मराठी रंगभूमीने प्रेक्षकांना आणि कलाकारांना नेहमीच भरभरून दिलं आहे. कधी भरभरून हसवलंय तर कधी धीरगंभीर विचारांनी अंतर्मुख होण्यास भाग पाडलं आहे. एवढंच नाही तर विषय सामाजिक असो वा कौटुंबिक, विनोदी असो अथवा राजनैतिक, ते नाटक जिवंतपणे तुमच्या समोर उभं करून तुम्हाला त्याचाच एक भाग असल्याची जाणीव करून दिली आहे. मात्र, रंगभूमीशी जोडलेली ही प्रेक्षकाची नाळ आता कुठेतरी तुटत चालल्याचा भास होत आहे आणि म्हणूनच, आज रंगभूमीला आपली गरज आहे!
कलाकारांच्या अभिनयाने सजलेल्या आणि प्रेक्षकांच्या टाळ्यांनी बहरलेल्या जिवंत रंगमाचाची जागा आता ऑनलाईन streaming ने घेतलेली दिसून येत आहे. Netflix, Prime च्या भाऊगर्दीत नाटकाचा प्रेक्षक कुठेतरी हरवून गेला आहे. म्हणूनच की काय, तुमच्याच ऑनलाईन streaming द्वारे नाटक पुन्हा तुमच्या पर्यंत घेऊन येण्यासाठी केलेला हा एक छोटासा प्रयत्न आहे. पुढे दिलेली नाटकांची यादी, अशाच इंटरनेटच्या जंगलात हरवून गेलेल्या आणि दिग्गज कलाकारांच्या इतिहासाची माहितीही नसलेल्या आत्ताच्या पिढीला रंगभूमीकडे पुन्हा खेचून आणेल अशी एक भोळी आशा आहे.
या विचारधारेला तुमचा पाठिंबा असेल आणि Netflix, Prime च्या Marathons करून कंटाळा आला असेल तर पुढील मराठी रंगभूमीवर इतिहास घडवलेल्या काही अजरामर नाटकांचा आस्वाद नक्की घ्या!











![‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे!’ नाटकाची तिकिटे जिंकण्याची सुवर्णसंधी [Free Tickets Giveaway] Free Marathi Tickets Giveaway](https://www.rangabhoomi.com/wp-content/uploads/2021/12/giveaway-1067x600.jpg)

1 Comment
Pingback: जागतिक रंगभूमी दिनानिमित्त डॉ. गिरीश ओक यांचा प्रेक्षकांना मोलाचा संदेश! - रंगभूमी.com