Author: गायत्री देवरुखकर

हो! आम्हाला तुम्हाला सांगताना अतिशय आनंद होतोय की रंगभूमी.com ही Google News वर Approve झाली आहे. रंगभूमी.com वर दररोज येणाऱ्या ताज्या घडामोडी आणि बातम्यांचा आढावा तुम्ही आता Google News वर घेऊ शकता. थेट तुमच्या मोबाईल वर. Google Play किंवा App Store वर जाऊन Google News हे App Download करा आणि मग पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून Subscribe करा. https://news.google.com/publications/CAAqBwgKMNKhmAsw6auwAw ह्या नंतर आम्ही वेबसाईटवर जे काही नवनवीन लेख लिहू तो सर्व मजकूर तुम्हाला आपोआप तुमच्या मोबाइल वर मिळत जाईल. डोळ्यांना सुखद वाटणाऱ्या अशा अतिशय सुंदर मराठी फॉन्टमध्ये तुम्ही आमचे सर्व लिखाण वाचू शकता. Rangabhoomi.com चा अनुभव तुमच्यासाठी अधिकाधिक सहज आणि सोपा…

Read More

काही दिवसांपूर्वी आम्ही तुमच्यासाठी ६ अजरामर विनोदी नाटकांचा खुसखुशीत ठेवा तुमच्या भेटीला! या लेखात काही धमाल विनोदी नाटकं घेऊन आलो होतो. आज पुन्हा तशीच काही खुसखुशीत नाटकं घेऊन आम्ही हजर आहोत. एका लग्नाची गोष्ट रंग्या रंगीला रे पाहुणा असा मी असामी श्यामची मम्मी वऱ्हाड निघालंय लंडनला – भाग १ वऱ्हाड निघालंय लंडनला – भाग २

Read More

कोरोनामुळे उद्भवलेल्या lockdown च्या विळख्यात अडकलेल्या कलाकारांना त्यांच्या घरातच online रंगमंच उपलब्ध करून देण्याचा हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे. घर बसल्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि पारितोषिके जिंकण्याची ही सुवर्णसंधी सोडू नका. कुठल्याही विषयाची मर्यादा नाही. विषय स्वरचित असो किंवा तुमच्या आवडत्या नाटकातील एखादा उतारा, त्याचं स्वागतच केलं जाईल. फक्त ५ ते ७ मिनिटांचा व्हिडिओ shoot करून तुम्ही या स्पर्धेत सहभागी होऊ शकता. स्पर्धेची भाषा फक्त मराठी असेल. प्रवेशाची अंतिम तारीख – १५-०४-२०२० स्पर्धेचा निकाल – २५-०४-२०२० स्पर्धेची पारितोषिके प्रौढ वर्ग (वय १६ वर्ष आणि अधिक)प्रथम पारितोषिक – ३०००/-द्वितीय पारितोषिक – १५००/-तीन उत्तेजनार्थ प्रशस्तिपत्रके बाल वर्ग (वय ५ ते १५ वर्ष)प्रथम पारितोषिक – १५००/-द्वितीय…

Read More

मराठी माणूस आणि नाटक यांच एक अजब असं मेतकूट आहे. त्यात तो माणूस कोकणातला मालवणकडचा असेल तर दुधात साखर! कारण कीत्येक शतकांपासून इथे होत असलेली दशावतारी नाटके, शिमग्यातील खेळे, सोंगे, भारुडे इ. हि त्यानेच जपलेली आतापर्यंतची मनोरंजनाची सांस्कृतिक मूल्ये! या रंगभूमीवर आतापर्यंत शुध्द मराठी भाषेतून येत असलेली मराठी नाटके रसिक प्रेक्षक चोखंदळपणे पहात होता. पण कोकणात जन्मलेल्या एका मराठी मालवणी भाषिक माणसाने मालवणी बोलीभाषेतून “वस्त्रहरण” हे नवंकोर नाटक रंगभूमीवर आणून रंगमंच आणि रसिकांसाठी मनोरंजनाचे आगळेवेगळे नवे दालन उघडे केले. कै. मछिंद्र कांबळी यांनी लोकनाट्याचा बाज असलेलं धमाल विनोदी मालवणी नाटक “वस्त्रहरण” रंगमंचावर आणून इतिहास घडवला. प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक श्री. मोहन…

Read More

जागतिक रंगभूमी दिनाचे निमित्त साधून रंगभूमी आणि सिनेसृष्टीमध्ये मोलाची कामगिरी बजावलेल्या आणि आता टी.व्ही. वरील “अग्गबाई सासूबाई” या मालिकेतून प्रेक्षकांचे मन जिंकणाऱ्या डॉ. गिरीश ओक यांनी रसिक प्रेक्षकांना लाख मोलाचा एक संदेश दिला आहे. तसेच, Quarantine च्या या कठीण काळामध्येही रंगभूमी दिन कसा साजरा करता येईल याचा उपायही दिला आहे. डॉ. गिरीश ओक यांनी आजवर दीपस्तंभ, यू-टर्न, कुसुम मनोहर लेले, कहानी में ट्विस्ट, श्री तशी सौ, तो मी नव्हेच अशा एक ना अनेक नाटकांमधून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. आजही, जेव्हा संपूर्ण जगाला कोरोना विषाणूने हादरवून सोडलंय तेव्हा ते social media द्वारे रसिक प्रेक्षकांना Online उपलब्ध असलेली नाटकं बघून आपण…

Read More

“खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे!”. असं कै. साने गुरुजी सांगून गेले. या त्यांच्या उक्तीमध्ये जात-धर्म, गरीब-श्रीमंत या जंजाळात अडकून पडलेला मनुष्यप्राणी त्यांना गृहीत असेलच, पण ज्यांना बोलता येत नाही, आपल्या भावना व्यक्तही करता येत नाही अशी मुकी, भटकी जनावरे कुत्री-मांजरी पण असु शकतील. निष्ठावान असलेला कुत्रा हा पाळीव प्राणी इमानदार आहे तसाच मनुष्याचा सर्वात विश्वासू मित्रपण आहे. कुत्रे आपली कर्तव्ये निष्ठेने पार पडत असतात. म्हणून ते पसंतीस जास्त उतरतात. लोक त्यांचे खूप लाड करतात. त्यांच्या असलेल्या अनेक जातीनुसार त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी, वागणुकीच्या तऱ्हा या वेगवेगळ्या असतात. गार्ड (सुरक्षा), पोलीस, सेनादले इ. ठिकाणी कुत्र्यांच्या विशिष्ट घ्राणेंद्रियांच्या तीव्र आकलन शक्ती फार उपयोगी पडतात. कुत्र्यांचे…

Read More

बदलत्या काळाबरोबर काही बदललं नसेल तर ती म्हणजे स्त्रियांची परिस्थिती! ह्याचे जिवंत दाखले रंगभूमीने प्रत्येक काळात नाट्यरूपाने आपल्या समोर आणले आहेत. अगदी पौराणिक काळातील द्रौपदीपासून आजच्या आधुनिक स्त्री पर्यंत स्त्रियांना फक्त आणि फक्त सोसावंच लागलं आहे हे दर्शवणारी कितीतरी नाटकं होऊन गेली आणि त्यांनी प्रेक्षकवर्गाला समाजातील भयाण परिस्थितीवर विचार करायला भाग पाडलं. आजही ती नाटकं बघितली की काळ बदलला असला तरी स्त्रियांची वेळ अजून बदललेली नाही हे ठळकपणे लक्षात येतं. स्त्रियांच्या मूलभूत हक्कांवर आणि त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांना वाचा फोडणारी अशीच काही सुप्रसिद्ध नाटकं तुमच्या भेटीला आणत आहोत! सखाराम बाईंडर शांतता! कोर्ट चालू आहे कुसुम मनोहर लेले अखेरचा सवाल काचेचा चंद्र…

Read More

घर बसल्या चहाचा कप हातात घेऊन मनोरंजक आणि खुमासदार विनोदी नाटकं एकापाठोपाठ बघायला मिळाली तर अजून काय हवंय! तुमचा एखादा रविवार आम्ही अशीच काही धमाल मराठी विनोदी नाटकं दाखवून pre-book करायचं ठरवलंय. म्हणूनच, पुढे दिलेली नाटकांची यादी नक्की पहा. काही नाटकं तुम्ही पहिलीदेखील असतील आणि पुन्हा बघायची ईच्छाही झाली असेल. तुम्ही पहा आणि इतरांबरोबरही शेअर करा. एक डाव भटाचा शांतेचं कार्ट चालू आहे सौजन्याची ऐशी तैशी हसवा फसवी मोरुची मावशी तरुण तुर्क म्हातारे अर्क

Read More

समृद्ध आणि सशक्त अशा मराठी रंगभूमीने अनेक उत्तमोत्तम नाटके आतापर्यंत रसिक प्रेक्षकांसमोर सादर केली आहेत. आजच्या घडीला “अमर फोटो स्टुडिओ ” हे  नाटक असंच सद्या रसिक प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेले दिसतं मनस्विनी लता रविंद्रची संहिता असलेलं, निपुण धर्माधिकारी यांचं दिग्दर्शन लाभलेलं हे रंजक नाटक, प्रदिप मुळ्येचं कल्पक नेपथ्य, शीतल तळपदेची सुयोग्य प्रकाशयोजना यामुळे एक वेगळीच उंची गांठते. सुव्रत जोशी, अमेय वाघ, पर्ण पेठे, पूजा ठोंबरे व सिद्धेश पूरकर यांचा भूमिकांना यथोचित न्याय देणारा पूरक अभिनय बऱ्यापैकी लक्षात रहातो. टाइम मशीन किंवा कालयंत्र या चमत्कृतीपूर्ण विषयावरील एच जी वेल्सची “टाइम मशीन” कादंबरी, जे. बी. प्रिस्टलेचे शोज, फॉक्स चॅनेलवर सद्या सुरु असलेली “लॉस्ट”…

Read More

मराठी रंगभूमीला लाभलेल्या चतुरस्त्र व्यक्तिमत्वांमध्ये अग्रस्थानी कोणतं नाव येत असेल तर ते म्हणजे “दिलीप प्रभावळकर”! मग ते त्यांचं लिखाण असो, अभिनय असो वा त्यांनी साकारलेल्या स्त्री व्यक्तिरेखा असोत ! वेगवेगळ्या रूपांमध्ये येऊन प्रत्येक भूमिकेला १००% न्याय देणारा हा अभिनेता आपल्याला लाभला हे आपले अहोभाग्यच समजावे लागेल. महत्वाचं म्हणजे स्त्री व्यक्तिरेखा साकारताना त्यांनी आजवर एकदाही मर्यादा ओलांडलेली नाही. कोणत्याही टप्प्यावर नारीशक्तीचा अपमान होऊ दिलेला नाही. रंगमंचावर उभी केलेली प्रत्येक भूमिका वठवली ती संपूर्ण अभ्यास करूनंच! तिथून पुढे या बहुगुणी अभिनेत्याने सिनेमाकडे झेप घेतली ती सुद्धा स्वतःच्या अनोख्या शैलीत! कधी महात्मा गांधीजी बनून खुद्द मुन्नाभाईला शिकवण दिली, तर कधी राजस्थानी गावकरी बनून…

Read More

रंगभूमीने आपल्याला काही किमयागार नाटकं दिली आणि कलाकारही दिले. अशा कलाकारांची यादी बनवायची झालीच तर एक नाव अगदी ठळकपणे समोर येईल. हास्यरसाने परिपूर्ण नाटकांचा खजिना! लाखो प्रेक्षकांच्या मनावर तब्बल ३७ वर्ष गारुढ करून राहिलेला विनोदवीर! आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये एक नाही दोन नाही तर तब्बल पाच रेकॉर्डस् केलेला नाट्यवीर म्हणजेच…  प्रशांत दामले! विकिपीडिया सांगतं की, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये प्रशांत दामले यांच्या नावावर तब्बल पाच रेकॉर्ड्‌स नोंदली गेली आहेत. त्यांमध्ये २४ डिसेंबर, इ.स. १९९५ रोजी एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या नाटकांचे चार प्रयोग, इ.स. १९९५ साली ३६५ दिवसांत ४५२ प्रयोग, इ.स. १९९६ साली ३६५ दिवसात ४६९ प्रयोग व…

Read More

मराठी रंगभूमीने प्रेक्षकांना आणि कलाकारांना नेहमीच भरभरून दिलं आहे. कधी भरभरून हसवलंय तर कधी धीरगंभीर विचारांनी अंतर्मुख होण्यास भाग पाडलं आहे. एवढंच नाही तर विषय सामाजिक असो वा कौटुंबिक, विनोदी असो अथवा राजनैतिक, ते नाटक जिवंतपणे तुमच्या समोर उभं करून तुम्हाला त्याचाच एक भाग असल्याची जाणीव करून दिली आहे. मात्र, रंगभूमीशी जोडलेली ही प्रेक्षकाची नाळ आता कुठेतरी तुटत चालल्याचा भास होत आहे आणि म्हणूनच, आज रंगभूमीला आपली गरज आहे! कलाकारांच्या अभिनयाने सजलेल्या आणि प्रेक्षकांच्या टाळ्यांनी बहरलेल्या जिवंत रंगमाचाची जागा आता ऑनलाईन streaming ने घेतलेली दिसून येत आहे. Netflix, Prime च्या भाऊगर्दीत नाटकाचा प्रेक्षक कुठेतरी हरवून गेला आहे. म्हणूनच की काय,…

Read More