मराठी रंगभूमीवरील अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाणारी महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धा! हे या स्पर्धेचं ३५ वं वर्ष! यंदाही मोठ्या उत्साहात पार पडली. यंदाच्या अंतिम फेरीत स्क्रिप्टीज क्रिएशन्स प्रस्तुत “असेन मी… नसेन मी…” या नाटकाने बाजी मारत रु. ७,५०,०००/- चे प्रथम पारितोषिक पटकावले. ही घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्री. विभीषण चवरे यांनी केली.
या वर्षी स्पर्धेत १० व्यावसायिक नाट्यप्रयोग सादर झाले. ६ मे ते १६ मे २०२५ या कालावधीत श्री शिवाजी नाट्य मंदिर, दादर (प), मुंबई येथे रंगलेल्या या अंतिम फेरीस प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला.
प्रमुख पारितोषिके पुढीलप्रमाणे
प्रमुख नाटकांचे पारितोषिक
- प्रथम पुरस्कार (₹७.५० लाख) – “असेन मी.. नसेन मी…” – स्क्रिप्टीज क्रिएशन्स
- द्वितीय पुरस्कार (₹४.५० लाख) – “वरवरचे वधुवर” – कलाकारखाना आणि शांताई
- तृतीय पुरस्कार (₹३.०० लाख) – “उर्मिलायन” – सुमुख चित्र
विशेष विभागांतील विजेते
दिग्दर्शन
- अमृता सुभाष – “असेन मी.. नसेन मी…” – प्रथम (₹१.५० लाख)
- अद्वैत दादरकर – “शिकायला गेलो एक” – द्वितीय (₹१.०० लाख)
- विराजस कुलकर्णी – “वरवरचे वधुवर” – तृतीय (₹५०,०००)
नाट्यलेखन
- संदेश कुलकर्णी – “असेन मी.. नसेन मी…” – प्रथम (₹१.०० लाख)
- शेखर ढवळीकर – “नकळत सारे घडले” – द्वितीय (₹६०,०००)
- सुनिल हरिश्चंद्र व स्मिता दातार – “उर्मिलायन” – तृतीय (₹४०,०००)
नेपथ्य, प्रकाश योजना, संगीत, वेशभूषा, रंगभूषा अशा तांत्रिक विभागांमध्येही विविध नाटकांनी उत्तम कामगिरी करून पारितोषिके मिळवली.
नेपथ्य
- प्रथम पारितोषिक (₹४०,०००): प्रदीप मुळ्ये – असेन मी… नसेन मी…
- द्वितीय पारितोषिक (₹३०,०००): प्रदीप पाटील – वरवरचे वधुवर
- तृतीय पारितोषिक (₹२०,०००): संदेश बेंद्रे – ज्याची त्याची लव्हस्टोरी
प्रकाश योजना
- प्रथम पारितोषिक (₹४०,०००): प्रदीप मुळ्ये – गोष्ट संयुक्त मानापमानाची
- द्वितीय पारितोषिक (₹३०,०००): शितल तळपदे – मास्टर माईंड
- तृतीय पारितोषिक (₹२०,०००): चेतन ढवळे – उर्मिलायन
संगीत दिग्दर्शन
- प्रथम पारितोषिक (₹४०,०००): निषाद गोलांबरे – वरवरचे वधुवर
- द्वितीय पारितोषिक (₹३०,०००): निनाद म्हैसाळकर – उर्मिलायन
- तृतीय पारितोषिक (₹२०,०००): साकेत कानिटकर – असेन मी… नसेन मी…
वेशभूषा
- प्रथम पारितोषिक (₹४०,०००): मयुरा रानडे – गोष्ट संयुक्त मानापमानाची
- द्वितीय पारितोषिक (₹३०,०००): मंगल केंकरे – सूर्याची पिल्ले
- तृतीय पारितोषिक (₹२०,०००): सुनिल हरिश्चंद्र – उर्मिलायन
रंगभूषा
- प्रथम पारितोषिक (₹४०,०००): उदयराज तांगडी – उर्मिलायन
- द्वितीय पारितोषिक (₹३०,०००): राजेश परब – गोष्ट संयुक्त मानापमानाची
- तृतीय पारितोषिक (₹२०,०००): सुरेंद्र चव्हाण व कौशल तांबे – असेन मी… नसेन मी…
उत्कृष्ट अभिनयासाठी रौप्यपदक व ₹५०,०००/-
पुरुष कलाकार — प्रशांत दामले, ऋषिकेश शेलार, आनंद इंगळे, सुव्रत जोशी, ओंकार राऊत
स्त्री कलाकार — नीना कुलकर्णी, शुभांगी गोखले, निहारिका राजदत्त, सखी गोखले, शर्मिला शिंदे
परीक्षक मंडळ
विजय गोखले, संजय डहाळे, मिलिंद शिंदे, आशा शेलार, लीना भागवत
समन्वयक
समन्वयक म्हणून राकेश तळगावकर यांनी जबाबदारी सांभाळली.
सांस्कृतिक कार्य विभागाचे गौरवोद्गार
सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार आणि अपर मुख्य सचिव श्री. विकास खारगे यांनी विजेत्या नाट्यसंस्था व कलाकारांचे अभिनंदन करत, मराठी नाटकाचे हे वैभव अबाधित राहावे, अशी भावना व्यक्त केली. तसेच सर्व सहभागी संस्थांचे व कलाकारांचे विशेष कौतुकही त्यांनी केले.
व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत सहभागी झालेल्या सर्व संस्था आणि कलाकार यांनी मेहनत घेऊन सादर केलेल्या सर्व दर्जेदार नाटकांना प्रेक्षकांची भरघोस उपस्थिती होती. भविष्यातही नाट्यनिर्माते व कलाकारांनी सर्वोत्तम कामगिरी करावी, अशी अपेक्षा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी व्यक्त केलेली आहे.
या स्पर्धेमुळे मराठी रंगभूमीवर नवनवीन प्रयोगशील आणि दर्जेदार नाटके समोर येत आहेत. “असेन मी.. नसेन मी…” या नाटकाने सर्वच क्षेत्रात आपली छाप सोडत, स्पर्धेतील सर्वोच्च गौरव मिळवला. ही स्पर्धा मराठी नाट्यसृष्टीसाठी एक महत्त्वाचा प्रेरणास्त्रोत ठरली आहे.

![महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा-२०२५’ चे आयोजन — राज्य शासनाच्या वतीने ऐतिहासिक पाऊल! [Updated] Maharashtra Govt. Ekankika Competition 2025](https://www.rangabhoomi.com/wp-content/uploads/2025/09/mahanatyaspardha-ekankika-spardha-cover-2-450x253.jpg)

