मंडळी, नाटक बघण्यासाठी नाट्यगृहात न जाता, अख्खं नाटकच तुमच्या घरी आलं तर? ‘फिरतं नाटक’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणत, टायनी टेल्स निर्मित आणि भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र व सर्जनशाळा प्रस्तुत ‘कडेकोट कडेलोट’ या नाटकाची चर्चा शहरापासून ते अगदी गावोगावीही सुरु आहे. या नाटकाला स्टेज, लाईट्स, मोठ्या जागा यांची सक्तीने गरज नसल्यामुळे हे नाटक आतापर्यंत भरपूर गावांमध्ये व शहरांमध्ये पोहचू शकलं आहे. कल्पेश समेळ दिग्दर्शित ‘कडेकोट कडेलोट’ हे नाटक फ्रँका रामे लिखित ‘अ वुमन अलोन’ या मूळ नाटकाचा मराठी अनुवाद आहे. ७०च्या दशकात फ्रँका रामे या इटालियन लेखिकेने लिहिलेलं हे नाटक जगातल्या सर्व वर्गातल्या स्त्रियांच्या व्यक्तिस्वातंत्र्याविषयी भाष्य करतं. त्यामुळे त्याचे वेगवेगळ्या भाषेत…
Author: श्रेया पेडणेकर
आपण सर्वांनी रत्नाकर मतकरी ह्यांच्या गूढ कथा वाचल्या असतीलच. मराठी साहित्यात मतकरी आणि गूढ ह्यांना समानार्थी मानले जाते. मत्करींच्या ह्याच गूढ कथा जर रंगभूमी वर अवतरल्या तर? कथांचे नाट्यरुपांतर बघायला काय मज्जा येईल ना! हीच अनोखी कल्पना तुमच्या समोर घेऊन येत आहेत ‘फॅक्टरी मंडळ’ प्रस्तुत ‘अकल्पित — एक रहस्यमय नाट्यदर्शन’. रत्नाकर मतकरी ह्यांच्या ‘हार’ आणि ‘बाबल्या रावळाचा पेटारा’ ह्या दोन गूढ व लघु कथांचे रूपांतर दीर्घांकी नाटकात करण्यात आले आहे. पहिल्या अंकात हार ह्या कथेचे सादरीकरण होईल व मध्यंतरानंतर दुसऱ्या अंकात बाबल्या रावळाचा पेटारा याचे सादरीकरण होण्यात येईल. योगेश उतेकर दिग्दर्शित ‘हार’ आपलं कुटुंब म्हणजे आपल्या जिव्हाळ्याचा विषय. पण ह्याच…
मॅनहोलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आयुष्य अतिशय कष्टाचे व घाणीचे असते. लोकांच्या भलाईसाठी, रस्ते साफ ठेवण्यासाठी, स्वास्थ्याला हानिकारक असलेल्या, विषारी वातावरणात आयुष्यभर काम करूनसुद्धा, त्यांना समाजात महत्वाचं, मानाचं स्थान मिळत नाही. एवढंच काय, त्यांच्या स्वास्थ्याची काळजी त्यांना घेता येईल एवढा पगारदेखील त्यांना दिला जात नाही. मॅनहोलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या या खडतर आयुष्याची कहाणी सांगणाऱ्या एका नवीन नाटकाने रंगमंचावर पदार्पण केलं आहे, ज्याचं नाव आहे ‘अंधे जहाँ के अंधे रास्ते’! ‘उन्मुक्त कलाविष्कार’च्या सहकार्याने, अस्तित्व संस्था, ठाणे रंगभूमीवर प्रस्तुत करत आहे उर्मी लिखित व दिग्दर्शित ‘अंधे जहाँ के अंधे रास्ते’ हे नवंकोरं नाटक. हे नाटक मॅनहोलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वास्तवाची कथा सांगतं. या नाटकाच्या नेपथ्याची…
मंडळी, बच्चेकंपनीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेतच. या दिवसांमध्ये पालकांना पडणारा सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे मुलांचे मनोरंजन करायचे तरी कसे? फिकर नॉट! आपल्या लाडक्या नाट्यसृष्टीने याची पूर्ण जबाबदारी घेतली आहे. संपूर्ण उन्हाळ्याच्या सुट्टीत बालनाटकांचे अनेक प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रात विविध प्रेक्षागृहांमध्ये आपल्याला पाहता येणार आहेत. बालनाट्ये का पाहावीत? बाहेर जाऊन मुलांना २-३ तासांचे नाटक दाखवायचा प्रयत्न फारसे पालक नाहीच करत. सध्याच्या पिढीत मनोरंजनाची इतकी माध्यमं आहेत की बालनाटकांसाठी वेगळा वेळ फार कोणी काढत नाही. परंतु बालनाट्य ही खास लहान मुलांच्या कोवळ्या मनांसाठी बनवलेली असतात. त्यातल्या कथा, पात्र, नेपथ्य, त्यांच्या भावविश्वातल्या गोष्टींच्या अवती-भोवती आखलेल्या असतात. त्यांना आवडणारं एखादं कार्टून, किंवा त्यांनी पुस्तकात वाचलेली…
रसिक प्रेक्षकांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे. कारण २६ मे, २०२२ रोजी ठाण्यात एक भव्य एकांकिका महोत्सव पार पडणार आहे. स्मित हरी प्रोडक्शन्स निर्मित व प्रणा थिएटर्स आयोजित रंगकर्मी एकांकिका महोत्सव! सन्मान कलेचा, उत्साह कलाकारांचा! नवोदितांना संधी मिळावी म्हणून हा महोत्सव साजरा केला जाणार आहे. जास्तीत जास्त नवनवीन प्रेक्षक नाट्यगृहात यावे व त्यांनी नाटकं पाहावी हा या महोत्सवाचा प्रयत्न आहे. रंगकर्मी एकांकिका महोत्सव हा एकांकिकांचा महोत्सव आहे व कुठलीही स्पर्धा नाही.या महोत्सवात प्रत्येक संघ, प्रत्येक कलाकार आपल्या कलेचं सादरीकरण करतो. कलेचा सन्मान व्हावा आणि कलाकारांचा उत्साह वाढावा हा या महोत्सवाचा मुख्य हेतू आहे. त्यामुळे या महोत्सवामार्फत नवनवीन कलाकारांना रंगमंचावर काम…
कोविड-१९ मुळे आलेल्या अकस्मात लाटेमुळे संपूर्ण जग बंद पडलं. आणि त्याच बरोबर आपल्या नाट्यगृहांना सुद्धा कुलुपं लागली. त्याच दरम्यान ‘घरो-घरी नाटक’ या संकल्पनेचा जन्म झाला आणि ‘अमूर्त प्रोडक्शन्स’, ‘गुंता’ ही एकांकिका घेऊन आले. कुठल्याही प्रकारचं मानधन न घेता प्रायोगिक तत्वांवर ‘गुंता’ हे नाटक प्रेक्षकांच्या घरी सादर केलं जातं. ह्या एकांकिकेचे प्रयोग घराच्या अंगणात, बाल्कनी, टेरेस, रंगमंच या ठिकाणांवर सादर केले जातात. कोविड-१९ अंतर्गत असलेल्या सगळ्या नियमांचे पालन या प्रयोगात केले जाते व अगदी मर्यादित प्रेक्षक सामिल होतात. त्यामुळे शांततेत, फक्त तुमच्यासाठी, या नाटकाचा प्रयोग तुमच्या घराच्या परिसरात घडवण्यात येतो. लॉकडाऊनमध्ये घरोघरी नाटक घेऊन जाणारी अमूर्त प्रोडक्शन्सची टीम आता नाट्यगृहात भेट…
वगनाट्य म्हणजे काय? वग म्हणजे ‘वगनाट्य तमाशा’तला एक महत्वाचा घटक. वगनाट्य तमाशा हे एक विनोदी लोकनाट्य आहे जे महाराष्ट्रात गावांमध्ये १८६५ सालापासून सादर केलं जातं. गण, गवळण, लावणी, बतावणी या सगळ्या लोकसाहित्याच्या प्रकारांच्या माध्यमातून वगनाट्याचा प्रयोग सादर होतो. वगाचे स्वरूप सामान्यतः नाटकासारखेच असते आणि त्याचे सादरीकरण तमाशाच्या शेवटी होते. या अखंड सादरीकरणातून वेगवेगळ्या कथा, चर्चा आणि विषय पुढे आणले जायचे. जेव्हा मनोरंजनाची इतर कुठलीही माध्यमं नव्हती, तेव्हा तमाशा आणि वगनाट्य हेच लोकांचे मनोरंजनाचे साधन होते. परंतु हा वगनाट्याचा प्रकार दिवसेंदिवस मागे पडत चालला आहे. नवीन पिढीला वगनाट्य या प्रकाराबद्दल काहीच माहिती नाही आहे. वगनाट्य मराठी मातीत जन्मलेले लोकनाट्य आहे. आपल्या…
मनोरंजनाची खुसखुशीत मेजवानी घेऊन आलेल्या ‘आमने सामने’ या नाटकाने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आणि पाहता पाहता या नाटकाचे १०० प्रयोग पूर्ण होणार आहेत. येत्या रविवारी, म्हणजेच १५ मे रोजी ‘आमने सामने’ या नाटकाचा शतक महोत्सवी सोहळा साजरा होणार आहे. या ‘सेंच्युरी’ प्रयोगाच्या आनंदोत्सवात अनेक दिग्गज व मान्यवर सहभागी होणार आहेत. https://youtu.be/Q4V-BeWnUdE सादरकर्ते अवनीश व अथर्व प्रकाशित ‘आमने सामने’ या दोन अंकी नाटकाची निर्मिती ‘नाटकमंडळी’ यांनी केली आहे. मंगेश कदम, लीना भागवत, मधुरा देशपांडे, रोहन गुजर हे कलाकार या नाटकाचा भाग आहेत. या नाटकाचे दिग्दर्शन नीरज शिरवईकर यांनी केले असून लग्नासारखा महत्त्वाचा विषय हाताळताना त्यांनी प्रेक्षकांना विचार करायला प्रवृत्त केले…
रसिक प्रेक्षकांसाठी एक अगदी आनंदाची बातमी आहे. कारण ‘सृजन द क्रिएशन’ घेऊन येत आहेत ‘सृजनोत्सव २०२२’ — एकांकिकांचा भव्य महोत्सव! येत्या १५ मे, २०२२ रोजी ‘सृजन द क्रिएशन’ या संस्थेचा दुसरा वर्धापन दिन आहे व त्या निमित्ताने, १ नाही, २ नाही, तर तब्बल ९ एकांकिकांचे सादरीकरण करून सृजन द क्रिएशनचा वर्धापन दिन रसिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत साजरा केला जाणार आहे. ‘सृजन द क्रिएशन’बद्दल थोडंसं… राजेश देशपांडे संस्थापित ‘सृजन द क्रिएशन’ ची सुरुवात लॉकडाऊन मध्ये झाली. ऑनलाईन कार्यशाळांच्या माध्यमातून जगभरातील सृजनशील माणसे या संस्थेचा भाग होऊ लागले आणि पाहता पाहता ऑनलाईन कार्यशाळेच्या निमित्ताने जगभरातील सृजनशील माणसांचे हे कुटुंब बनत गेले. १६ ऑनलाईन…
‘यहाँ से बहुत दूर, गलत और सही के पार, एक मैदान है… मैं वहाँ मिलूंगा तुझे’ — रूमीच्या या प्रसिद्द काव्यपंक्तींमधून जन्माला आलेली एक संकल्पना घेऊन- प्रेम, लग्न आणि लिंगाच्या चार भिंतींच्या पलीकडे जाऊन, लैंगिकतेच्या कवाडांना मोडण्याचा प्रयत्न करणारं एक नवीन नाटक ३ मे रोजी, अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर रंगभूमीवर पदार्पण करतंय, ज्याचं नाव आहे दुष्यंतप्रिय! ‘दुष्यंतप्रिय’ हे कालीदासांच्या ‘अभिज्ञान शाकुन्तलम्’ या संगीतनाटकावरुन प्रेरित असून याचे लेखन सारंग भाकरे यांनी केले आहे. दिग्दर्शनही त्यांचेच आहे. या नाटकातल्या नाटकात, कर्जतमधला २०-वर्षीय रोहित, शाकुंतल या नाटकामध्ये हरणाचे पात्र साकारत असतो. नाटकाच्या शुभारंभाला फक्त दोन आठवडे असताना शकुंतला साकारणारी अभिनेत्री नाटक सोडून जाते. दिग्दर्शकाचा थरकाप…
रत्नाकर करंडक या एकांकिका स्पर्धेबद्दल तुम्ही आमच्या पेजवर सगळी माहिती वाचलीच असेल. जर तुम्हाला रत्नाकर करंडकबद्दल अधिक माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. दिग्गजांच्या साहित्याला एक नवा श्वास देणारी ‘रत्नाकर करंडक’! रत्नाकर करंडक या एकांकिका स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व कलाकारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. २६ ते ३० जून बालगंधर्व नाट्यगृह, पुणे, येथे रत्नाकर करंडकची अंतिम फेरी पार पडणार आहे. शेवटची एकांकिका सादर झाल्यावर आणि परीक्षक अंतिम निर्णय सांगेपर्यंत, साधारण पाऊण तासाच्या कालावधीत अतिशय उपयोगी असे NLP, म्हणजे न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंगच्या मोफत कार्यशाळेचा लाभ सर्व सहभागी कलाकारांना घेता येणार आहे. NLP मास्टर प्रॅक्टिशनर सीमा देसाई नायर NLP चे…
मराठी साहित्याला अनेक दिग्गज लाभले आहेत. त्यांच्या कथा, कादंबऱ्या, एकांकिका व नाटकांमध्ये प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची अफाट ताकद होती. या अजरामर साहित्याबद्दल आजच्या पिढीला कळावं, या दिग्गजांचे साहित्य नवीन पिढीनं वाचावं आणि ते साहित्य नव्या शैलीत सादर करावं, या हेतूने ‘ओम आर्टस्’ आयोजित करत आहेत ‘रत्नाकर करंडक २०२२’! ‘रत्नाकर करंडक’च्या पहिल्या वर्षाचे मानकरी अर्थातच मराठी वाचकांचे लाडके लेखक रत्नाकर मतकरी असणार आहेत. रत्नाकर मतकरी यांच्या साहित्याच्या आधारावर रचलेल्या एकांकिका या स्पर्धेत भाग घेऊ शकतील. प्रवेश प्रक्रिया प्राथमिक फेरीसाठी, प्रथम संपर्क साधलेल्या संघांना प्राधान्य दिलं जाणार आहे. एका केंद्रावर फक्त १० संघांना प्रवेश मिळू शकतो. त्यामुळे स्पर्धेत भाग घेण्यासाठी इच्छुक असलेल्या संघांनी…