Author: श्रेया पेडणेकर

लॉकडाऊन मुळे आपण सर्व घरात लॉक झालो. तशीच लॉक झाली मराठी नाट्यसृष्टी. मागच्या दोन वर्षात कोरोना मुळे अखंड नाट्यसृष्टी बंद पडली होती. नाटक रसिक देखील आतुरतेने नाटकांची वाट पहात होते. आता हळू हळू अनेक नाटकं रंगभूमीवर पुनरागमन करताना दिसतायत आणि त्यातलंच एक नाटक म्हणजे नीरज शिरवईकर लिखित व विजय केंकरे दिग्दर्शित ‘अ परफेक्ट मर्डर’! आल्फ्रेड हिचकॉक ह्यांच्या ‘डायल एम फॉर मर्डर’ या सिनेमावर आधारित ‘अ पर्फेक्ट मर्डर’ हे नाटक डिसेंबर २०२१ मध्ये रंगभूमीवर पुनःश्च हरी ओम करतंय. ह्या नाटकाचा पहिला प्रयोग डिसेंबर २०१८ रोजी झाला होता व २०१९ पर्यंत त्याचे जवळ जवळ १०० यशस्वी प्रयोग झाले होते. नाटकाचे कथानक काहीसे चित्तथरारक आहे.…

Read More

मराठी रंगभूमीचा खूप मोठा इतिहास आहे. मराठी नाट्यसृष्टीला फुलवण्यात अनेक नावांचा हातभार आहे. खूप सारी दिग्गज मंडळी आहेत ज्यांनी स्वत:चे एक अढळ स्थान नाट्यसृष्टीत अजरामर केले आहे. त्यापैकी एक महत्वाचे नाव महणजे श्रीराम लागू! श्रीराम लागू ह्यांचे १७ डिसेंबर २०१९ रोजी पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. ९२ वर्षाचे श्रीराम लागू मराठी नाट्यसृष्टीमधले अतिशय मोठे नाव होते. त्यांच्या कालखंडात त्यांच्या कलेने त्यांनी रंगमंच्या वरील अनेक पात्रांना रंगभूमीवर जिवंत केलं होतं. २० पेक्षा अधिक नाटके श्रीराम लागूंनी स्वतः दिग्दर्शित केली असून अनेक मराठी नाटकांचा ते भाग होते. श्रीराम लागू ह्यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९२७ ला सातारा जिल्ह्यात झाला. बाळकृष्ण चिंतामण लागू आणि सत्यभामा…

Read More