Saturday, September 25, 2021

दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर ‘टिळक आणि आगरकर’ नाटकाचे प्रक्षेपण

- जाहिरात -

देशाच्या जडघडणीत महत्वाची भूमिका निभावणाऱ्या नेत्यांना, देशभक्तांना कालबाह्य व संदर्भहीन ठरवण्याचे सर्वकष प्रयत्न सद्ध्याच्या सत्ताधाऱ्यांकडून होत असताना टिळक, आगरकरांसरख्या उत्तुंग अशा सामाजिक/राजकीय क्षेत्रातील धुरिणांवरचे ‘टिळक आणि आगरकर’ हे नाटक रंगमंचावर आणण्याचे प्रयोजन म्हणजे एकेकाळी देशासाठी झिजलेल्या या धुरिणांची काय उंची होती व आत्ताचे तथाकथित नेते काय योग्यतेचे आहेत याची तुलना सूज्ञांनी मनोमन करावी, हा नाटककर्त्याचा हेतू असावा कदाचित!

आधी स्वातंत्र्य की आधी सामाजिक सुधारणा या प्रमुख प्रश्नांवरून टिळक व आगरकर या दोन जिवलग मित्रांमधले मतभेद विकोपाला कसे गेले हे या नाटकात मर्मभेदकपणे मांडले आहे. आधी स्वातंत्र्य मिळवू, परकीय राजसत्तेचे जोखड मानेवरून भिरकावून देऊ, सुधारणा काय नंतरही करता येईल अशी टिळकांची मते तर सुधारणारहित समाज मिळालेले स्वातंत्र्य टिकवू शकेल का? त्याचा उपभोग घेऊ शकेल का? आगरकर त्याकाळी समाजातील अनेक चालीरितींवर प्रहार करत होते. त्यामध्ये सुधारणा सुचवत होते. पण टिळक आधी स्वातंत्र्य याच मतावर ठाम होते. दोघांमध्ये कितीही वैचारिक वितुष्ट असले तरी त्या दोघांमधले भावनिक नाते अतूट होते.

लो. टिळक स्मृती शताब्दी वर्षानिमित्त ‘टिळक आणि आगरकर’ हे अजरामर नाटक ३१ जुलै रोजी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर दाखवण्यात येणार आहे. अभिजात आणि श्री. आर्यादुर्गा क्रिएशन निर्मित हे नाटक म्हणजे मराठी रंगभूमीवरील सुवर्णपानच! आकाश भडसावळे, संध्या म्हात्रे, गायत्री दीक्षित, अनुष्का मोडक, अथर्व गोखले, जगदीश जोग, बहार भिडे, अनुराग गर्गे, हर्षल सूर्यवंशी, सयाजी शेंडकर, दिपक जोईल, तुषार चव्हाण, प्रसाद संगीत, सुनिल रमेश जोशी आणि (पद्मश्री) नयना आपटे अशा दिग्गज कलाकारांच्या अभिनयाने समृध्द असे हे नाटक घर बसल्या बघता येणे हे आपले अहो भाग्यच!

- Advertisement -

३१ जुलै रोजी दुपारी १:३० व रात्रौ १०:३० वाजता हे नाटक वाहिनीवर दाखवण्यात येणार आहे. त्याच वेळी वाहिनीच्या YouTube चॅनेलवर तसेच Facebook पेजवरही हे नाटक प्रेक्षकांना लाईव्ह बघता येणार आहे. वाहिनीवर अथवा पुढीलपैकी कोणत्याही एका लिंकवर क्लिक करून तुम्ही हे नाटक बघू शकता.

दूरदर्शन सह्याद्रीचे YouTube चॅनेल

दूरदर्शन सह्याद्रीचे Facebook पेज

३१ जुलै रोजी नक्की या नाटकाचा आस्वाद घ्या आणि तुम्हाला हे नाटक कसे वाटले त्याबद्दल आम्हाला hello@rangabhoomi.com या ईमेल आयडीवर जरूर लिहून कळवा.

- Advertisement -
- जाहिरात -spot_img

More articles

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

- जाहिरात -

Latest Articles

Nope! You cannot copy the content on this page, sorry.