लॉकडाऊनच्या कठीण काळात रसिक प्रेक्षकांना नाट्यगृहात जाऊन नवनवीन नाटकांचा आस्वाद घेता आलेला नाही. कोरोनाचे संकट संपून नाटकाचा रुपेरी पडदा लवकरच उघडावा अशी प्रार्थना सर्वच रंगकर्मी आणि रसिक प्रेक्षक करीत आहेत. काही रंगकर्मींनी मात्र या बिकट परिस्थितीशी दोन हात करत Online माध्यमातून नाटक प्रेक्षकांच्या भेटीस आणण्याचा ध्यास घेतलेला आहे. त्यापैकीच एक म्हणजे अभिनय कल्याण संस्थेचे संस्थापक अभिजीत झुंजारराव. अभिजीत झुंजारराव यांनी फक्त एक नाटक नाही तर चार विविध नाटकांचा नाट्य महोत्सव Online माध्यमातून भरवण्याचे आयोजिले आहे. या महोत्सवाचे वैशिष्ट्य असे आहे की चार विविध शहरांमधील चार विविध संस्था या महोत्सवासाठी एकत्रित येत आहेत — थिएटर प्रीमियर लीग २०२०.थिएटर प्रीमियर लीग २०२०Theatre…
Author: गायत्री देवरुखकर
कोरोनाचा फैलाव वाढत गेल्यामुळे प्रत्येक नागरिक घाबरून गेला आहे. प्रत्येकाला आज स्वत:च्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याबद्दल काळजी वाटत आहे. सर्वत्र नैराश्याचे वातावरण असताना आणि हजारो मनःस्ताप असताना लोकांचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत ते म्हणजे रंगभूमीवरील कलाकार! कधी प्रशांत दामले, प्रसाद ओक असे दिग्गज रंगकर्मी Facebook च्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांशी Live गप्पा मारत आहेत. तर कधी शिवानी रांगोळे तिच्या वाचनात आलेल्या कथा व कवितांचं Instagram वर वाचन करत आहे. काहींनी निवड केली आहे ती YouTube माध्यमाची!डॉ. गिरीश ओक यांचे बहारदार चिवित्रांगणडॉ. गिरीश ओक यांनी मात्र YouTube चा मार्ग अवलंबिला आहे. अग्गबाई सासूबाई, जुळून येती रेशीमगाठी अशा विविध कार्यक्रमातून दररोज प्रेक्षकांच्या भेटीला…
कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू वाढू लागला आणि COVID-19 ला जागतिक महामारी म्हणून घोषित करण्यात आलं. ह्याच पार्श्वभूीवर आपले पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी Lockdown चा ऐलान केला. शाळा, कॉलेज, कार्यालयं बंद झाली आणि अख्खा देशच स्तब्ध झाला. कोरोनाशी चार हात करण्यासाठी घरी बसून राहणे हा एकच रामबाण उपाय आहे हे आता निश्चित झाले आहे. बरं तुम्ही म्हणाल, हे सगळं तर आम्ही जाणून आहोत यात नवीन काय? नवीन असणार आहे तो म्हणजे या सर्व परिस्थितीकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन!Corona, Lockdown, Quarantine सगळं सगळं अगदी खरं आहे. पण या सर्व परिस्थितीची सकारात्मक बाजू बघितलीत तर तुम्हाला जाणवेल की अगदीच १००% सगळं थांबलेलं नाही.…
कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या COVID–19 या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींनी कोरोनापासून जनतेचा बचाव करण्यासाठी Lockdown चा ऐलान केला आहे. जनतेचे या संदर्भातील विचार जाणून घेण्यासाठी प्रयोग मालाड संस्था खालील online स्पर्धांचे आयोजन करीत आहे.१. निबंध (लेख) लेखन स्पर्धा → विषय — कोरोना चा सामाजिक संदेश आणि देश व व्यक्ती स्तरावरील आर्थिक व्यवहारांवर होणारा परिणाम२. छायाचित्र स्पर्धा→ विषय — कोरोना हॉलिडे काळातील स्तब्ध मुंबईतील सार्वजनिक व नैसर्गिक विहंगम दृश्ये३. पोस्टर बनवणे स्पर्धा→ विषय — कोरोना युद्ध काळातील अपेक्षित मानसिकताया स्पर्धा सर्व वयोगटांसाठी खुल्या असतील. तुम्ही एक वा एकाहून जास्त स्पर्धेत सहभागी होऊ शकता. प्रत्येक स्पर्धेचे प्रवेश शुल्क १००/- आहे.…
रंगभूमी म्हटलं की नाटक हे त्याचं हृदय आणि नाटकांची समीक्षणे ही त्याची स्पंदने असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. होय! बरोब्बर ओळखलंत. आम्ही तुमच्यासाठी नाटकाची समीक्षणे घेऊन हजर झालो आहोत. नाटक बघून त्या नाटकाचा भाव समजून स्वत:ला उमगेलला अर्थ, जाणवलेल्या त्रुटी तरुण पिढीच्या माध्यमातून नाट्यसृष्टीपर्यंत पोहोचवायचा आमचा मानस होता आणि आज आम्ही असाच एक युवा लेखक तुमच्या समोर सादर करत आहोत! या लेखकाचं नाव आहे अभिषेक अरविंद महाडिक. अभिषेक, तुझं रंगभूमीच्या टीममध्ये मन:पूर्वक स्वागत! अभिषेकने श्री. भगुभाई मफतलाल पॉलीटेकनिक मध्ये Civil Engineering चा डिप्लोमा केल्यानंतर St. John College of Engineering and Technology मधून Graduation केले. साधारण अडीच वर्षांच्या Work Experience…
Lockdown च्या परिस्थितीतही घर बसल्या सहकुटुंब, सहपरिवार Live नाटक बघायला मिळालं तर काय बहार येईल ना मंडळी! असाच काहीसा प्रयत्न केला आहे पुण्याच्या एका Theatre Group ने ज्याचं नाव आहे Theatron Entertainment. कोरोनासारख्या भीषण जागतिक महामारीमुळे या टीमला त्यांचे प्रयोग रद्द करावे लागले आणि म्हणूनच त्यांनी आधीच शूट केलेले नाटकाचे प्रयोग YouTube वर Live दाखवायचे ठरवले. या उपक्रमात Theatron Entertainment आपल्यासाठी ३ वेगवेगळी नाटकं घेऊन येत आहे. ज्यांची नावं आहेत “मिकी”, “भंवर” आणि “ऍनाथेमा”. ही नाटकं तुम्ही पुढे दिलेल्या वेळापत्रकात नमूद केलेल्या दिवशी रात्री ९:३० वाजता Theatron Entertainment च्या Youtube Channel वर Live बघू शकता. YouTube वर नाटकं तशी खूप…
हो! आम्हाला तुम्हाला सांगताना अतिशय आनंद होतोय की रंगभूमी.com ही Google News वर Approve झाली आहे. रंगभूमी.com वर दररोज येणाऱ्या ताज्या घडामोडी आणि बातम्यांचा आढावा तुम्ही आता Google News वर घेऊ शकता. थेट तुमच्या मोबाईल वर.Google Play किंवा App Store वर जाऊन Google News हे App Download करा आणि मग पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून Subscribe करा.https://news.google.com/publications/CAAqBwgKMNKhmAsw6auwAwह्या नंतर आम्ही वेबसाईटवर जे काही नवनवीन लेख लिहू तो सर्व मजकूर तुम्हाला आपोआप तुमच्या मोबाइल वर मिळत जाईल. डोळ्यांना सुखद वाटणाऱ्या अशा अतिशय सुंदर मराठी फॉन्टमध्ये तुम्ही आमचे सर्व लिखाण वाचू शकता.Rangabhoomi.com चा अनुभव तुमच्यासाठी अधिकाधिक सहज आणि सोपा करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर…
काही दिवसांपूर्वी आम्ही तुमच्यासाठी ६ अजरामर विनोदी नाटकांचा खुसखुशीत ठेवा तुमच्या भेटीला! या लेखात काही धमाल विनोदी नाटकं घेऊन आलो होतो. आज पुन्हा तशीच काही खुसखुशीत नाटकं घेऊन आम्ही हजर आहोत.एका लग्नाची गोष्टरंग्या रंगीला रेपाहुणाअसा मी असामीश्यामची मम्मीवऱ्हाड निघालंय लंडनला – भाग १वऱ्हाड निघालंय लंडनला – भाग २
कोरोनामुळे उद्भवलेल्या lockdown च्या विळख्यात अडकलेल्या कलाकारांना त्यांच्या घरातच online रंगमंच उपलब्ध करून देण्याचा हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे. घर बसल्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि पारितोषिके जिंकण्याची ही सुवर्णसंधी सोडू नका.कुठल्याही विषयाची मर्यादा नाही. विषय स्वरचित असो किंवा तुमच्या आवडत्या नाटकातील एखादा उतारा, त्याचं स्वागतच केलं जाईल.फक्त ५ ते ७ मिनिटांचा व्हिडिओ shoot करून तुम्ही या स्पर्धेत सहभागी होऊ शकता.स्पर्धेची भाषा फक्त मराठी असेल.प्रवेशाची अंतिम तारीख – १५-०४-२०२०स्पर्धेचा निकाल – २५-०४-२०२०स्पर्धेची पारितोषिकेप्रौढ वर्ग (वय १६ वर्ष आणि अधिक)प्रथम पारितोषिक – ३०००/-द्वितीय पारितोषिक – १५००/-तीन उत्तेजनार्थ प्रशस्तिपत्रकेबाल वर्ग (वय ५ ते १५ वर्ष)प्रथम पारितोषिक – १५००/-द्वितीय पारितोषिक – १०००/- तीन उत्तेजनार्थ प्रशस्तिपत्रकेअधिक माहितीसाठी पुढील लिंकवर…
मराठी माणूस आणि नाटक यांच एक अजब असं मेतकूट आहे. त्यात तो माणूस कोकणातला मालवणकडचा असेल तर दुधात साखर! कारण कीत्येक शतकांपासून इथे होत असलेली दशावतारी नाटके, शिमग्यातील खेळे, सोंगे, भारुडे इ. हि त्यानेच जपलेली आतापर्यंतची मनोरंजनाची सांस्कृतिक मूल्ये! या रंगभूमीवर आतापर्यंत शुध्द मराठी भाषेतून येत असलेली मराठी नाटके रसिक प्रेक्षक चोखंदळपणे पहात होता. पण कोकणात जन्मलेल्या एका मराठी मालवणी भाषिक माणसाने मालवणी बोलीभाषेतून “वस्त्रहरण” हे नवंकोर नाटक रंगभूमीवर आणून रंगमंच आणि रसिकांसाठी मनोरंजनाचे आगळेवेगळे नवे दालन उघडे केले.कै. मछिंद्र कांबळी यांनी लोकनाट्याचा बाज असलेलं धमाल विनोदी मालवणी नाटक “वस्त्रहरण” रंगमंचावर आणून इतिहास घडवला. प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक श्री. मोहन तोंडवळकर…
जागतिक रंगभूमी दिनाचे निमित्त साधून रंगभूमी आणि सिनेसृष्टीमध्ये मोलाची कामगिरी बजावलेल्या आणि आता टी.व्ही. वरील “अग्गबाई सासूबाई” या मालिकेतून प्रेक्षकांचे मन जिंकणाऱ्या डॉ. गिरीश ओक यांनी रसिक प्रेक्षकांना लाख मोलाचा एक संदेश दिला आहे. तसेच, Quarantine च्या या कठीण काळामध्येही रंगभूमी दिन कसा साजरा करता येईल याचा उपायही दिला आहे. डॉ. गिरीश ओक यांनी आजवर दीपस्तंभ, यू-टर्न, कुसुम मनोहर लेले, कहानी में ट्विस्ट, श्री तशी सौ, तो मी नव्हेच अशा एक ना अनेक नाटकांमधून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. आजही, जेव्हा संपूर्ण जगाला कोरोना विषाणूने हादरवून सोडलंय तेव्हा ते social media द्वारे रसिक प्रेक्षकांना Online उपलब्ध असलेली नाटकं बघून आपण…
“खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे!”. असं कै. साने गुरुजी सांगून गेले. या त्यांच्या उक्तीमध्ये जात-धर्म, गरीब-श्रीमंत या जंजाळात अडकून पडलेला मनुष्यप्राणी त्यांना गृहीत असेलच, पण ज्यांना बोलता येत नाही, आपल्या भावना व्यक्तही करता येत नाही अशी मुकी, भटकी जनावरे कुत्री-मांजरी पण असु शकतील.निष्ठावान असलेला कुत्रा हा पाळीव प्राणी इमानदार आहे तसाच मनुष्याचा सर्वात विश्वासू मित्रपण आहे. कुत्रे आपली कर्तव्ये निष्ठेने पार पडत असतात. म्हणून ते पसंतीस जास्त उतरतात. लोक त्यांचे खूप लाड करतात. त्यांच्या असलेल्या अनेक जातीनुसार त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी, वागणुकीच्या तऱ्हा या वेगवेगळ्या असतात. गार्ड (सुरक्षा), पोलीस, सेनादले इ. ठिकाणी कुत्र्यांच्या विशिष्ट घ्राणेंद्रियांच्या तीव्र आकलन शक्ती फार उपयोगी पडतात. कुत्र्यांचे नाते आपल्या…