दर्जेदार नाटक आणि हमखास “हाऊसफुल्ल” बोर्ड यांच समीकरण निश्चितच आहे. डोंबिवलीतील ‘सावित्रीबाई फुले’ नाट्यगृहामध्ये मार्च २०१५ मधील तो ‘हाऊसफुल्ल’ बोर्ड देखील नाटकाचा हाच दर्जा दर्शवित होता. निर्माता अभिजीत साटम आणि दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव या द्वयीने ‘मिस्टर अँड मिसेस’ हे नाटक २१ डिसेंबर २०१३ ला रंगमंचावर आणले होते. चिन्मय मांडलेकर आणि मधुरा वेलणकर साटम यांच्या संयत अभिनयाने नटलेले हे नाटक आवर्जून पाहण्यासारखे होते. नवरा बायको यांचे आर्थिक ओढाताणीने हरवत चाललेले नाते आणि अचानक आलेले वळण असा खरं तर विषय. गुजराती लेखक अस्लम परवेज यांचे कथानक आणि प्रियदर्शन जाधव यांचे कल्पक दिग्दर्शन, यामुळे त्याकाळात नाट्यक्षेत्रात क्रांती घडली होती. मीरा कुलकर्णी, बँकेत काम करणारी सर्वसामान्य स्त्री,…
Author: रंगभूमी.com
रंगभूमी.com चा प्रवास सुरू झाला तेव्हा नवनवीन कलाकार मंडळी आमच्याशी जोडली गेली. या कलाकार मंडळींमध्ये काही अभिनेते/अभिनेत्री होते तर काही लेखक/लेखिकाही होत्या. याच लेखकांपैकी एक महत्वाचं नाव म्हणजे राहुल हणमंत शिंदे! राहुल लिखित “मायेचा स्पर्श”, “महादू गेला”, “आभासी”, “अद(भूत) प्रकरण” अशा कितीतरी कथा तुम्ही आजवर रंगभूमी.com च्या Podcast वर किंवा YouTube चॅनेलवरही ऐकल्या असतील. या कथांचं वैशिष्टय असं आहे की सर्व कथा निरनिराळ्या धाटणीच्या आहेत. आज आम्हाला हे सांगायला खूप आनंद होत आहे की राहुलच्या अशाच विविध शैलींतील १२ कथांचा कथासंग्रह प्रकाशित झाला आहे ज्याचं नाव आहे “अज्ञात”! अज्ञातबद्दल सांगताना राहुल म्हणतो की, “माझा अज्ञात हा पहिला स्वतंत्र कथासंग्रह स्टोरीमिरर…
हो! लवकरच सुरू होतोय १३ दिवसांचा हा अनोखा Online सोहळा, ज्याचं नाव आहे THEATREEL! “Clubture” या कलाकारांच्या एका ग्रुपने THEATREEL या नाविन्यपूर्ण कार्यक्रमाची नुकतीच घोषणा केली आहे. १३ विविध अभिनेत्रींच्या अभिनयाने सजलेला हा कार्यक्रम १ ऑगस्ट, २०२० ते १३ ऑगस्ट, २०२० अशा १३ दिवसांमध्ये प्रेक्षकांना बघता येणार आहे. संकल्पना — Theatreel पूर्णतः हुसेन झैदी लिखित “माफिया क्वीन्स ऑफ मुंबई” या पुस्तकातील १३ विविध कथांवर आधारित असणार आहे. या पुस्तकामध्ये माफिया गॅंगशी जोडल्या गेलेल्या १३ स्त्रियांच्या १३ विविध कथा आहेत. याच १३ कथा संपूर्ण महाराष्ट्रभरातून मुंबई, पुणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद अशा विविध शहरांमधून हौशी आणि प्रायोगिक रंगभूमी गाजवलेल्या १३ अभिनेत्री त्यांच्या…
आमची ताई, म्हणजे माझी मोठी बहीण, वरळी येथे “जनता शिक्षण संस्था” या शाळेत शिक्षिका होती. या शाळेत व्यवस्थापक मंडळात माझे काकाही उच्चपदावर होते. शाळेच्या जीर्णोद्धारासाठी आणि काही मजले आणखी वाढवण्यासाठी काही प्रथितयश नाट्यसंस्थांचे व्यावसायिक नाट्यप्रयोग करून निधी जमा करावा यासाठी या शाळेने “धि गोवा हिंदू असो.” चे संगीत मत्स्यगंधा हे नाटक करावयाचे ठरवले. मी त्यावेळी साधारण सहावी ते सातवीत असेन. नाटकं तर मी गणेशगल्लीच्या मैदानात, आमच्या मेघवाडीच्या मैदानात आणि गावी तर दशावतारी नाटकेही जत्रांमधून पाहिली होती. पण नाट्यगृहात आणि तेही रवींद्र नाट्य मंदिरात पाहण्याची ही माझी पहिलीच खेप होती. त्यावेळी रवींद्र नाट्य मंदिर छोटेसे व टूमदार पण वातानुकूलित व भव्यही…
माझ्या आठवणीतील नाटक — सूर्याची पिल्ले
सर्वप्रथम नाट्यरसिक of the Month स्पर्धेला दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल खूप धन्यवाद! नाट्यरसिक of the Month स्पर्धेमध्ये आम्ही नाटकाशी संबंधित काही प्रश्न विचारले होते. त्या प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन तुम्हाला नाटकांबद्दल असलेली ओढ तुम्ही सिद्ध केलीय. म्हणूनच या महिन्यात आम्ही तुमच्या भेटीला एक नवीन स्पर्धा घेऊन आलो आहोत. या स्पर्धेचं नाव आहे नटसम्राट/नटसम्राज्ञी of the Month. नावावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की ही स्पर्धा अभिनयाशी संबंधित असणार आहे. परंतु याही पलीकडे या स्पर्धेमागचा मुख्य हेतू असणार आहे तो म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रंगभूमी स्थगित झालेली असताना रसिक प्रेक्षकांना नाट्यसृष्टीशी बांधून ठेवण्याचा! मंडळी! आपण बरीच नाटकं बघत असतो. काही नाटकं, त्यांची पुस्तकं आपण…
“प्रयोग मालाड” निर्मित आणि प्रेमानंद गज्वी लिखित “घोटभर पाणी” या एकांकिकेने सर्वत्र धुमाकूळ घातला होता. सामाजिक आशय असलेल्या या एकांकिकेचे, एकांकिका स्पर्धा, पथ नाटय, टेरेस थिएटर असे सर्वत्र प्रयोग होत होते. “प्रयोग मालाड” ने या एकांकिकेद्वारे जनजागृती करण्याचा जणू वसा घेतला होता. रामकृष्ण गाडगीळ आणि मी “घोटभर पाणी” चे प्रयोग सादर करत होतो. गाडगीळांची भूमिका सुनील तावडेही करत असे. तर माझी भूमिका हिंदीमध्ये राजेंद्र चावला करायचा. ५० वा प्रयोग, नाटयदर्पणचे सुधीर दामले यांच्या उपस्थितीत पथ नाटय स्वरूपात सादर झाला. १०० व्या प्रयोगापर्यंत आम्ही लवकरच पोहोचणार होतो. १०० वा प्रयोग छबिलदासला करण्याचे दोन महिने आधीच ठरले होते. तेवढ्यात मला मोटरसायकलचा अपघात…
काव्यप्रेमींसाठी आजपासून तीन दिवस संध्याकाळी ४ वाजता “भावांतरण” हा एक सुंदर सोहळा Rimzimgunjan_art या इंस्टाग्राम अकाउंट वर आयोजिण्यात आला आहे. पावसाच्या सरी कोसळत असताना वाफाळलेला चहाचा कप हातात घेऊन घर बसल्या या कार्यक्रमाचा आनंद घेणं म्हणजे काव्य रसिकांसाठी मेजवानीच ठरणार आहे. ३, ४, ५ जुलै, २०२० रोजी पार पडणारा हा सोहळा तुम्ही इंस्टाग्राम वर Live पाहू शकता ठीक ४ वाजता. पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून हा कार्यक्रम नक्की पहा आणि अभिप्राय कळवा.https://www.instagram.com/Rimzimgunjan_art/ तीन दिवसांच्या सोहळ्यासाठी आपल्याला सादरकर्ते म्हणून डॉ. नितीन अभ्यंकर, डॉ. मुकुल आचार्य आणि डॉ. अस्मिता दीक्षित हे मान्यवर लाभणार आहेत. तसेच मुलाखतकार असणार आहेत सौ. विजया पाटील. “भावांतरण”…
ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक श्री. लीलाधर कांबळी यांचे २ जुलै, २०२० रोजी रात्री ९ च्या सुमारास त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. गेली २ वर्षे ते कॅन्सरशी लढा देत होते. हसवाफसवी, केला तुका नि मका झाला, वस्त्रहरण या नाटकांमधील त्यांनी साकारलेल्या भूमिका चांगल्याच गाजल्या. त्यांनी मच्छिंद्र कांबळी यांच्याही बरोबर अनेक नाटकांमधून त्यांनी कामे केली. दिलीप प्रभावळकरांच्या बहुरूपी भूमिकांनी अजरामर झालेल्या हसवाफसवी नाटकामध्ये लीलाधर कांबळी यांनी दिलीप सरांना अचूक साथ दिली होती. त्यामुळेच हसवाफसवी नाटकामधील वाघमारे प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहेत. वस्त्रहरण आणि हसवाफसवी या नाटकांचे त्यांनी परदेश दौरेही गाजवले. ‘भाकरी आणि फूल’, ‘गोटय़ा’, ‘बे दुणे तीन’, ‘कथास्तु’,…
स्वरा मोकाशी लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित “हरवलेल्या पत्त्यांचा बंगला” हे नाटक दीर्घकाळ स्मरणात राहील. मुले कितीही मोठी झाली तरी त्यांच्या पालकांकडून असलेल्या अपेक्षा कमी होत नाहीत, याचीच गोष्ट सांगणारं हे नाटक आहे. तीन स्त्रियांच्या आयुष्यावरील भाष्य त्यामध्ये गुंफण्यात देखील लेखक-दिग्दर्शक द्वयी यशस्वी झालेले दिसले. या मधील ‘इंदिराबाई’ त्यागाला आदर्श मानणाऱ्या पिढीत जन्माला आलेल्यांच प्रतिनिधित्व करताना दिसतात. वंदना गुप्ते यांनी या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. त्यांनी साकारलेली आई, तीच्या वागणुकीतून आणि आलेल्या अनुभवातून एका निष्कर्षाप्रत येऊन प्रेक्षकांना मेसेजही देते ही बाब भावणारी आहे. वंदना गुप्ते यांनी दाखवलेली अभिनयातील सह्जता विशेष उल्लेखनीय तर आहेच , शिवाय त्यांनी साकारलेल्या इंदिराबाईने त्यांच्या…
लॉकडाऊनच्या काळात प्रत्येक कलाकार, तंत्रज्ञ आणि प्रेक्षक रंगभूमीवरील नाटक पाहण्यासाठी आसूसलेले आहेत. नाटकाचे प्रयोग कधी सुरू होणार ? ह्याची उत्सुकता प्रत्येक नाट्यरसिकाला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या विळख्यात असलेल्या मुंबई पुण्यात तरी नाटकांचे प्रयोग इतक्यात सुरू होणे कठीण आहे. अशा संकट काळात प्रेक्षकांना थेट रंगभूमीपर्यंत पोहोचता येत नसल्याने प्रत्यक्ष रंगभूमीच आपल्या घरोघरी अवतरणार आहे. सुनील बर्वे, पौर्णिमा मनोहर आणि वाईड विंग्स मिडीया यांची संकल्पना असलेल्या OMT अर्थात ‘Online माझं Theatre’ ह्या विशेष कार्यक्रमाची नुकतीच OMT च्या अधिकृत फेसबुक पेजवर घोषणा करण्यात आली. त्याविषयी सांगताना टीमतर्फे ह्या कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट करण्यात आली. ह्यात एकूण वीस कलाकारांच्या चार टीम्सने सहभाग घेतला असून प्रत्येक…
कुणी मला विचारलं की मालिका, नाटक की चित्रपट ? तर माझं पहिलं उत्तर नेहमीच ‘नाटक’ हे असेल. कारण आजवर मी पाहिलेल्या प्रत्येक नाटकाने मला खूप काही दिलंय. ती कोणतीही आर्थिक मदत नव्हती’ त्यामुळेच बहुतेक ती मदत अनमोल होती असे मला कायम वाटते. दरवेळी नाटक पाहिले, की एखादा तरी सकारात्मक बदल माझ्यात आणि माझ्या विचारांमध्ये होतोच, असे मला आजवरच्या अनुभवावरून वाटते आहे. हे असेच एक नाटक ज्याने माझ्या आयुष्यात मला एक लेखक म्हणून आणि एक माणूस म्हणून घडवले, जे नाटक पाहिल्यावर मी एखाद्या गोष्टीत आकंठ बुडणे म्हणजे काय हा अनुभव घेतला. ते नाटक म्हणजे ‘वाडा चिरेबंदी’. २० डिसेंबर २०१४. दुपारी ०४:३०…











