natyagandh mahotsav 2026 cover v2

वगसम्राट दादू इंदुरीकर यांच्या स्मरणार्थ
सम्यक कलांश प्रतिष्ठान आयोजित

नाट्यगंध महोत्सव

Marathi Natak Festival • Online Ticket Booking

|| वंदितो रंगभूमी • वंदितो रंगकर्मी ||
२०२५-२०२६

natyagandh mahotsav 2026 cover v2
Choose a Show Below

4th to 6 March, 2026 @ 7:30pm

Yashwant Natya Mandir, Matunga (Mumbai)

natyagandh mahotsav 2026 time table

नाट्यगंध महोत्सव २०२६ (वर्ष ६ वे) – नजरे आड राहिलेल्या एकांकिकांचा महोत्सव व नजरे आड राहिलेल्या रंगकर्मींचा सत्कार 

सम्यक कलांश प्रतिष्ठानतर्फे आयोजित नाट्यगंध महोत्सव २०२५-२०२६ हे एकांकिका विश्वातील एक अनोखे आणि महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरत आहे. यंदा या महोत्सवाचे पाचवे वर्ष असून, वगसम्राट दादू इंदुरीकर यांच्या स्मरणार्थ हा महोत्सव साजरा केला जात आहे.

सदर महोत्सवात ६ एकांकिका असून नजरे आड राहिलेल्या रंगकर्मी यांचा सत्कार होणार आहे. मान्यवरांसह हा सोहळा संपन्न होणार आहे. दिनांक ४-६ मार्च २०२६, दररोज सायंकाळी ७:३० वा. यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा येथे योजिला आहे. तरी सर्व प्रेक्षांनी ह्या महोत्सवाचा आनंद घ्यावा. 

४ मार्च २०२६ रोजी सादर होणाऱ्या एकांकिका

🔹 संस्था : अभिनयाग्नी नाट्य संस्था, मुंबई
एकांकिका : “ग्रे झोन”
लेखक : डॉ. सोमनाथ अंकुश सोनवलकर
दिग्दर्शक : ग्रेगरी फर्नांडिस

🔹 संस्था : के जे कॉलेज ऑफ इंजिनीरिंग, पुणे
एकांकिका : “बायंगी”
लेखक : श्रेयश स्वामी
दिग्दर्शक : अक्षदा पवार

५ मार्च २०२६ रोजी सादर होणाऱ्या एकांकिका

🔹 संस्था : नाटक नामा, मुंबई
एकांकिका : “बिझिनेस क्लास”
लेखक व दिग्दर्शक : तेजस सर्पे

🔹 संस्था : नाट्यवेध, नाशिक
एकांकिका : “कॅफे मेमेंटो”
लेखक : वंदन वेलदे
दिग्दर्शक : तन्मय लोहगावकर

६ मार्च २०२६ रोजी सादर होणाऱ्या एकांकिका

🔹 संस्था : ब्रोकेन कॅमेरा, मुंबई
एकांकिका : “ग्राउंड झीरो”
लेखक : दत्ता मसुरकर
दिग्दर्शन : सुरेश राणे

🔹 संस्था : कलासक्त, मुंबई
एकांकिका : “तळ्यात मळ्यात”
लेखक : सागर देशमुख
दिग्दर्शक : योगेश कदम

🌟 नजरेआड राहिलेले रंगकर्मी — “सत्कारमूर्ती”

🏆 जेष्ठ रंगभूषाकार — श्री. दत्ता भाटकर
🏆 जेष्ठ कपडेपट — सुधीर हरिदास

🎁 प्रेक्षकांसाठी खास आकर्षण

🎟 दररोज “लकी ड्रॉ”
👉 २ विजेते प्रेक्षकांना आकर्षक बक्षिसे

⚠ प्रवेशिका सोबत बाळगणे अनिवार्य आहे.

🎭 चला, रंगभूमीला वंदन करूया…
रंगकर्मींचा सन्मान करूया…
आणि नाट्यगंधाचा हा उत्सव अविस्मरणीय बनवूया!