Author: रंगभूमी.com

बुलढाण्याला मित्राचा वाढदिवस होता. मी खामगाव वरून स्कुटीने गेलो होतो. बुलढाणा जायला ज्ञानगंगा अभयारण्यातून बोथा घाट मार्गे जावं लागतं. या अभयारण्यात अस्वल,बिबट सारखे हिंस्त्र प्राणी आहेत तर बरेचसे पक्षी देखील.प्राण्यांच्या

Read More

काही दिवसांपूर्वी रंगभूमी.com च्या Social Media वर आम्ही नाट्यरसिक of the month या अनोख्या स्पर्धेबद्दल सांगितले होते. १ जून, २०२० पासून रंगभूमी.com च्या Instagram पेजवर या स्पर्धेची सुरुवात झालेली आहे. आम्ही तमाम नाट्य प्रेमींना आवाहन करतो की त्यांनी या स्पर्धेमध्ये नक्की सहभाग घ्यावा.   या स्पर्धेचे स्वरूप अतिशय सोपे आहे. सोमवार ते शुक्रवार आम्ही नाटकाशी संबंधित काही प्रश्न Instagram story मध्ये तुम्हाला विचारणार आहोत. या प्रश्नाचे स्वरुप ध्वनिफीत, जोड्या जुळवणे किंवा एखादी चारोळीही असू शकते. तुम्हाला त्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे. महिन्याच्या शेवटी जास्तीत जास्त अचूक उत्तरे देणाऱ्या @myrangabhoomi च्या Follower ला नाट्य रसिक of the month घोषित करण्यात येईल…

Read More

माझं बालपण आणि आत्तापर्यंतचं सारं आयुष्य लालबागला गेलं. लालबाग म्हणजे गिरणगांव. कोकण, घाट, विदर्भ अशा चहूबाजूंनी आलेल्या हौशी गिरणीकामगारांनी येथील सण, उत्सव मोठ्या हौसेने व अहमहमिकेने सजवले, फुलवले. इथे गणेशोत्सव आणि नवरात्रात नाटके होत असत. ही नाटके बहुतेक काल्पनिक ऐतिहासिक अशा स्वरूपाची असत. “जल्लाद” हे असंच एक लोकप्रिय नाटक सादर करून नावारुपाला आलेली “नवहिंद बाल मित्र मंडळ” ही नाट्यसंस्था. या नाटकांमध्ये ट्रिक सीन्स असत. सुरुवातीची श्रेयनामावली सुद्धा ट्रिक सीन्सद्वारे वेगवेगळ्या पद्धतीने दाखवली जात असे. आम्हा लहान मुलांना त्याचे फारंच आकर्षण वाटत असे. जंगल, राजवाडा, राजमार्ग असे सुंदर रंगीत पडदे वातावरणनिर्मितीत बदल म्हणून अधेमधे टांगले जात असत. अधूनमधून गाण्यांची व तलवार…

Read More

रंगभूमी.com ने मला आठवणीत राहिलेले नाटक या सदरा अंतर्गत मला लेख लिहिण्यास सांगितले आणि क्षणार्धात माझ्यासमोर एक नाव आले वैशालीची खोली. १९८९ सालची महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा. मला आठवतंय, पूवी सर्व वर्तमानपत्रात मुंबईतील विविध नाट्यगृहात सादर होणाऱ्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत सादर होणाऱ्या नाटकांची यादी येत असे. त्यात नाटक सादर होण्याची तारीख-वेळ, संस्थेचे नाव, नाटकाचे नाव आणि लेखकाचे नाव इत्यादी तपशील असे. मग मी त्याची कात्रणे करून जी नाटके आवर्जून बघायची आहेत त्यावर टिक (√) करून ठेवायच्या. या वर्षी एका नाटकाने माझे कुतूहल वाढवले. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले येथे सादर होणारे निनाद संस्थेचे सुरेश जयराम लिखित आणि मंगेश कदम दिग्दर्शित…

Read More

काही दिवसांपूर्वी आम्ही रंगभूमी.com च्या social media वर “माझ्या आठवणीतील नाटक” या नवीन सदराबद्दल माहिती दिली होती. या नवीन सदराला मिळालेल्या उदंड प्रतिसादाबद्दल आम्ही सर्व वाचकांचे आभारी आहोत. प्रत्येक गुरुवारी आपण एक नवीन अनुभव रंगभूमी.com वर वाचू शकता. आपण कितीतरी नाटकं पाहतो. काही नाटकं आपल्या मनात कायमचं घर करून जातात. आपल्याला आयुष्यभरासाठी एक छानशी आठवण देऊन जातात. ही आठवण चांगली असो वा वाईट मनोरंजक नक्कीच असेल. अशा अनेक गोड कडू आठवणी वाचकांपर्यंत पोहोचवायच्या दृष्टिकोनातून आम्ही या सदराची सुरुवात केलेली आहोत.  या संकल्पनेचा रंजक भाग असा आहे की ही आठवण एका प्रेक्षकाची असू शकते किंवा नाटकात काम करत असलेल्या कलाकाराची सुद्धा! रंगमंचावर…

Read More

सूचना: अनिल कासकर यांचा अभिनेता ते रंगभूषाकारापर्यंतचा प्रवास हा लेख तुम्ही वाचला नसेल तर नक्की वाचा! अभिनय करताना आलेला वाईट आणि चांगला अनुभव… प्राथमिक शिक्षण पूर्ण करून विद्यालयात प्रवेश घेतला आणि तिथेच अभिनयाची खरी सुरुवात झाली….!! जेष्ठ आणि श्रेष्ठ लेखक बाळ कोल्हटकर यांच्या “सिमेवरुन परत जा” या नाटकाचा स्नेहसंमेलन साठी विद्यालयात प्रयोग करण्यात येणार होता, संपूर्ण पात्रनिवड झाल्यानंतर मला कळले म्हणून मी आमचे कला शिक्षक ह्यांना भेटलो आणि विनंती केली की मला काम करायचे आहे. अगोदर नाही म्हणाले पण मुख्याध्यापकांना भेटून त्या कला शिक्षकांवर आणि कलाकारांवर दबाव आणून नाटकात प्रवेश घेतला. परंतु पात्रनिवड झाली असल्यामुळे अभिनयास वाव मिळेल अशी भूमिका…

Read More

रा. वसंत कानेटकर लिखित आणि राजेश देशपांडे दिग्दर्शित ‘हिमालयाची सावली’ हे नाटक पाहिले. मराठी रंगभूमीवरील एक अजरामर अभिजात कलाकृती म्हणून ‘हिमालयाची सावली’ हे नाटक कायम स्मरणात राहील. १९७२ नंतर सत्तेचाळीस वर्षांनी ह्या अभिजात कलाकृतीचे शिवधनुष्य समर्थपणे पेलून राजेश देशपांडेनी तर कमालच केली आहे. हिमालयाची सावलीचे कथानक साधारण १९२० सालातील, रंगमंचावर तो कालावधी प्रभावीपणे साकारण्यात दिग्दर्शक, नेपथ्यकार यांच्या बरोबरच कलाकारही यशस्वी झाले आहेत. आयुष्यभर समाजसेवेचे कार्य करणारे ‘नानासाहेब’ आणि त्यांचा संसार निगुतीने जपणारी ‘बयो’ यांची गोष्ट सांगाणारे हे नाटक आहे. समाजसेवेच कार्य आणि समाजाचा संसार कोणी समजूत घेत नाही यांची खंत नानासाहेबांना कायम असते. आपल्या कुटुंबीयांना आपण बाहेर काय करत आहोत हे कळत…

Read More

कोरोनारूपी संकटातून आपणा सर्वांना बाहेर पडण्यास अजून किमान ३ ते ४ महिन्यांचा कालावधी निश्चितच जाईल. तसंच, परिस्थिती पूर्णतः स्थिरस्थावर होऊन प्रेक्षकवर्ग पुन्हा नाट्यगृहामध्ये प्रवेश करण्यास कमीत कमी ५ ते ६ महिने लागतील. पण तोपर्यंत, रंगभूमीच्या जोरावर रोजगारी मिळवून दैनंदिन व्यवहार चालवणाऱ्या गरजू कलाकारांना होणाऱ्या त्रासाची जाणीव ठेवून प्रशांत दामले, विक्रम गोखले, प्रसाद कांबळी हे आणि असे बरेच ज्येष्ठ रंगकर्मी पुढे सरसावले. आता या यादीमध्ये अजून एक नाव जोडले गेले आहे, ते म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री अश्विनी भावे यांचे! अश्विनी भावे यांनी WhatsApp वरील एका उपक्रमांतर्गत गरजू रंगकर्मींना ५ लाख रुपयांची मदत केली आहे आणि त्या पुढील तीन महिने ५ लाख रुपये…

Read More

ज्येष्ठ अभिनेते श्री. विक्रम गोखले यांनीही गरजू रंगकर्मींना मदत करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी नाणे गावातील पौड जवळील स्वमालकीचा एक एकराचा प्लॉट महामंडळाच्या नावाने करून द्यायचा ठरवला आहे. आज त्याची बाजारभावानुसार किंमत ही २.५ कोटी रुपयांपेक्षा कमी नाही. या ठिकाणी महामंडळाने ज्येष्ठ व एकटे राहणाऱ्या कलावंताना आसरा आणि सहारा मिळावा म्हणून ज्येष्ठ कलावंतासाठी मोफत राहण्याची सोय करण्साठी सदर जागा विक्रम गोखले अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला दान करून महामंडळाच्या नावाने करून देण्याची घोषणा केली आहे. ज्येष्ठ अभिनेते माननीय श्री. चंद्रकांत गोखले म्हणजेच श्री. विक्रम गोखले यांचे वडील स्वत:च्या कमाईतून काही पैसे भारतीय सैन्यदलाला दान करत असत. असाच मौल्यवान दानधर्माचा वारसा…

Read More

जत्रा भरणार म्हटलं की त्यामध्ये वैविध्यपूर्ण मनोरंजन तर आलंच पण याच जत्रेतून मनोरंजनासोबत गरजू कलाकारांसाठी मदत निधीसुद्धा उभारला जाणार असेल तर सद्य परिस्थितीमध्ये त्याहून चांगले काहीच नाही. अशीच एक जत्रा आजपासून पुढे ३ दिवस भरणार आहे. ‘एम्. डी. नाट्यांगण आणि थिएटर Hotspot’ च्या अंतर्गत तीन दिवसांचा “नाट्य जत्रा” हा कार्यक्रम YouTube च्या माध्यमातून पार पडणार आहे. या कार्यक्रमांतर्गत १० वेगवेगळ्या एकांकिका दाखविण्यात येणार आहेत. २८, २९, ३० मे, २०२० अशा तीन दिवसांमध्ये दाखवल्या जाणाऱ्या या अव्वल दर्जाच्या एकांकिका म्हणजे तमाम रसिक प्रेक्षकांसाठी एक सोहळाच आहे असं म्हणावं लागेल. या सोहळ्यामध्ये तुम्हीदेखील सहभागी होऊ शकता. फक्त प्रेक्षक म्हणून नाही तर रंगभूमीवर…

Read More

सकाळचं कोवळं ऊन अंगावर घेण्यासाठी अंगणात बसलेल्या गोदाआजीला तिच्या नातवानं, सुजीतनं फोन आणून दिला आणि फोनवरचं बोलणं ऐकून आजीनं ‘ माझा म्हादू..’ म्हणून मोठ्यानं हंबरडाच फोडला.तिच्या आवाजानं तिची मुलगी वनिता आणि सून सुनंदा हातातलं काम टाकून अंगणात पळत आल्या.शेजारीपाजारीपण तिथं जमा झाले.”सासूबाई, काय झालं?” सुनंदानं भांबावून विचारलं.”आता कसं आणि काय सांगू? माझा म्हादू गेला…” गोदाआजीनं सूर लावला.”काय ss ? माझा म्हादू दादा….असा कसा गं गेला?” वनितानं तिच्या सुरत सूर मिसळला.”ते विचारायचं राहून गेलं की बग…माझा भाचा म्हादू ..बॅरिस्टर होता की…असा कसा गेला.” आजीला धीर देण्यासाठी दोन-तीन बायका तिला खाली बसवून तिची पाठ थोपटू लागल्या.”बॅरिस्टर कुठं?म्हादू काका तर शिपाई होता ना?…

Read More

सोलापूरच्या रंगभूमीला सत्तर वर्षाची परंपरा आहे. सोलापूर हे गिरणगाव म्हणून ख्यातकीर्त असले तरी कलेची रुजवण येथे अमाप होती. शंभर वर्षापूर्वी मेकॅनिकी थियेटर व नूतन संगीत थियेटर या नावाची नाटकासाठी बांधलेली दोन सभागृहे येथे होती. नाटकाचा अर्थात संगीत नाटक व गद्य नाटकाचा खास एक प्रेक्षकवर्ग त्या काळी होता. किर्लोस्कर नाटक मंडळी, गंधर्व नाटक मंडळी, आनंद विकास मंडळी, शाहू नगरवासी या व्यावसायिक नाट्य संस्थांचे प्रयोग तेथे होत असत. तसेच आचार्य अत्रे, मामा वरेरकर, मो.ग. रांगणेकर यांचे नाट्य प्रयोगही हौशी रंगभूमीवर होत होते. प्रत्यक्ष रंगमंचावर सोलापूरातील काही कलाकार मंडळी एकत्र येऊन नाटकांचे प्रयोग करत होते.  १९४० च्या दरम्यान नवयुग नाट्य मंडळ, दत्त…

Read More