती, भारतीय परंपरा, इथली नातीगोती, भाषाशैली इतकी समृद्ध आहेत की त्याचे जितके गोडवे आपण गाऊ तितके कमीच आहेत. पण आपण हे गोडवे गाऊ शकतो कारण आपल्याला आपली भारतीय संस्कृती जन्मत:च ज्ञात झाली होती. आपण ‘भारतीय’ मातीत जन्मलो. म्हणून आपण विविधतेत एकता जाणतो. विविध जातीच्या, स्वभावाच्या लोकांना आपलंसं करू शकतो. पण, भारतात जन्मलेले बरेच तरुण आज परदेशात जाऊन स्थायिक होताना दिसत आहेत. हे तरुण भारतात सहसा परतत नाहीत. अगदी वयोवृद्ध आई वडील गंभीर आजारी असतील तरीही मुलांना परदेशातून भारतात सहज परतता येत नाही. या परदेशी स्थायिक झालेल्या तरुणांना मुलं होतात तेव्हा त्या मुलांना लहानपणीपासूनच पाश्चात्य संस्कृतीची ओळख होते. भारतीय संस्कृतीचा…

Read More

‘मानाची’ संघटनेच्या, अर्थात, मालिका नाटक चित्रपट लेखक संघटनेच्या ९ व्या वर्धापन दिनानिमित्त उत्स्फूर्त एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेची अंतिम फेरी ६ मे, २०२४ रोजी श्री शिवाजी मंदिर, दादर येथे पार पडली. अटीतटीचा सामना झाला. अंतिम फेरीत ‘चौदा इंचाचा वनवास’ (संहिता क्रिएशन्स, मीरा रोड) आणि ‘A Tale of Two’ (BMCC, पुणे) या दोन एकांकिकांनी बाजी मारली! ‘मानाची’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मानाची लेखक संघटनेचं ब्रीदवाक्य आहे ‘लेखकांनी लेखकांची लेखकांसाठी स्थापन केलेली संघटना’! लेखकांसाठी इतका भव्य सोहळा आयोजित करणाऱ्या या संघटनेच्या कार्यकारी समितीचे सर्वप्रथम आभार आणि कौतुक! उत्स्फूर्त एकांकिका स्पर्धेचे स्वरूप स्पर्धक संघाना देण्यात आलेल्या २० विषयांमधून दोन विषयांच्या…

Read More

‘खरा इन्स्पेक्टर मागावर’ हे नाटकाचं नाव वाचून तुम्हाला यात चोर पोलिसाचा खेळ असेल किंवा ही एखादी मर्डर मिस्टरी असेल याचा अंदाज आलाच असेल. ‘आजकल’ची प्रस्तुती असलेल्या या नाटकात खून, पोलीस आणि खुनी अशी साखळी आहे. पण, संपूर्ण घटनेकडे बघण्याची किंवा संपूर्ण घटना प्रेक्षकांना दाखविण्याची पद्धत एकदम वेगळी आहे. समीक्षकाच्या चष्म्यातून या नाटकातील रहस्य प्रेक्षकांसमोर उलगडत जातं. म्हणजे नाटक सुरू आहे आणि समीक्षकही हजर आहेत… रंगमंचावरच! Khara Inspector Magavar ‘खरा इन्स्पेक्टर मागावर’ हे नाटक टॉम स्टॉप्पार्ड नामक लेखकाच्या ‘रिअल इन्स्पेक्टर हाऊंड’ या इंग्रजी नाटकाचे भाषांतर आहे. हा इंग्रजी नाटककार त्याच्या बौधिक खोली, शब्दखेळ, विचारप्रधान पण भावनिक आणि तरीही हसवणाऱ्या अशा अनोख्या…

Read More

‘प्रिय भाई… एक कविता हवी आहे’ अशा नावाचा एक कार्यक्रम मुक्ता बर्वे सादर करत आहेत असं काही दिवसांपूर्वी कानावर आलं. भाई म्हणजे पु.ल. देशपांडे. म्हणजे, पुलंशी संबंधित काहीतरी नाट्यवाचन असावं. पण मग ‘एक कविता हवी आहे’, असं का म्हटलंय? हां! त्यांच्या आवडीच्या कवितांचं वाचन असणार. पण मग मुक्ता बर्वे? नाटकाचे दौरे, सिनेमाचं शूट संभाळून ही ती हा कार्यक्रम पण करतेय? इतका महत्वाचा का बरं असावा हा कार्यक्रम? असे अनेक तर्क मनात सतत कुतूहल निर्माण करत होते. मग हळूहळू प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांचे व्हिडिओज समोर येऊ लागले. प्रेक्षकांच्या भारावून गेलेल्या त्या प्रतिक्रिया ऐकून लक्षात आलं की ही काही साधीसुधी कलाकृती नोहे! हे काहीतरी…

Read More

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे दरवर्षी गोविंद बल्लाळ देवल स्मृतिदिनाप्रीत्यर्थ आयोजित करण्यात येणारा पुरस्कार वितरण सोहळा यावर्षीही दणक्यात पर पडला. यावर्षी सोहळ्याचं प्रमुख आकर्षण होतं ते म्हणजे सोहळ्याचं स्थळ! गेले काही वर्षे बंद पडलेलं माटुंगा येथील यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल या सोहळ्याच्या प्रेक्षक आणि रंगकर्मींसाठी सुरू करण्यात आले आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष आणि आपले लाडके अभिनेते प्रशांत दामले यांनी नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे काम ३० मे रोजी सुरू केल्याचे कळविले. तसेच तब्बल १४ दिवस कसोशीने पाठपुरावा करत नाट्य संकुल पुनर्जीवित करण्यासाठी १४ जून ही तारीख गाठता आली याबद्दल हर्षही याप्रसंगी व्यक्त केला. अजूनही ७०% च काम झाले आहे आणि…

Read More

रंगभूमी.com नाट्यक्षेत्रात गेली तीन वर्षे सातत्याने कार्यरत आहे. या प्रवासात बरीच नाटकं बघण्याचा योग आला. खरं तर नाटकांचे बरेच ‘प्रकार’ बघायला मिळाले. एकांकिका, दीर्घांक, दोन अंकी नाटक, तीन अंकी नाटक, लघुनाटिका आणि बरंच काही! बऱ्या-वाईट-चांगल्या अशा कित्येक नाट्यानुभवांचा ओघ आजही अव्याहत सुरू आहे. या ओघात वाहत आलेल्या नाट्यकृतींपैकी काही नाटकांनी मनात असं काही घर केलं की ती नाटकं जिवंतपणी विस्मृतीत जाणं निव्वळ अशक्यच! आपल्याला आवडलेली ही सुंदर नाटकं रंगभूमी.com च्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची कल्पना समोर आली. सहकाऱ्यांनी ही कल्पना उचलून धरली आणि बऱ्याच अथक प्रयत्नांनंतर आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत रंगभूमी.com आयोजित ‘नाट्यदरबार’ — निवडक आणि दर्जेदार नाट्यकलाकृती…

Read More

समाजात भ्रष्टाचार किती बळावला आहे याबद्दल आपण जितकी चर्चा करू ती कमीच आहे. सामाजिक, राजकीय, आध्यात्मिक अशा सर्वच स्तरांवर आज भ्रष्टाचाराचं काहूर माजलंय. याच ज्वलंत विषयाचे असंख्य पैलू विविध पात्रांमार्फत प्रेक्षकांना दाखवणारं एक नाटक येत्या १० फेब्रुवारी रोजी रंगभूमीवर पदार्पण करत आहे. ज्येष्ठ निर्माते कै.सुधीर भट यांचे सुपुत्र संदेश भट सादर करीत आहेत ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर लिखित आणि हृषिकेश जोशी दिग्दर्शित ‘येतोय तो खातोय’ हे नाटक! ही सुयोग नाट्यसंस्थेची ९० वी कलाकृती असणार आहे. कांचन सुधीर भट, मोहन दामले, मिलन टोपकर, चंद्रशेखर आठल्ये, यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे. संतोष पवार, हृषिकेश जोशी, भार्गवी चिरमुले या कलाकारांसोबतच मयुरा रानडे,…

Read More

एक काळ होता जेव्हा माणूस सुखासाठी धडपडत होता. जीवनातही कुटुंब आणि मित्रपरिवारासाठी वेळ काढत होता. पण आजचा काळ वेगळा आहे. आज माणूस सुखी राहण्यासाठी नाही तर फक्त सुखी दिसण्यासाठी झगडतोय. कमालीचं औदासिन्य आलेलं असतानाही सोशल मीडियावर खूश दिसण्यासाठी आजकाल प्रत्येकामध्ये चढाओढ सुरू आहे. आजची पिढी सोशल मिडियाच्या आहारी गेलेली आहे. लाईक्स आणि फॉलोअर्सच्या विळख्यात अडकलेली दिसतेय. सहजसुंदर आयुष्यातील हेलकावे सहन करण्याची क्षमता या पिढीत उरलेली नाही. अशाच प्रकारचं, वरवरचं आयुष्य जगणारा आणि ‘आज’च्या पिढीचं दर्शन घडवणारा ‘Sad सखाराम’ आपल्या भेटीसाठी आला आहे. आविष्कार निर्मित, युगंधर देशपांडे लिखित आणि नीरज शिरवईकर दिग्दर्शित ‘Sad सखाराम’ हा एक भन्नाट, आगळा वेगळा पण तरीही…

Read More

मोजक्या शब्दांत यमाचं वर्णन करायला सांगितलं तर कसं कराल? दोन शिंगं असलेला, रेड्यावर बसलेला, यम म्हणजे मृत्यूदाता, यम म्हणजे काळ… बरोबर? पण यमाची एक नवीन व्याख्या करणारं विनोदी नाटक सद्ध्या रंगभूमीवर गाजतंय. प्रवीण धोपट लिखित स्वप्नील कोकाटे दिग्दर्शित आणि नयन बाठे, दीपा परब सादर करीत आहेत दोन अंकी नाटक ‘यम इंडिकेटर’ एक मध्यमवयीन जोडपं नातेवाईकांच्या लग्नाला जायला निघालेलं असतं. इतक्यात त्यांच्या दारात ‘यम’ येऊन उभा ठाकतो! त्या दोघांपैकी एकाची वेळ आल्याचे तो त्यांना सांगतो. परंतु, यमाच्या डेटाबेसमध्ये गडबड झाल्यामुळे नेमका कोणाचा मृत्यू आज लिहिला आहे ते त्याला माहीत नसते. इथेच खरी गंमत सुरू होते. पुढे काय होतं? यम नेमकं कोणाला…

Read More

गिरीश कुलकर्णी यांचं ‘होल बॉडी मसाज’ लवकरच रंगभूमीवर! नजीकच्या काळात बरीच प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकं प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहेत. या नाटकांच्या मांदियाळीत एक नाटक सध्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. ते नाटक म्हणजे महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे ‘होल बॉडी मसाज’ हे नाटक! ९ डिसेंबर रोजी पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग सादर होणार आहे. ‘बाई, मसाज म्हंजे बोटांचे डोळे करायचे आनि पेशंटच्या बॉडीमधील दुःख शोधायचं!’ अशा टॅगलाईनसोबत नाटकाचे पोस्टर इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आले आहे. विजय शिंदे नामक एक दारुडा इसम. पण त्याच्या बोटांमध्ये अशी काही जादू असते की त्याच्या मालीशने दुर्धर शारीरिक दुखणी बरी होत असतात. ‘ओल्ड गव्हर्नमेंट मेडिकल…

Read More

लॉकडाऊनपश्चात, रंगभूमी.com च्या माध्यमातून आम्ही नाटकांची समीक्षणे, प्रयोगांचे वेळापत्रक, कलाकारांच्या मुलाखती, नाटकांबद्दल संपूर्ण माहिती आणि नाटकांशी संबंधित बरंच काही तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत. रंगभूमी.com आणि प्रेक्षकांमधील प्रवास अखंड सुरू राहावा हाच आमचा मानस आहे. कुठलं नाटक कुठल्या नाट्यगृहात किती वाजता बघता येईल याची माहिती आम्ही देतच होतो आणि आता तमाम रसिक प्रेक्षकांच्या विनंतीचा मान ठेवत आम्ही तुमच्या आमच्या रंगभूमी.com वेबसाईटवर ऑनलाईन तिकीट बुकींग सुरू करत आहोत. रंगभूमी.com ने हे नवं पाऊल खास तुमच्या सोयीसाठी उचललं आहे आणि आम्हाला खात्री आहे की तुम्ही या ऑनलाईन सोयीचा पुरेपूर लाभ घ्याल. सध्या आमच्यासोबत मर्यादित नाटकं तिकीट विक्री साठी जोडली गेली असली…

Read More