चिन्मय मांडलेकर लिखित-दिग्दर्शित व अष्टविनायक निर्मित ‘व्हॅक्यूम क्लिनर’ हे सुपरहीट धमाल नाटक पुन्हा रंगभूमीवर आले आहे. या नाटकाचे प्रयोग यापूर्वीही हाऊसफुल होत होते आणि आजही त्याच ताकदीने हे नाटक प्रेक्षकांचे हाऊसफुल प्रेम संपादित करण्यात यशस्वी होताना दिसत आहे. म्हणूनच, कलाकारांचा उत्साह वाढवण्यासाठी १४ नोव्हेंबर, २०२१ रोजी मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विले-पार्ले येथे सादर झालेल्या प्रयोगा दरम्यान रंगभूमी.com च्या टीमने ‘व्हॅक्यूम क्लिनर’ च्या सर्व कलाकारांची भेट घेतली. नाटकाबद्दल आणि कलाकारांच्या व्यक्तिरेखांबद्दल जाणून घेण्यासाठी प्रस्तुत विडिओ नक्की बघा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांसाठी एक छान संदेश दिलेला आहे. तोही ऐका!
‘व्हॅक्यूम क्लिनर’ नाटकाचे समीक्षण जर अद्याप तुम्ही वाचले नसेल तर पुढील लिंकवर क्लिक करून ते नक्की वाचा → व्हॅक्यूम क्लीनर मराठी नाटक [Review]
सध्याच्या घडीला दीनानाथ नाट्यगृहात COVID संबंधी अत्यावश्यक निर्देशनांचे अचूक पालन केले जात आहे. नाट्यगृहातील सुरक्षा कर्मचारी प्रवेशद्वाराजवळ काळजीपूर्वकरीत्या कलाकार व प्रेक्षकांचे तापमान तपासूनच त्यांना आत प्रवेश देताना दिसले. तसेच ते सगळ्यांचे मास्क व vaccination डोसबद्दलही विचारपूस करत असल्याचे लक्षात आले. प्रवेशद्वाराजवळच COVID काळात आपल्या सर्वांचेच सुरक्षाकवच ठरलेला Sanitiser सुद्धा Automatic Sanitiser Dispensers द्वारे जागोजागी रंगकर्मींसाठी तैनात करण्यात आल्याचे निदर्शनास आहे. सर्व सुरक्षा कर्मचारी आपले कर्तव्य हिरीरीने बजावत आहेत. अशा वेळी प्रेक्षकांनीही थोडासा सुज्ञपणा दाखवून कुठेही घोळका करून उभे ना राहता सुटसुटीत उभे राहणे अर्थातच योग्य! नाटक बघण्यासाठी एक सोडून बैठकीचा वापर करायचा आहे हे तर आपण जाणून आहोतच.
व्हॅक्यूम क्लीनर मराठी नाटक प्रेक्षक प्रतिक्रिया व्हिडीओ

यापुढेही व्हॅक्यूम क्लीनर नाटकाचे संपूर्ण महाराष्ट्रात भरपूर प्रयोग होणार आहेत. या नाटकाचे तिकिटे बुक करण्यासाठी पुढील लिंक चा वापर करा.
व्हॅक्यूम क्लीनर या मराठी नाटकाची तिकीट विक्री येथे सुरु आहे.
————
For more videos like these, don’t forget to Subscribe to रंगभूमी.com’s YouTube channel and give us your support.


![अश्शी दिसणार आहे ‘आज्जीबाई जोरात’ नाटकातील खुसखुशीत आज्जी [Exclusive First Look] aajjibai jorat aajji first look reveal](https://www.rangabhoomi.com/wp-content/uploads/2024/04/aajjibai-jorat-aajji-first-look-reveal-450x253.jpg)
![मुक्काम पोस्ट आडगाव — उत्कृष्ट अभिनय, सुरेल गाणी आणि लयबद्ध नृत्यांनी परिपूर्ण अशी चटकदार मिसळ! [Mukkam Post Adgaon Review] mukkam post adgaon cover](https://www.rangabhoomi.com/wp-content/uploads/2024/02/mukkam-post-adgaon-cover-450x253.jpg)