police police • entry tickets

“सत्यविजय थिएटर्स” सादर करीत आहे…

पोलीस पोलीस!

दीर्घांक अभिवाचन - लेखक: श्री. रत्नाकर मतकरी

अभिवाचक: डॉ. मेघा विश्वास, आदित्य हळबे, संजीव सत्यविजय धुरी, समीर देशपांडे, स्नेहा जोशी

संगीत आणि संगीत संयोजन: तन्वी धुरी

श्री. रत्नाकर मतकरी ह्यांच्या ८७ व्या जयंतीदिनी, त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ

शुभारंभाचे 2 प्रयोग:

Police Police

“सद्रक्षणाय खलनिग्रहणाय”, सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांचा नायनाट, हे पोलिसांचं ब्रीदवाक्य आहे.
कायद्याची अंमलबजावणी करणं हे कर्तव्य असताना जर कुणी कायद्याच्या वरचढ होऊन कायद्याचा खेळासारखा वापर करू लागलं तर, कधी ना कधी, ती व्यक्ती स्वतःही त्या खेळात अडकू शकते.
न्यायदेवता जरी आंधळी असली तरी सत्य डोळस असतं आणि एक ना एक दिवस ते जगासमोर येतंच.

सुप्रसिद्ध लेखक आणि नाटककार दिवंगत श्री रत्नाकर मतकरी यांच्या ८७व्या जयंतीदिनी, त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, त्यांच्याच सिद्धहस्त लेखणीतून साकारलेल्या दीर्घांकाचे अभिवाचन…

दीर्घांक —

“पोलीस पोलीस!”

‘सत्तेच्या सावलीत हरवलेल्या सत्याची कहाणी.’

“पोलीस पोलीस!”

 


Mastodon