९ फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारी २०२५ – रोज सायं. ६:३० वा.
प्रवेश मूल्य: रोज ₹५००/- फक्त किंवा Festival Pass ₹२०००/- फक्त.
आविष्कारचा ५४ वा वर्धापनदिन आणि अरविंद देशपांडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘आविष्कार’ नाट्यसंस्थेतर्फे यावर्षीचा ३८ वा नाट्यमहोत्सव ९ ते १३ फेब्रुवारीदरम्यान माटुंगा पश्चिम येथील यशवंत नाट्यमंदिरच्या मिनी थिएटरमध्ये, म्हणजेच ‘साळगांवकर प्रायोगिक रंगमंच’ येथे पार पडणार आहे.