Search for:

Theatre Premier League 2020 / थिएटर प्रीमियर लीग २०२०

थिएटर प्रीमियर लीग २०२० (Theatre Premier League 2020) च्या माध्यमातून जगभरातील मराठी रसिक एकाच वेळी ऑनलाइन पद्धतीने या लीगमधील नाटके बघू शकणार आहेत. चार नाटकांचा हा महोत्सव असून यात महाराष्ट्रातील ही उत्तम नाटके दररोज रात्री ८ वाजता सादर होणार आहेत. तिकीट दर प्रती नाटक ५५ रूपये आणि पुर्णोत्सव तिकीट दर १६० रुपये असेल.

Theatre Premier League 2020
Theatre Premier League 2020 Schedule & Dates

थिएटर प्रीमियर लीग २०२०” द्वारे अशा प्रकारचा ऑनलाइन नाट्य महोत्सव महाराष्ट्रात पहिल्यांदाच होत असून रसिकांसाठी ही पर्वणीच आहे. या लॉकडाउनच्या काळात कलावंत आणि रसिक यांचं नातं जोडणारा हा थिएटर प्रीमियर लीग २०२० नाट्य महोत्सव प्रेरक ठरू शकतो.

तिकिटे कशी आरक्षित कराल? (Theatre Premier League 2020 Tickets)

 1. खाली दिलेल्या पिवळ्या रंगाच्या “Buy Tickets Now” button वर क्लिक करावे.
 2. तुम्हाला हव्या असलेल्या तिकिटांचे प्रमाण निवडा.
 3. NEXT” button वर क्लिक करून पुढील स्क्रीनवर आपले ईमेल, मोबाईल नंबर, पूर्ण नाव व WhatsApp नंबर (if different) भरा.
 4. PROCEED TO PAY” button वर क्लिक करून Payment ची प्रक्रिया पूर्ण करा.
 5. Payment Confirmation स्क्रीनवर असलेला Payment ID copy करून त्याची कुठेतरी नोंद करा. हा Payment ID हेच तुमचे तिकीट मानले जाईल.

तिकीट बुकिंग बद्दल शंका अथवा प्रक्रियेमध्ये अडथळा आल्यास ९९६७६९९९५९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा.

Theatre Premier League 2020 – Ticket Booking Demo Video

तिकिटे बुक करण्यासाठी पुढील Demo Video ची तुम्हाला नक्कीच मदत होईल.

Theatre Premier League 2020 नियमावली

 1. दर्शकांना एकाच वेळी प्रत्येक प्रयोगाची एक किंवा एकापेक्षा जास्त तिकिटे बुकींग करता येईल. तसेच चारही प्रयोगांचे एक किंवा एकाहून जास्त सीझन पासही बुक करता येतील.
 2. आरक्षित केलेल्या तिकिटाचे मूल्य कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
 3. महोत्सवामध्ये सादर होणारा प्रत्येक प्रयोग बघण्यासाठी दर्शकांकडे Facebook अकाऊंट असणे आवश्यक आहे.
 4. तिकीट बुकिंग करण्यासाठी तुम्ही पुढील पर्यायांचा वापर करू शकता. UPI (For. e.g.: PhonePe, Google Pay, BHIM, Paytm UPI, etc.), Net Banking, Credit Cards, Debit Cards or Wallet apps.
 5. महोत्सवातील प्रयोगांचे सादरीकरण एका खाजगी फेसबुक ग्रुपवर करण्यात येणार आहे. या फेसबुक ग्रुपची लिंक तुम्हाला प्रत्येक प्रयोगाच्या २४ तास आधी ईमेल आयडीवर पाठवण्यात येईल.
 6. ईमेल मिळाल्यावर दिलेल्या लिंकवर क्लिक करून दर्शकांनी ग्रुप जॉईन करणे आवश्यक आहे. हे केल्या शिवाय दर्शकांना प्रयोग पाहता येणार नाही.
 7. महोत्सवात सादर होणारे प्रयोग पाहण्यात तुमच्या बाजूने काही तांत्रिक अडचण आल्यास रंगभूमी.com त्यासाठी जबाबदार असणार नाही.