Author: रंगभूमी.com

नुकत्याच मिळालेल्या वृत्तानुसार, रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या ‘दादा, एक गुड न्यूज आहे’ या नाटकातून ऋता दुर्गुळे या अभिनेत्रीने एक्झिट घेतलेली आहे. ऋताच्या या एक्झिटमागचं कारण अद्याप उघडकीस आलेलं नाही. परंतु, नुकतीच लग्नबंधनात अडकलेली ऋता तिच्या चित्रपटांच्या प्रोमोशनमुळे हा निर्णय घेत असावी असा अंदाज बांधण्यात येत आहे. ऋताचा हा permanent ब्रेक आहे की temporary… हा खुलासाही अद्याप झालेला नाही. काही दिवसात सगळ्या गोष्टींचा खुलासा होईल. त्यामुळे आमच्यासोबत राहा. Hruta leaves ‘Dada, Ek Good News Aahe’ Marathi Natak ऋता दुर्गुळे हिचे टाईमपास ३ आणि अनन्या असे २ चित्रपट सध्या प्रदर्शित व्हायच्या मार्गावर आहेत. या दोन्ही चित्रपटांची सर्वत्र जाहिरातही सुरू असल्याचं दिसून…

Read More

अजेय संस्थेचा ‘काव्ययोग’ सोहळा दु. ३ ते रा. ८:३० या वेळेत मराठी ग्रंथ संग्रहालय स्टेशन रोड येथे पार पडला. याच सोहळ्याचा आढावा घेणारा हा लेख तुमच्यासमोर सादर आहे. प्रमुख पाहुण्या म्हणून आम्ही सिद्ध लेखिका अध्यक्षा प्रा. पद्मा हुशिंग आणि काव्यवयोग म.पां.भावे स्मृती पुरस्कार अंतिमफेरी साठी परीक्षक म्हणून कवी विकास भावे आणि कवी रामदास खरे उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन साधना पाटील यांनी केलं असून प्रास्ताविक डॉ. क्षितिज कुलकर्णी यांनी केले. झपुर्झा नाट्य चळवळीचा प्रवास, त्यातली स्वतःची भूमिका, झपुर्झा २०२२ विषयी, म.पां.भावे स्मृती पुरस्कार आणि काव्ययोगचे महत्व आशा मुद्द्यांविषयी प्रास्ताविकात स्पष्टता दिली. अभिनेत्याला एक दृष्टी असावी, हे vision तयार करण्याचं काम…

Read More

आरोग्यम धनसंपदा या मालाडमधील संस्थेने आपला २०वा वर्धापन दिन साजरा २६ एप्रिल २०२२ रोजी साजरा केला. योग, व्यायाम, नृत्य, संगीत, खेळ या विविध क्षेत्रात आरोग्यम धनसंपदा संस्थेने आजपर्यंत महत्वपूर्ण योगदान दिले आहे.  २० व्या वर्धापन दिनी संस्थेने ‘आरोग्यम धनसंपदा प्रायोगिक कलामंच’ची स्थापना करून रंगकर्मींसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. ‘आरोग्यम धनसंपदा प्रायोगिक कलामंच’तर्फे पहिला उपक्रम आज जाहीर करण्यात आला आहे. हा उपक्रम म्हणजे रंगकर्मी प्रशिक्षण शिबीर! रंगकर्मी प्रशिक्षण शिबीर नाटक ही एक सांघिक कला आहे. आपण जेव्हा एखादे नाटक पाहतो आणि ते आपल्याला खूप आवडतं. तेव्हा नाटकाच्या लेखन-दिग्दर्शनासोबतच आणखी महत्त्वाच्या घटकांचा एकत्रित परिणाम आपल्यावर झालेला असतो. नाटकाच्या प्रयोगाचा परिणाम साधण्यासाठी आवश्यक घटक १. अभिनेता-अभिनेत्री २. …

Read More

रिवायत प्रोडक्शनने रसिक प्रेक्षकांकरिता येत्या रविवारसाठी एक सुंदर बेत आखला आहे. अवतार प्रोडक्शन्स निर्मित ‘पूर्ण वर्तुळ’ आणि कलाकार मंडळी प्रस्तुत व अनाम निर्मित ‘पाहुणचार’ ह्या दोन्ही एकांकिकांचा आस्वाद प्रेक्षकांना एकाच तिकिटात घेता येणार आहे. या दोन्ही नाटकांचे प्रयोग दिनांक १० जुलै रोजी, १२:३० वाजता, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, पुणे येथे सादर होणार आहेत. पूर्ण वर्तुळ — अन्यायाचा प्रतिशोध घेणारी एक रोमांचक एकांकिका. लेखन व दिग्दर्शन — समर्थ चाफेकर कलाकार — अतुल कुडलेन, दीपेंती चिकणे, वेदांत कुलकर्णी, शुभम राजापूरकर, अवनी हरकरे, वैभव जुमडे, आकाश हळगावकर. स्री सक्षमतेच्या क्रांतिकारी विचाराची एक दुसरी बाजू ह्या नाटकात मांडली आहे. आपल्याला मिळणाऱ्या अधिकाराचा व सुरक्षिततेचा महिलांद्वारे होणारा चुकीचा…

Read More

अजेय संस्था ठाण्यात गेली नऊ वर्ष झपूर्झा नाट्यचळवळ सादर करत आली आहे. यंदाचे झपूर्झा चे १० वे वर्ष. झपूर्झा दशक महोत्सव वर्ष आहे, एका थीमवर आधारित नृत्य व नाट्यविष्कार झपूर्झा मध्ये सादर होतात. स्पर्धात्मक वातावरणा बाहेर कलाकारांना त्यांची कला सादर करता यावी, त्याचा आनंद कलाकारांना व प्रेक्षकांना मिळवा आणि या संपूर्ण प्रक्रियेतून नवोदित कलाकारांना कला सादरीकरणा संदर्भात अनेक नवीन गोष्टी शिकता याव्यात ही झपूर्झा ची मूळ संकल्पना. झपूर्झा नाट्य चळवळी ची संकल्पना लेखक, दिग्दर्शक डॉ.क्षितिज कुलकर्णी यांची असूनअध्यक्ष गौरव संभूस आहेत अजेय टीम आयोजन, व्यवस्थापन व प्रोडक्शन बघत आली आहे. झपूर्झा यावर्षी १०व्या वर्षात पदार्पण करत आहे. या घटनेचं विशेष…

Read More

Update 11/10/2022: मिरा-भाईंदरमध्ये नव्या नाट्यगृहाचे उद्घाटन — उद्घाटन सोहळ्यात वाद होऊनही कार्यक्रम यशस्वी रंगभूमी आणि रंगभूमीवर सादर होणाऱ्या विविध कलाकृती यांचा आस्वाद घेण्यासाठी जास्तीत जास्त नाट्यगृहे बांधणं आणि त्यांचं योग्य संगोपन होणं हे खूप महत्वाचं आहे. रंगभूमी.com तर्फे आम्ही नाटकाबद्दल प्रेक्षकांशी संवाद साधतो तेव्हा कित्येकदा, “अमुक नाट्यगृह आमच्या घरापासून नजीक असल्यामुळे आम्ही आजवर नवीन जागा घेण्याचा विचारही केला नाही.”, अशाप्रकारच्या प्रतिक्रिया ऐकून पराकोटीचं समाधान मिळतं. मिरा-भाईंदर शहरातील रसिक प्रेक्षकांसाठीही आज आम्ही अशीच एक खुशखबर घेऊन आलो आहोत. गेले बरेच दिवस रखडलेल्या मिरा-भाईंदर महापालिकेच्या नाट्यगृहाच्‍या उदघाटनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचा मुहूर्त मिळाला आहे! २७ जुलै रोजी हे नाट्यगृह सुरू केले…

Read More

झपूर्झा हा अजेय संस्थेचा वार्षिक इव्हेंट. स्पर्धात्मक वातावरणाच्या बाहेर नव्या कलाकारांना सादरीकरण करता यावं, त्यासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध व्हावा हा या मागचा हेतू. दरवर्षी झपूर्झामध्ये जास्तीत जास्त नवे कलाकार सहभागी होतात. अभिनय, ध्वनीसंयोजन, प्रकाशयोजना, नेपथ्य, व्यवस्थापन अश्या विभागात ही रस असणारे तरुण कलाकार सहभागी होऊ शकतात. आजही म्हणजेच झपूर्झा च्या १०व्या वर्षात ही उद्देश कायम आहे. गेल्या नऊ वर्षात झपूर्झा ही अतिशय महत्त्वाची नाट्य चळवळ म्हणून नावारूपाला आली आहे. संपूर्ण झपूर्झा एकाच थीमवर आधारित असतो. नाट्याविष्कार, नृत्यनाट्य, नृत्याविष्कार यातून त्याच विषयाच्या वेगवेगळ्या बाजू समोर मांडल्या जातात. झपूर्झाची संकल्पना लेखक, दिग्दर्शन डॉ. क्षितिज कुलकर्णी यांची असून निर्माता गौरव संभूस आहेत. तसेच, अजेयची संपूर्ण…

Read More

दीर्घ कवितेचे रसमय सादरीकरण अनुभवण्याचा सुवर्णयोग प्रेक्षकांसाठी चालून आला आहे. या कार्यक्रमांतर्गत, रानकवी पद्मश्री ना. धों. महानोर यांच्या लेखणीतून साकारलेल्या ‘अजिंठा’ या दीर्घ कवितेचे रंगमंचीय सादरीकरण अक्षय वाटवे, माधवी तोडकर, उदय रामदास हे कलाकार करतात. या प्रयोगाची काही खास वैशिष्ट्ये  • मातीशी नातं सांगणाऱ्या लोकसंगीताचा वापर • नाट्यानुभव देणारं अभिवाचन • पूरक प्रकाशयोजना आणि वैशिष्ट्यपूर्ण ध्वनी संयोजन • पार्श्वसंगीतासाठी देशी आणि परदेशी लोकवांद्यांचा वापर • प्रत्यक्ष मंचावर ‘उदू’ या आफ्रिकन आणि ‘दॉयरा’या पर्शियन वाद्यांची साथसंगत तसेच या दीर्घ कवितेतील  • पाण्यास बिलगले ऊन रंग विखरून, • मन चिंब पावसाळी झाडात रंग ओले, • पानं कानात सांगतात, पानं पांगतात, • तळपायावर…

Read More

महाराष्ट्रातील अलिबाग येथील PNP नाट्यगृहाला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दल वाहनं वेळेत घटनास्थळी पोहोचली आहेत. आग लागण्याचं नेमकं अद्याप समोर आलेलं नाही. तरीही नाट्यगृहात वेल्डिंगचे काम सुरू होते व त्यामुळे ही घटना घडली असावी, असे सांगितले जात आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही असे आमच्या प्रतिनिधीला कळले आहे. आजूबाजूच्या परिसरातील रहिवाशीही आग विझविण्याचा प्रयत्न करीत आहेत. https://www.instagram.com/p/Ce2jv5CpOrP/ https://twitter.com/myrangabhoomi/status/1537101504082894849

Read More

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या राज्य नाट्य हौशी स्पर्धा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर २०२१ साली घेता आल्या नव्हत्या. यंदा मात्र स्पर्धेच्या हीरक महोत्सवी वर्षी ‘आजादी का अमृत महोत्सव’ या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा दणक्यात पार पडली. मराठी, हिंदी, संस्कृत तसेच बालनाट्य, संगीतनाट्य व दिव्यांग बालनाट्य अशा सहा वेगळ्या प्रकारांमधून राज्यातील ३४ केंद्रांवर या स्पर्धा घेण्यात आल्या. हिंदी व मराठी भाषेतील नाट्य स्पर्धांचा निकाल जाहीर झालेला आहे व तो पुढीलप्रमाणे आहे. महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा २०२२ — मराठी नाटकांचे निकाल श्री विघ्नहर्ता प्रतिष्ठान (मुंबई) या संस्थेच्या ‘इन द सेल ऑफ सर्व्हायव्हल’ या नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झाले आहे. साईकला कला क्रीडा…

Read More

‘मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं!’, असं म्हणत आपल्याला खऱ्या अर्थाने जगणं शिकवणारा सर्वांचा लाडका अभिनेता प्रशांत दामले आणि त्याचं प्रेक्षकांचं तितकंच लाडकं असलेलं नाटक ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’! आज या नाटकाचे ५०० प्रयोग पूर्ण होणार आहेत. तमाम रसिक प्रेक्षकांचे प्रेम संपादित करून रंगभूमीचा बादशाह ठरलेल्या प्रशांत दामले या चतुरस्त्र अभिनेत्याच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. अर्थात, या महत्वाच्या टप्प्याचं संपूर्ण श्रेय नाटकाच्या संपूर्ण टीमला जातं. प्रशांत दामले, कविता मेढेकर, अतुल तोडणकर, मृणाल चेंबूरकर, प्रतीक्षा शिवणकर, राजसिंह देशमुख व पराग डांगे अभिनीत आणि प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन व गौरी थिएटर्स निर्मित आणि सरगम प्रकाशित ‘एका लग्नाची…

Read More

तुम्हालाही एखाद्या नाट्यानुभवाबद्दल तुमची प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पाठवायची असेल तर ती [email protected] या ई-मेल आयडीवर पाठवू शकता. नवनवीन नाटकांची इत्यंभूत माहिती देणाऱ्या आमच्या YouTube चॅनेलला नक्की भेट द्या! श्री. विजयकुमार अणावकर यांनी पाठवलेली प्रतिक्रिया ‘कुर्रर्रर्रर्र’कुरीत विनोदी नाटक अलीकडच्या काळात रंगभूमीवर विनोदी नाटकांची लाट नव्याने उभारी घेत असतानाच प्रसाद खांडेकर लिखित आणि दिग्दर्शित ‘कुर्रर्रर्रर्र’ या नाटकाने गंभीर विषयाला  हलक्याफुलक्या विनोदाची झालर लावून प्रेक्षकाना आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे. बाळंतपण आणि मातृत्व यामधील सुंदर क्षण या नाटकात हळुवार विनोदाने साकारले आहेत. अक्षर आणि पूजा यांच्या लग्नाला पाच वर्षे झालेली असून देखील त्यांना बाळ होत नाही. पूजाला लागलेली बाळाची हुरहूर आणि बाळासाठी तिच्यामागे लागलेला आईचा…

Read More