रंगभूमी.com
    Facebook Twitter Instagram YouTube WhatsApp Telegram RSS
    • Home
    • About Us
    • Subscribe
    • Donate
    • Advertise
    • Contact Us
    Facebook Twitter Instagram YouTube WhatsApp Telegram RSS
    रंगभूमी.com
    • Home
    • Browse Marathi Natak
    • News

      मिरा-भाईंदर येथील प्रेक्षकांसाठी लवकरच खुले होणार एक नवे नाट्यगृह!

      June 20, 2022

      अजेय संस्थेच्या ‘झपूर्झा’चा यशस्वी दशक महोत्सव!

      June 18, 2022

      लपझप प्रॉडक्शन्सतर्फे ‘अजिंठा’ या दीर्घ कवितेचे सादरीकरण!

      June 16, 2022

      महाराष्ट्रातील अलिबाग येथील PNP नाट्यगृहाला भीषण आग! [Video]

      June 15, 2022

      शक्तीमान ने स्कर्ट का घातलाय? — लिंगरचनेवर सडेतोड भाष्य करणारं एकलनाट्य

      June 12, 2022
    • Reviews

      गुंता एकांकिका [Review]- नात्यातल्या गुंत्याची एक अनोखी बाजू

      May 18, 2022

      मोस्ट वेलकम [Review] — नव्या विचारप्रवाहाच्या स्वागतासाठी सज्ज झालेल्या तरुणांचे समाजाला कळकळीचे आवाहन!

      April 18, 2022

      अडलंय का…? [Review] — एका नाट्यवेड्याने मेकॅनिकल जगात हरवून गेलेल्या माणसाच्या काळजाला घातलेली सार्त हाक!

      April 9, 2022

      ‘प्रेम करावं पण जपून’ नाटक [Review] — सावध प्रेमाची एक विनोदी कथा! 

      March 22, 2022

      संज्या छाया [Review] — आयुष्याचा नवा अर्थ उलगडून देणारा भावनिक प्रवास!

      February 26, 2022
    • Podcast
    • Opinion

      बालनाट्यांची अनोखी दुनिया!

      May 23, 2022

      माटुंगास्थित ‘यशवंत नाट्य मंदिर’ अद्याप खुले न होण्यामागचा खुलासा!

      May 19, 2022

      हीच तर फॅमिलीची गंमत आहे! [Giveaway] — विजेत्यांच्या प्रतिक्रिया

      May 6, 2022

      ‘कुर्रर्रर्रर्र’कुरीत प्रेक्षक प्रतिक्रिया!

      April 22, 2022

      सारखं ‘हाउसफुल्ल’ होतयं! — प्रशांत दामले व वर्षा उसगांवकर अभिनीत नव्या नाटकाला मिळालेली दिलखुलास पसंती

      April 1, 2022
    • Events

      अजेय संस्थेच्या ‘झपूर्झा’चा यशस्वी दशक महोत्सव!

      June 18, 2022

      ‘अकल्पित — एक रहस्यमय नाट्यदर्शन’ — रत्नाकर मतकरी लिखित लघुकथांचे नाट्यरूपांतरण!

      June 1, 2022

      ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ नाटकाच्या ५०० व्या प्रयोगानिमित्त प्रशांत दामले यांचे मनोगत

      May 31, 2022

      मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते ‘मराठी नाट्य विश्व’ या नाट्य संग्रहालयाच्या बोधचिन्हाचे अनावरण

      May 27, 2022

      कलाकारांचे प्रोत्साहन वाढवणाऱ्या रंगकर्मी एकांकिका महोत्सवाचे दुसरे वर्ष!

      May 21, 2022
    • Natak Shows & Events Schedule
      • Browse Shows in Mumbai
        • दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विले पार्ले (Mumbai)
        • प्रबोधनकार ठाकरे नाट्य मंदिर, बोरिवली
        • दामोदर नाट्यगृह, परळ
        • महाकवी कालिदास नाट्यमंदिर, मुलुंड (Mumbai)
        • विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी (Navi Mumbai)
        • आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, पनवेल (Navi Mumbai)
        • काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे (Mumbai)
        • राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे (Thane)
        • आचार्य प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिर, कल्याण (Thane)
        • सावित्रीबाई फुले नाट्यगृह, डोंबिवली (Thane)
      • Browse Shows in Pune
        • बालगंधर्व रंगमंदिर, पुणे (Pune)
        • यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, पुणे (Pune)
        • भरत नाट्य मंदिर, सदाशिव पेठ (Pune)
        • लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह, पुणे (Pune)
        • टिळक स्मारक मंदिर, सदाशिव पेठ (Pune)
        • रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, पिंपरी-चिंचवड (Pune)
        • The Base, Pune
      • Browse Shows in Nashik
        • महाकवी कालीदास कला मंदिर, नाशिक (Nashik)
    • रंगभूमी.com
      • About Us
      • Subscribe to Us
      • Advertise Here
      • Contact Us
    रंगभूमी.com
    Home»News»मिरा-भाईंदर येथील प्रेक्षकांसाठी लवकरच खुले होणार एक नवे नाट्यगृह!
    News 3 Mins Read

    मिरा-भाईंदर येथील प्रेक्षकांसाठी लवकरच खुले होणार एक नवे नाट्यगृह!

    एक लाख एक हजार चौ.फूट क्षेत्रामध्ये या चार मजली इमारतीत सुमारे ९०० आसने असलेले मुख्य थिएटर व ३०० आसने असलेले लघु नाट्यगृहाची व्यवस्था करण्यात आली आहे.
    By रंगभूमी.com टीमJune 20, 2022Updated:June 20, 2022
    Mira-Bhayander Natak Auditorium near Dahisar Check Naka
    Share
    WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    रंगभूमी आणि रंगभूमीवर सादर होणाऱ्या विविध कलाकृती यांचा आस्वाद घेण्यासाठी जास्तीत जास्त नाट्यगृहे बांधणं आणि त्यांचं योग्य संगोपन होणं हे खूप महत्वाचं आहे. रंगभूमी.com तर्फे आम्ही नाटकाबद्दल प्रेक्षकांशी संवाद साधतो तेव्हा कित्येकदा, “अमुक नाट्यगृह आमच्या घरापासून नजीक असल्यामुळे आम्ही आजवर नवीन जागा घेण्याचा विचारही केला नाही.”, अशाप्रकारच्या प्रतिक्रिया ऐकून पराकोटीचं समाधान मिळतं. मिरा-भाईंदर शहरातील रसिक प्रेक्षकांसाठीही आज आम्ही अशीच एक खुशखबर घेऊन आलो आहोत. गेले बरेच दिवस रखडलेल्या मिरा-भाईंदर महापालिकेच्या नाट्यगृहाच्‍या उदघाटनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचा मुहूर्त मिळाला आहे! २७ जुलै रोजी हे नाट्यगृह सुरू केले जाणार आहे.

    २०१५ साली उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या नाट्यगृहाचे भूमीपूजन करण्यात आले आणि येत्या २७ जुलै रोजी त्यांच्याच हस्ते या नाट्यगृहाचे उदघाटनही होणार आहे. आमदार प्रताप सरनाईक आणि आयुक्त दिलीप ढोले यांनी नाट्यगृहाच्या कामाची पाहणी करून नाट्यगृहाचे काम पूर्ण झाले असून ते उद्‌घाटनासाठी सज्ज असल्याचे सरनाईक सांगितले आहे. गुरुवारी केलेल्या पाहणीमध्ये नाट्यगृहातील ध्वनी यंत्रणा व प्रकाश योजनेची पाहणी करण्यात आली, तसेच नाट्यगृहात ध्वनिचित्रफीतही सादर करून सर्व यंत्रणा सुस्थितीत आहेत, याची खात्री करण्यात आली. मध्यंतरी नाट्यक्षेत्रातील राजन भिसे, भरत जाधव, सुशांत शेलार व शरद पोंक्षे अशा काही नामवंत कलाकारांनी नाट्यगृहाला भेट देऊन काही सूचना केल्या होत्या, त्या सूचनांचीही अंमलबजावणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे नाट्यगृह टीडीआरच्या बदल्यात खासगी विकसकाकडून बांधून घेण्यात आले असल्यामुळे सुमारे दीडशे कोटी रुपयांच्या या नाट्यगृहाच्या बांधणीसाठी महापालिकेचा एकही पैसा खर्च झालेला नाही.

    MBMC Auditorium near Dahisar Check Naka

    • MBMC Theatre
    • MBMC Theatre
    • MBMC Theatre
    • MBMC Theatre
    • MBMC Theatre
    • MBMC Theatre
    • MBMC Theatre

    Mira Bhayander Natak Theatre

    दहिसर चेकनाकाजवळ आणि प्रसाद इंटरनॅशनल हॉटेलच्या मागे हे नाट्यगृह वसलेले आहे. प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरिवली ते काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे यादरम्यान आजवर एकही नाट्यगृह नव्हते. त्यामुळे, मिरा-भाईंदर येथील या नव्या नाट्यगृहाच्या माध्यमातून घोडबंदर रोड पट्ट्यामधील तसेच मीरा-भाईंदर ते अगदी वसई-विरार पट्ट्यामधील प्रेक्षकांसाठी हे एक हक्काचे नाट्यगृह उपलब्ध होणार आहे.

    MBMC Natak Theatre Details

    Mira-Bhayander Natak Auditorium near Dahisar Check Naka

    एक लाख एक हजार चौ.फूट क्षेत्रामध्ये ही चार मजल्यांची वास्तू उभारण्यात आली आहे. पहिल्या व दुसऱ्या माळ्यावर मुख्य नाट्यगृह (Main Theatre) आणि लघु नाट्यगृह (Mini Theatre) तयार करण्यात आले आहे व तिसऱ्या व चौथ्या मजल्यावर आर्ट गॅलरीची व्यवस्था करण्यात आली आहे. मुख्य थिएटरमध्ये ९०० प्रेक्षकांसाठी आसनव्यवस्था आहे. तर लघुनाट्यगृहात ३०० आसनांची व्यवस्था करण्यात आल्याचे समजले आहे.

    MBMC Natyagruha Auditorium Photo

    MBMC Auditorium Name

    Free Press Journal च्या वृत्तानुसार शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मीरा भाईंदर महानगरपालिकेला (MBMC) प्रख्यात गायिका भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ त्यांचे नाव सभागृहाला देण्याची मागणी केली आहे. सरनाईक यांनी आपल्या पत्रात येत्या जनरल बॉडी मीटिंगमध्ये नामकरणाचा प्रस्ताव ठेवण्याची महापौरांना विनंती केली आहे. ७ जून, २०१९ रोजी सभागृहाला भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे नाव देण्यासाठी मंजुरी देणारा ठराव यापूर्वीच सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. MBMC मध्ये असाही आदेश आहे की एकदा नाव दिल्यावर वास्तूचे नाव बदलता येत नाही.

    “आम्हालाही लता दीदींना योग्य ती आदरांजली द्यायची आहे, पण आधीच नाव ठरवलेल्या सभागृहाचे नाव बदलणे हा आणखी एका महान व्यक्तिमत्त्वाचा अपमान होईल. त्याऐवजी, मी दिग्गज गायिका लता दीदींच्या स्मरणार्थ एक नवीन कलासंकुल बांधण्याचा प्रस्ताव मांडला आहे, जिथे आपण केवळ सांस्कृतिक आणि शास्त्रीय कार्यक्रमच नाही तर नवोदित गायकांसाठी आवश्यक तालमीची व्यवस्थादेखील करू शकतो.” असे सभागृह नेते प्रशांत दळवी (भाजप) म्हणाले.

    MBMB Natyagruha Opening Date

    नाट्यगृहाचे नाव लवकरच घोषित होईल व २७ जुलै रोजी एक दिमाखदार नाट्यगृह नाट्यरसिकांसाठी खुले होईल. तुम्ही या नाट्यगृहाला भेट द्यायला तयार असालच… आम्हीही आहोत! या नाट्यगृहाची रचना दाखवणारा, वास्तूचा आढावा घेणारा संक्षिप्त व्हिडिओ आम्ही लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी आताच आमच्या YouTube चॅनेलला Subscribe करून ठेवा.

    Bharat Jadhav Dilip Dhole Dr A P J Abdul Kalam featured Lata Mangeshkar MBMC Auditorium MBMC Natyagruha MBMC Theatre MBMC Theatre Dahisar Mini Theatre Mira Bhayander Natak Theatre Mira-Bhayandar Theatre Mira-Bhayander Auditorium Pratap Sarnaik Rajan Bhise Shared Ponkshe दहिसर चेकनाका नाट्यगृह मिरा भाईंदर महानगरपालिका
    Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Telegram Reddit Tumblr Email
    Previous Articleअजेय संस्थेच्या ‘झपूर्झा’चा यशस्वी दशक महोत्सव!

    Related Posts

    महाराष्ट्रातील अलिबाग येथील PNP नाट्यगृहाला भीषण आग! [Video]

    June 15, 2022

    शक्तीमान ने स्कर्ट का घातलाय? — लिंगरचनेवर सडेतोड भाष्य करणारं एकलनाट्य

    June 12, 2022

    शब्दांची रोजनिशी नाटकाचा सुवर्णमहोत्सवी प्रयोग!

    June 10, 2022

    Leave a Comment Cancel reply

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

    — जाहिरात —
    Advertise Marathi Natak Here
    Social
    • YouTube
    • Facebook
    • Instagram
    • Twitter
    • WhatsApp
    • Telegram
    रंगभूमी.com
    Facebook Twitter Instagram YouTube WhatsApp Telegram RSS
    © 2022 रंगभूमी.com. Powered by iXyr Media.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

     

    Loading Comments...