रंगभूमी.com
    Facebook Twitter Instagram YouTube WhatsApp Telegram RSS
    • Home
    • About Us
    • Subscribe
    • Donate
    • Advertise
    • Contact Us
    Facebook Twitter Instagram YouTube WhatsApp Telegram RSS
    रंगभूमी.com
    • Home
    • Book Tickets
    • Marathi Natak Info
    • News
      Adhantar Returns after 25 Years for 25 Shows

      अधांतरच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त प्रेक्षकांसाठी नव्याने २५ प्रयोगांचा नजराणा

      August 9, 2022
      atal thakur panvel ekpatri dwipatri abhinay competition cover

      एकपात्री व द्विपात्री अभिनय स्पर्धा २०२२ — कलाविष्कारासाठी रंगमंच उपलब्ध करुन देणारी मानाची संस्था

      August 8, 2022
      Online Natak Ticket Booking for Marathi

      रंगभूमी.com वर नाटकांचं ऑनलाईन तिकीट बुकींग सुरू!

      August 8, 2022
      Punha Sahi Re Sahi Marathi Natak

      विश्वविक्रमी अजरामर नाटक ‘सही रे सही’ला २० वर्ष पूर्ण — लवकरच ५००० प्रयोगांचा टप्पा गाठणार!

      August 6, 2022
      Prasthan Urf Exit Marathi Natak

      आलोक राजवाडे दिग्दर्शित ‘प्रस्थान उर्फ EXIT’ नाटकाचा शुभारंभ!

      August 4, 2022
    • Reviews
      Andhe Jahaan Ke Andhe Raaste Marathi Natak Review

      अंधे जहाँ के अंधे रास्ते [Review] — शहराच्या घाणीत अडकलेल्या मॅनहोल सफाई कर्मचाऱ्यांची कथा

      June 30, 2022
      Gunta

      गुंता एकांकिका [Review]- नात्यातल्या गुंत्याची एक अनोखी बाजू

      May 18, 2022
      Most Welcome Marathi Natak

      मोस्ट वेलकम [Review] — नव्या विचारप्रवाहाच्या स्वागतासाठी सज्ज झालेल्या तरुणांचे समाजाला कळकळीचे आवाहन!

      April 18, 2022
      अडलंय का...? Marathi Natak by Atul Pethe and Parna Pethe and Nipun Dharmadhikari

      अडलंय का…? [Review] — एका नाट्यवेड्याने मेकॅनिकल जगात हरवून गेलेल्या माणसाच्या काळजाला घातलेली सार्त हाक!

      April 9, 2022
      Prem Karava Pan Japoon

      ‘प्रेम करावं पण जपून’ नाटक [Review] — सावध प्रेमाची एक विनोदी कथा! 

      March 22, 2022
    • Podcast
    • Opinion
      Pradeep Patwardhan Moruchi Mavshi Prashant Damle

      चटका लावणारी ‘एक्झिट’

      August 11, 2022
      Zapurza Kavyayog

      काव्ययोग संपन्न! — असा पार पडला झपुर्झाचा पहिला टप्पा

      July 11, 2022
      Anandyatri

      आनंदयात्री स्नेहसंमेलन (GTG) सोहळा

      June 30, 2022
      Baalnaatya Feature

      बालनाट्यांची अनोखी दुनिया!

      May 23, 2022
      Yashwant Natya Mandir, Matunga

      माटुंगास्थित ‘यशवंत नाट्य मंदिर’ अद्याप खुले न होण्यामागचा खुलासा!

      May 19, 2022
    • Events
      Zapurza Dashak Mahotsav

      झपूर्झा फ्लॅग शो — Zapurza Flag Show

      July 17, 2022
      Abhijaat Natya Majotsav Thane

      नाट्यजागरण — मनोरंजनाच्या महामहोत्सवात एक कलाकार २४ तास जागून सादर करणार सलग ६ प्रयोग!

      July 13, 2022
      Zapurza Kavyayog

      काव्ययोग संपन्न! — असा पार पडला झपुर्झाचा पहिला टप्पा

      July 11, 2022
      vidnyan ekankika spardha 2

      वैज्ञानिक कलारंग — रंगभूमीवरील विज्ञानाची प्रयोगशाळा

      July 5, 2022
      Zapurza Dashak Mahotsav

      काव्ययोग — झपूर्झाच्या दशकपूर्ती महोत्सवातील पहिला टप्पा

      July 2, 2022
    • Shows Calendar
      • Browse Shows in Mumbai
        • दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विले पार्ले (Mumbai)
        • प्रबोधनकार ठाकरे नाट्य मंदिर, बोरिवली
        • दामोदर नाट्यगृह, परळ
        • महाकवी कालिदास नाट्यमंदिर, मुलुंड (Mumbai)
        • विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी (Navi Mumbai)
        • आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, पनवेल (Navi Mumbai)
        • काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे (Mumbai)
        • राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे (Thane)
        • आचार्य प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिर, कल्याण (Thane)
        • सावित्रीबाई फुले नाट्यगृह, डोंबिवली (Thane)
      • Browse Shows in Pune
        • बालगंधर्व रंगमंदिर, पुणे (Pune)
        • यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, पुणे (Pune)
        • भरत नाट्य मंदिर, सदाशिव पेठ (Pune)
        • लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह, पुणे (Pune)
        • टिळक स्मारक मंदिर, सदाशिव पेठ (Pune)
        • रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, पिंपरी-चिंचवड (Pune)
        • The Base, Pune
      • Browse Shows in Nashik
        • महाकवी कालीदास कला मंदिर, नाशिक (Nashik)
    • रंगभूमी.com
      • About Us
      • Subscribe to Us
      • Advertise Here
      • Contact Us
    रंगभूमी.com
    Home»Reviews»हौस माझी पुरवा [Review] — सहकुटुंब अनुभवावा असा हास्यरसाचा बूस्टर डोस
    Reviews 4 Mins Read

    हौस माझी पुरवा [Review] — सहकुटुंब अनुभवावा असा हास्यरसाचा बूस्टर डोस

    By गायत्री टंकसाळी-देवरुखकरNovember 29, 2021Updated:July 13, 2022
    Haus Mazi Purva Marathi Natak Review
    Share
    WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    हौस माझी पुरवा — सहकुटुंब अनुभवावा असा हास्यरसाचा बूस्टर डोस

    लॉकडाऊनमध्ये घरी बसून कंटाळलेल्या प्रेक्षकांना ज्या ‘booster dose’ ची गरज होती तो बूस्टर डोस म्हणजे ‘हौस माझी पुरवा’ हे नाटक! तुम्ही जर लॉकडाऊनला वैतागलाय आणि आता संपूर्ण कुटुंबासोबत तुम्हाला काहीतरी ‘refreshing’ बघावंसं वाटतंय तर तुमच्यासाठी संतोष पवार लिखित-दिग्दर्शित ‘हौस माझी पुरवा’ हे नाटक उत्तम पर्याय आहे. सध्याच्या राजकीय व सामाजिक ज्वलंत विषयांवर विनोदाच्या अंगाने पण, सडेतोड भाष्य करणारं हे नाटक प्रेक्षकांना ३ तास खिळवून ठेवतं. लोकशाहीचं आजच्या काळात काय महत्व आहे हे हास्याच्या कोषातून लोकांना समजावयाचा संतोष पवार यांचा हा प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे.

    YouTube player

    Haus Mazi Purva Marathi Natak Review

    Haus Mazi Purva Marathi Natak Review

    नाटकाची कथा आटपाट नगरात सुरू होते. या नगरामध्ये संत्या (संतोष पवार) आणि अंशू (अंशुमन विचारे) हे दोन अवली मित्र राहत असतात. संत्या आणि अंशूची जोडी म्हणजे राहू-केतूची जोडीचं जणू! आटपाट नगराची संपूर्ण सत्ता आपल्या हातात यावी यासाठी संत्या व अंशू एक प्लॅन बनवतात. नगराच्या राजाला (अमोल सुर्यवंशी) सत्तेच्या खुर्चीवरून पाडण्यासाठी ते त्याच्याशी जवळीक साधून राजा व राणीला (प्राप्ती बने) चुकीचे सल्ले द्यायचा कट रचतात. जेणेकरून, सामान्य प्रजा त्याच्यावर चिडेल व त्याला सत्तेवरून हाकलून लावेल. एकदा प्रजेने राजाला हाकललं की आपल्यासाठी सत्तेवर येण्याचा मार्ग मोकळा होईल असा काहीसा संत्या आणि अंशूचा विचार असतो. हे करण्यामध्ये त्यांची मैत्रीण सोनूही (हर्षदा बामणे) त्यांना मदत करते. पण संत्या, अंशू आणि सोनू त्यांच्या या प्लॅनमध्ये यशस्वी होतात का? ते खरंच राजा-राणीची दिशाभूल करतात का? ते करताना त्यांना कुठल्या आव्हानांना तोंड द्यावं लागतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर तुम्हाला ‘हौस माझी पुरवा’ हे नाटक बघावंच लागेल.

    Haus Mazi Purva Marathi Natak Review

    Haus Mazi Purva Marathi Natak Direction

    कथा कितीही गंभीर वाटत असली तरी नाटक अतिशय विनोदी अंगाने पुढे पुढे सरकत जाते. खूप साऱ्या गंभीर विषयांवर बोललं गेलं असूनही ते तितक्याच सहजतेने आणि विनोदी स्वरूपात प्रेक्षकांसमोर मांडले गेलं आहे. प्रेक्षकांच्या मनावर कुठेही प्रवचन किंवा उपदेशाचा भडीमार केला जात नाही. याचं संपूर्ण श्रेय अर्थातच नाटकांचे लेखक-दिग्दर्शक संतोष पवार यांना जातं. तसेच, प्रसंगानुरूप कथेला पूरक ठरणारी गाणी या नाटकात आहेत. त्यामुळे गाण्यांचा अतिरेक झाल्यासारखा वाटत नाही. याउलट गाणी कथेच्या प्रवाहासोबतच प्रेक्षकांचे मनोरंजन करीत राहतात.

    Haus Mazi Purva Marathi Natak Review

    Haus Mazi Purva Marathi Natak Script

    नाटकाची मूळ कथा अजय राजाराम विचारे यांनी लिहिली आहे. या नाटकाचे निर्मातेही तेच आहेत. सद्य परिस्थितीला साजेशी कथा लिहिल्याबद्दल व त्या कथेवर आधारित नाटकाच्या निर्मितीसाठी पुढाकार घेतल्याबद्दल अजय राजाराम विचारे यांचे खूप अभिनंदन!

    Haus Mazi Purva Marathi Natak Review

    Haus Mazi Purva Marathi Natak Actors

    संतोष पवार यांनी या नाटकासाठी लेखक, दिग्दर्शक, नेपथ्यकार व अभिनेता अशा चारही भूमिकेत उत्तम कामगिरी बजावली आहे. सोप्या पद्धतीचे पण अचूक नेपथ्य आणि तितकंच सडेतोड लिखाण करत त्यांनी क्षणोक्षणी प्रेक्षकांना अंतर्मुख होण्यास भाग पाडले आहे. नाटकाचा उत्तरार्ध हा पूर्वार्धापेक्षा थोडासा उजवा ठरला आहे. शेवटापर्यंत नाटकाचा आलेख कमालीच्या उंचावर जाऊन पोहोचतो. राजकीय, शासकीय व सामाजिक विषयांवर भाष्य करणारं हे नाटक प्रेक्षकांना कधी स्वत:कडे खेचून घेतं हे प्रेक्षकांना कळतदेखील नाही.

    Haus Mazi Purva Marathi Natak Review

    सादरीकरण्यामध्ये अंशुमन विचारे यांनी त्यांना कमालीची साथ दिली आहे. या दोन मातब्बर अभिनेत्यांसोबतच या नाटकात प्राप्ती बने, अमोल सुर्यवंशी, हर्षदा बामणे हे नवोदित कलाकारही आपल्या भेटीस येणार आहेत. या एकूण पाचही पात्रांचा रंगमंचावरील वावर अतिशय सुंदर आहे. तसेच, त्यांचं विनोदाचं टाईमिंगही अचूक जुळून आलेलं आहे. एका गोष्टीची विशेष नोंद करावीशी वाटते. नाटकात फार क्वचित वेळा संतोष पवार आणि अंशुमन विचारे मंचावर नसतात. तरीही नाटकाच्या शेवटापर्यँत दोघेही त्याच क्षमतेने सादरीकरण करताना दिसतात.

    Haus Mazi Purva Marathi Natak Details

    नाटकाची वेशभूषा करणाऱ्या मंगल केंकरे यांचा विशेष उल्लेख करावासा वाटतो. नाटकातील प्रत्येक दृश्याचा व्यवस्थित विचार करून कलाकारांना त्यानुसार वेशभूषा देण्यात आली आहे. वेशभूषा हा या नाटकाचा खूप महत्वाचा भाग आहे हे तुम्हाला नाटक बघितल्यावर लक्षात येईलच. शितल तळपदे यांनी सेटला पूरक अशी प्रकाश योजना केलेली आहे. प्रसंगानुरूप दृश्यांचा भाव रंगीबेरंगी प्रकाशांसोबत वेळोवेळी बदलत राहतो.

    नाटकाची संपूर्ण टीम एक सुंदर कलाकृती बघण्याची तुमची हौस पूरी करण्यात नक्कीच यशस्वी ठरली आहे. हे नाटक बघितलंत तर तुम्ही एक सुंदर अनुभव घेऊन समाधानाने नाट्यगृहातून बाहेर पडाल. या धाटणीच्या लिखाणाची आज खऱ्या अर्थाने समाजाला गरज आहे. जास्तीत जास्त संख्येने प्रेक्षक या नाटकाला हजेरी लावतील याबद्दल काही शंकाच नाही.

    Haus Maajhi Purva – Upcoming Shows

    Aug 15
    11:30 AM - 2:30 PM

    हौस माझी पुरवा

    श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह, दादर (Mumbai)
    Mumbai
    Aug 15
    8:30 PM - 11:30 PM

    हौस माझी पुरवा

    प्रबोधनकार ठाकरे नाट्य मंदिर, बोरिवली
    Mumbai
    Aug 16
    4:30 PM - 7:30 PM

    हौस माझी पुरवा

    आचार्य प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिर, कल्याण (Thane)
    Kalyan
    View Calendar

    नाटक: हौस माझी पुरवा
    लेखक/दिग्दर्शक/नेपथ्य: संतोष पवार
    निर्माते: अजय विचारे
    प्रकाश: शितल तळपदे
    संगीत: रुपेश-नितीन
    वेशभूषा: मंगल केंकरे
    कलाकार: प्राप्ती बने, अमोल सुर्यवंशी, हर्षदा बामणे, अंशुमन विचारे आणि संतोष पवार

    Natak Tickets Online Booking
    Ajay Vichare Anshuman Vichare booster dose family Family Package featured Politics Prapti Bane Santosh Pawar अमोल सुर्यवंशी आटपाट नगर हास्यरस
    Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Telegram Reddit Tumblr Email
    Previous Articleमराठी नाट्य कलाकार संघातर्फे ८ व्या जागतिक रंगकर्मी दिवसाचे आयोजन — रंगकर्मींसाठी कलाकार दत्तक योजनेची घोषणा
    Next Article ‘कुर्रर्रर्रर्र’ नाटकाचा शुभारंभ — ४ डिसेंबर पासून नाट्यगृहात धमाल मनोरंजनाची डिलिव्हरी सुरु

    Related Posts

    Online Natak Ticket Booking for Marathi

    रंगभूमी.com वर नाटकांचं ऑनलाईन तिकीट बुकींग सुरू!

    August 8, 2022
    Prasthan Urf Exit Marathi Natak

    आलोक राजवाडे दिग्दर्शित ‘प्रस्थान उर्फ EXIT’ नाटकाचा शुभारंभ!

    August 4, 2022
    sanjay bhakre ekankika lekhan spardha

    स्व. ज. रा. फणसळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या एकांकिका लेखन स्पर्धेचं पहिलं वर्ष!

    July 25, 2022

    1 Comment

    1. Pingback: संतोष पवार लिखित-दिग्दर्शित ‘हौस माझी पुरवा’ या धमाल कॉमेडी नाटकाचा मी लिहिलेला रीव्ह्यू –

    Leave a Comment Cancel reply

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

    — जाहिरात —
    The Lens Affair Wedding Photography

    Social
    • YouTube
    • Facebook
    • Instagram
    • Twitter
    • WhatsApp
    • Telegram
    रंगभूमी.com
    Facebook Twitter Instagram YouTube WhatsApp Telegram RSS
    © 2022 रंगभूमी.com. Powered by iXyr Media.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

     

    Loading Comments...