काही दिवसांपूर्वी आम्ही रंगभूमी.com च्या social media वर “माझ्या आठवणीतील नाटक” या नवीन सदराबद्दल माहिती दिली होती. या नवीन सदराला मिळालेल्या उदंड प्रतिसादाबद्दल आम्ही सर्व वाचकांचे आभारी आहोत. प्रत्येक गुरुवारी आपण एक नवीन अनुभव रंगभूमी.com वर वाचू शकता.
आपण कितीतरी नाटकं पाहतो. काही नाटकं आपल्या मनात कायमचं घर करून जातात. आपल्याला आयुष्यभरासाठी एक छानशी आठवण देऊन जातात. ही आठवण चांगली असो वा वाईट मनोरंजक नक्कीच असेल. अशा अनेक गोड कडू आठवणी वाचकांपर्यंत पोहोचवायच्या दृष्टिकोनातून आम्ही या सदराची सुरुवात केलेली आहोत.
या संकल्पनेचा रंजक भाग असा आहे की ही आठवण एका प्रेक्षकाची असू शकते किंवा नाटकात काम करत असलेल्या कलाकाराची सुद्धा! रंगमंचावर नाटक सुरू असताना नाटकातील कलाकाराला आलेले अनुभव किंवा सगळ्या त्रुटींवर मात करून नेपथ्य उभं केलेल्या एखाद्या नेपथ्यकाराचाही हा अनुभव असू शकतो. तुमच्या संदर्भासाठी दोन लेख आम्ही रंगभूमी.com वर प्रकाशित केले आहेत. ते वाचून तुमच्याही नाटकांशी निगडित काही आठवणी जाग्या झाल्या तर त्या आम्हाला hello@rangabhoomi.com ईमेलद्वारे नक्की लिहून पाठवा.
आतापर्यंत आमच्यापर्यंत पोहोचलेले अनुभव खूपच वेगवेगळ्या धाटणीचे आहेत. कोणी दशावतारी नाटकांची गंमत सांगत आहेत तर कोणी राज्य नाट्य स्पर्धेतील अनुभव सांगत आहे. हा प्रवास खूपच रोचक असणार आहे. त्यामुळे आमच्यासोबत रहा. दर गुरुवारी एका नवीन आठवणीचा आस्वाद घ्या. लेख आवडले तर तुमच्या नजीकच्या मंडळींना लिंक नक्की पाठवा.
विनंती एकच! या सदराचे सर्वेसर्वा तुम्ही आहात. त्यामुळे हा प्रवाह खंडित होऊ देऊ नका. अधिकाधिक मनोरंजक आठवणी आमच्यापर्यंत hello@rangabhoomi.com या ईमेल आयडीवर पाठवत रहा.