Tuesday, November 30, 2021

थिएटर प्रीमियर लीग ऑनलाईन नाट्यमहोत्सव: अधिक भव्य स्वरूपात ‘सीझन २’ लवकरच तुमच्या भेटीला!

सर्वप्रथम तमाम मायबाप रसिक प्रेक्षकांचे खूप आभार! तुम्ही थिएटर प्रीमियर लीग च्या सीझन १ ला भरभरून प्रेम दिलंत. म्हणूनच, यावेळी आम्ही अधिक भव्य स्वरूपात तुमच्यासाठी घेऊन येत आहोत अभिनय कल्याण आयोजित “थिएटर प्रीमियर लीग – सीझन २” Powered by रंगभूमी.com

सीझन १ ला मिळालेला प्रतिसाद हा TPL च्या संपूर्ण टीमसाठी आश्चर्याचा आणि आनंदाचा एक सुखद धक्का होता. म्हणूनच, सीझन २ अधिक दणक्यात साजरा करण्याचा आमचा मानस आहे. तुम्ही या सीझनलाही तितकंच भरघोस प्रेम द्याल याबद्दल शंकाच नाही.

नाट्यमहोत्सवाच्या या दुसऱ्या सीझनमध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत दीर्घांक आणि दोन अंकी नाटक… होय! अगदी कमी दारात तुम्हाला ३ दर्जेदार नाटकांचा घर बसल्या आस्वाद घेता येणार आहे. ऑनलाईन तिकीट विक्री पुढे दिलेल्या लिंकवर सुरू झालेली आहे.

https://www.rangabhoomi.com/tpl2/

पोस्टरखाली दिलेल्या “Get Tickets” बटनवर क्लिक करून नाटकाचे तिकीट बुक करा. तुम्ही एक अथवा एकाहून अधिक तिकिटेही काढू शकता. त्वरा करा! तुमची TPL – सीझन २ ची तिकिटे आजच बुक करा.

या नाट्यमहोत्सवात बघता येणारी नाटकं आणि त्यांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे असेल.

Theatre Premier League - Season 2 — Schedule & Ticket Prices
Theatre Premier League – Season 2 — Schedule & Ticket Prices

तुम्हाला आमची ही संकल्पना आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबियांना त्याबद्दल नक्की सांगा. तर मग भेटू लवकरच… TPL – सीझन २ च्या लाईव्ह प्रयोगामध्ये! तोपर्यंत रंगभूमी.com ला सोशल मीडियावर Follow, Like आणि Subscribe करायला विसरू नका.

https://www.rangabhoomi.com/tpl2/

तुमचे प्रोत्साहन लाख मोलाचे

आम्हाला आशा आहे की तुम्हाला प्रस्तुत लेख आवडला असेल व यापुढेही आमचे लेख वाचण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल. तुम्हाला काही छोटीशी रक्कम रंगभूमी.com च्या प्रोत्साहनार्थ देणगी स्वरुपात द्यायची असेल तर आम्ही त्याचे स्वागत करू.

- जाहिरात -spot_img

More articles

1 COMMENT

  1. सिझन 2 ला खूप खूप शुभेच्छा !??

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

— जाहिरात —

Latest Articles

%d bloggers like this: