Saturday, September 25, 2021

Online एकपात्री अभिनय स्पर्धा २०२० — विशेष लक्षवेधी पारितोषिक विजेत्याची घोषणा

- जाहिरात -

१ मे २०२० रोजी रंगभूमी.com आयोजित Online एकपात्री अभिनय स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. या पारितोषिक वितरण सोहळ्यामध्येच आम्ही विशेष लक्षवेधी स्पर्धक या पारितोषिकाचीही घोषणा केली. या पारितोषिकासाठी स्पर्धकांना त्यांच्या सादरीकरणाच्या व्हिडिओवर, रंगभूमी.com च्या YouTube चॅनेलवर आणि रंगभूमी.com च्या Facebook पेजवर प्रेक्षकांचे जास्तीत जास्त एकूण Views मिळवायचे होते. प्रेक्षकांचे जास्तीत जास्त Views मिळवण्यासाठी स्पर्धकांकडे २ मे २०२० दुपारी १२ वाजल्यापासून ९ मे २०२० दुपारी १२ वाजेपर्यंत अवधी होता. मला हे सांगावं लागेल की आठवडाभर खूपच अटीतटीचा सामना झालेला आहे.

आज दुपारी १२ वाजता मोजलेल्या Views च्या आकड्यानुसार जास्तीत जास्त Views मिळलेले पहिले सहा स्पर्धक पुढीलप्रमाणे आहेत.

विरीशा नाईक – ९०९
श्यामसुंदर शहाणे – ९७४
अजिंक्य टेकाळे – ११९५
सिद्देश शिंदे – १४१५
रेशम दिघे – २०३९
ज्योती उरणकर – २२८१

- Advertisement -

वरील आकडेवारीनुसार हे निश्चितच दिसून येत आहे की प्रथम आणि द्वितीय क्रमांकामध्ये खूपच कमी Views चा फरक आहे. २४२ Views च्या फरकाने “विशेष लक्षवेधी पारितोषिकाची” मानकरी ठरत आहे ज्योती उरणकर. ज्योती तुला रंगभूमी.com च्या संपूर्ण टीमकडून खूप खूप शुभेच्छा!

आम्ही सर्व स्पर्धकांचे या उपक्रमात सहभागी झाल्याबद्दल पुन्हा एकदा आभार मानतो. सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र ई-मेलद्वारे पोहोचवण्यात येईल. रंगभूमी.com द्वारे आयोजित होणाऱ्या नवनवीन उपक्रमांबद्दल आम्ही वेबसाईटवर, रंगभूमी.com च्या YouTube चॅनेलवर तसेच Facebook पेजवर तुम्हाला कळवत राहू. त्यामुळे आमच्या वेबसाईट व चॅनेलला Subscribe करायला तसेच Facebook पेजला Follow करायला विसरु नका. भेटू लवकरच. धन्यवाद!

- Advertisement -
- जाहिरात -spot_img

More articles

1 COMMENT

  1. खूप खूप धन्यवाद!!!! रंगभूमी..com आयोजित स्पर्धेत भाग घेता आला, आयोजकांचे मनापासून धनयवाद,?????

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

- जाहिरात -

Latest Articles

Nope! You cannot copy the content on this page, sorry.

%d bloggers like this: