Close Menu
रंगभूमी.com
  • Home
  • Login / Register
    • Forgot your Password?
  • Upcoming Shows Calendar
  • Book Natak Tickets
  • Marathi Natak Info
  • रंगभूमी.com पॉडकास्ट
  • Categories
    • News
    • Reviews
    • Competitions
    • Events
    • Opinion
    • साहित्य सहवास
    • Videos
  • रंगभूमी.com
    • About Us
    • Subscribe to Us
    • Advertise Here
    • Contact Us
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp Telegram RSS
  • Home
  • About Us
  • Subscribe
  • Advertise
  • Contact Us
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp Telegram RSS
रंगभूमी.com
Register or Log In
  • Home
  • Explore Marathi Natak
  • Upcoming Shows Calendar
  • Competitions
  • News
    shankar jaykishan Marathi natak

    Shankar Jaykishan Marathi Natak: भरत जाधव, महेश मांजरेकर आणि शिवानी रांगोळे प्रमुख भूमिकेत; पहा प्रयोगांची माहिती

    November 25, 2025
    35th vyavsayik rajya natya spardha final round results

    “असेन मी.. नसेन मी…” नाटकास ३५ व्या व्यावसायिक राज्य नाट्य स्पर्धेत घवघवीत यश — ७.५० लाखांचे प्रथम पारितोषिक पटकावले!

    May 20, 2025
    img 6750

    सासू-सुनेच्या नात्याची गंमतशीर धमाल! — ‘The दमयंती दामले’ नाटकाचा २५वा प्रयोग आहेच मुळी खास!

    May 16, 2025
    NCPA Pratibimb 2025 info

    NCPA आयोजित प्रतिबिंब मराठी नाट्य उत्सव २०२५ — आशय समृद्ध नाटकांची पर्वणी!

    May 14, 2025
    me vs me marathi Natak info

    ‘मी vs मी’ नाटकाचा २५ वा प्रयोग रंगणार श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहात!

    April 25, 2025
  • Reviews
    me vs me marathi Natak info

    ‘मी vs मी’ नाटकाचा २५ वा प्रयोग रंगणार श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहात!

    April 25, 2025
    jyacha tyacha vitthal review cover

    ज्याचा त्याचा विठ्ठल — एक वेगळा आणि गहिरा अनुभव देणारी कलाकृती

    April 23, 2025
    Shikaayla Gelo Ek Marathi Natak Prashant Damle

    शिकायला गेलो एक [Natak Review] — एकसुरी आयुष्यात रंग भरणारं धम्माल विनोदी रसायन!

    April 5, 2025
    american album marathi natak cover

    भारतीय संस्कृतीच्या प्रगल्भतेची जाणीव करुन देणारा ‘अमेरिकन अल्बम’ [American Album Review]

    May 15, 2024
    priya bhai ek kavita havi aahe cover for review

    प्रिय भाई… एक कविता हवी आहे — एका कवितेच्या शोधाचा काव्यमय प्रवास! [Priya Bhai Review]

    April 25, 2024
  • Podcast
  • Opinion
    Shikaayla Gelo Ek Marathi Natak Prashant Damle

    शिकायला गेलो एक [Natak Review] — एकसुरी आयुष्यात रंग भरणारं धम्माल विनोदी रसायन!

    April 5, 2025
    Keshavrao Bhosale Natyagruha, Kolhapur

    कोल्हापूरचं होरपळलेलं नाट्यांगण जसं होतं तसंच पुन्हा उभारणार!

    August 14, 2024
    atul pethe

    अवघी दुमदुमली पुण्यातील प्रायोगिक रंगभूमी! — नेमकं काय म्हणाले अतुल पेठे?

    July 4, 2024
    american album marathi natak cover

    भारतीय संस्कृतीच्या प्रगल्भतेची जाणीव करुन देणारा ‘अमेरिकन अल्बम’ [American Album Review]

    May 15, 2024
    priya bhai ek kavita havi aahe cover for review

    प्रिय भाई… एक कविता हवी आहे — एका कवितेच्या शोधाचा काव्यमय प्रवास! [Priya Bhai Review]

    April 25, 2024
  • रंगभूमी.com
    • About Us
    • Subscribe to Us
    • Advertise Here
    • Contact Us
रंगभूमी.com
News 2 Mins Read

‘ज्याचा त्याचा विठ्ठल’ – माधुराणी गोखले प्रभुलकर यांचा भक्तिरसात न्हालेला नाट्यानुभव

By गायत्री देवरुखकरMarch 21, 2025Updated:March 21, 2025
photo 2025 03 21 17.48.50
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

‘आई कुठे काय करते?’ या गाजलेल्या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. मात्र, माधुराणी गोखले प्रभुलकर पुन्हा एका वेगळ्या रूपात आपल्या भेटीला येत आहे. रूपक निर्मित ‘ज्याचा त्याचा विठ्ठल’ या आगळ्या-वेगळ्या संगीत-चित्र-नाट्य अभिवाचनाच्या कार्यक्रमाद्वारे ती प्रेक्षकांना नव्या आध्यात्मिक प्रवासावर घेऊन जाणार आहे.

पुण्यातील दमदार शुभारंभानंतर, आता मुंबईत पहिला प्रयोग!

विठू नामाचा गजर सोडू नको रे…
त्या नामातच माझे जीवन सामावले रे…

पुण्यात आपल्या पहिल्या प्रयोगाने रसिकांची मने जिंकून आता हा नाट्यप्रयोग २२ मार्च रोजी रात्री ९ वाजता माटुंग्यातील यशवंत नाट्यमंदिरात सादर होणार आहे.

मागे बसा किंवा पुढे… अनुभव अविस्मरणीय!

या नाट्यानुभवाचं हे प्रमुख वैशिष्ट्य आहे, असं म्हणता येईल. संपूर्ण कार्यक्रमात संगीत आणि अभिनयासोबत अनुरूप चित्रांचा वापर करण्यात आला आहे. ही चित्रे स्क्रीनवर दाखवून संपूर्ण प्रेक्षागृहात असा काही माहौल बनतो की, तुम्ही नाट्यगृहात कुठेही बसला असाल तरी ही कलाकृती तुम्हाला परिपूर्ण आनंद देऊन जाते. ही छायाचित्रे रेखाटली आहेत मिलिंद मुळीक यांनी

‘ज्याचा त्याचा विठ्ठल’ – शब्द, संगीत आणि भक्ती यांचा अद्वितीय संगम

या नाट्यानुभवाबद्दल विचारले असता, दिग्दर्शक अमित वझे यांनी काही ओळी सादर केल्या. त्या अशा होत्या.

शुभंकर वाट्याला यायचं असेल, तर ओंजळ उघडी असावी लागेल ना?
योग यावा लागतो… तो आला की ज्याचा त्याचा विठ्ठल ज्याला त्याला भेटतोच..!

विठोबाची प्राप्ती प्रत्येकाला त्याच्या भक्तीप्रमाणे होते. प्रत्येकाने विठोबाला वेगवेगळ्या रूपात अनुभवलं आहे.

संत तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेव, जनाबाई यांनी विठ्ठलाला आळवले तेव्हा त्यांनी कधी प्रेमाने, कधी रुसव्याने, तर कधी आर्ततेने त्याला साद घातली. प्रत्येक भक्तासाठी विठ्ठल वेगळा असतो. कोणासाठी तो सखा, कोणासाठी तो पालक, कोणासाठी अध्यात्माचा आधार, आणि कोणासाठी आत्मशोधाचा दीपस्तंभ.

img 5378

img 5379
img 5380
img 5381
“अंगा अंगी रंगला,
माझा विठोबा खेळिया,
कधी नामाच्या तरंगात,
कधी भक्तीच्या ओढीत!”

‘ज्याचा त्याचा विठ्ठल’ हा केवळ एक नाट्यप्रयोग नाही, तर ते भक्तिरसाचे अमृतस्नान आहे.

अभीमाना गिळूनी टाकावा,
विठोबाच्या पायी झुकावा…!

याच भक्तिरसात मधुराणी गोखले प्रभुलकर आपल्या प्रभावी अभिनयाने आणि अभिवाचनाने रसिकांना गुंतवून ठेवणार आहे.

‘प्रिय भाई… एक कविता हवी आहे’ आणि ‘कवी जातो तेव्हा’ नंतरचा नवा सोहळा!

या कलाकृतीचे मूळ लेखक डॉ. समीर कुलकर्णी असून, दिग्दर्शन अमित वझे यांनी केले आहे.
अमित वझे यांनी याआधीही ‘प्रिय भाई… एक कविता हवी आहे’ आणि ‘कवी जातो तेव्हा’ यांसारख्या अविस्मरणीय कलाकृती दिल्या आहेत.

मुंबईकरांनो, हा अनोखा अनुभव चुकवू नका!
“जेवढे रिकामे याल, तेवढे भरून जाल…”, असं नाटकाच्या संपूर्ण टीमचं समस्त प्रेक्षकवर्गाला आवाहन आहे.
हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा!

Upcoming Shows

Notice
There are no upcoming मराठी नाटकं.

Amit Vaze Anjali Marathe Jyaacha Tyaacha Vitthal Jyacha Tyacha Vitthal Jyacha Tyacha Vitthal Marathi Natak Jyacha Tyacha Vitthal Marathi Natak Shows Madhurani Prabhulkar Madhurani Prabhulkar Gokhale Mansi Vaze Vitthal
Follow on Google News Follow on Instagram Follow on YouTube
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Telegram Reddit Tumblr Email
Previous Article१०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या निमित्ताने साजरा होणार ‘बहुभाषिक नाट्य महोत्सव’!
Next Article ‘कुटुंब किर्रतन’ — एक रंगतदार कौटुंबिक नाट्यप्रयोग!

Related Posts

jyacha tyacha vitthal review cover

ज्याचा त्याचा विठ्ठल — एक वेगळा आणि गहिरा अनुभव देणारी कलाकृती

April 23, 2025
priya bhai ek kavita havi aahe cover for review

प्रिय भाई… एक कविता हवी आहे — एका कवितेच्या शोधाचा काव्यमय प्रवास! [Priya Bhai Review]

April 25, 2024
Leave A Reply Cancel Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

shankar jaykishan Marathi natak

Shankar Jaykishan Marathi Natak: भरत जाधव, महेश मांजरेकर आणि शिवानी रांगोळे प्रमुख भूमिकेत; पहा प्रयोगांची माहिती

November 25, 2025
Maharashtra Govt. Ekankika Competition 2025

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा-२०२५’ चे आयोजन — राज्य शासनाच्या वतीने ऐतिहासिक पाऊल! [Updated]

September 30, 2025
35th vyavsayik rajya natya spardha final round results

“असेन मी.. नसेन मी…” नाटकास ३५ व्या व्यावसायिक राज्य नाट्य स्पर्धेत घवघवीत यश — ७.५० लाखांचे प्रथम पारितोषिक पटकावले!

May 20, 2025
img 6750

सासू-सुनेच्या नात्याची गंमतशीर धमाल! — ‘The दमयंती दामले’ नाटकाचा २५वा प्रयोग आहेच मुळी खास!

May 16, 2025

Mastodon
रंगभूमी.com
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp Telegram RSS
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
  • Refund/Returns/Cancellation Policy
© 2025 रंगभूमी.com. Powered by iXyr Media.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Login / Register
Use Phone Number
Use Email Address
Reset Password
Use Phone Number
Use Email Address