रंगभूमी.com
    Facebook Twitter Instagram YouTube WhatsApp Telegram RSS
    • Home
    • About Us
    • Subscribe
    • Donate
    • Advertise
    • Contact Us
    Facebook Twitter Instagram YouTube WhatsApp Telegram RSS
    रंगभूमी.com
    • Home
    • Book Tickets
    • Marathi Natak Info
    • News
      Amar Photo Studio Marathi Natak Info

      ‘अमर फोटो स्टुडिओ’ शेवटच्याकाही मोजक्या प्रयोगांसह पुन्हा रंगभूमीवर!

      December 31, 2022
      thanks dear marathi natak

      थँक्स डियर: मराठी रंगभूमीवर नवी मेजवानी

      December 23, 2022
      yum indicator marathi natak

      आधुनिक युगातील नवा यम तुमच्या भेटीसाठी घेऊन आलं आहे अथर्व निर्मित दोन अंकी नाटक ‘यम इंडिकेटर’!

      December 15, 2022
      whole body massage natak girish kulkarni

      गिरीश कुलकर्णी यांचं ‘होल बॉडी मसाज’ लवकरच रंगभूमीवर!

      December 6, 2022
      sanjyaa chhaaya marathi natak 100 shows

      ‘संज्या छाया’ची शानदार सेंच्युरी! — शतकपूर्तीनिमित्त नाटकाचा पुस्तक प्रकाशन सोहळा जाहीर

      November 26, 2022
    • Reviews
      sad sakharam natak

      भावभावना परत मिळवण्यासाठी भावनिक गुंत्यात अडकलेला ‘Sad सखाराम’ [Review]

      January 17, 2023
      Aamne Saamne Marathi Natak

      आमने सामने — दोन संसाराची हटके गोष्ट

      December 30, 2022
      Andhe Jahaan Ke Andhe Raaste Marathi Natak Review

      अंधे जहाँ के अंधे रास्ते [Review] — शहराच्या घाणीत अडकलेल्या मॅनहोल सफाई कर्मचाऱ्यांची कथा

      June 30, 2022
      Gunta

      गुंता एकांकिका [Review]- नात्यातल्या गुंत्याची एक अनोखी बाजू

      May 18, 2022
      Most Welcome Marathi Natak

      मोस्ट वेलकम [Review] — नव्या विचारप्रवाहाच्या स्वागतासाठी सज्ज झालेल्या तरुणांचे समाजाला कळकळीचे आवाहन!

      April 18, 2022
    • Podcast
    • Opinion
      sad sakharam natak

      भावभावना परत मिळवण्यासाठी भावनिक गुंत्यात अडकलेला ‘Sad सखाराम’ [Review]

      January 17, 2023
      Aamne Saamne Marathi Natak

      आमने सामने — दोन संसाराची हटके गोष्ट

      December 30, 2022
      Pradeep Patwardhan Moruchi Mavshi Prashant Damle

      चटका लावणारी ‘एक्झिट’

      August 11, 2022
      Zapurza Kavyayog

      काव्ययोग संपन्न! — असा पार पडला झपुर्झाचा पहिला टप्पा

      July 11, 2022
      Anandyatri

      आनंदयात्री स्नेहसंमेलन (GTG) सोहळा

      June 30, 2022
    • Events
      arogyam dhanasampada prayogik kalamanch opening cover

      मकरंद देशपांडे यांच्या हस्ते ‘आरोग्यम धनसंपदा प्रायोगिक कलामंचाचे’ उद्घाटन — प्रायोगिक नाट्यमहोत्सवाने कलामंचाचा शुभारंभ

      October 17, 2022
      adpk prayogik natya mahotsav 2022 cover

      मालाडमध्ये नव्या रंगमंचाचा लवकरच शुभारंभ — शुभारंभाप्रीत्यर्थ नाट्यमहोत्सवाची घोषणा

      October 10, 2022
      anaam natyavaachan ekankika mejwani cover

      ‘अनाम’तर्फे रसिकांसाठी नाट्यवाचन आणि एकांकिकेची मेजवानी

      September 10, 2022
      zapurzaa 2022 cover

      झपूर्झा तेजस्वी दशक महोत्सव २०२२

      September 9, 2022
      Zapurza Dashak Mahotsav

      झपूर्झा फ्लॅग शो — Zapurza Flag Show

      July 17, 2022
    • Shows Calendar
      • Browse Shows in Mumbai
        • दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विले पार्ले (Mumbai)
        • प्रबोधनकार ठाकरे नाट्य मंदिर, बोरिवली
        • दामोदर नाट्यगृह, परळ
        • महाकवी कालिदास नाट्यमंदिर, मुलुंड (Mumbai)
        • विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी (Navi Mumbai)
        • आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, पनवेल (Navi Mumbai)
        • काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे (Mumbai)
        • राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे (Thane)
        • आचार्य प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिर, कल्याण (Thane)
        • सावित्रीबाई फुले नाट्यगृह, डोंबिवली (Thane)
      • Browse Shows in Pune
        • बालगंधर्व रंगमंदिर, पुणे (Pune)
        • यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, पुणे (Pune)
        • भरत नाट्य मंदिर, सदाशिव पेठ (Pune)
        • लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह, पुणे (Pune)
        • टिळक स्मारक मंदिर, सदाशिव पेठ (Pune)
        • रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, पिंपरी-चिंचवड (Pune)
        • The Base, Pune
      • Browse Shows in Nashik
        • महाकवी कालीदास कला मंदिर, नाशिक (Nashik)
    • रंगभूमी.com
      • About Us
      • Subscribe to Us
      • Advertise Here
      • Contact Us
    रंगभूमी.com
    Home»News»अजेय संस्थेच्या ‘झपूर्झा’चा यशस्वी दशक महोत्सव!
    News 3 Mins Read

    अजेय संस्थेच्या ‘झपूर्झा’चा यशस्वी दशक महोत्सव!

    By रंगभूमी.com टीमJune 18, 2022
    Zapurza Dashak Mahotsav
    Share
    WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    झपूर्झा हा अजेय संस्थेचा वार्षिक इव्हेंट. स्पर्धात्मक वातावरणाच्या बाहेर नव्या कलाकारांना सादरीकरण करता यावं, त्यासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध व्हावा हा या मागचा हेतू. दरवर्षी झपूर्झामध्ये जास्तीत जास्त नवे कलाकार सहभागी होतात. अभिनय, ध्वनीसंयोजन, प्रकाशयोजना, नेपथ्य, व्यवस्थापन अश्या विभागात ही रस असणारे तरुण कलाकार सहभागी होऊ शकतात. आजही म्हणजेच झपूर्झा च्या १०व्या वर्षात ही उद्देश कायम आहे. गेल्या नऊ वर्षात झपूर्झा ही अतिशय महत्त्वाची नाट्य चळवळ म्हणून नावारूपाला आली आहे.

    संपूर्ण झपूर्झा एकाच थीमवर आधारित असतो. नाट्याविष्कार, नृत्यनाट्य, नृत्याविष्कार यातून त्याच विषयाच्या वेगवेगळ्या बाजू समोर मांडल्या जातात. झपूर्झाची संकल्पना लेखक, दिग्दर्शन डॉ. क्षितिज कुलकर्णी यांची असून निर्माता गौरव संभूस आहेत. तसेच, अजेयची संपूर्ण टीम झपूर्झातल्या वेगवेगळ्या विभागात सहभागी असते.

    झपूर्झामध्ये आजवर सादर झालेल्या थीम

    १. झपूर्झा : एक आधुनिक वेडोत्सव 

    २. झपूर्झा : समाजा कडून समाजासाठी.

    ३. झपूर्झा : इंडियातील यंग भारत

    ४. झपूर्झा : रंग अजून ओला आहे.

    ५. झपूर्झा : प्रेम कर भिल्ला सारख

    ६. झपूर्झा :डोळ्याने पाहीन रूप तुझे 

    ७. झपूर्झा : पडद्यावरील नाटक 

    ८. झपूर्झा : वसूधैव कुटुंबकम 

    ९. झपूर्झा : हसले मनी चांदणे 

    १०.झपूर्झा : तेजस्वी दशक महोत्सव (लवकरच) 

    अश्या संपूर्ण वेगळ्या आणि नव्या थीम वर आधारित झपूर्झा सादर झाला आहे. झपूर्झाची प्रक्रिया एक ते दोन महिन्यांची असते.

    झपूर्झा हा ठाण्यात गडकरी रंगायतन मध्ये अनेक वर्षे सादर होत आला आहे. तसेच डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृहातही २०१४ साली पार पडला. कालांतराने झपूर्झाचे रूपांतर चळवळीमध्ये झाले त्याचे स्वरूप बदलत गेले. 

    शब्दझपूर्झा अंक

    झपूर्झामधलं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ‘शब्दझपूर्झा’ अंक. २०१३ पासून प्रत्येक वर्षी झपूर्झाचा अंक निघत आहे तो सुद्धा झपूर्झाच्या थीमवर. ह्या अंकात अजेय संस्थेतील, अजेय संचालित शतकोटी रसिक समूहावरील, आणि इतर सर्व इच्छुक लेखकांना, कवींना लिहिण्याची संधी उपलब्ध असते. यंदाच्या दशक महोत्सवानिमित्त ‘शब्दझपुर्झा’ वाचकांच्या भेटीस येणार आहे.

    काव्ययोग — झपूर्झाचा पहिला टप्पा

    झपूर्झाचा पहिला टप्पा ‘काव्ययोग‘ सुरू झाला आहे. ‘काव्ययोग’ कार्यक्रमाने झपूर्झाची नांदी होत आहे. अजेय संस्थेच्या ‘शतकोटी’ समूहावरील कवींमधून कविवर्य म.पां. भावे स्मृती पुरस्कार २०२२  देण्यास आरंभ होत आहे. यामध्ये ३४ कवींनी सहभाग घेऊन मोठया प्रमाणावर सहभाग नोंदवला आणि महिनाभर काव्यहोत्र सुरू होतं. यामध्ये निवडक १० कवींचे सादरीकरण व गौरव दशकातील १० विशेष मराठी कवींच्या शैलीचा १० निवेदकांकडून रसास्वाद, ३४ कवींपैकी निवडलेल्या १० कवींपैकी एकाला म.पां.भावे पुरस्कार देऊन गौरव असे कार्यक्रमाचे  स्वरूप आहे. काव्ययोगाचे परीक्षण ज्येष्ठ कवी विकास भावे यांच्या हस्ते होणार आहे. रविवार ३ जुलै २०२२ रोजी, दुपारी ३ वाजल्यापासून मराठी ग्रंथ संग्रहालय स्टेशन रोड, ठाणे(प.) येथे काव्ययोगाचा आस्वाद घेऊ शकता.

    झपूर्झामध्ये सहभागी होण्यासाठी कलाकारांना आवाहन

    तसेच झपूर्झामध्ये नवोदित कलाकारांना सहभागी होण्यासाठी मोठयाप्रमावणार संधी मिळणार आहे, त्यासाठी वयोगट १६ ते २६ असून या मध्ये अभिनेते, अभिनेत्री, तसेच नृत्यकलाकारांची आवश्यकता आहे. ज्यांना ऑडिशन द्यायची इच्छा आहे त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करावा.

    झपूर्झा फेसबूक पेज लिंक – http://Fb.me/zapurza2022

    संपर्क — ८९२८८ ६४१७१, ७२०८६ ८८२३५

    Natak Tickets Online Booking
    Ajey Sanstha Gaurav Sambhus Kavyayog Shabdazapurza zapurza
    Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Telegram Reddit Tumblr Email
    Previous Articleलपझप प्रॉडक्शन्सतर्फे ‘अजिंठा’ या दीर्घ कवितेचे सादरीकरण!
    Next Article मिरा-भाईंदर येथील प्रेक्षकांसाठी लवकरच खुले होणार एक नवे नाट्यगृह! (Bharat Ratna Lata Mangeshkar Auditorium Mira Bhayandar)

    Related Posts

    zapurzaa 2022 cover

    झपूर्झा तेजस्वी दशक महोत्सव २०२२

    September 9, 2022
    Zapurza Dashak Mahotsav

    झपूर्झा फ्लॅग शो — Zapurza Flag Show

    July 17, 2022
    Zapurza Kavyayog

    काव्ययोग संपन्न! — असा पार पडला झपुर्झाचा पहिला टप्पा

    July 11, 2022

    Leave A Reply Cancel Reply

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

    — जाहिरात —
    Kalnirnay 50 Years
    Social
    • YouTube
    • Facebook
    • Instagram
    • Twitter
    • WhatsApp
    • Telegram
    रंगभूमी.com
    Facebook Twitter Instagram YouTube WhatsApp Telegram RSS
    © 2023 रंगभूमी.com. Powered by iXyr Media.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.