हंडाभर चांदण्या (मराठी नाटक)
लेखक : दत्ता पाटील / दिग्दर्शक : सचिन शिंदे
'हंडाभर चांदण्या' या नाटकाविषयी...
‘हंडाभर चांदण्या’ या नाटकाने प्रायोगिक रंगभूमीला एक नवे वळण दिले, असे म्हटले जाते. सध्याचा पाण्याचा अत्यंत भीषण प्रश्न या नाटकातून अतीशय वेगळ्या पद्धतीने मांडला आहे. पाण्याच्या टँकरची डोळ्यात प्राण आणून वाट पाहण्यासाठी माळावर जमलेल्या छोट्याशा दुष्काळी गावातील विलक्षण गोष्ट यात मांडली आहे. लोकसंगिताच्या प्रभावी माध्यमातून सद्यस्थितीवर साध्या जगण्यातून उपहासात्मक भाष्य करणारे हे नाटक सचिन शिंदे यांनी दिग्दर्शित केले आहे. प्रमोद गायकवाड हे निर्माते असून, प्राजक्त देशमुख, प्रणव पगारे, दीप्ती चंद्रात्रे, गीतांजली घोरपडे, नुपूर सावजी, अरूण इंगळे, राहूल गायकवाड, राजेंद्र उगले, दत्ता अलगट, धनंजय गोसावी यांच्या भूमिका आहेत. दिल्लीतील एनएसडीच्या भारंगमसह, सारंग, वसंतोत्सव, दामू केंकरे महोत्सव, अविष्कार महोत्सव यासह अनेक महोत्सव या नाटकाने गाजवले आहेत.
तिकिटे कशी आरक्षित कराल?
Theatre Premier League 2020 नियमावली
हेल्पलाईन
तिकीट बुकिंग बद्दल शंका अथवा प्रक्रियेमध्ये अडथळा आल्यास 999-256-256-1 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा.