Author: साक्षी जाधव

मी साक्षी जाधव. मी पत्रकारतेच्या पदवीचे शिक्षण घेत आहे. रंगभूमीसाठी काम करणे माझी आवड आहे. नाटकांना प्रकाशयोजना करणे आणि नवनवीन गोष्टी शोधून काढण्यात खूप उत्साह वाटतो.

कलेचा आधारस्तंभ म्हणजे रंगमंच. सूचक प्रकाशयोजनेत डोळ्यासमोर घडणाऱ्या गोष्टी प्रेक्षकांच्या मनाला भुरळ पाडतात. पण नाटक ही अशी कला आहे जी पाहताना जेवढी गुंतवून ठेवते तेवढीच ऐकताना विलीन करून घेते. ‘एका अंध प्रेक्षकालासुद्धा नाटकाचा आस्वाद घेता आला पाहिजे’, असं म्हणतात. नाटकाच्या सादरीकरणासह महत्वाची असते संहिता. संहितेत प्रत्येक पात्र वेगळे असते आणि प्रत्येक पात्राची गोष्ट असते. संहिता किंवा गोष्ट ऐकताना आपल्यासमोर उभे राहणारे दृश्य हे आपण केलेले दिग्दर्शन असते. आपण आपल्या रोजच्या जीवनाशी कथेचा संबंध जोडण्यास सुरुवात करतो. अशीच उत्तम संहिता नाटकाची शक्ती असते. संहितेचे वाचन जेवढे रम्यक तेवढेच आपण कथेत हरवले जातो. कथा वाचनाला कलेचा दर्जा लाभल्यामुळे दरवर्षप्रमाणेच या वर्षी iapar…

Read More

विश्वात घडणाऱ्या अनेक घटना आणि घडामोडींचा बुद्धिनिष्ठ पद्धतीने केला जाणारा अभ्यास म्हणजे विज्ञान. मुंबईमधील मराठी विज्ञान परिषद प्रामुख्याने विज्ञानाचा मराठी भाषेतून प्रसार करण्यासाठी, विज्ञानाचे जीवनात महत्व वाढविण्यासाठी आणि वैज्ञानिकदृष्ट्या प्रगती करण्याच्या उद्देशाने वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. कार्यशाळा घेणे, अभ्यासक्रम घेणे, शिष्यवृत्ती योजना देणे, अनेक स्पर्धा आणि कार्यक्रमांचे आयोजन करणे, त्यामार्फत अनेक पुरस्कार आणि पारितोषिके देणे असे अनेक उपक्रम राबविले जातात. २०१५ पासून मराठी विज्ञान परिषद राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा आयोजित करत आहेत. यंदाच्या वर्षीसुद्धा ही स्पर्धा ‘शैक्षणिक’ म्हणजेच इयत्ता आठवी ते बारावी आणि ‘खुल्या’ अशा दोन गटांत होणार आहे. स्पर्धेच्या अटी कथेमध्ये वैज्ञानिकाने केलेले संशोधन, त्यामध्ये आलेल्या अडचणी यांवर विशेष भर…

Read More

नवरा आणि बायकोचे नाते म्हंटले की प्रेम, आपुलकी, राग, रुसवा, विश्वास अशा अनेक भावनांचा ताळमेळ असतो. असेच एक रंगभूमीवर गाजलेले जोडपे गौरव कुलकर्णी आणि आदिती कुलकर्णी. ‘तू म्हणशील तसं’ नाटकातील मिस्टर आणि मिसेस कुलकर्णी यांच्या नात्याची चर्चा प्रेक्षकांमध्ये दिसते. या नाटकात, दिलखुलास जगणारा गौरव आणि नेमकेपणाने जगणारी आदिती यांचे प्रोफेशनल आणि वैयक्तिक आयुष्यात उडणारे खटके आणि त्यानंतर होणारा गोड शेवट आनंददायी पद्धतीने मांडले आहे. आधुनिक युगातील जोडप्यांवर आणि त्यांच्या नात्यातील चढ-उतारांवर भाष्य करणारी अनेक नाटकं आहेत, परंतु, या नाटकाने स्वत:चे वेगळेपण जपत प्रयोगांची यशस्वी घोडदौड सुरू ठेवली आहे. खुशखबर अशी की, गौरी प्रशांत दामले निर्मित, पुणे टॉकीज प्रस्तुत, संकर्षण कऱ्हाडे लिखित…

Read More

‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेतून घराघरात पोहचल्यानंतर ‘शी’ वेबसिरीजमध्ये काम केले आणि आता ‘अनन्या’ चित्रपटात दिसणारा लाडका अभिनेता सुव्रत जोशी. या अभिनेत्याने तरुण नाट्य कलावंतांसाठी आणि अभिनय क्षेत्रात रस असलेल्या मुलांसाठी ‘अभिनयासाठी आजीवन साधन’ अशी कार्यशाळा म्हणजेच वर्कशॉप सुरु केले आहे. या कार्यशाळेत २९ जून ते ४ जुलैपर्यंत नवीन कलाकार घडविण्यात येणार आहेत. या ६ दिवसांत कार्यशाळेची वेळ सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे आणि या कार्यशाळेची फी ६०००/- रुपये आकारण्यात आली आहे. या कार्यशाळेत आवाज, वाणी, शरीर यांचा उत्तम वापर आणि त्यावरील नियंत्रणाबद्दल शिकवण्यात येणार आहे. भावनांवर आणि श्वासावर प्रभुत्व मिळवणे आणि अभिनेता बनण्याच्या प्रवासात उपयोगी ठरणारी…

Read More