Author: श्रेया पेडणेकर

मनोरंजनाची खुसखुशीत मेजवानी घेऊन आलेल्या ‘आमने सामने’ या नाटकाने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आणि पाहता पाहता या नाटकाचे १०० प्रयोग पूर्ण होणार आहेत. येत्या रविवारी, म्हणजेच १५ मे रोजी ‘आमने सामने’ या नाटकाचा शतक महोत्सवी सोहळा साजरा होणार आहे. या ‘सेंच्युरी’ प्रयोगाच्या आनंदोत्सवात अनेक दिग्गज व मान्यवर सहभागी होणार आहेत. https://youtu.be/Q4V-BeWnUdE सादरकर्ते अवनीश व अथर्व प्रकाशित ‘आमने सामने’ या दोन अंकी नाटकाची निर्मिती ‘नाटकमंडळी’ यांनी केली आहे. मंगेश कदम, लीना भागवत, मधुरा देशपांडे, रोहन गुजर हे कलाकार या नाटकाचा भाग आहेत. या नाटकाचे दिग्दर्शन नीरज शिरवईकर यांनी केले असून लग्नासारखा महत्त्वाचा विषय हाताळताना त्यांनी प्रेक्षकांना विचार करायला प्रवृत्त केले…

Read More

रसिक प्रेक्षकांसाठी एक अगदी आनंदाची बातमी आहे. कारण ‘सृजन द क्रिएशन’ घेऊन येत आहेत ‘सृजनोत्सव २०२२’ — एकांकिकांचा भव्य महोत्सव! येत्या १५ मे, २०२२ रोजी ‘सृजन द क्रिएशन’ या संस्थेचा दुसरा वर्धापन दिन आहे व त्या निमित्ताने, १ नाही, २ नाही, तर तब्बल ९ एकांकिकांचे सादरीकरण करून सृजन द क्रिएशनचा वर्धापन दिन रसिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत साजरा केला जाणार आहे. ‘सृजन द क्रिएशन’बद्दल थोडंसं… राजेश देशपांडे संस्थापित ‘सृजन द क्रिएशन’ ची सुरुवात लॉकडाऊन मध्ये झाली. ऑनलाईन कार्यशाळांच्या माध्यमातून जगभरातील सृजनशील माणसे या संस्थेचा भाग होऊ लागले आणि पाहता पाहता ऑनलाईन कार्यशाळेच्या निमित्ताने जगभरातील सृजनशील माणसांचे हे कुटुंब बनत गेले. १६ ऑनलाईन…

Read More

‘यहाँ से बहुत दूर, गलत और सही के पार, एक मैदान है… मैं वहाँ मिलूंगा तुझे’ — रूमीच्या या प्रसिद्द काव्यपंक्तींमधून जन्माला आलेली एक संकल्पना घेऊन- प्रेम, लग्न आणि लिंगाच्या चार भिंतींच्या पलीकडे जाऊन, लैंगिकतेच्या कवाडांना मोडण्याचा प्रयत्न करणारं एक नवीन नाटक ३ मे रोजी, अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर रंगभूमीवर पदार्पण करतंय, ज्याचं नाव आहे दुष्यंतप्रिय! ‘दुष्यंतप्रिय’ हे कालीदासांच्या ‘अभिज्ञान शाकुन्तलम्’ या संगीतनाटकावरुन प्रेरित असून याचे लेखन सारंग भाकरे यांनी केले आहे. दिग्दर्शनही त्यांचेच आहे. या नाटकातल्या नाटकात, कर्जतमधला २०-वर्षीय रोहित, शाकुंतल या नाटकामध्ये हरणाचे पात्र साकारत असतो. नाटकाच्या शुभारंभाला फक्त दोन आठवडे असताना शकुंतला साकारणारी अभिनेत्री नाटक सोडून जाते. दिग्दर्शकाचा थरकाप…

Read More

रत्नाकर करंडक या एकांकिका स्पर्धेबद्दल तुम्ही आमच्या पेजवर सगळी माहिती वाचलीच असेल. जर तुम्हाला रत्नाकर करंडकबद्दल अधिक माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.  दिग्गजांच्या साहित्याला एक नवा श्वास देणारी ‘रत्नाकर करंडक’! रत्नाकर करंडक या एकांकिका स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व कलाकारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. २६ ते ३० जून बालगंधर्व नाट्यगृह, पुणे, येथे रत्नाकर करंडकची अंतिम फेरी पार पडणार आहे. शेवटची एकांकिका सादर झाल्यावर आणि परीक्षक अंतिम निर्णय सांगेपर्यंत, साधारण पाऊण तासाच्या कालावधीत अतिशय उपयोगी असे NLP, म्हणजे न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंगच्या मोफत कार्यशाळेचा लाभ सर्व सहभागी कलाकारांना घेता येणार आहे. NLP मास्टर प्रॅक्टिशनर सीमा देसाई नायर NLP चे…

Read More

मराठी साहित्याला अनेक दिग्गज लाभले आहेत. त्यांच्या कथा, कादंबऱ्या, एकांकिका व नाटकांमध्ये प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची अफाट ताकद होती. या अजरामर साहित्याबद्दल आजच्या पिढीला कळावं, या दिग्गजांचे साहित्य नवीन पिढीनं वाचावं आणि ते साहित्य नव्या शैलीत सादर करावं, या हेतूने ‘ओम आर्टस्’ आयोजित करत आहेत ‘रत्नाकर करंडक २०२२’! ‘रत्नाकर करंडक’च्या पहिल्या वर्षाचे मानकरी अर्थातच मराठी वाचकांचे लाडके लेखक रत्नाकर मतकरी असणार आहेत. रत्नाकर मतकरी यांच्या साहित्याच्या आधारावर रचलेल्या एकांकिका या स्पर्धेत भाग घेऊ शकतील. प्रवेश प्रक्रिया प्राथमिक फेरीसाठी, प्रथम संपर्क साधलेल्या संघांना प्राधान्य दिलं जाणार आहे. एका केंद्रावर फक्त १० संघांना प्रवेश मिळू शकतो. त्यामुळे स्पर्धेत भाग घेण्यासाठी इच्छुक असलेल्या संघांनी…

Read More

कोविड-१९ च्या निर्बंधांमुळे नाटक नाट्यगहात होणे शक्य नव्हते. तेव्हाच ‘घरो घरी नाटक’ या संकल्पनेचा जन्म झाला. कुठल्याही प्रकारचं मानधन न घेता प्रायोगिक तत्वांवर ‘गुंता’ हे नाटक प्रेक्षकांच्या घरी सादर केलं जात होतं.  कोविड-१९ च्या अंतर्गत असलेल्या सगळ्या नियमांचे पालन ह्या प्रयोगात केले जात होते. आजही ह्या नाटकाचे प्रयोग घराच्या अंगणात, बाल्कनी, टेरेस, रंगमंच ह्या ठिकाणी सादर केले जातात. ‘गुंता’ नाटकाबद्दल थोडंसं… माणसाला ‘माणूस’ ज्या बनवतात त्या म्हणजे भावना! आनंद, दुःख, राग, द्वेष, प्रेम, मत्सर, करुणा इत्यादी भावना मानवाला माणसाचा दर्जा देतात. पण या भावना समजून घेणं फार अवघड असतं. एका शब्दाखाली भावनेचे बरेच पैलू असतात. पण ज्या भावनेबद्दल माणूस वर्षानुवर्षं…

Read More

मंडळी प्रेम म्हणजे काय आणि प्रेम कसं करायचं ह्याचं उत्तर काळानुसार आणि व्यक्तीनुसार बदलत गेलय. आजपर्यंत प्रेमाची कथा सांगणारी किंवा प्रेमावर भाष्य करणारी बरीच नाटकं येऊन गेली आहेत. पण प्रेमाकडे एका वेगळ्या नजरेने बघणारं आणि आजकालच्या जगातल्या प्रेमसंबंधांबद्दल आपले डोळे उघडणारं एक नवीन नाटक सध्या रंगभूमी वर आलंय. मधुसंगिता थिएटर्स आणि अर्चना थिएटर प्रस्तुत ‘प्रेम करावं पण जपून’ हे नव्यापिढीच्या प्रेमाबद्दलच्या विचारांवर आणि प्रेमाच्या विविध छटांवर हसत-खेळत रंग टाकणारं एक नवीन विनोदी नाटक. नाटकाची कथा आणि कलाकार हे अगदी नवोदित असूनही नाटक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतं. नाटकात असलेल्या मालवणी ठसक्यामुळे प्रेक्षकांची भरभरून करमणूक होते हे अगदी निश्चित.  सध्याची पिढी अगदी…

Read More

मराठी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी मराठी नाटकाची ओढ विसरत नाही. तिसरी घंटा ऐकताच सहजच त्याचे पाय नाट्यगृहाकडे वळतात. परदेशात राहणाऱ्या नाट्यदर्दींसाठी अनामिका, कान्हाज मॅजिक निर्मित व साईसाक्षी प्रकाशित ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकाचा खास परदेश दौरा सुरु होत आहे. जेणेकरून परदेशात राहणाऱ्या रसिक प्रेक्षकांना परदेशातल्या नाट्यगृहांमध्ये हे नाटक पाहण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे.  प्रा. वसंत शंकर कानेटकर लिखित ‘अश्रूंची झाली फुले’ हे अतिशय अजरामर नाटक आहे. ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ या सिनेमाच्या भव्य यशानंतर तरुण पिढीमध्ये काशिनाथ घाणेकर यांनी साकारलेल्या भूमिकांबद्दल कुतूहल निर्माण झालं. तेव्हा ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकाने २०१९ मध्ये रंगभूमीवर पुन्हा पदार्पण केलं. अभिनेते सुबोध…

Read More

मानवाचा मुख्य हेतू वर्षानुवर्षांपासून प्रगतीकडे वाटचाल करत राहणे हाच राहिला आहे. प्रगती म्हटली की थोडं मागे सोडणं आणि थोडं नवीन पत्करणं आलंच. पण परंपरागत रूढी, परंपरा, संस्कृती, जात, धर्म, अंधश्रद्धा या असल्या बूरसटलेल्या विचारांमध्ये माणूस अडकून पडतो. आणि बदलाव न स्वीकारता बदलावाकडे वाटचाल करणाऱ्यांची तोंड बंद करतो. हे २१ वे शतक जरी असले, तरीही या परिस्थितीत फार बदल पडला नाहीये. पण अजून किती वर्ष हेच चालू राहणार? हे कटू व थेट प्रश्न विचारणारं आणि विचार करायला लावणारं नाटक म्हणजे ‘निशिगंधा व कलासाधना’ प्रस्तुत ‘मोस्ट वेलकम’ हे नाटक! सुनील हरिश्चंद्र लिखित व दिग्दर्शित ‘मोस्ट वेलकम’ हे नाटक माणसातल्या मानवतावादाला प्रश्न विचारतं.…

Read More

संसार जसा जुना होत जातो तसा निरस होत जातो. आयुष्यात काही नाविन्य राहात नाही आणि संसाराच्या पलीकडे जाऊन एका तिसऱ्या व्यक्ती बरोबर नवोदित आनंद शोधण्याचा प्रयत्न बरेच जण करतात. पण हे करत असताना आपल्या जोडीदाराला हे कळणार तर नाही ना? ह्याची टांगती तलवार सतत त्यांच्या डोक्यावर लटकत असते. जर त्यांच्या जोडीदारांना या विवाहबाह्य संबंधांबद्दल कळलं तर? काय गोंधळ उडेल? त्यांची प्रतिक्रिया काय असेल? या सगळ्या प्रश्नांनी जर तुमची उत्कंठा वाढली असेल, तर बदाम राजा प्रोडकशन्स निर्मित ‘खरं खरं सांग..!’ हे नवोदित नाटक तुम्हाला नक्कीच बघायला आवडेल.  माधुरी गवांदे आणि निनाद कर्पे निर्मित व विजय केंकरे दिग्दर्शित ‘खरं खरं सांग..!’ हे…

Read More

बॅचलर हा शब्द ऐकताच भाड्याने रूम देणाऱ्या मालकाच्या कपाळावर नेहमी आठ्या उमटतात. त्यात शहर मुंबई असेल तर मग बघायलाच नको. समुद्रमंथन निर्मित ‘वाकडी तिकडी’ या नाटकाची अशीच काहीशी कथा आहे. या नाटकाच्या प्रमुख भूमिकेत अंशुमन विचारे, दिसायला भोळा पण भानगडी सोळा अशा अजाचे पात्र साकारतोय. त्याच बरोबर दिग्दर्शक श्रमेश बेटकर स्वतः संज्या या एका फटकळ व्यक्तीच्या भूमिकेत दिसणार आहेत. सचिन वळंजू विजा या एका भित्र्या व्यक्तीचे पात्र साकारताना आपल्याला दिसून येतात तर हर्षदा बामने ‘दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं’ या म्हणीसारख्या सुहानीचे पात्र साकारत आहे. या नाटकात अनिल शिंदे मोडेल पण वाकणार नाही अश्या एका मालकाची भूमिका साकारतायेत. त्याचबरोबर…

Read More

आपण जेव्हा एखादं नाटक बघतो तेव्हा एका वेळेला आपल्याला एक कथा अनुभवायला मिळते. पण जर एका तिकिटात, पाठोपाठ, तुम्हाला दोन कथा बघायला मिळाल्या तर? डोंबिवलीमध्ये ‘तो, पाऊस आणि ताफेटा’ आणि ‘नवरा आला वेशीपाशी’ या दोन दीर्घांकाचे प्रयोग सादर होणार आहेत व एका प्रयोगामध्ये रसिक प्रेक्षकांना दोन वेग-वेगळे दीर्घांक पाहायची सुवर्णसंधी मिळणार आहे. अबस्ट्रॅक्ट आर्ट प्रस्तुत, ‘तो पाऊस आणि टाफेटा’ याचे सादरीकरण पहिल्या अंकात होईल तर करनाटकू निर्मित, ‘नवरा आला वेशीपाशी’ या दीर्घांकाचे सादरीकरण मध्यांतरानंतर दुसऱ्या अंकात होईल. तो पाऊस आणि टाफेटा नितीन सावळे आणि जुईली शिर्के दिग्दर्शित व तुषार गोडसे लिखित ‘तो पाऊस आणि टाफेटा’, आयुष्यातील प्रवास मांडणारी, भूतकाळाच्या आठवणीतून…

Read More