सालाबादप्रमाणे यंदाही एनसीपीएचा ‘प्रतिबिंब मराठी नाट्य उत्सव’ मे महिन्यात होणार आहे. २२ मे ते २५ मे या चार दिवसांच्या सोहळ्यात उत्तमोत्तम नाटकं बघायला मिळणार आहेतच. त्यासोबत, अभिनय व कथालेखनाच्या कार्यशाळाही घेतल्या जाणार आहेत.
ज्यात मराठी रंगभूमीशी संबंधित अशा जाणकारांशी सुसंवाद साधण्याची संधी आपल्याला मिळेल. रसिक प्रेक्षक या नात्याने आपण या महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या नाट्यउत्सवात सहभागी होऊन नाट्यकलेला उत्स्फूर्त दाद द्यावी.






