मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीने जागतिक रंगभूमीला दिलेली देणगी आहे, असे मानले जाते. विष्णूदास भावे यांनी मराठी रंगभूमीचा श्रीगणेशा केला तर संगीत नाटकाचा लौकिक अर्थाने प्रारंभ अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या संगीत शाकुंतल (१८८०) या नाटकाने झाला. गायनाचार्य भास्करबुवा बखले, गोविंदराव टेंबे, मास्टर कृष्णराव, पं. राम मराठे, पं. जितेंद्र अभिषेकी, छोटा गंधर्व, केशवराव भोळे असे दिग्गज संगीतरचनाकार (संगीतकार) लाभल्याने मराठी नाट्यसंगीत समृद्ध झाले. अशा आपल्या संस्कृतीचा वारसा पुढे वृद्धिंगत करण्यासाठी बालगंधर्व कला अकादमी परिवार आयोजित करत आहे राज्यस्तरीय संगीत एकांकिका स्पर्धा. हे या स्पर्धेचे पहिलेच वर्ष. ‘रंगभूमीवरील नवे पर्व, लवकरच संगीत बालगंधर्व’ ही संकल्पना माननीय श्री. किशोर कुमार यांनी संपूर्ण महाराष्ट्रासाठी…
Author: साक्षी जाधव
कोरोना महामारीनंतर पुन्हा आंतरमहाविद्यालयीन नाट्य स्पर्धेला सुरुवात झाली आहे. हिंदी आणि उर्दू भाषेची नाटकं सादर करण्यासाठी मानाची मानली जाणारी मोठी स्पर्धा म्हणजे इप्टा (Indian People’s Theatre Association) संस्थेतर्फे आयोजित आंतरमहाविद्यालयीन नाट्य स्पर्धा (Inter Collegiate Drama Competition – ICDC). यावर्षी या स्पर्धेचे ४९ वे वर्ष आहे व ते जोमाने सादर करण्याची विद्यार्थ्यांमध्ये तयारी दिसत आहे. ICDC 2022 ची प्राथमिक फेरी १२, १३ आणि १४ सप्टेंबर रोजी होणार असून अंतिम फेरी २० सप्टेंबरला होईल. प्रवेश करण्याची अंतिम तारीख ५ सप्टेंबर आहे. IPTA Mumbai इंडियन पीपल्स थिएटर असोसिशनची स्थापना मुंबईमध्ये २५ मे १९४३ रोजी मारवारी शाळेत झाली. स्वातंत्र्य पूर्वीच्या काळात रंगभूमीसाठी काम करणारी…
महाराष्ट्र सरकार १९६१ पासून राज्यातील सर्व कलांचे जतन, संवर्धन व त्यांमध्ये संशोधन करण्यासाठी नाट्य, साहित्य, नृत्य, संगीत, लोककला व चित्रपट या कलांना समृद्ध आणि सक्षम करण्याचे व कलावंतांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यासपीठ निर्माण करून सन्मान देण्याचे कार्य करीत आहे. यंदाच्या वर्षी महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेचे ६१ वे वर्ष आहे. नवीन वर्ष निमित्ताने नवीन नियमावली स्पर्धेसाठी तयार करण्यात आली आहे. राज्य नाट्य स्पर्धा – नियमावली व प्रवेश अर्ज ६१ वी राज्य नाट्य स्पर्धा २०२३ – माहिती व नियमावली (Rajya Natya Spardha Details) दरवर्षी अनेक नाट्य संस्था राज्य नाट्य स्पर्धेची वाट पाहत असतात. कोरोना काळातही या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रात…
सध्या रंगभूमीवर बरीच नाटकं धुमाकूळ घालत आहेत. काही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत तर काहींना प्रेक्षकांच्या टीकांचे वार सहन करावे लागत आहेत. प्रेक्षकांसाठी खुशखबर म्हणजे या यादीत लवकरच अजून काही नाटकं सामील होणार आहेत. व्यावसायिक रंगभूमीवर सातत्याने नवनवीन लेखन दिग्दर्शन पहायला मिळते. यंदाच्या वर्षीही काही नवीन तर काही गाजलेली जुनी नाटकं पुन्हा नव्याने व्यावसायिक रंगभूमीवर सादर होणार आहेत. इब्लिस, चारचौघी, करायचं प्रेम तर मनापासून, संभ्रम ही नाटकं लवकरच रंगभूमीवर दिसणार आहेत. इब्लिस अद्वैत थिएटरला यावर्षी १६ वर्ष पूर्ण झाली आणि लवकरच इब्लिस या नाटकाचे नव्याने प्रयोग होणार आहेत. या नाटकाचे लेखन दिग्दर्शन मिलिंद शिंत्रे यांनी केले असून निर्माते राहुल भंडारे आहेत.…
गूढकथांचे दर्जेदार लेखन करणारे लेखक आणि नाटककार रत्नाकर मतकरी. नाटक, एकांकिका, बालनाट्य, कथा, गूढकथा, कादंबरी, ललित लेख, वैचारिक साहित्य प्रकारात लेखन करणारे साहित्यिक, रंगकर्मी, दिग्दर्शक, निर्माता आणि चित्रकार म्हणजे रत्नाकर मतकरी. रत्नाकर मतकरींनी बालनाट्य प्रकाराची निर्मिती केली तसेच झोपडपट्टीतील बालकलाकारांना घडवले. अनेक एकांकिका, बावीस नाटकं, २३ कथासंग्रह, तीन कादंबऱ्या, १२ लेखसंग्रह असा साहित्यांचा मोठा वारसा देऊ करणारे रत्नाकर मतकरी. Ratnakar Karandak 2022 Competition रत्नाकर मतकरी यांच्या गूढकथा वाचकांना अनेक रहस्यांचा प्रवास घडवतात. अशाच रहस्यमय गूढकथेवर आधारित एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली. ओम आर्ट्स आयोजित रत्नाकर करंडक २०२२ वर्ष पहिले. या स्पर्धेची मूळ संकल्पना भूषण देसाई यांची आहे. १७ जून ते…
मराठी नाट्यसृष्टीतील प्रत्येक नाटकाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले, सामाजिक परिस्थितीची जाणीव करून दिली. असेच एक प्रसिद्ध नाटक ‘अधांतर’ पुन्हा रंगभूमीवर दिसणार आहे. यंदाच्या वर्षी या नाटकाला २५ वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून या निमित्ताने अधांतरचे २५ प्रयोग होणार आहेत. या रौप्य महोत्सवाची निर्मिती प्रयोगशाळा करत असून नाटकमंडळी याचे सादरीकरण करणार आहेत. जयंत पवार लिखित आणि मंगेश कदम यांनी दिग्दर्शन केलेल्या नाटकातील जुने कलाकार पुन्हा पात्र साकारताना दिसणार? की नवीन कलाकार सहभागी होणार? हे लवकरच स्पष्ट होणार आहे. जयंत पवार जयंत पवार हे एक पत्रकार, मराठी नाटककार आणि नाट्यसमीक्षक होते. २९ ऑगस्ट, २०२१ रोजी दीर्घकालीन आजारामुळे त्यांचे दु:खद निधन झाले. पण त्यांनी…
कलाकार रंगमंचावर एकटा असून प्रेक्षकांना खिळवून ठेवत असेल तर तो ताकदीचा कलाकार मानला जातो. एकपात्री किंवा द्विपात्री नाट्य सादर करताना कलाकाराचा लक्षवेधी अभिनय असावा लागतो. अशाच कलाकारांच्या अभिनयाची कसोटी पाहण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, पनवेल आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा तसेच पुरस्कृत भाजपा सांस्कृतिक सेल-उत्तर रायगड आयोजित करत आहेत ‘एकपात्री व द्विपात्री अभिनय स्पर्धा’ वर्ष तिसरे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, पनवेल हे दरवर्षी वेगवेगळ्या नाट्यस्पर्धांचे आयोजन करतात. ‘रंगमंच आमचा कलाविष्कार तुमचा’ अस म्हणून अटल करंडक एकांकिका स्पर्धा, मायबोली एकपात्री अभिनय स्पर्धा, एकपात्री आणि…
रंगभूमीवर अनेक नाटक अजरामर झाली. अनेक नाटक त्यातील कलाकार महाराष्ट्रात सर्वाधिक प्रयोग करून लोकांच्या मनात रुजू झाले. असेच एक बहारदार विनोदी नाटक म्हणजे सही रे सही. या नाटकाने अनेक कलाकार घडवले. सही रे सही या नाटकाचा पहिला प्रयोग १५ ऑगस्ट २००२ ला झाला आणि यंदाच्या वर्षी हे नाटक २० वर्ष पूर्ण करत आहे. सही रे सही चा प्रवास लता नार्वेकर यांच्या श्रीचिंतमणी निर्मित केदार शिंदे लिखित आणि दिग्दर्शित ‘ सही रे सही’ नाटकाचा पहिला प्रयोग १५ ऑगस्ट २००२ रोजी झाला आणि सही रे सहीला सुरुवात झाली. हे नाटक उभे राहिले ते भरत, अंकुश आणि केदार शिंदे यांच्या मैत्रीमुळे. एका सही…
राज्यस्तरीय प्रायोगिक रंगभूमी सातत्याने नवी उमेद घेऊन प्रेक्षकांसाठी मेजवानी घेऊन येते. अनेक प्रयत्नातून नवीन विषय रंगमंचावर आणले जातात आणि प्रेक्षक मायबापकडून भरभरून प्रतिसाद मिळतो. असेच एक अनोखे नाटक शिव रणभूमी प्रशांत प्रतिष्ठान निर्मित माळरानावर फुललेलं नाटक ‘आय. एम. पुंगळ्या शारुक्या आगीमहुळ’ हे प्रेक्षकपसंती मिळवत आहे. फासे पारधी समाजावर आधारित या नाटकाचे कथानक एका जोडप्याच्या आयुष्यावर लिहिले आहे. प्रेक्षक मागणीनुसार या नाटकाचे पुन्हा प्रयोग होणार आहेत. मंगळवार २ ऑगस्ट सायं. ४.३० वाजता गडकरी रंगायतन, ठाणे मंगळवार १६ ऑगस्ट सायं. ४.०० वाजता विष्णुदास भावे, वाशी आय. एम. पुंगळ्या शारूक्या आगीमहुळ हे नाटक म्हणजे मोकळ्या माळरानावर संसार थाटलेल्या जोडप्याची कथा आहे. फासेपारधी समाजातील…
एखाद्या कादंबरीवर आधारित नाटक करताना अवाढव्य कथेला कमीत कमी वेळात मांडताना लेखकाचे कस लागतात आणि नाटकाची संहिता लिहताना कथेचा आणि पात्रांचा पूर्ण अभ्यास करावा लागतो. या दोन्ही गोष्टींचा विचार भद्रकाली प्रोडक्शन्सने केला. भद्रकाली प्रोडक्शन्स घेऊन येत आहेत दृष्टी आणि कृष्णकिनारा अशी दोन कादंबरीवर आधारित नाटके तसेच भद्रकाली प्रोडक्शन्स निर्मित संगीत देवबाभळी नाटकाचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. भद्रकाली प्रोडक्शन्स यंदाच्या वर्षी या संस्थेला ४० वर्ष पूर्ण झाली. ‘चाकरमानी’ या नाटकापासून सुरुवात केली आणि दरवर्षी वेगवेगळ्या विषयावर भाष्य करणारे नाटक करत या वर्षी नवीन नाटकांची निर्मिती करण्यात येणार आहे पण ती नाटके कोणती असणार हे अजून गुपित असून याबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता दिसून येते.…
मुले आई-वडिलांची म्हातारेपणातील काठी असतात तसेच आई-वडील मुलांच्या तरुण वयातील आधारस्तंभ. तरुण पिढीला नवनवीन संधी मिळतात. भविष्यात ते त्यांचे मार्ग स्वतःच निवडून अनेक छंद, कला जोपासत स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करतात. अनेक पालकांना वाटत असते की आपल्या पाल्यांनी यश गाठावे, आर्थिकदृष्ट्या कणखर व्हावे यासाठी व्यावसायिक क्षेत्र जसे डॉक्टर, इंजिनिअर, वकील, सी.ए, इत्यादी. निवडून त्यातच करिअर करावे. पण जेव्हा मुलांची इच्छा आणि पालकांची अपेक्षा विरुद्ध असतात तेव्हा पालक आणि पाल्यांमध्ये मतभेद निर्माण होऊ लागतात. पालकांनी मुलांना कला जोपासून आवडत्या क्षेत्रात यश मिळवण्यासाठी सहकार्य करावे, असा संदेश देणारे ‘जोकर’ सादर करीत आहे ‘अनुमित नाट्य संस्था’. जोकर ‘जोकर’ ही एकांकिका २०१९ या…
अनेक नाटकांचे महोत्सव सुरू असताना अभिजात नाट्य संस्था प्रस्तुत करत आहे आगळा-वेगळा महोत्सव. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नाट्य व संगीत क्षेत्रातील विविध मान्यवर दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत रंगणार आहे २४ तासांचा महामहोत्सव! ‘अभिजात’ नाट्यसंस्था या महोत्सवाचे आयोजन करत असून हा महोत्सव दोन सत्रात होणार आहे. अभिजात नाट्य महोत्सव — महामहोत्सवाचे वेळापत्रक अभिजात नाट्य महोत्सव — महामहोत्सवात सादर होणारी नाटकं या महोत्सवात ‘टिळक आणि आगरकर’ व ‘होय मी सावरकर बोलतोय!’ यांचे सादरीकरण होणार आहे. या दोन ऐतिहासिक नाटकांच्यामध्ये मनोरंजन म्हणून ‘वासूची सासू’ हे विनोदी नाटक सादर करण्यात येणार आहे. हा महोत्सव म्हणजे प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी कलाकारांची कसोटी असणार आहे. टिळक आणि आगरकर लोकमान्य बाळ गंगाधर…