सालाबादप्रमाणे यंदाही एनसीपीएचा ‘प्रतिबिंब मराठी नाट्य उत्सव’ मे महिन्यात होणार आहे. २२ मे ते २५ मे या चार दिवसांच्या सोहळ्यात उत्तमोत्तम नाटकं बघायला मिळणार आहेतच. त्यासोबत, अभिनय व कथालेखनाच्या कार्यशाळाही घेतल्या जाणार आहेत. ज्यात मराठी रंगभूमीशी संबंधित अशा जाणकारांशी सुसंवाद साधण्याची संधी आपल्याला मिळेल. रसिक प्रेक्षक या नात्याने आपण या महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या नाट्यउत्सवात सहभागी होऊन नाट्यकलेला उत्स्फूर्त दाद द्यावी.
या उत्सवात आज लोकप्रिय असलेली व्यावसायिक नाटकं तसेच अनेक तरुण कलावंतांच्या प्रयोगशील कलाकृती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आपल्या प्रोत्साहनामुळे लोकप्रिय कलावंताना वाहवा मिळेल. पण, उद्याच्या रंगभूमीसाठी नवीन काही करू पाहणाऱ्या उदयोन्मुख कलाकार व रंगसंस्थांना प्रोत्साहन देण्याचे कामही या उत्सवाच्या निमत्ताने आपण नाट्यरसिक म्हणून जरूर करू शकाल.
‘प्रतिबिंब’ नाट्य उत्सव नावाप्रमाणे, महाराष्ट्राच्या समृद्ध रंगभूमी परंपरेचा आरसा आहे! या उत्सवाचा वारसा पुढे नेणारी तरुण कलावंतांची पिढी आपल्यासमोर नवनवीन विषय मांडणार आहे, ज्यातून आपल्याला एकूण जगण्यासंदर्भातील नवे भान व नवा दृष्टीकोन पाहायला मिळू शकेल. रसिक प्रेक्षक या नात्याने आपण या महाराष्ट्राचा समृद्ध सांस्कृतिक वारसा असलेल्या नाट्यउत्सवात सहभागी होऊन नाट्यकलेला उत्स्फूर्त दाद द्यावी.
शिल्पा कुमार यांच्या सौजन्याने प्रतिबिंब मराठी नाट्य उत्सव २०२५ साजरा होत आहे.
महोत्सवाच्या संचालिका, राजेश्री शिंदे यांनी सांगितले की “प्रतिबिंब हा एक मराठी सांस्कृतिक उत्सव आहे जो कलाकारांना, थिएटर ग्रुप्सना, कार्यशाळा संचालकांना आणि प्रेक्षकांना एकत्र आणतो. यंदाचा प्रतिबिंब नाट्य उत्सव या दृष्टिकोनातून घेतलेला एक महत्त्वाकांक्षी प्रयत्न आहे. विविध विषयांवर भाष्य करणारी नाटकं, कार्यशाळा आणि इंस्टॉलेशन्स या उत्सवाचा भाग आहेत. या महोत्सवाचे मुख्य उद्दिष्ट अधिकाधिक थिएटर ग्रूप्सना या नाट्य उत्सवात सामील करून विविध विषयांवर भाष्य करणाऱ्या, त्यांनी सादर केलेल्या कलाकृती जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचाव्यात. आम्हाला खात्री वाटते की ‘प्रतिबिंब’ हा राज्यातील सर्वोत्तम प्रादेशिक रंगभूमीचा अनुभव घेण्यासाठीचा वन-स्टॉप प्लॅटफॉर्म बनेल. ‘प्रतिबिंब’ नाट्य उत्सव हा मराठी रंगभूमीचा समृद्ध वारसा जो आपल्या विविध शैलीतील विस्तृत सादरीकरणासाठी प्रसिद्ध आहे तो NCPA च्या या मंचावर साकारणार आहे. तेव्हा या आणि NCPA च्या मंचावर सादर होणाऱ्या कथांद्वारे महाराष्ट्राच्या नाट्यमय आणि सांस्कृतिक कला विश्वाचा अनुभव घ्या.”
Pratibimb Marathi Natya Utsav (2025) — Schedule
View more info on the NCPA website →
Students can avail 20% discount on select shows with a valid ID.
22 May, 2025 — Thursday
ALIVE
WHEN: 7 pm
WHERE: Experimental Theatre, NCPA
लेखक: संकेत पारखे आणि ऋत्विक व्यास
दिग्दर्शक: संकेत पारखे
कलाकार: रुमानी खरे, संकेत पारखे, अवंती लाटणकर
संगीत: सौरभ भालेराव
ध्वनी संयोजन: यश लोणकर
पब्लिसिटी अँड क्रेडिट्स डिझाईन: विराजस कुलकर्णी
ग्राफिक्स डिझायनर: शुभंकर सोंदणकर
वेशभूषा: मुग्धा भालेराव
NCPA करिता तांत्रिक समन्वय: राजेश्री शिंदे
‘Alive’ हे नाटक राधा नावाच्या एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची गोष्ट आहे. सोशल मीडिया हेच राधाचं आयुष्य झालेलं आहे. राधला सोशल मीडियावर खूप फॉलोअर्स आहेत, पण प्रत्यक्षात ती खूप एकटी आहे. सोशल मीडियावर ती खूप यशस्वी दिसत असली तरी प्रत्यक्षात तिच्या आयुष्यात मानवी नात्यांचा, प्रेमाचा अभाव आहे. एक दिवस राघव नावाच्या मुलाशी तिची ऑनलाईन ओळख होते. हळूहळू त्यांचं बोलणं वाढत जातं आणि त्यांची मैत्री होते. जसजशी ही मैत्री वाढते, तसतशी राधा खर्या अर्थाने कोणाशी तरी जोडली जाते, मोकळेपणाने व्यक्त होऊ लागते.
हे नाटक म्हणजे वास्तव आणि आभासी डिजिटल विश्वातील विरघळत चाललेली सीमारेषा, डिजिटल विश्वातील नातेसंबंध आणि त्यात हरवत चाललेली स्वतःची ओळख, याबद्दलचा प्रवास आहे. आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेल्या डिजिटल आभासी विश्वात ‘Alive’ असणं म्हणजे नेमकं काय? या प्रश्नाभोवती नाटक फिरते.
23 May, 2025 — Friday
सोबतीचा करार
WHEN: 7 pm
WHERE: Experimental Theatre, NCPA
साथसंगत:
• निनाद सोलापूरकर (हार्मोनियम, सिंथेसायझर, सहगायन)
• समीर शिवगार (तबला)
• आमोद कुलकर्णी (ढोलक/पखवाज)
ही मैफल महाराष्ट्रभर १५० हून अधिक वेळा सादर झाली आहे.
काव्यलेखन, सादरीकरण: वैभव जोशी
संगीत: डॉ. आशिष मुजुमदार
गायक: दत्तप्रसाद रानडे
वादक: तननाद सोलापूरकर, समीर शिवगार, प्रसाद जोशी, मिलिंद शेवरे
निर्माते: शैलेश नारनुरकर
निर्मिती: रसिक साहित्य व वैभव जोशी
काव्यवाचन आणि कविता (१५० मिनिटे)
“मज आयुष्याचा माझ्या कळलेला आशय नाही,
जगतो हा तर्कच आहे आलेला प्रत्यय नाही”
…अशा आत्मपरीक्षण करायला लावणाऱ्या ओळी सांगणारे कवी-गीतकार वैभव जोशी यांची ‘रसिकप्रिय’ मैफल म्हणजेच ‘सोबतीचा करार’!
आजचे आघाडीचे कवी-गीतकार वैभव जोशी यांच्या सर्वाधिक लोकप्रिय मराठी-हिंदी कविता आणि गझलांचे सादरीकरण ‘सोबतीचा करार’ मधून होत असते. वैभव जोशी त्यांच्या खुमासदार शैलीतून, प्रेम, नातेसंबंध, तत्वज्ञान अशा अनेक विषयांवरील भाष्य करणाऱ्या, अंतर्मुख करणाऱ्या कविता, गझला सादर करतात. तर सर्वश्रुत गझलगायक दत्तप्रसाद रानडे त्यांच्या शब्दांना सुरेल साथ देतात. या मैफलीला डॉ. आशिष मुजुमदार यांचे दर्जेदार संगीत लाभलेले आहे.
24 May, 2025 — Saturday
अभिनय कार्यशाळा — अभिनयाविषयी परिचयात्मक कार्यशाळा
प्रशिक्षक: सचिन शिंदे
WHEN: 11 am
WHERE: JBT Museum, NCPA
कार्यशाळेबाबत संक्षिप्त माहिती:
या नाट्य कार्यशाळेत अभिनय म्हणजे काय? अभिनयाचे प्रकार, अभिनयाच्या शैली, भूमिकेची तयारी-प्रक्रिया, भूमिकेचा अभ्यास, आवाजफेक व संभाषण, संवादफेक, निरीक्षण व कल्पनाशक्ती संस्कार, भाव प्रकटीकरण, रंगमंचावरील व कॅमेऱ्यासमोरील अभिनयातील फरक आदि माध्यमातील अभिनय इत्यादी विषयांचे शास्त्रशुद्ध, शिस्तबद्ध व सुसंगत पद्धतीने प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याच बरोबर दिग्दर्शन म्हणजे काय? त्यासाठी आवश्यक बाबींची माहिती व तांत्रिक बाबींचा विचार याचाही समावेश असणार आहे.
वर्कशॉप फी – ₹८०० + GST
नोंदणीसाठी संपर्क: ०२२-६६२२३९४८ (सोम – शुक्र, सकाळी ९.३० ते सायं. ५.३०)
ई-मेल: [email protected]
विशेष सूचना: या वर्कशॉपमध्ये जागा मर्यादित असल्याने लवकरात लवकर नोंदणी करावी.
मार्गदर्शक – सचिन शिंदे यांचा संक्षिप्त परिचय:
• २०१५ पासून प्रायोगिक नाटकांसाठी ७ नाटकांसाठी झी गौरव व म.टा. सन्मान पुरस्कार
• १५ चित्रपटांमध्ये भूमिका, ३ मराठी चित्रपटांचे व एका मराठी सिरीयलचे दिग्दर्शन
• सध्या – झी मराठी साठी अवघा रंग एक झाला व वेध भविष्याचा या दोन कार्यक्रमाची निर्मिती
• विशेष: रेल्वे प्लॅटफॉर्मवरील अनाथ मुलांना घेऊन हमारी दुनिया या नाटकाचा दिल्लीमध्ये प्रयोग
• महाराष्ट्र राज्यनाट्य स्पर्धेत सलग ३ वर्षे प्रथम क्रमांक
• अभिनय कार्यशाळा घेतलेली ठिकाणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, रुईया कॉलेज इ.
• एकूण ३५ नाटकांचे व ५० हून अधिक एकांकिकांचे दिग्दर्शन
• NCPA, मुंबई तर्फे कलगीतुरा या नाटकाची निर्मिती
• NSD, दिल्लीतील भारंगम या आंतरराष्ट्रीय महोत्सवात सलग ३ वर्षे निवड
• यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये ललित कला केंद्राच्या संचालक पदी निवड
ज्याचा त्याचा विठ्ठल
WHEN: 3 pm
WHERE: Tata Theatre, NCPA
“ज्याचा त्याचा विठ्ठल” हे एक वेगळे कलात्मक संगीत-चित्र-नाट्य अभिवाचन आहे.
प्रभावी कथा, भारावून टाकणारं संगीत आणि प्रसिद्ध चित्रकार मिलिंद मुळिक यांची बोलकी जलरंगातील चित्रं आहेत, जी संपूर्ण कथेला दृश्य परिणाम देतात. हा एक उत्कट, अंतर्मुख आणि समृद्ध करणारा रंगमंचीय अनुभव आहे.
ये जो पब्लिक है
WHEN: 5 pm
WHERE: Experimental Theatre, NCPA
इंटिमेट रंगमंचासाठी बसवलेले हे एक हलकेफुलके, इंटरअॅक्टिव्ह नाटक आहे.
येणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाला टेबल टेनिसची एक बॅट दिली जाते, ज्याच्या एका बाजूला लाल आणि दुसऱ्या बाजूला हिरव्या चेंडूचे चित्र असेल. नाटकातील पात्रांच्या आयुष्यात जेव्हा टोकाचे मतभेद निर्माण होतात, तेव्हा पात्रे प्रेक्षकांकडून कौल मागतात. प्रेक्षक त्यांच्या मतानुसार त्या रंगाचा चेंडू दाखवतात आणि नंतर ते चेंडू मोजले जातात. ज्या रंगाचे चेंडू जास्त असतील, त्या दिशेने नाटकाची गोष्ट पुढे सरकते.
पुरुष
WHEN: 7:30 pm
WHERE: Tata Theatre, NCPA
जयवंत दळवी लिखित पुरुष हे मराठी रंगभूमीवरील एक लोकप्रिय नाटक आहे जे पुरुषी वृत्ती आणि वर्तनांना बळी पडलेल्या एका महिलेची कहाणी सांगते. हे नाटक पुरुषांमध्ये आढळणाऱ्या अहंकारावर भाष्य करते आणि या वृत्तीला बळी पडणाऱ्या महिलांच्या संघर्षावर प्रकाश टाकते.
२०२४ मध्ये मोरया, भूमिका आणि अथर्व हे या नाटकाचे रंगभूमीवर पुनःप्रदर्शन करत आहेत.
25 May, 2025 — Sunday
कथाकथनाचे प्रशिक्षण — गोष्ट सांगण्याची कला शिकवणारी कार्यशाळा
प्रशिक्षक: गीतांजली कुलकर्णी
WHEN: 11 am
WHERE: JBT Museum, NCPA
कार्यशाळेबाबत माहिती:
गोष्ट सांगणे ही मानवी जीवनातील प्राचीन म्हणावी अशी कला, आजच्या काळात नव्या स्वरूपात विकसित झाली आहे. ‘स्टोरीटेलिंग’ ला आजच्या काळात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. छोट्या मुलांना गोष्ट सांगण्याची व कथनकलेची तंत्रे शिकवण्यासाठी हा खास ‘मास्टरक्लास’ आहे.
या मास्टरक्लासमध्ये:
• कथनासाठी आवश्यक बेसिक गोष्टी समजावून सांगितल्या जातील
• शरीर माध्यम म्हणून तयार करण्यासाठी हालचाली व आवाजाचे व्यायाम
• एका गोष्टीची तयारी, सादरीकरण आणि प्रत्येक सहभागीला वैयक्तिक फीडबॅक
वर्कशॉप फी – ₹८०० + GST
नोंदणीसाठी संपर्क: ०२२-६६२२३९४८ (सोम – शुक्र, सकाळी ९.३० ते सायं. ५.३०)
ई-मेल: [email protected]
बुकिंग: www.bookmyshow.com
सूचना: जागा मर्यादित असल्याने लवकर नोंदणी करावी.
मार्गदर्शक – अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी यांचा संक्षिप्त परिचय:
• नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) माजी विद्यार्थिनी
• अनेक मराठी व हिंदी नाटकांत व सिनेमांत प्रमुख भूमिका
• ‘कोर्ट’ आणि इतर महत्त्वाच्या चित्रपट, वेब सिरीजमध्ये अभिनय
• ड्रामा स्कूल मुंबई या संस्थेच्या सह-संस्थापक
• आदिवासी मुलांच्या साक्षरतेसाठी ‘गोष्टरंग’ उपक्रम — बालसाहित्याचे नाट्यरूपांतर
• अनेक तरुण लेखक/कलाकारांना मार्गदर्शन व प्रेरणा
तुजी औकात काये?
WHEN: 3 pm
WHERE: Experimental Theatre, NCPA
लेखिका: वैदिका कुमारस्वामी
दिग्दर्शिका: प्रतिक्षा खासनीस आणि निकिता ठुबे
कलाकार: प्रतिक्षा खासनीस, निकिता ठुबे, कल्पेश समेळ, स्वप्नील भावे, दीप डबरे
प्रकाश योजना: ओमकार हजारे
संगीत: स्वप्नील भावे, दीप डबरे(संगीत दिग्दर्शन)
वेशभूषा: शरयू तायडे
निर्माते: मयुर देशमुख
निर्मिती व्यवस्थापक: अभिनव जेऊरकर
निर्मिती: सोशल मंच
वेदिका कुमारस्वामी लिखित ‘गावनवरी’ पुस्तकावर आधारित, ही कथा आहे वेदिकाची – जी देवदासी परंपरेत जन्मते. लहानपणापासूनच तिच्यावर लादलेली सामाजिक बंधनं मोडून ती घर सोडते. तिचा प्रवास म्हणजे पारंपरिक जाचकतेतून अनिश्चित स्वातंत्र्याकडे झेप घेण्याचा संघर्ष.
या प्रवासात ज्याच्याशी लग्न झालं त्या देवाला ती घटस्फोट देते, घटस्फोट देण्याचे धाडस करते. स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेते. विविध शक्तिपीठातल्या पवित्र देवस्थळी जाऊन त्या देवींच्या कथांवर प्रश्नचिन्ह निर्माण करते आणि विद्रोहाच्या ठिणगीसह तिचं नशीब आणि सशक्तीकरण शोधते. ही कथा नाटकात केवळ संवादांमधून नव्हे तर गाणी, कवितांच्या संगीतमय प्रवासात रंगवली जाते.
असेन मी... नसेन मी...
WHEN: 4:30 pm
WHERE: Tata Theatre, NCPA
हे नाटक एका आई-मुलीच्या गुंतागुंतीच्या नात्याचा वेध घेते. डिमेन्शिया आणि मृत्यूच्या छायेखाली घडणाऱ्या या नाटकात वैयक्तिक सत्याच्या माध्यमातून सार्वत्रिक सत्य मांडले गेले आहे. नाटकात अनेक पुरुष पात्रांचा उल्लेख आहे, जे रंगमंचावर येत नाहीत. परंतु, नाटकातील स्त्रियांच्या आयुष्यावर खोलवर प्रभाव टाकतात. शहरी जीवनातील नातेसंबंधांचे बारकावे, वैद्यकीय प्रगतीमुळे वाढलेला आयुष्याचा काळ, आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या कुटुंबातील नात्यांच्या गुंतागुंतीवर भाष्य या नाटकात केले गेले आहे.
दीपा, वय ७५, पुण्यात एकटी राहते. तिची मुलगी गौरी मुंबईत असते आणि मुलगा रोहन अमेरिकेत. दीपा हळूहळू स्मृती गमावू लागते. तिच्या आजारासोबतच गौरीला तिच्या घटस्फोटाचाही सामना करावा लागतो. जुन्या आठवणी, मनोव्यथा, अपरिपूर्ण नात्यांचे ओझे — हे सगळं या नाटकात प्रभावीपणे मांडले आहे.

![महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा-२०२५’ चे आयोजन — राज्य शासनाच्या वतीने ऐतिहासिक पाऊल! [Updated] Maharashtra Govt. Ekankika Competition 2025](https://www.rangabhoomi.com/wp-content/uploads/2025/09/mahanatyaspardha-ekankika-spardha-cover-2-450x253.jpg)

