Author: गायत्री देवरुखकर

आजच्या पिढीला उत्तमोत्तम शिक्षण मिळावं यासाठी त्यांच्या पालकांची धडपड सुरू असते. मुलांना करिअरच्या संधीही तितक्याच ताकदीच्या उपलब्ध होऊ लागल्यामुळे तरुण पिढीही स्वच्छंद मनाने स्वतःचे मार्ग निवडून विश्वभर उडाण घेण्यासाठी सज्ज झालीय. इंटरनेटमुळे जग छोटं वाटू लागलंय. आंतरराष्ट्रीय पातळीवर सहजरीत्या विचारांची देवघेव होऊ लागलीय. अशा पिढीच्या मनात परदेशी विचारांचं बीज रुजणं स्वाभाविक आहे. अशा परिस्थितीत आपली मूळ संस्कृती विरळ होत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि अशी पिढी मूळ संस्कृती, नातीगोती विसरून आत्मकेंद्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी नात्यांचा ओलावा कमी होऊन पडणारा भावनांचा दुष्काळ हे आणि मेकॅनिकल जगणं हे ओघानं आलंच! त्यातूनच निर्माण झालेल्या एकलकोंडेपणाला कंटाळून आयुष्यात स्वतःला खुश ठेवण्यासाठी आनंदमयी मार्ग निवडणंही…

Read More

‘38, कृष्ण व्हिला’ हे बहुचर्चित नाटक १९ मार्च पासून प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज होतंय हे तर आपण जाणून आहोतच! गिरीश ओक आणि श्वेता पेंडसे अभिनीत ‘38, कृष्ण व्हिला’ या नाटकात गिरीश ओक आणि श्वेता पेंडसे हे कलाकार असून नाटकाचे दिग्दर्शन विजय केंकरे यांनी केले आहे. तसेच, श्वेता पेंडसे या स्वतः या नाटकाच्या लेखिका आहेत. https://www.youtube.com/watch?v=2A_DdKEVlfU व्यावसायिक रंगभूमीवरचं गिरीश ओक यांचं हे ३८ वं वर्ष आहे आणि नाटकाच्या नावातही ३८ हा आकडा आहे ही खरं म्हणजे एक गंमतच आहे. पण या नाटकाची अजून एक खासियत अशी की हे गिरीश ओक यांच्या आयुष्यातील ५० वे नाटक असणार आहे. एखाद्या नाटकाचे ५० प्रयोग होतात तेव्हा…

Read More

आपण बऱ्याच कलाकारांना ज्या भूमिकेत बघतो त्याच भूमिकेप्रमाणे त्यांचं व्यक्तिमत्त्व असेल असं गृहीत धरतो. अर्थात, बरेचदा आपल्याला त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारशी माहितीदेखील नसते. खलनायकाच्या भूमिकेत दिसणाऱ्या कलाकारांना वैयक्तिक जीवनातही प्रेक्षकांकडून परखड प्रतिक्रिया मिळाल्याचे किस्से कमी नाहीत. पण, प्रत्येक खलनायक साकारणारा कलाकार खऱ्या आयुष्यातही तसाच वाईट असेलच असं नाही. अगदी त्याचप्रमाणे, प्रेक्षकांना पोट धरून हसवणारा एखादा कलाकार खऱ्या आयुष्यातही तसाच मिश्किल आणि सुस्वभावी असेलच असं नाही. जागतिक पातळीवरील विनोदाचा सम्राट चार्ली चॅप्लिन याच्या आयुष्यावर बेतलेलं अशाच काहीशा विषयाचं एक नाटक ‘मिलाप थिएटर’ तर्फे आपल्या भेटीस येत आहे. चार्लीच्या स्वभावातील ग्रे शेड आपल्याला या नाटकात बघायला मिळणार आहे. नाटकाचं नाव आहे ‘द…

Read More

एखाद्या नव्या शहरात जायचं म्हटलं तरी आपण पूर्ण तयारी करून जातो. पण काळाच्या विचित्र खेळात आपण अचानक एके दिवशी एखाद्या नव्या जगातच जाऊन पोहोचलो तर? असं जग जे आपल्यासमोर एक अनाकलनीय चित्र उभं करेल. ही कल्पनाच किती भन्नाट आहे! याच कल्पनेवर आधारित असं ललित कला केंद्र, सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ आयोजित ‘हत्तमालाच्या पल्याड’ हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झालेलं आहे. या नाटकाचे लेखक बादल सरकार असून दिग्दर्शक महेश खंदारे आहेत. ‘हत्तमालाच्या पल्याड’ ह्या नाटकात दोन अट्टल चोर, चिक्कूराम आणि विक्कुराम, पकडले जाण्याच्या भीतीने एका नदीत उडी मारतात आणि ती नदी त्यांना एका अशा दुनियेत घेऊन जाते जी त्यांनी कधीही पाहिलेली…

Read More

प्रपंच म्हटलं की त्यात नवरा-बायकोची एकमेकांना साथ, वेळप्रसंगी तडजोड, काळाशी अनुरूप वागणं असं सगळंच आलं आणि हे सगळं जुळून येण्यासाठी गरजेच असतो तो ‘समतोल’! संसाराचा जीवनगाडा नीट चालवायचा तर पती आणि पत्नी ही त्याची दोन चाकं व्यवस्थित, लयीत चालली पाहिजेत. त्यांची वेळो वेळी देखभाल करायला हवी, त्यांना तेलपाणी-वंगण द्यावं लागतं. एक चाक जरी कुरकूरू लागलं की संसाराचं संगीत बेसूर होतं. गाडा नीट चालत नाही. हा प्रश्न सुखी, समाधानी जीवनासाठी सर्वात महत्वाचा आणि मोठा! हाच समतोल मांडणारं एक नाटक प्रख्यात दिग्दर्शक व अभिनेते अभिजीत झुंजारराव आपल्या भेटीस घेऊन आले आहेत. नाटकाचं नाव आहे ‘ए, आपण चहा घ्यायचा?’! सध्या या नाटकाचा कोकण…

Read More

नाटक यशस्वी होतं तेव्हा त्या यशासाठी नाटकाच्या टीममधील प्रत्येक सदस्य आणि त्यांचे अविरत  प्रामाणिक प्रयत्न कारणीभूत असतात. अशी नाटकं पुन्हा पुन्हा बघूनही कंटाळा येत नाही. ती प्रत्येक वेळी तितकीच रंजक वाटतात. असंच एक सुंदर नाटक म्हणजे ‘अनन्या’! रसिक प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे हे नाटक पुन्हा तुमच्या भेटीस येत आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या नाटकाचा ३०० वा प्रयोगही लवकरच सादर होणार आहे. दिग्दर्शक प्रताप फड यांनी अनन्याच्या व्यक्तिरेखेवर, तिच्या आयुष्यातील चढ उतारांवर केलेला खोल अभ्यास या नाटकाला अधिकाधिक परिपूर्णतेकडे घेऊन जातो. ऋतुजा बागवे या गुणी अभिनेत्रीने त्यांना अचूक साथ देत तिच्या चोख अभिनयातून अतिशय जिवंतपणे अनन्या आपल्यासमोर उभी केली आहे. …

Read More

तरुण मुलगा आणि सूनेने मिळून म्हाताऱ्या सासू सासऱ्यांचा छळ केला आणि त्यांना घराबाहेर काढलं, नाही हो! असं या नाटकात काहीही नाही. नवरा बायकोच्या आयुष्यात भूतकाळात घडलेल्या घटनांमुळे ते म्हातारपणी एकमेकांवर सूड उगवतात. छे! छे! असंही या नाटकात काहीही नाही. मुलाने बाहेरचा रस्ता दाखवल्यावर, एक वयस्कर जोडपं वृद्धाश्रमात आपला वृद्धापकाळ एकमेकांच्या सहवासात व्यतीत करतं… अजिबात नाही! या नाटकात तसंही काहीच नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोस्टर बघून हे नाटक ‘judge‘ करण्याची चूक तर मुळीच करू नका. सहकुटुंब सहपरिवार बघण्यासारखं हे नाटक वृध्द व्यक्तींना तरुणासारखं जगण्याचा मंत्र देणारं आहे आणि तरुण मंडळींसाठी येणारा काळासाठी ‘FD‘ म्हणजेच ‘Fixed Deposit‘ ठरणार आहे. प्रशांत दळवी लिखित…

Read More

नवीन मराठी नाटकाची घोषणा म्हणजे नाट्यरसिकांमध्ये नवचैतन्याची लाट! त्यातही विनोदी नाटक म्हणजे रसिक प्रेक्षकांसाठी हास्यरसपूर्ण मेजवानीच! हसवत हसवत राजकीय घडामोडींवर सडेतोड भाष्य करणारे सुप्रसिद्ध दिग्दर्शक संतोष पवार नाट्यरसिकांसाठी ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ हे एक नवीन नाटक घेऊन येत आहेत. https://youtu.be/UEMH-Lrfmmg वेद प्रॉडक्शन हाऊस प्रस्तुत ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ या नव्या कोऱ्या नाटकाच्या निमित्ताने शलाका पवार, सागर कारंडे यांच्यासोबत सायली देशमुख, सिद्धीरूपा करमरकर, अजिंक्य दाते, अमोघ चंदन, रमेश वाणी हे गुणी कलाकारही आपल्या भेटीस येणार आहेत. समोरासमोर राहणाऱ्या दोन कुटुंबामधील प्रत्येक सदस्यामध्ये काही ना काही शारिरीक व्यंग (defect) असतात. अशातच, त्या कुटुंबांमध्ये कशाप्रकारे सोयरिक जुळून येते आणि ती जुळून येताना काय…

Read More

एकांकिका स्पर्धेत मानाचे स्थान संपादित केलेल्या ‘अस्तित्व’ आयोजित ‘कल्पना एक आविष्कार अनेक २०२१’ स्पर्धेचा निकाल जाहीर झालेला आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी आचार्य अत्रे नाट्यगृह, कल्याण येथे १८ डिसेंबर रोजी पार पडली. मान्यवरांकडून देण्यात आलेल्या एका कल्पनेवर आधारित एकांकिका लिहून ती सादर करावी असे या स्पर्धेचे सर्वसाधारण स्वरूप असते. नाट्यदर्पणने सुरू केलेली कल्पना एक आविष्कार अनेक ही स्पर्धा रवी मिश्रा यांनी पूर्ण ताकदीने ‘अस्तित्व’ तर्फे इतकी वर्षे सुरू ठेवली आहे याबद्दल त्यांचे करावे तितके कौतुक कमीच आहे. तसेच, गेली चार वर्षे ‘चार मित्र, कल्याण’ या संस्थेकडूनही या स्पर्धेला मिळालेले सहकार्य मोलाचे आहे. स्पर्धेचे यंदा ३५ वे वर्ष होते. अंतिम फेरीसाठी…

Read More

एकाच तिकिटात दोन दीर्घांक — एकाच ठिकाणी दोन कलाकृती बघायला मिळण्याची सुवर्णसंधी एकाच तिकिटात, एकाच दिवशी, एका पाठोपाठ एक, दोन वेगवेगळ्या धाटणीच्या कलाकृती पाहायला मिळाल्या तर काय बहार येईल नई? नाशिक येथील महाकवी कालिदास कलामंदिरमध्येही याच पद्धतीचा एक नाट्यप्रयोग प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. रविवार दिनांक १९ डिसेंबर, २०२१ रोजी महाकवी कालिदास कलामंदिरामध्ये करनाटकू निर्मित ‘नवरा आला वेशीपाशी’ आणि चक्री संस्थेची निर्मिती असलेले ‘यात्रा’ असे दीड तासांचे दोन दीर्घांक सायंकाळी ५ वाजल्यापासून दाखवले जाणार आहेत. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असे की या दोन्ही दीर्घांकाचा विषय एकमेकांपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. करनाटकू निर्मित ‘नवरा आला वेशीपाशी’ या दीर्घांकाबद्दल आम्ही याआधीच समीक्षण लिहिले आहे. जर…

Read More

मराठी सिने-नाट्यसृष्टी आणि हिंदी सिनेसृष्टीमध्ये स्वत:चे एक अढळ स्थान प्रस्थापित केलेले आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे! आज १६ डिसेंबर, २०२१ रोजी त्यांच्या १७ व्या स्मृतिदिनी त्यांच्या पत्नी व अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्या हस्ते ‘लक्ष्य कला मंच’ची स्थापना करण्यात आली आहे. बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहातील एका सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला पुरुषोत्तम बेर्डे, रवींद्र बेर्डे तसेच, लक्ष्मीकांत बेर्डे यांची कन्या स्वानंदी बेर्डे व सुपुत्र अभिनय बेर्डेही उपस्थित होते. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या दुःखद निधनानंतर, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘लक्ष्य कला मंच’ उभारण्याचे स्वप्न गेले कित्येक वर्षे आम्ही उराशी बाळगून होतो, असे मनोगत या सर्वच कुटुंबीयांनी व्यक्त केले. लक्ष्य कला मंच…

Read More

दरवर्षी अजेय संस्थेतर्फे फेब्रूवारी-मार्च दरम्यान ‘शब्दसेल्फी’ या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. लॉकडाऊनमुळे मध्यंतरीच्या काळात हा कार्यक्रम पार पडू शकला नाही. पण या वर्षी हा कार्यक्रम पुन्हा सादर होणार आहे. २२ डिसेंबर, २०२१ रोजी रात्री ८ वाजता ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन येथे हा कार्यक्रम प्रेक्षकांना बघता येणार आहे. ‘शब्दसेल्फी’ची संकल्पना एकदम वेगळी आहे. हा कवितांवर आधारित कार्यक्रम आहे. पण, इतर कार्यक्रमाप्रमाणे फक्त काव्यवाचन नाही. या कार्यक्रमांतर्गत काव्यनाट्य, काव्यश्रुंखला, काव्यचित्रपट, काव्यांकिका, काव्यमेडली अशा विविध प्रकारांचा वापर करून कवितेमधील आशय घेऊन कविता सादर केल्या जातात. या कार्यक्रमाची संकल्पना लेखक, दिग्दर्शक डॉ. क्षितिज कुलकर्णी यांची आहे. अनेक महिने या विषयावर अभ्यास करून, निरनिराळी…

Read More