Author: साक्षी जाधव

मी साक्षी जाधव. मी पत्रकारतेच्या पदवीचे शिक्षण घेत आहे. रंगभूमीसाठी काम करणे माझी आवड आहे. नाटकांना प्रकाशयोजना करणे आणि नवनवीन गोष्टी शोधून काढण्यात खूप उत्साह वाटतो.

भारताला नाट्यपरंपरेचा समृद्ध असा वारसा लाभलेला आहे. हा वारसा जोपासत, पुढील पिढीकडे सशक्तपणे संक्रमित करणे हे आपले कर्तव्य आहे. भविष्यातील पिढ्यांना उत्कृष्ट दर्जाचे नाट्य शिक्षण मिळावे यासाठी अनेक शिक्षणसंस्था कार्यरत आहेत. देशभरातील कानाकोपऱ्यात नवनवीन कलाकार उमलत असतात. परंतु, संधींची कमतरता आणि वाढती स्पर्धा या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी अभिनयाचे शास्त्रोक्त शिक्षण घेणे महत्त्वाचे आहे. देशभरातून, प्रसिद्धी व पैसा कमवण्याचे स्वप्न घेउन मुंबईत येणाऱ्या कलाकारांना असे प्रगल्भ शिक्षण मुंबई शहरातही मिळाले तर? होय, कारण क्रेसेंट थिएटर घेऊन आलंय ‘मुंबई स्कूल ऑफ ड्रामा’! Crescent Theatre’s Mumbai School of Drama नाटकांसाठी आणि रंगकर्मींसाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देणे, या उद्देशाने क्रेसेंट थिएटर २०२१ सालापासून रंगभूमीसाठी…

Read More

मनोरंजन क्षेत्रात कलाकारांची फळी येते आणि जाते. वर्षानुवर्षे चुकत-शिकत कलाकारांच्या फळ्या तयार होतात. एक कलाकार म्हणून अस्तित्व निर्माण करताना वेगवेगळ्या भागांचा अभ्यास करणारी शैली कलाकाराच्या वैयक्तिक जीवनातही अंगवळणी पडते. अशीच एक नाट्यसृष्टी, सिनेसृष्टी, मालिका आणि वेब सिरीजमधून उभारी घेणारी तरुणी चंद्रलेखा जोशी. हल्लीच पहिला भाग पूर्णत्वास आलेली ‘तुमची मुलगी काय करते’ या मालिकेत पी.एस.आय. जमदाडेची भूमिका साकारणारी तसेच मल्हार आणि दिशा निर्मित ‘काळी राणी’ या व्यावसायिक नाटकात महत्वाचे पात्र साकारणारी चंद्रलेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. चंद्रलेखा मूळची डोंबिवली विभागातील आहे. बाबा (विवेक जोशी) नाट्य क्षेत्रात असल्यामुळे नाटकाची ओढ होती. तसेच लहान वयात अनेक नाटकांमध्ये महत्वाच्या भूमिका बजावत अभिनय क्षेत्रात पदार्पण…

Read More

|| जीवेची जीवलगे माझे कृष्णाई कान्हाई सांवळे डोळसे करुणा येऊ दे कांही || अशा अनेक अभंगातून जीवनाचे सार मांडणाऱ्या वारकरी संप्रदायातील महत्वाच्या संत कान्होपात्रा. कान्होपात्रेप्रमाणे वारीतील प्रत्येक वारकऱ्यांचा प्रवास एखाद्या जीवन प्रवासाप्रमाणे असतो. जीवनात समाधान प्राप्तीच्या ओढीने ही वारी सुरू होते. या वारीत कोणाची साथ महत्वाची याचे भान हवे तसेच समाधान आणि कर्माचे समतोल राखणे गरजेचे आहे. असाच मानवाच्या जीवनशैलीवर आधारित स्वेवन स्टुडिओज निर्मित जन्मवारी या दोन अंकी नाटकाने जय जय राम कृष्ण हरी म्हणत रंगभूमीवर पदार्पण केले आहे. जन्माच्या प्रवासात स्वतःचे समाधानी अस्तित्व शोधण्याची वारी दर्शविणाऱ्या ‘जन्मवारी’ या नाटकात दोन काळ दर्शवले आहे. नाटक १५ वे शतक आणि वर्ष…

Read More

मनोरंजन क्षेत्रात प्रतिभावान कलाकार म्हणून ओळख मिळवण्यासाठी अनेक पैलूंचा अभ्यास करणे गरजेचे असते. अशाच एका अभिनेत्री श्रद्धा हांडेने अलबत्या गलबत्या या नाटकामध्ये कन्याराजेची मुख्य भूमिका साकारत असताना थँक्स डियर नाटकाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. श्रध्दाला बालपणापासूनच अभिनयाची आवड होती टीव्हीवरील कलाकारांना पाहून अभिनय क्षेत्रात जाण्याची इच्छा निर्माण झाली. परंतु सुरुवातीला श्रद्धाने शिक्षणाला प्राधान्य दिले. उत्तमगुणांनी बारावी पास होऊन बिर्ला कॉलेजमध्ये मॅनेजमेंट क्षेत्रात पदवीधर झाली. श्रद्धा शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असल्यामुळे अनेक नोकरीच्या संधी चालून येत होत्या परंतु अभिनय क्षेत्रातील आवड कायम ठेवत मंथन नाट्यशाळेतून प्रशिक्षण घेत अभिनयाचा प्रवास सुरू केला. सुरुवातीच्या काळात कल्याणला राहत असताना कॉलेज आणि नाटकाच्या प्रशिक्षणात तीन वर्ष…

Read More

मराठी रंगभूमीचे विस्तृत साम्राज्य जोपासणे ही सर्व रंगकर्मींची जबाबदारी आहे. या साम्राज्यात व्यवसायिक आणि प्रायोगिक नाटकांना प्राधान्य दिले असले तरी एकांकिका विश्व ही प्रथम पायरी असते. या विश्वात नाट्यकर्मींना संधी देण्यासाठी नवनवीन एकांकिका स्पर्धा आयोजित केल्या जातात. गेले २ वर्ष अशीच एक स्पर्धा लोकप्रिय होत आहे. चिंतामणी कलामंच आयोजित राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा ‘खासदार करंडक २०२३’ तसेच ‘नवरस राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा २०२३’. यंदाचे वर्ष खासदार करंडक चे तिसरे तर ‘नवरस’ चे दुसरे वर्ष आहे. यावर्षी स्पर्धेची प्राथमिक फेरी होणार नसून लाईट-शो म्हणजेच अंतिम फेरी रंगीत प्रयोग होणार आहे. चिंतामणी कलामंच २०१८ साली ‘प्रथमेश पिंगळे’ यांनी सूरू केले. प्रथमेश पिंगळे हे…

Read More

मुंबईतील प्रसिद्ध एकांकिका स्पर्धांपैकी या ही स्पर्धेचे नाव आदराने घेतले जाते. पाण्याच्या समस्या दूर करून ‘पाणीवाली बाई’ अशी ओळख निर्माण करणाऱ्या एक समाजसेविका आणि गोरेगावच्या माजी आमदार माननीय मृणालताई गोरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गेली ४ वर्षे, मृणालताई नाट्यकरंडक ही खुली राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा आयोजित केली जाते. यंदाचे स्पर्धेचे ५ वे वर्ष असून या स्पर्धेचे आयोजन सोहम थिएटर्स अंतर्गत होणार आहे. सुदेश सावंत हे स्पर्धेचे आयोजन करत असून संतोष वाडेकर आणि गिरीश सावंत हे समन्वयक आहेत. प्रसिद्ध अभिनेते सुनील बर्वे हे या स्पर्धेचे मार्गदर्शन करणार असून प्रमोद शेलार आणि युवराज मोहिते हे सल्लागार आहेत. अनेक वर्षांपासून या स्पर्धेला जोरदार प्रतिसाद मिळत आहे.…

Read More

नाटकांमार्फत रंगभूमीवर अनेक समाज प्रबोधनात्मक विषयांची मांडणी केली जाते. राजकीय, सामाजिक आणि वैयक्तिक विषयांवर भाष्य केले जाते. दोन नेत्यांमधील वाद असो किंवा दोन घरातील वाद, तो सामाजिक विषयच समजला जात. पण, दोन लहान मुलांमध्ये झालेले वाद समाजिक विषयांचे कशाप्रकारे दार ठोठावते हे मांडण्यासाठी राखाडी स्टुडिओ व अमेय गोसावी निर्मित उच्छाद हे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. नाटकाचे शुभारंभाचे प्रयोग १२ व १३ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ७.३० वाजता द बेस, एरंडवणे, पुणे येथे होणार आहेत. ‘उच्छाद’ हे नाटक यास्मिना रेझा यांच्या ‘गॉड ऑफ कार्नेज’ या प्रसिद्ध फ्रेंच नाटकाचा निरंजन पेडणेकर यांनी केलेला मराठी अनुवाद आहे. मुलांच्या खेळीच्या वातावरणात एका मुलाकडून…

Read More

एकांकिका स्पर्धांना मिळणारा प्रतिसाद हळूहळू वाढत चालला आहे. अशीच एक मोठा प्रतिसाद मिळवणारी स्पर्धा म्हणजे कमल वसंत जाधव करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा. यंदाच्या वर्षी या स्पर्धेचे आयोजन छात्रशक्ती आणि तांडव थिएटरमधील तरुण मुलांनी नव्या ऊर्जेने केले आहे. हे या स्पर्धेचे ४ थे वर्ष असून दरवर्षी जवळपास १०० संघ स्पर्धक असणारी ही नाट्यस्पर्धा. या स्पर्धेची सुरुवात डॉ. जितेंद्र वसंत जाधव यांनी त्यांच्या आई कमल वसंत जाधव यांच्या नावाने केली. “मी एक रंगकर्मी आहे. अनेक वर्ष अभिनेते, दिग्दर्शक म्हणून रंगभूमीची सेवा केली. वैद्यकीय जीवनात रुळत असताना मला पुन्हा रंगभूमीची ओढ निर्माण झाली आणि म्हणून नव्या रंगकर्मींसाठी एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्याचे ठरवले. रंगभूमीकडून…

Read More

“लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया, झळाळती कोटी ज्योती या हां हां हां…” या गाण्यातील या ओळीप्रमाणे महाराष्ट्रातील नाटय संस्कृती तेजोमय आहे. त्यातील अनेक कलाकार तारे ही नाटकाची दुनिया उजाळतात. प्रत्येक कलाकाराची नाटकाची आवड जपण्यासाठी अनेक संस्था पुढाकार घेत कलाकारांमध्ये ज्योत प्रज्वलित करून नाट्य संस्कृतीचा वारसा चालवतात. पण हा वारसा चालू राहण्यासाठी तो नवीन पिढ्यांमध्ये रुजवणे देखील महत्वाचे असते. यासाठी अनेक बाल-कलाकारांची कला क्षेत्रात जडणघडण होते. अशाच बाल कलाकारांसाठी सातत्याने उपक्रम राबविणारी नागपूरमधील बालरंगभूमी परिषद. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी या परिषदेने स्वर्गीय पुरुषोत्तम दारव्हेकर स्मृती प्रित्यर्थ बालनाट्य लेखन स्पर्धा आयोजित केली आहे. बालनाट्य लेखन स्पर्धा बालरंगभूमी परिषद २०१८ पासून नाट्य लेखन…

Read More

मराठी नाट्य सृष्टीला पु. ल. देशपांडे, प्रा. लक्ष्मण देशपांडे, मधुकर टिल्लू, सदानंद चांदेकर, सुमन धर्माधिकारी, सुषमा देशपांडे असे दिग्गज कलावंत लाभले, ज्यांनी एकपात्री नाट्यकलेला उंची मिळवून दिली. ताकदीचा कलाकार ही दाद मिळवण्यासाठी अनेक वर्ष प्रामाणिक अभिनयाची आवड जपावी लागते, कष्ट घ्यावे लागतात आणि सध्याच्या युवा कलाकारांचा अभिनय क्षेत्रात रस निर्माण होत आहे. अशा कलाकारांसाठी बालगंधर्व कला अकादमी परिवार आयोजित करत आहे राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा. बालगंधर्व कला अकादमी अनेक वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या बालगंधर्व कला अकादमीने अनेक कलाकार घडवले. या अकादमीमार्फत थिएटर, दूरदर्शन याबद्दल शिक्षण दिले जाते. तसेच, अभिनय, नृत्य अशा अनेक कलागुणांना जपले जाते. कलाकारांसाठी अनेक कार्यशाळा घेण्यात येतात. यावर्षी…

Read More

रंगभूमीने आजवर कोणताही मतभेद न करता प्रामाणिक काम करणाऱ्यांना उंची गाठण्यास मदत केली आहे. अशाच एका संस्थेने सातत्याने रंगमंचाची सेवा करत पुन्हा एका नव्या नाटकाची निर्मिती केली. १७ आणि १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.०० वाजता आसक्त कलामंच, पुणे प्रस्तूत करत आहे दिनकर दाभाडे यांच्या कादंबरीवर आधारित ‘व्हाया सावरगाव खुर्द’. व्हाया सावरगाव खुर्द (Via Savargaon Khurd) नाटकाला ग्रामपंचयातीच्या निवडणूकीची पार्श्वभूमी आहे. दोन राजकीय गटातील सत्ता संघर्ष नाटकाचा केंद्रबिंदू आहे. ग्रामपंचयातीच्या निवडणूका या एका विषयावर सगळी पात्र एकमेकांशी बांधली गेली आहेत. ‘व्हाया सावरगाव खुर्द’ ह्या कादंबरीतील १९ स्वगतांचा हा एक कोलाज आहे. पात्रांच्या मनसोक्त आणि बेधडक बोलण्यातून नाटकाचं कथानक पुढे पुढे सरकत…

Read More

नाटक हे कधीच कार्यक्रम म्हणून न पाहता एक प्रयोग म्हणून पाहिले जाते कारण कार्यक्रम एकदाच होतात. त्यात काही फारसे बदल होत नाही पण प्रयोग हे अनेक होतात आणि त्यात सातत्याने बदल होत असतात. असेच ७ वर्षांपासून ‘नाट्य प्रयोग’ आपल्यासाठी एकपात्री आणि द्विपात्री अभिनय स्पर्धा भरवते तर यंदाच्या वर्षी सह आयोजन आमची वसई यांनी केले आहे. एकपात्री अभिनय स्पर्धेची फिरता चषक पद्धत असून यंदाच्या वर्षी या स्पर्धेची प्रवेश करण्याची अंतिम तारीख २५ सप्टेंबर आहे. रंगमंचावर अभिनयाचा कस, सर्वांना खेळवून ठेवण्याची वृत्ती या स्पर्धेत महत्वाची ठरेल. स्पर्धेसाठी आजपर्यंत प्रमोद शेलार, संकेत तांडेल, मनीष सोपारकर, दिनेश शिंदे, विनोद देहरे रमाकांत वाकचौरे असे उत्तम…

Read More