अरविंद देशपांडे (३१ मे १९३२ – ३ जानेवारी १९८७) हे एक प्रख्यात भारतीय चित्रपट, नाट्य व दूरदर्शन अभिनेते आणि नाट्य दिग्दर्शक होते. १९७१ मध्ये त्यांनी त्यांच्या पत्नी सुलभा देशपांडे यांच्यासोबत आविष्कार नाट्यगटाची स्थापना केली. आविष्कारचा ५४ वा वर्धापनदिन आणि अरविंद देशपांडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘आविष्कार’ नाट्यसंस्थेतर्फे यावर्षीचा ३८ वा नाट्यमहोत्सव ९ ते १३ फेब्रुवारीदरम्यान माटुंगा पश्चिम येथील यशवंत नाट्यमंदिरच्या मिनी थिएटरमध्ये, म्हणजेच ‘साळगांवकर प्रायोगिक रंगमंच’ येथे पार पडणार आहे.
अलिकडे मराठी भाषेला दिल्या गेलेल्या ‘अभिजात’ भाषेच्या दर्जाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी महोत्सवाचं सूत्र आहे ‘अभिजात मराठी’. मराठी भाषा आणि इतर ज्ञानशाखा या अनुषंगाने ५ दिवस मान्यवरांची व्याख्याने आणि नाट्यप्रयोग असा महोत्सवाचा कार्यक्रम असून तपशील खालीलप्रमाणे:
आविष्कार महोत्सव – Online Ticket Booking
(or Click Here to Book Tickets via WhatsApp)
आविष्कार महोत्सव वेळापत्रक
रविवार, ०९ फेब्रुवारी, २०२५
व्याख्यान
उद्घाटक, वक्ते : प्रा. डॉ. दीपक पवार
विषय : मराठी भाषेचं राजकारण
नाट्यप्रयोग
Theatre Anotomy (पुणे) निर्मित
मूळ नाटक : Myth of Mandigoes
मूळ कविता : देवेंद्र अहिरवार
लेखक, दिग्दर्शक: शंतनु सायली
सोमवार, १० फेब्रुवारी, २०२५
व्याख्यान
दिग्दर्शक, अभिनेत्री प्रतिमा कुलकर्णी
विषय : मराठी कथा/कादंबरी/कवितेची भाषा आणि नाटकाची भाषा, तौलनिक अभ्यास
नाट्यप्रयोग
आसक्त (पुणे) निर्मित ‘व्हाया सावरगाव खुर्द’
मूळ कादंबरी : दिनकर दाभाडे
दिग्दर्शक : सुयोग देशपांडे
मंगळवार, ११ फेब्रुवारी, २०२५
व्याख्यान
प्रा. डॉ. प्रज्ञा दया पवार
विषय : दलित साहित्य – भाषिक योगदान
नाट्यप्रयोग
परिवर्तन (जळगाव) निर्मित ‘नली’
मूळ लेखक : श्रीकांत देशमुख
नाट्यरूपांतर : शंभू पाटील
दिग्दर्शक : योगेश पाटील
बुधवार, १२ फेब्रुवारी, २०२५
व्याख्यान
पत्रकार, लेखक, लोकसाहित्य अभ्यासक डॉ.मुकुंद कुळे
विषय: मौखिक साहित्य आणि मराठी भाषा
नाट्यप्रयोग
रंगभूमी.com आणि Incomplete थिएटर निर्मित ‘वणवा’
मूळ लेखक : दि. बा. मोकाशी
नाट्यरूपांतर, दिग्दर्शक : शिवम पंचभाई
गुरूवार, १३ फेब्रुवारी, २०२५
व्याख्यान
संजीव चांदोरकर
विषय : भाषा आणि अर्थकारण
नाट्यप्रयोग
आविष्कार निर्मित ‘गोळकोंडा डायमंडस’
लेखक : योगेश्वर बेंद्रे
दिग्दर्शक : संदेश दुगजे
प्रवेश मूल्य: रोज रु. ५००/- फक्त
या सर्व दर्जेदार कलाकृतीनचा जास्तीत जास्त संख्येने रसिक प्रेक्षकांनी आस्वाद घ्यावा ही विनंती!