रंगभूमी.com
    Facebook Twitter Instagram YouTube WhatsApp Telegram RSS
    • Home
    • About Us
    • Subscribe
    • Donate
    • Advertise
    • Contact Us
    Facebook Twitter Instagram YouTube WhatsApp Telegram RSS
    रंगभूमी.com
    • Home
    • Book Tickets
    • Marathi Natak Info
    • Shows Calendar
    • News
      vaibhav mangle summer heat facebook post

      आधीच उकाडा आणि त्यात संतापाचा वणवा! — “कुठे आणि कशी मागावी दाद!”, वैभव मांगलेंचा सवाल

      May 16, 2023
      ncpa pratibimb natya utsav 2023 cover

      प्रतिबिंब मराठी नाट्य उत्सव — नाटकं बघण्यासाठी, शिकण्यासाठी आणि जगण्यासाठी आयोजिलेला नाट्योत्सव!

      May 1, 2023
      Natyadarbar

      नाट्यदरबार — दर्जेदार नाट्यानुभवांची रंगतदार मैफल!

      April 26, 2023
      mushafiri cover 2

      पु.लंसोबत एका बहुरंगी ‘मुशाफिरी’चा आस्वाद घ्यायला चला!

      March 17, 2023
      Paach Futacha Bachchan Marathi Natak

      ‘रोम रोम रंगमंच’चे नवे नाटक – पाच फुटाचा बच्चन

      February 28, 2023
    • Reviews
      devmanus marathi natak cover 2

      देवमाणूस — युद्धाची भीषणता दाखवणारं वास्तवदर्शी चित्रण

      April 29, 2023
      sad sakharam natak

      भावभावना परत मिळवण्यासाठी भावनिक गुंत्यात अडकलेला ‘Sad सखाराम’ [Review]

      January 17, 2023
      Aamne Saamne Marathi Natak

      आमने सामने — दोन संसाराची हटके गोष्ट

      December 30, 2022
      Andhe Jahaan Ke Andhe Raaste Marathi Natak Review

      अंधे जहाँ के अंधे रास्ते [Review] — शहराच्या घाणीत अडकलेल्या मॅनहोल सफाई कर्मचाऱ्यांची कथा

      June 30, 2022
      Gunta

      गुंता एकांकिका [Review]- नात्यातल्या गुंत्याची एक अनोखी बाजू

      May 18, 2022
    • Podcast
    • Opinion
      sad sakharam natak

      भावभावना परत मिळवण्यासाठी भावनिक गुंत्यात अडकलेला ‘Sad सखाराम’ [Review]

      January 17, 2023
      Aamne Saamne Marathi Natak

      आमने सामने — दोन संसाराची हटके गोष्ट

      December 30, 2022
      Pradeep Patwardhan Moruchi Mavshi Prashant Damle

      चटका लावणारी ‘एक्झिट’

      August 11, 2022
      Zapurza Kavyayog

      काव्ययोग संपन्न! — असा पार पडला झपुर्झाचा पहिला टप्पा

      July 11, 2022
      Anandyatri

      आनंदयात्री स्नेहसंमेलन (GTG) सोहळा

      June 30, 2022
    • Events
      ncpa pratibimb natya utsav 2023 cover

      प्रतिबिंब मराठी नाट्य उत्सव — नाटकं बघण्यासाठी, शिकण्यासाठी आणि जगण्यासाठी आयोजिलेला नाट्योत्सव!

      May 1, 2023
      Natyadarbar

      नाट्यदरबार — दर्जेदार नाट्यानुभवांची रंगतदार मैफल!

      April 26, 2023
      mushafiri cover 2

      पु.लंसोबत एका बहुरंगी ‘मुशाफिरी’चा आस्वाद घ्यायला चला!

      March 17, 2023
      arogyam dhanasampada prayogik kalamanch opening cover

      मकरंद देशपांडे यांच्या हस्ते ‘आरोग्यम धनसंपदा प्रायोगिक कलामंचाचे’ उद्घाटन — प्रायोगिक नाट्यमहोत्सवाने कलामंचाचा शुभारंभ

      October 17, 2022
      adpk prayogik natya mahotsav 2022 cover

      मालाडमध्ये नव्या रंगमंचाचा लवकरच शुभारंभ — शुभारंभाप्रीत्यर्थ नाट्यमहोत्सवाची घोषणा

      October 10, 2022
    • रंगभूमी.com
      • About Us
      • Subscribe to Us
      • Advertise Here
      • Contact Us
    रंगभूमी.com
    Home»Events»‘सृजन द क्रिएशन’ तर्फे रंगणार भव्य एकांकिका महोत्सव!
    Events 5 Mins Read

    ‘सृजन द क्रिएशन’ तर्फे रंगणार भव्य एकांकिका महोत्सव!

    By श्रेया पेडणेकरMay 12, 2022
    Srujanotsav 2022
    Share
    WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    रसिक प्रेक्षकांसाठी एक अगदी आनंदाची बातमी आहे. कारण ‘सृजन द क्रिएशन’ घेऊन येत आहेत ‘सृजनोत्सव २०२२‘ — एकांकिकांचा भव्य महोत्सव! येत्या १५ मे, २०२२ रोजी ‘सृजन द क्रिएशन’ या संस्थेचा दुसरा वर्धापन दिन आहे व त्या निमित्ताने, १ नाही, २ नाही, तर तब्बल ९ एकांकिकांचे सादरीकरण करून सृजन द क्रिएशनचा वर्धापन दिन रसिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत साजरा केला जाणार आहे.

    ‘सृजन द क्रिएशन’बद्दल थोडंसं…

    राजेश देशपांडे संस्थापित ‘सृजन द क्रिएशन‘ ची सुरुवात लॉकडाऊन मध्ये झाली. ऑनलाईन कार्यशाळांच्या माध्यमातून जगभरातील सृजनशील माणसे या संस्थेचा भाग होऊ लागले आणि पाहता पाहता ऑनलाईन कार्यशाळेच्या निमित्ताने जगभरातील सृजनशील माणसांचे हे कुटुंब बनत गेले. १६ ऑनलाईन आणि ५ प्रत्यक्षातल्या कार्यशाळांनंतर, हे कुटुंब विस्तारात जात आहे. वय वर्ष ७ ते ७० वयोगटातली लोकं इथे एकत्र येऊन अनेक कार्यक्रम व उपक्रमांचा भाग झाले आहेत. अनेक मान्यवरांनी हातचं काही राखून न ठेवता त्यांना मार्गदर्शन केलं व अजूनही करीत आहेत.

    सृजनोत्सव २०२२

    ‘सृजन द क्रिएशन’ ही संस्था येत्या १५ मे रोजी २ वर्षांची होतेय. तेव्हा सकाळी १०:०० ते रात्री ११:०० वाजेपर्यंत ९ एकांकिकांचा ‘सृजनोत्सव २०२२’, सृजन द क्रिएशनचे कलाकार साजरा करणार आहेत. तिकिटाचा दर फक्त १५०/- असून,  प्रबोधनकार ठाकरे, लघु नाट्यगृह, बोरिवली, येथे हा भव्य एकांकिका महोत्सव पार पडणार आहे. तिकीट विक्री शनिवार दिनांक १४ मे पासून नाट्यगृहावरच सुरू होणार आहे. फक्त देशभरातील विद्यार्थी नाही तर परदेशी असलेले सृजनचे विद्यार्थी व सदस्यसुद्धा या महोत्सवासाठी येणार आहेत.

    या महोत्सवात रमेश पवार, आशिष पाथरे, वनमाला वेंदे, स्मिता पोतनीस, डॉ. स्मिता दातार आणि राजेश देशपांडे यांच्या विविध स्पर्धांमध्ये पारितोषिकप्राप्त एकांकिका सृजनोत्सवात सादर होणार आहेत. या संपूर्ण कार्यक्रमातल्या एकांकिकांच्या नेपथ्याची जबाबदारी संदेश बेंद्रे यांनी सांभाळली आहे व त्यांच्या प्रकाशयोजनेची धुरा श्याम चव्हाण यांनी सांभाळली आहे.

    या कार्यक्रमात अनिल तांबे, शशांक पिटकर, दिपक लांजेकर, महेश येंद्रे, आदित्य गोमटे, गिरीश तेंडुलकर. गंधार बाबरे, श्रीपाद वैशंपायन, विष्णू सपकाळ, राज पवार, प्रतिक पवार, अमेय पोवार, यश भालेकर, संग्राम लवटे, संतोष राणे, अक्षय राणे, वैभव राणे, ओंकार खोचरे, प्रशांत सावंत, रिशील घोडेराव, अबीर श्रुंगारपुरे, सृजन देशपांडे, वैष्णवी चव्हाण, वनमाला वेंदे, अन्नदा परब, राज्ञी कुलकर्णी, सुरुची वीरकर, वर्षा सुर्वे, ऐश्वर्या परशुरामे, मंगल नाखवा, श्रद्धा घैसास जोशी, शिल्पा माहुली, अपूर्वा कामात लांजेकर, तन्मयी वैद्य, ऋचा सुर्वे, अपर्णा जाधव, कल्याणी गजगेश्वर, अनन्या जाधव, वरद शिराळे, विहान श्रुंगारपुरे व श्रेयन परब या ४१ कलाकारांची टोळी आहे.

    सृजनोत्सव २०२२ मध्ये सादर होणाऱ्या एकांकिका

    १) वस्तुस्तिथी

    सजीव माणसांना मन असतं तसं वस्तुंना असेल का? मन असलं तर घरात झालेल्या घटनांविषयी ते आपसात काय बोलत असतील? याचे उत्तर तुम्हाला वस्तुस्थिती ही एकांकिका पाहून कळेल. या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन राजेश देशपांडे यांनी केले आहे, व या एकांकिकेला सुनील नार्वेकरांनी संगीताची जोड दिली आहे.

    २) मॅड मॅडम ची मॅड शाळा

    वनमाला वेंदे लिखित दिग्दर्शित ‘मॅड मॅडम ची मॅड शाळा’ हे एक विनोदी प्रहसन आहे. कोरोना मुळे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यावर परिणाम झालाय. शाळा सुरू झाल्यावर एखादी मॅड टीचर घरात जे काम करत असेल ते शाळेत करायला गेली तर काय होईल? मुलांना टीचरला लॅपटॉप मोबाईलमध्ये बघायची सवय झालेली असताना ते कधी व्हिडिओ ऑफ करतात किंवा टीचरला म्यूट करून नेट प्रॉब्लेम आहे असं सांगतात..पण आता शाळेत गेल्यावर ही मुले काय करतील हे पाहायला अतिशय धमाल येईल.

    ३) रोज मरे त्याला

    मरण हे अंतिम सत्य असतं. माणूस येणाऱ्या प्रत्येक संकटाला घाबरू लागला तर जीवन मरणासारखे होऊन जाते. पण संकटाला भ्यायचं की तोंड द्यायचं? संकटांना घाबरणं मरण असतं आणि त्याला धैर्याने तोंड देणे जीवन. आशिष पाथरे लिखित ‘रोज मरे त्याला’ या एकांकिकेचे दिग्दर्शन राजेश देशपांडे यांनी केले असून, या एकांकिकेच्या संगीताची बाजू वनमाला वेंदे यांनी सांभाळली आहे.

    ४) इडिया घर

    माणसाचं जीवन निरागस राहिलं नाही. प्राणीच साधे असे आपण म्हणतो खरं, पण प्राण्यांना माणसांसारखी बुद्धी मिळाली तर? ते माणसांपेक्षा वेगळे वागतील की त्यांचे वागणे माणसांच्या वागण्याची अनुकृति होईल? राजेश देशपांडे लिखित दिग्दर्शित ‘इडिया घर’ ही एकांकिका याच विचाराभोवती फिरते. या एकांकिकेच्या संगीताची बाजू अंजली मायदेव यांनी सांभाळली आहे.

    ५) आपुले मरण

    नातलग, मित्र मैत्रिणी, शेजारीपाजारी, सगळी नाती सांभाळताना आपण समजत असतो की इतकी माणसे आपल्या बरोबर आहेत, आपली आहेत. माणूस एकटेपणाला घाबरतो. पण जीवनातील सत्य काय असतं? माणूस आयुष्यभर गर्दीत एकटाच असतो याची जाणीव होणं हेच आपलं मरण आपण पाहण्यासारखं असतं. राजेश देशपांडे दिग्दर्शित या एकांकिकेचे लेखन स्मिता पोतनीस यांनी केले आहे व प्रितीश खंडागळे यांनी या एकांकिकेच्या संगीताची बाजू सांभाळली आहे.

    ६) झो झेंगाट झालं ना

    माणसं खोटं बोलतात. ही सत्यापासून एक सुखद पळवाट असते ती स्वप्नात रंगण्याची. माणसं दुसऱ्यांना गोष्टी सांगताना स्वतःचे मनोरंजन करत असतील तर ते खरच गैर आहे का? याच विचारावर भाष्य करणारी ‘झो झेंगाट झालं ना’ या एकांकिकेची मूळ कथा द. मा. मिरासदार लिखित ‘नाना ९९ बाद’ या कथेवर आधारित आहे. या एकांकिकेचे लेखन व दिग्दर्शन राजेश देशपांडे यांनी केले असून या एकांकिकेच्या संगीताची बाजू प्रतिक पवार यांनी सांभाळली आहे.

    ७) व्हेअर देअर इज ए विल

    जीवन प्रत्येकाला प्रिय असतं. परंतु मरण गूढ असल्यामुळे सगळे त्याला घाबरतात. मुंगीही स्वतःचा जीव वाचवते. मग जीवन नेमकं नकोसं कधी होत असेल? आणि असं झालं तर जीवन जगायचं की मरायचं हा अधिकार माणसाला हवा की कायद्याच्या नियमात बांधलेला हवा? डॉ. स्मिता दातार लिखित या एकांकिकेचे दिग्दर्शन राजेश देशपांडे यांनी केले आहे. त्याचबरोबर प्रतिक पवार यांनी या एकांकिकेला संगीताची जोड दिली आहे.

    ८) जांभुळ पडल्या झाडाखाली

    माणसावर झाड पडलं असो वा कोणत्याही सामाजिक वैयक्तिक प्रश्‍न असो, माणूस एकदा लालफितीत अडकला की त्यातून त्याचा जीव जातो की प्रश्न सुटतो? जांभुळ पडल्या झाडाखाली ही एकांकिका याच प्रश्नाचे उत्तर देते. या एकांकिकेची मूळ कथा कृष्णचंदर यांची आहे. याचे लेखान व दिग्दर्शन राजेश देशपांडेंचे असून संगीत संग्राम लवटे यांचे आहे.

    ९) म्ह्या

    चोरी करणारा चोर कायद्यानुसार गुन्हेगार, पण चोरी करणाऱ्या चोरांनी धमाल करताना जर शहर वाचवलं तर? रमेश पवार लिखित या एकांकिकेची कथा पन्नास वर्षांपूर्वीची आहे आणि ती दोन चोरांवर लिहिलेली आहे. पण ते चोर जर आत्ता चोरी करत असतील तर काय फरक पडेल? राजेश देशपांडे लिखित दिग्दर्शित ही एकांकिका याच प्रश्नाचे उत्तर देते.

    रसिकांनी या एकांकिकांचा आनंद घ्यावा असे आवाहन संस्थेचे प्रमुख राजेश देशपांडे ह्यांनी केले आहे. तेव्हा ९ दमदार एकांकिका पाहण्याची सुवर्णसंधी रसिक प्रेक्षकांनी साधावी व ‘सृजनोत्सव २०२२’ ला मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी.

    Natak Tickets Online Booking
    Rajesh Deshpande Srujan The Creation Srujanotsav
    Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Telegram Reddit Tumblr Email
    Previous Articleछुपे रुस्तम — ऋषिकेश जोशी आणि प्रियदर्शन जाधव यांच्या नव्या नाटकाचा शुभारंभ!
    Next Article कणकवली, कोल्हापूरनंतर आता ‘मुंबईत’ रंगणार तीन दिवसीय परिवर्तन कला महोत्सव!

    Related Posts

    Rajesh Deshpande Ratnagiri Workshop

    प्रसिद्ध नाटककार राजेश देशपांडे ह्यांची रत्नागिरी जिल्ह्यात २ दिवसीय कार्यशाळा

    January 8, 2022

    Leave A Reply Cancel Reply

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

    — जाहिरात —
    Kalnirnay 50 Years
    Social
    • YouTube
    • Facebook
    • Instagram
    • Twitter
    • WhatsApp
    • Telegram
    रंगभूमी.com
    Facebook Twitter Instagram YouTube WhatsApp Telegram RSS
    © 2023 रंगभूमी.com. Powered by iXyr Media.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.