Author: प्रेषित देवरुखकर

मंडळी! तुम्हाला तुमच्या गावच्या आठवणी कुणी विचारल्या की काय होतं? अर्थात खूप गप्पा रंगतात. गावच्या आठवणी ताज्या होतात आणि मग त्या गप्पांमधून आठवणीतील किस्से, ओळखीची ठिकाणं, गावची माणसं यांचा एक रंगीत असा कोलाज आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. तो कोलाज रंगभूमीवर थेट आपल्यासमोर उतरविण्याच्या एक प्रयत्न म्हणजे अष्टविनायक प्रकाशित अकॅडमी ऑफ सिनेमा अँड थिएटर निर्मित स्नेहा प्रदीप प्रॉडक्शनचं नाटक ‘मुक्काम पोस्ट आडगाव’! जशा गावच्या गप्पा संपल्यावरही मनातला गावचा प्रवास सुरूच राहतो अगदी तसंच ‘मुक्काम पोस्ट आडगाव’ हे नाटक बघून प्रेक्षक नाट्यगृहाबाहेर पडतात ते अतिशय भावूक होऊन! गावची जत्रा, गावच्या घरातली माणसं, समुद्रावर जाण्याची धमाल, टमटममधील प्रवास असं सगळं झपझप डोळ्यासमोर तरळत…

Read More

मी नुकतंच वामन तावडे लिखित आणि अभय पैर दिग्दर्शित ‘छिन्न’ हे नाटक बघून आले. नाट्यगृहात प्रवेश करताना पोस्टर बघितलं तर त्यावर लिहिलेली एक ओळ मनात घर करून राहिली. ‘४४ वर्षांपूर्वीचे वादळ पुन्हा एकदा तेवढ्याच ताकदीने’… अशी ती ओळ होती. ती ओळ वाचून बरेच प्रश्न पडले. पुढील काहीच वेळात मी नाटकाच्या संपूर्ण टीमची मुलाखत घेण्यासाठी भेट घेणारच होते. त्यामुळे म्हटलं Google कडे न वळता टीमकडूनच या ओळीमागची हकीगत जाणून घ्यावी. मी बॅकस्टेज गेले. व्ही. आय. पी. रुममध्ये नाटकातील कलाकारांच्या मुलाखती घेत होते आणि मध्येच ती समोर येऊन बसली. मी बाकीच्यांप्रमाणे तिलाही विचारलं की तुम्ही कोणती भूमिका साकारताय? तर ती हसली. म्हणाली……

Read More

मंडळी, तुम्हाला ‘एक डाव भटाचा’ हे धमाल विनोदी नाटक आठवतंय? याच नाटकामुळे वैभव मांगले घराघरात पोहोचले. त्यानंतर वैभव दादांनी बऱ्याच अजरामर भूमिका साकारल्या. वेगवेगळ्या धाटणीच्या. अगदी आजही त्यांची वाडा चिरेबंदी, संज्या छाया ही नाटकं रंगभूमीवर प्रेक्षकांची मनं जिंकतायत. पण आज वैभव दादा पुन्हा ‘Home Pitch’ वर अर्थात विनोदी genre मध्ये नवी इनिंग खेळण्यासाठी सज्ज झालेले आहेत आणि होम ग्राउंड म्हटल्यावर सिक्सर वर सिक्सर तर कम्फर्म आहेतच ना! आणि त्याला दिलीप जाधव यांच्या अष्टविनायक नाट्यसंस्थेची व धमाल विनोदी नाटकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या संतोष पवार यांच्या दिग्दर्शनाची जोड मिळणं म्हणजे बहारच! निवेदिता सराफ आणि मयुरी मांगले या नाटकाला सहनिर्मात्या म्हणून लाभल्या आहेत. Murderwale…

Read More

आपल्या देशात अलिकडच्या काळातील वाढत्या स्त्री अन्याय-अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर या वर्षीच्या आविष्कार ५३ वा वर्धापनदिन आणि ३७ वा अरविंद देशपांडे स्मृती महोत्सवात स्त्री कलाकारांचे एकपात्री प्रयोग सादर होणार आहेत. स्त्री आणि समाज या अनुशंगाने विविध विषयांकडे पाहण्याचा स्त्रियांचा दृष्टीकोन हे या महोत्सवाचं वैशिष्ट्य असणार आहे. शुक्रवार, ९ फेब्रुवारी, २०२४ ला या महोत्सवाचे शुभारंभ होणार असून, दररोज सायंकाळी ७ वाजता प्रयोग होणार आहेत व मंगळवार, १३ फेब्रुवारी, २०२४ ला या महोत्सवाची सांगता होणार आहे. गोरेगाव येथील केशव गोरे स्मारक ट्रस्ट, आरे रोड, येथे हा महोत्सव पार पडणार आहे. महोत्सवाची कार्यक्रमपत्रिका खालीलप्रमाणे शुक्रवार, ९ फेब्रुवारी ‘अंजोर’ निर्मित शुभारंभाचा प्रयोग व्हय, I am Savitribai Phule…

Read More

तिसरी घंटा वाजते. सचिन खेडेकरजींच्या खणखणीत आवाजात नाटकाची announcement होते… पडदा उघडतो. पुण्यातील एक वाडा आपल्याला दिसतो. त्या वाड्याच्या मधोमध एक कारंजं आणि कारंजाच्या पायथ्याशी बसलेली ईला… ईला कोण? ज्येष्ठ साहित्यकार मानव किर्लोस्करांची धाकली लेक! एवढ्या मोठ्या वाड्यात कुणाची जाग दिसत नाही. ती एकटीच बसलेली असते मान खाली घालून. पुढे काय होतं? तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ‘ग़ालिब’ नाटकाला भेट द्या. कारण असं नाटक वारंवार घडत नाही. मंडळी, एक अख्खा काळ लोटावा लागतो असं नाटक रंगभूमीवर जन्माला येण्यासाठी. आणि आज ते रंगभूमीवर अवतरलंय. अष्टविनायक प्रकाशित आणि मल्हार व वज्रेश्वरी निर्मित मराठी नाटक ‘ग़ालिब’ च्या स्वरूपात! गालिब — एक अशी शब्दसहल…

Read More

मुंबईतील दादरस्थित श्री शिवाजी मंदिर हे नाट्यगृह आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचं आहे. दिग्गज रंगकर्मींच्या अजरामर कलाकृतींचा इतिहास लाभलेलं हे नाट्यगृह रसिक प्रेक्षकांसाठी भावनिक पातळीवर किती महत्वाचं ठरतं, हेही आपण जाणतो. परंतु, येत्या काही काळात, प्रेक्षकांना या नाट्यदालनापासून थोडं लांब राहावं लागणार असं दिसतंय. कारण, तब्बल २३ नाटकांकडून या नाट्यगृहावर येत्या १ जानेवारी, २०२४ पासून बहिष्कार टाकण्यात आलेला आहे. Marathi Natak Producers Boycott Shree Shivaji Mandir Theatre रसिक प्रेक्षकांचं मन जिंकतील अशी चांगली आणि दर्जेदार नाटकं सध्या रंगभूमीवर गाजतायत. येत्या ‘वीकेंड’ला नेमक्या कुठल्या नाटकाला प्राधान्य द्यावं, असा प्रश्न दर आठवड्याला प्रेक्षकांच्या मनात डोकावत आहे, आणि हीच खरं तर नाटकांसाठी जमेची बाजू आहे.…

Read More

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे शतक महोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ. जब्ब्बर पटेल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असून या संमेलनाचे स्वागताध्यक्ष मा.श्री. शरद पवार व मुख्य निमंत्रक मा.ना.श्री. उदय सामंत आहेत, असे आज सुप्रसिद्ध अभिनेते व नाट्य परिषदेचे अध्यक्ष श्री. प्रशांत दामले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तंजावर येथे ९९ व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष श्री. प्रेमानंद गज्वी व नाट्य परिषदेचे पदाधिकारी व सदस्य यांच्या उपस्थितीत नाट्य संहिता पूजन व नटराज पूजन होणार आहे. यानंतर नाट्य संमेलनाच्या सोहळ्याची मुहूर्तमेढ कार्यक्रम सांगली येथे दिनांक २९ डिसेंबर २०२३ रोजी होणार आहे. https://youtu.be/q_DZpJslAls Akhil Bhartiya Marathi Natya Parishad – 100th Natya Sammelan…

Read More

“बायका सोशिक असतात”, “बायकांनी कसं… सोशिक असायला हवं”, “बाईच्या जातीने असं वागावं”, “बाईच्या जातीने असं वागू नये”, स्त्रीजातीबद्दल अशी कितीतरी विधानं दैनंदिन आयुष्यात सतत आपल्या कानावर आदळत असतात. अशा विधानांच्या उत्पत्तीमागे कारणं तशी बरीच आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या चालीरीती. स्त्रियांना लग्न करुन परक्या घरात जावं लागतं. त्यामुळे तिलाच सगळं सामंजस्याने समजून घ्यावं लागतं. लग्नानंतर तिचं ओळखीचं असं काहीच नसतं. नवं घर, नव्या पद्धती… या नव्या पद्धतींना आपलंसं करण्यासाठीच वरील विधानांचं जणू बाळकडूच मुलींना लहानपणीपासून पाजलं जातं. आजही समाजात बायकांचा छळ सुरू आहे. काहीच बदललेलं नाही. हे झालं बायकांचं, पण लहान मुली… त्यांचं काय? त्यांची परिस्थिती याहून खराब…

Read More

१९६१ पासून महाराष्ट्र सरकार राज्यातील सर्व कलांचे जतन, संवर्धन व त्यांमध्ये नवनवीन संशोधन करण्यासाठी नाट्य, नृत्य, संगीत, लोककला, साहित्य व चित्रपट या कलांना समृद्ध आणि सक्षम करण्याचे व कलावंतांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यासपीठ निर्माण करून सन्मान देण्याचे कार्य करीत आहे. २०२३ हे वर्ष, महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेचे ६२ वे वर्ष आहे. हौशी मराठी नाट्य स्पर्धा २०२३-२०२४ स्पर्धेची नवीन नियमावली पुढीलप्रमाणे आहे. राज्य नाट्य स्पर्धा – नियमावली व माहिती (Rajya Natya Spardha – Rules & Regulations) ६२ वी महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत हौशी मराठी नाट्य स्पर्धेचा प्रवेश अर्ज यावर्षी ऑनलाईन स्वरूपातच स्वीकारल्या जाणार आहेत. पुढील लिंकवर क्लिक करुन तुम्ही ऑनलाईन…

Read More

व्हिजन निर्मित आणि पु. ल. देशपांडे लिखित ‘एक झुंज वाऱ्याशी’ या नाटकाचा २४ वा प्रयोग अलिकडेच पाहिला. ‘द लास्ट अपॉइंटमेंट’ या रशियन नाटकाचे, प्रख्यात लेखक पु. ल. देशपांडे यांनी केलेले, हे मराठी रूपांतरण आहे. एक सामान्य माणूस स्वतःवर नव्हे, तर दुसऱ्या कोणातरी व्यक्तींवर झालेल्या अन्यायासाठी सबळ पुराव्यांशी लढा देतो, एवढंच नव्हे तर आरोग्य उपमंत्री महोदयांच्या कार्यालयात जाऊन राजीनामा देण्याची सतत मागणी करतो. अशा घटनेवर आधारलेले संस्मरणीय नाट्य या नाटकामध्ये घडते. या नाटकातील सामान्य माणसाने न्यायासाठी केलेला संघर्ष प्रेक्षकांच्या मनाला नकळत भिडत जातो, शिवाय प्रेक्षकांना विचार करायला देखील भाग पाडतो. पूर्वीच्या काळची सामाजिक आणि राजकीय परिस्थिती अगदी वर्तमान काळात देखील बदललेली…

Read More

‘स्वरा’ ही एक सुशिक्षित, स्वतःवर पूर्णपणे विश्वास असलेली, आत्मनिर्भर आणि छानश्या कुटुंबात पण वडिलांच्या छत्रछायेशिवाय वाढलेली मुलगी, मात्र प्रेमाच्या बाबतीत कायम अपयशीच. तिची आई मंजुषा पतीच्या निधनानंतर आयुष्याकडे नव्याने बघण्याचा प्रयत्न करतेय. अनपेक्षितपणे तिची कॉलेजचा मित्र यशवंत पाटील बरोबर झालेली भेट. स्वराच्या आयुष्यात नव्याने आलेला तिच्या ऑफिसमधला सहकारी मित्र कपिल. या चौघांच्या आयुष्यात एकत्रितपणे घडणार्‍या गोष्टी अगदी अलगदपणे उलगडून आणि हसत खेळत मांडणी करणाऱ्या या नाटकात सहजीवनाचा खरा अर्थ उलगडलेला पहायला मिळतो. लेखक आदित्य मोडक आणि दिग्दर्शक नितीश पाटणकर यांच हे पहिलच व्यावसायिक नाटक, त्यांनी दोन पिढ्यांच्या नातेसंबंधाचा आणि समाजाकडे बघण्याचा दृष्टीकोन मांडण्याचा केलेला प्रयत्न प्रचंड यशस्वी झालेला आहे. कपिलच्या…

Read More

संपूर्ण महाराष्ट्रात सध्या कडाक्याचा उन्हाळा जाणवतोय. अशातच लहान मुलांना सुट्ट्या पडल्यामुळे नाटकांना जाणाऱ्या प्रेक्षकांची संख्या वाढताना दिसतेय. याच कारणामुळे, बऱ्याच नाटकांच्या प्रयोगांच्या संख्येतही वाढ झालेली दिसतेय. काही नाटकांचे महाराष्ट्रभर दौरेही सुरू आहेत. परंतु, या दौऱ्यांमध्ये कलाकारांना बऱ्याच संकटांना तोंड द्यावं लागत आहे, असं दिसतंय. वैभव मांगले या हरहुन्नरी कलाकाराने एका पोस्टद्वारे फेसबुकवर अतिशय परखड शब्दात या सर्व प्रकारावर टीका केली आहे. ‘संज्या छाया’ नाटकाचा दौरा सुरू होता. या दौऱ्यादरम्यान नाटकाच्या संपूर्ण टीमला खूपच वाईट अनुभव आला. वैभव मांगलेंनी या संपूर्ण प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त करत फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे. मुंबईबाहेरील बऱ्याच नाट्यगृहात AC व्यवस्थित सुरू नसल्याने प्रयोगादरम्यान कलाकारांचं आणि प्रेक्षकांचं…

Read More