Author: श्रेया पेडणेकर

वर्षभरात अनेक एकांकिका स्पर्धांमध्ये विविध संघ आणि कलाकार भाग घेत असतात. त्यातील काही विजयी संघ आणि कलाकार प्रेक्षकांची वाहवा मिळवतात. तर या स्पर्धांमध्ये विजयी न झालेल्या किंवा अंतिम फेरीत दाखल न झालेल्या एकांकिका स्पर्धकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सम्यक कलांश प्रतिष्ठान घेऊन येत आहेत नाट्यगंध महोत्सव २०२२! यंदाचे नाट्यगंध महोत्सवाचे हे ४थे वर्ष आहे. स्थानिक कलाकारांना, स्थानिक पातळीवर रंगमंच उपलब्ध करून देणे हा नाट्यगंध महोत्सवाचा मुख्य हेतू आहे. स्पर्धेत मागे राहिलेल्या कलाकारांचे, पडद्याआड राहिलेल्या संघांचे मनोबल वाढविण्याचे, तसेच त्यांना प्रेक्षक मिळवून देण्याचे कार्य सम्यक कलांश प्रतिष्ठान नाट्यगंध महोत्सवाच्या माध्यमातून गेली चार वर्षे करत आहे व या एकांकिकांना प्रेक्षक मिळवून देण्यात…

Read More

या दशकातल्या तरुण पिढीची प्रेमाबद्दल अनेक वेगवेगळी मतं आहेत. खरं प्रेम सापडणं फार अवघड होत चाललंय, आणि त्यामुळे दिवसेंदिवस लोकांचा प्रेमावरून विश्वास उडत चाललाय असं अनेकांचं मानणं आहे. या अश्या वातावरणात प्रेम किंवा समर्पणाची भावना जरी मनात आली तरी त्यांना धस्स होतं. तर एकीकडे प्रेमावर अतिशय विश्वास दाखवणारे जीवही या जगात वावरतात. त्यामुळे बिनधास्त मोकळेपणाने प्रेम व्यक्त करणारे, आणि सावधपणे, प्रेमात प्रत्येक पाऊल मोजून मापून टाकणारे, असे दोन गट आपल्याला बघायला मिळतात. या अशा परस्पर विरोधी मतांच्या दोन व्यक्ती जर एकत्र आल्या तर? त्यांचं नातं कसं उलगडेल? त्यांच्या नात्यात काय अडथळे येतील आणि त्या सगळ्या विरोधाभासांना ते कसे सामोरे जातील?…

Read More

जळगावसह खानदेशच्या मातीच्या, भाषेचा गोडवा आणि वैविध्यपूर्णता जपत नाटक, साहित्य, संगीत आणि नृत्य या सांस्कृतिक क्षेत्रात क्रियाशील असलेली संस्था, म्हणून परिवर्तन ओळखली जाते. गेल्या काही वर्षांपासून परिवर्तनच्या नाटकांचे व सांगीतिक कार्यक्रमांचे महोत्सव राज्यभर होत असतात. तर यावर्षी ‘वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान’ आयोजित ‘परिवर्तन कला महोत्सव’ कणकवली येथे पार पडणार आहे. कोरोनामुळे मागील वर्षी आठ महोत्सव रद्द करण्यात आले होते. म्हणून यावर्षी २५, २६ व २७ फेब्रुवारी २०२२ असे तीन दिवस हा सोहळा अगदी जल्लोषात पार पडणार आहे. दि. २५ फेब्रुवारी २०२२ रोजी महोत्सवाची सुरुवात बहिणाईंच्या कविता व गाण्यांवर आधारित ‘अरे संसार संसार’ या सुरेल मैफिलीने होणार आहे. या कार्यक्रमाची संकल्पना…

Read More

पु. ल. देशपांडे म्हणजे मराठी साहित्यातलं मोठं नाव! मराठी मातीतली अशी एकही व्यक्ती नसेल जी पुलंना ओळखत नसेल. आपण पुलंच्या लेखणीला ओळखतो, त्यांचं साहित्य ओळखतो. आपल्या माहितेतले पु. ल. देशपांडे म्हणजे जे त्यांच्या लेखणीतून आपल्या समोर आले व आपण त्यांचा चित्र आपल्याया मनात निर्माण केलं. पण पुलंना आपण खऱ्या अर्थाने ओळखतो का? खळखळून हसवणाऱ्या या आनंदयात्रीची अपरिचित बाजू दाखवणारा प्रयोग म्हणजे ‘पुरुषोत्तम’. स्वातंत्रवीर सावरकर सेवा केंद्र यांच्या सहकार्याने क्रेसेंट थिएटर आयोजित आणि प्रयोगशाळा प्रस्तुत, पुरुषोत्तम हे सादरीकरण, आजवर आपल्या मनात, डोक्यात, विचारात पुलंविषयी असलेल्या साचेबद्ध प्रतिमेच्या पलीकडे जाऊन एक वेगळे ‘पुरुषोत्तम’ आपल्या समोर सादर करण्याचे प्रयत्न करते. तक्षिल खानविलकर, सुमेध…

Read More

एकांकिकाचं लेखन म्हणजे अगदी कौशल्याचं काम. आपल्या लिखाणातून आपले विचार मांडणे व त्याच बरोबर प्रेक्षकांना खिळवून ठेवणे हे वाटते तितके सोप्पे नसते. एकांकिका लिहिणाऱ्या हौशी लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘अवतरण अकादमी’ घेऊन आली आहे ‘राज्यस्तरीय एकांकिका लेखन स्पर्धा!’ ‘कालानंद देणेघेणे हा केवळ मनुष्यप्राण्याचा गुण असल्यामुळे कलोपासना हा माणसाचे माणूसपण दृढ राखणारा एकमेव आचार आहे’, ह्या अभंग विश्वासाने व काही वेगळे करण्याच्या हेतूने, जागतिक रंगभूमी दिवशी, २७ मार्च १९९९ रोजी ‘अवतरण’ हा मंच कार्यरत झाला. रंगभूमीच्या कलाकारांमधील परस्पर सहकार्य वाढीस लावून कला निर्मितीस प्रोत्साहन मिळावे म्हणून नवोदित कलाकारांना रंगमंच उपलब्ध करून देऊन त्यांच्या कलागुणांची पारख होण्यासाठी, गेली २३ वर्षे ‘अवतरण अकादमी’ अन्य…

Read More

नाटक या साहित्यप्रकाराची सुंदरता शब्दात मांडणं अगदी अवघड. नाटक पाहण्याची जी पूर्ण प्रक्रिया असते, म्हणजे सर्वप्रथम पडदे उघडण्याची आतुरता, तिसरी घंटा वाजल्यावर वाढलेली उत्सुकता, पडदा उघडताच, ‘रंगदेवता व रसिकप्रेक्षक’ ही सूचना ऐकतानाचा वाढलेला उत्साह, हा संपूर्ण अनुभव अगदी अवर्णनीय असतो. एका काळोख्या नाट्यगृहात बसून अनेक कथा, देश, भाषा व भावना प्रेक्षक अनुभवू शकतात. नाटक म्हणजे नाट्यरसिकांची खरी मेजवानी. पण नाटकाची अलौकिकता आणि वेगळेपण ह्याची खरी जाणीव फक्त नाट्यदर्दींना असते. साचेबद्ध आयुष्य आणि काटेकोर जीवन जगणाऱ्यांना नाटकाची मजा काय उमगणार? पण, नाटकाचा न ही कळत नसलेल्या व आकड्यांच्या जगात रमणाऱ्या व्यक्तीला नाटकाचे महत्व व सौन्दर्य समजावणे हा एखाद्या नाट्यदर्दीसाठी जीवन मरणाचा…

Read More

मध्यंतरीचा हा करोनाबाधित काळ जगभर सर्वांसाठीच अवघड ठरला आहे. या अशा नैराश्यवादी वातावरणात तग धरून राहण्यासाठी सगळ्यात महत्वाचे असते ते म्हणजे मन मोकळे करून मनमुराद हसणे. विनोदाने आपल्याला खळखळून हसवायला रंगमंचावर पुन्हा एकदा येत आहे, अभिजात निर्मित व व्यास क्रिएशन्स प्रकाशित ‘वासूची सासू’ हे नाटक! वासूची सासू ह्या नाटकाने एकेकाळी रंगमंच गाजवलेला. मुख्य भूमिकेत असलेले लोकप्रिय व सगळ्यांचे आवडते कलाकार दिलीप प्रभावळकर ह्यांनी सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक व नाटककार प्रदीप साळवी ह्यांनी लिहिलेले हे पात्र अजरामर केले आहे. व आता अभिजात व व्यास क्रिएशन्स सह, दिग्दर्शक दुर्गेश मोहन कलाकारांच्या नव्या टोळीसह हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर घेऊन येत आहेत. वासूची सासू…

Read More

एकांकिकांना प्रोत्साहन देण्याकरिता, ‘रीत क्रिएशन’ व ‘रीत चॅरिटेबल ट्रस्ट’ गेल्या सहा वर्षांपासून मराठी एकांकिका स्पर्धेचे आयोजन करतात. व ह्या वर्षी दोन वर्षांच्या खंडानंतर रीत चॅरिटेबल ट्रस्ट पुन्हा एकदा उत्साहाने घेऊन येत आहेत ‘रीत राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा २०२२!’ मागील दोन वर्षे कोरोनाच्या संकटामुळे जगभरात अनेक कार्यक्रम व स्पर्धा पार पडू शकल्या नाहीत. त्यामुळे नाईलाजास्तव रीत राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा सुद्धा खंडित पडली. परंतु आता २ वर्षांनंतर, आणखी जल्लोषात, उत्साहात व आधी पेक्षा जास्त मोठ्या प्रमाणावर ही स्पर्धा पुनरागमन करतेय. रीत राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी यंदा ऑनलाईन स्वरूपात पार पडेल. स्पर्धेचा परीघ वाढावा व जास्तीत जास्त संघांनी या स्पर्धेत भाग घ्यावा हा…

Read More

अभिनयाचे कसब वाटते तितके सोपे नसते. शब्दफेक, आवाजात चढउतार, निरनिराळे एक्स्प्रेशन, कॅरेक्टर पकडणे ह्या सगळ्या कसबीत कुशल असणे गरजेचे असते. पण हे शिकवणारे फार कोणी नसते आणि बहुतेक वेळा कलाकारांना हे स्वत:हून शिकावे लागते. हीच अडचण दूर करण्यासाठी ‘सृजन – द क्रिएशन’ — प्रसिद्ध व लोकप्रिय लेखक, दिग्दर्शक व नाटककार राजेश देशपांडे ह्यांची दोन दिवसीय लेखन-दिग्दर्शन-अभिनयाची ‘मूलभूत मार्गदर्शन कार्यशाळा’ घेऊन येत आहेत. राजेश देशपांडे हे एक अतिशय मोठे नाव. त्यांनी आजपर्यंत अतिशय उत्कृष्ट नाटकांची निर्मिती केली आहे. ‘करून गेलो गाव’, ‘लग्नानंतरची गोष्ट’, ‘श्री बाई समर्थ’, ‘होते कुरूप वेडे’, ही त्यांच्या यादीमधली काही अतिशय गाजलेली नाटके. नुकतेच रंगमंचावर आलेले ‘धनंजय माने…

Read More

बहीण भावाचे नाते हे अतिशय सुंदर व निखळ असते. दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात. कधी वादविवाद होतात, शब्दाला शब्द भिडतो तरीदेखील कठीण प्रसंगी ते एकमेकांची ढाल बनून उभे राहतात. भावा-बहिणीची अशीच एक गोष्ट सांगते ‘दादा, एक गूड न्यूज आहे’ हे नाटक! कल्याणी पाठारे लिखित आणि अद्वैत दादरकर दिग्दर्शित हे नाटक भावा-बहिणीच्या नात्याचा एक वेगळा प्रवास आहे. डिसेंबर २०१८ मध्ये हे नाटक रंगभूमीवर अवतरले. आतापर्यंत झालेले सगळे प्रयोग प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादात पार पडले आहेत. ‘दादा, एक गूड न्यूज आहे’ या नाटकाच्या मुख्य भूमिकेत सुप्रसिद्ध मराठी नट उमेश कामत हा ३० वर्षाचा, करिअर फोकस्ड व आपल्या बहिणीवर प्रेम करणाऱ्या ‘विनीत’चे पात्र साकारतोय.…

Read More

असं म्हणतात की मराठी भाषा दर १० किलोमीटर वर बदलते आणि प्रत्येक लहेज्यात एक वेगळा गोडवा असतो. तर हाच गोडवा नाटकांपर्यंत का पोहोचू नये? या प्रमाण भाषेपासून लांब असलेल्या अनेक बोलीभाषा मुख्य प्रवाहापर्यंत पोहचाव्या व लोकांना त्यांचा आस्वाद घेता यावा, या उद्देशाने ‘सुप्रिया प्रॉडक्शन्स’ पुन्हा एकदा घेऊन येत आहेत ‘बोलीभाषा एकांकिका स्पर्धा!’ Bolibhasha Ekankika Spardha 2022 प्रसिद्ध नाटककार व ९६ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष श्री. गंगाराम गवाणकर यांचे हे मत होते की अनेक मालिका व चित्रपट बोलीभाषेमुळे गाजले‌. त्यांचे स्वतःचे ‘वस्त्रहरण’ हे मालवणी भाषेतले नाटक लोकांनी डोक्यावर उचलून घेतले होते. तर बोलीभाषेतली नाटके किंवा एकांकिका रंगभूमीवर जास्तीत…

Read More

लॉकडाऊनमुळे सगळे घरात कैद झाले. आपल्या मराठी नाट्यसृषटी ला देखील कुलूप लागलं. त्यामुळे अनेक नाटके जी रंगभूमीवर अगदी नवीन होती, त्यांच्या प्रयोगांमध्ये खंड पडला. पण जसा लॉकडाऊन उघडत चाललाय तसेच बरीच नाटके रंगमंचावर पुनरागमन करत आहेत. त्यातलं एक नाटक म्हणजे सागर कारंडे ह्यांचे ‘इशारो ईशारो में’ हे नाटक! दिग्दर्शक जय कपाडिया, ह्यांचे ‘ईशारों ईशारों में’, ह्या नाटकाचा, पहिला प्रयोग २५ जानेवारी २०२० रोजी पार पडला. परंतु अखंड देशभर लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे १५-१६ प्रयोगांनंतर नाटक बंद पडले होते. डिसेंबर २०२० ला बोरिवलीमध्ये नाटकाचा पुनश्च हरी ॐ झाला. ह्या १७ व्या प्रयोगनिमित्त कलाकार खूपच आसुसले होते. प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात हा प्रयोग पार…

Read More