Author: रंगभूमी.com

आजपासून पुढे ४ दिवस सुरू होतोय आपल्या लाडक्या थिएटर प्रीमियर लीगचा सीझन ३ म्हणजेच TPL – सीझन ३! तिकीट विक्री जोरात सुरू आहे. तुम्ही जर तुमचं तिकीट बुक केलं नसेल तर लवकरात लवकर तिकीट बुक करा. या सीझनचं वैशिष्टय म्हणजे या पर्वामध्ये बहुभाषिक नाटकं आपल्या भेटीस येत आहेत. पुढे नमूद केलेली मराठी, हिंदी आणि गुजराती भाषेतील ४ दर्जेदार नाटकं तुम्हाला सीझन ३ मध्ये Online बघता येणार आहेत. हिंदी नाटक सद्गती पुढील लिंकवर क्लिक करून १९ नोव्हेंबर रोजी रात्रौ ८ वाजता प्रक्षेपित होणाऱ्या सद्गती या नाटकाची तिकिटे तुम्ही बुक करू शकता. सद्गती हिंदी नाटक तिकीट विक्री काली सलवार पुढील लिंकवर क्लिक…

Read More

सणासुदीला एखादं दर्जेदार नाटक बघण्याची प्रथा अस्सल नाट्यवेड्या प्रेक्षकांमध्ये अजूनही प्रचलित आहे. याच प्रथेचा मान ठेवत घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर कलांश थिएटर, रत्नागिरी ही संस्था रसिक प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे “बिराड” हि एकांकिका! हे प्रक्षेपण विनामूल्य करण्यात येणार आहे याची तमाम रसिक प्रेक्षकांनी नोंद घ्यावी. १७ ऑक्टोबर, २०२० रोजी रात्रौ ८ वाजता “बिराड” या एकांकिकेचं कलांश थिएटरच्या YouTube चॅनेलवर Live premiere करण्यात येणार आहे. सर्व नाट्यरसिकांसाठी ही एक सुखद पर्वणीच असणार आहे. कलांश थिएटरच्या YouTube चॅनेलची लिंक पुढे दिलेली आहे. आताच त्या लिंकवर क्लिक करून चॅनेलला Subscribe करून ठेवा. https://www.youtube.com/channel/UCdVZn_2J-HSJR0TljTUpufw याच चॅनेलवर आयोजकांनी बिराड एकांकिकेचे छोटेसे ट्रेलरही पूर्वप्रक्षेपित केले आहे. ते…

Read More

सर्वप्रथम तमाम मायबाप रसिक प्रेक्षकांचे खूप आभार! तुम्ही थिएटर प्रीमियर लीग च्या सीझन १ ला भरभरून प्रेम दिलंत. म्हणूनच, यावेळी आम्ही अधिक भव्य स्वरूपात तुमच्यासाठी घेऊन येत आहोत अभिनय कल्याण आयोजित “थिएटर प्रीमियर लीग – सीझन २” Powered by रंगभूमी.com सीझन १ ला मिळालेला प्रतिसाद हा TPL च्या संपूर्ण टीमसाठी आश्चर्याचा आणि आनंदाचा एक सुखद धक्का होता. म्हणूनच, सीझन २ अधिक दणक्यात साजरा करण्याचा आमचा मानस आहे. तुम्ही या सीझनलाही तितकंच भरघोस प्रेम द्याल याबद्दल शंकाच नाही. नाट्यमहोत्सवाच्या या दुसऱ्या सीझनमध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत दीर्घांक आणि दोन अंकी नाटक… होय! अगदी कमी दारात तुम्हाला ३ दर्जेदार नाटकांचा घर…

Read More

कोरोना आणि लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर गेले बरेच महिने तमाम रसिक प्रेक्षक रंगभूमीच्या दर्शनास मुकले आहेत हे आपण सर्वजण जाणूनच आहोत. त्यांना रंगभूमीकडे नेणे तर सध्या अशक्यच! पण या कठीणसमयी रंगभूमीच प्रेक्षकांच्या घरी आणून पोहोचवण्याची किमया करणारे किमयागार म्हणजे अभिजीत झुंजारराव! सर्वत्र नैराश्याचे वातावरण पसरलेले असताना जिथे एका संस्थेचे एक नाटक उभे करणे कठीण होते तिथे अभिनय कल्याण संस्थेचे सर्वेसर्वा श्री. अभिजीत झुंजारराव यांनी ४ विविध शहरांमधील ४ विविध संस्थांची ४ विविध धाटणीची बहुरंगी नाटकं Online माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आणण्याचा प्रयोग नुकताच यशस्वीरीत्या पार पाडला आहे. See Also: बहुगुणी रंगकर्मी अभिजीत झुंजारराव यांच्याशी गप्पा TPL 2020 म्हणजेच थिएटर प्रीमियर लीग या नाट्यमहोत्सवात…

Read More

ज्येष्ठ नाटककार प्र. ल. मयेकर म्हणजेच प्रभाकर लक्ष्मण मयेकर यांच्या समर्थ लेखणीतून जन्माला आलेल्या “रातराणी” या अप्रतिम नाटकाचे अभिवाचन करायला काही प्रख्यात रंगकर्मी १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ठीक ७ वाजता आपल्या भेटीस येणार आहेत. VISION voice-n-act या संस्थेने त्यांच्या YouTube चॅनेलवर प्र. ल. मयेकर विशेष “चला, वाचू या (पुष्प ५४ वे)” या कार्यक्रमात दोन अंकी साभिनय नाट्यवाचन आयोजिले आहे. या अभिवाचनात अरुण नलावडे, अविनाश नारकर, श्रीनिवास नार्वेकर, विनीत मराठे आणि “ऍना स्मिथ” ऐश्वर्या नारकर अशा आपल्या आवडत्या कलाकारांचा सहभाग असणार आहे. पुरुषोत्तम बेर्डे यांचा ओरिजिनल म्युझिक ट्रॅक आणि ओरिजिनल सॅली स्मिथ अरुण नलावडे यांच्यासह हा एक भारावून टाकणारा अनुभव असेल…

Read More

storyयाँ production, its all about Kalyan आणि स्वामी नाट्यांगण या तीन संस्थांनी एकत्र येऊन १५ ऑगस्ट, २०२० रोजी भारतात तसेच जर्मनीमध्ये दोन online नाट्याविष्कार सादर करायचे ठरविले आहे. “लकीर” आणि “बिफोर द लाईन” या दोन एकांकिका या कार्यक्रमात दाखविल्या जातील. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या दोन्ही एकांकिकांची तयारी लॉकडाउनच्या काळात करण्यात आली आहे. या एकांकिकांचे लाईव्ह प्रक्षेपण होणार नाहीये तर त्या शूट करून प्रेक्षकांना दाखवण्यात येणार आहेत याची कृपया प्रेक्षकांनी नोंद घ्यावी. तिकीट शुल्क फक्त ५०/- भरून तुम्हाला दोन्ही एकांकिका बघता येतील. दोन्ही एकांकिकांचे ३ प्रयोग उद्या एकाच दिवसात असतील. सकाळी ११ वाजता, दुपारी ४ वाजता आणि सायंकाळी ७:३० वाजता. तुम्ही…

Read More

लॉकडाउनच्या काळात नाट्यगृहात नाटक सादर होणे आणि प्रेक्षकांना नाट्यगृहापर्यंत जाणे शक्य नसल्याने बरेच रंगकर्मी नाटक Online माध्यमातून प्रेक्षकांच्या घरापर्यंत आणण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यातीलच एक अभिनव उपक्रम म्हणजे अभिनय कल्याण आयोजित “नाट्यछटा दिवाकरांच्या”! “नाट्यछटा दिवाकरांच्या” बद्दल काही ठळक मुद्दे हा उपक्रम १५ ऑगस्ट, २०२० ते २९ ऑगस्ट, २०२० दरम्यान अभिनय कल्याण संस्थेच्या YouTube चॅनेलवर सादर होणार आहे. पुढील लिंकवर क्लिक करून तुम्ही या कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकता. https://www.youtube.com/channel/UCRkOzRPXizr6qAkrBAYCn3Qरोज सायंकाळी ७ वाजता हा कार्यक्रम सुरू होईल.नाटक, सिनेमा आणि सिरीयलच्या माध्यमातून घराघरात पोचलेले २६ कलाकार २६ निवडक नाट्यछटा सादर करणार आहेत.हा संपूर्ण प्रयोग स्वेच्छा मूल्य निधीवर राबवला जाणार आहे. म्हणजेच, आपण…

Read More

आमच्या लहानपणी मी ऐकलेली गोष्ट, घाऱ्या डोळ्यांच्या व्यक्तींशी मैत्री करु नये, का…? तर त्यांना भूत ह्या प्रकारातले (पिशाच्च) आत्मा वगैरे दिसतात म्हणे (ऐकून होतो) आणि ती व्यक्ती सोबत असणाऱ्या व्यक्तींना घाबरवतात… असो तर गोष्ट अशी आहे….. सन : २००४-२००५ कामगार कल्याण केंद्र, अंधेरी विभागातर्फे स्पर्धेच्या नाटकासाठी मी इथं कुणी कुणाला सावरायचं ह्या नाटकात काम करीत होतो. रंगीत तालमीला दोन दिवस होते आणि नाटक कमी वेळेत संपणार आहे असे कळले, आता काय करायचे सगळे  विचार करायला लागले आणि मला माझ्या ‘दोनाचे चार’ व्हायच्या अगोदरचा एक मजेशीर किस्सा आठवला, तर… आमच्या मंडळातर्फे  प्रतिवर्षाप्रमाणे श्री. सत्यनारायणाची महापूजा होती, पूजा, प्रसाद, कार्यक्रम सगळे झाले…

Read More

दर्जेदार नाटक आणि हमखास “हाऊसफुल्ल” बोर्ड यांच समीकरण निश्चितच आहे. डोंबिवलीतील ‘सावित्रीबाई फुले’ नाट्यगृहामध्ये मार्च २०१५ मधील तो ‘हाऊसफुल्ल’ बोर्ड देखील नाटकाचा हाच दर्जा दर्शवित होता. निर्माता अभिजीत साटम आणि दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव या द्वयीने ‘मिस्टर अँड मिसेस’ हे नाटक २१ डिसेंबर २०१३ ला रंगमंचावर आणले होते. चिन्मय मांडलेकर आणि मधुरा वेलणकर साटम यांच्या संयत अभिनयाने नटलेले हे नाटक आवर्जून पाहण्यासारखे होते. नवरा बायको यांचे आर्थिक ओढाताणीने हरवत चाललेले नाते आणि अचानक आलेले वळण असा खरं तर विषय. गुजराती लेखक अस्लम परवेज यांचे कथानक आणि प्रियदर्शन जाधव यांचे कल्पक दिग्दर्शन, यामुळे त्याकाळात नाट्यक्षेत्रात क्रांती घडली होती. मीरा कुलकर्णी, बँकेत काम करणारी सर्वसामान्य स्त्री,…

Read More

रंगभूमी.com चा प्रवास सुरू झाला तेव्हा नवनवीन कलाकार मंडळी आमच्याशी जोडली गेली. या कलाकार मंडळींमध्ये काही अभिनेते/अभिनेत्री होते तर काही लेखक/लेखिकाही होत्या. याच लेखकांपैकी एक महत्वाचं नाव म्हणजे राहुल हणमंत शिंदे! राहुल लिखित “मायेचा स्पर्श”, “महादू गेला”, “आभासी”, “अद(भूत) प्रकरण” अशा कितीतरी कथा तुम्ही आजवर रंगभूमी.com च्या Podcast वर किंवा YouTube चॅनेलवरही ऐकल्या असतील. या कथांचं वैशिष्टय असं आहे की सर्व कथा निरनिराळ्या धाटणीच्या आहेत. आज आम्हाला हे सांगायला खूप आनंद होत आहे की राहुलच्या अशाच विविध शैलींतील १२ कथांचा कथासंग्रह प्रकाशित झाला आहे ज्याचं नाव आहे “अज्ञात”! अज्ञातबद्दल सांगताना राहुल म्हणतो की, “माझा अज्ञात हा पहिला स्वतंत्र कथासंग्रह स्टोरीमिरर…

Read More

हो! लवकरच सुरू होतोय १३ दिवसांचा हा अनोखा Online सोहळा, ज्याचं नाव आहे THEATREEL! “Clubture” या कलाकारांच्या एका ग्रुपने THEATREEL या नाविन्यपूर्ण कार्यक्रमाची नुकतीच घोषणा केली आहे. १३ विविध अभिनेत्रींच्या अभिनयाने सजलेला हा कार्यक्रम १ ऑगस्ट, २०२० ते १३ ऑगस्ट, २०२० अशा १३ दिवसांमध्ये प्रेक्षकांना बघता येणार आहे. संकल्पना — Theatreel पूर्णतः हुसेन झैदी लिखित “माफिया क्वीन्स ऑफ मुंबई” या पुस्तकातील १३ विविध कथांवर आधारित असणार आहे. या पुस्तकामध्ये माफिया गॅंगशी जोडल्या गेलेल्या १३ स्त्रियांच्या १३ विविध कथा आहेत. याच १३ कथा संपूर्ण महाराष्ट्रभरातून मुंबई, पुणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद अशा विविध शहरांमधून हौशी आणि प्रायोगिक रंगभूमी गाजवलेल्या १३ अभिनेत्री त्यांच्या…

Read More

आमची ताई, म्हणजे माझी मोठी बहीण, वरळी येथे “जनता शिक्षण संस्था” या शाळेत शिक्षिका होती. या शाळेत व्यवस्थापक मंडळात माझे काकाही उच्चपदावर होते. शाळेच्या जीर्णोद्धारासाठी आणि काही मजले आणखी वाढवण्यासाठी काही प्रथितयश नाट्यसंस्थांचे व्यावसायिक नाट्यप्रयोग करून निधी जमा करावा यासाठी या शाळेने “धि गोवा हिंदू असो.” चे संगीत मत्स्यगंधा हे नाटक करावयाचे ठरवले. मी त्यावेळी साधारण सहावी ते सातवीत असेन. नाटकं तर मी गणेशगल्लीच्या मैदानात, आमच्या मेघवाडीच्या मैदानात आणि गावी तर दशावतारी नाटकेही जत्रांमधून पाहिली होती. पण नाट्यगृहात आणि तेही रवींद्र नाट्य मंदिरात पाहण्याची ही माझी पहिलीच खेप होती. त्यावेळी रवींद्र नाट्य मंदिर छोटेसे व टूमदार पण वातानुकूलित व भव्यही…

Read More