Search for:
News

स्पर्धेत सहभागी व्हा! — नाट्यरसिक of the month

Pinterest LinkedIn Tumblr

काही दिवसांपूर्वी रंगभूमी.com च्या Social Media वर आम्ही नाट्यरसिक of the month या अनोख्या स्पर्धेबद्दल सांगितले होते. १ जून, २०२० पासून रंगभूमी.com च्या Instagram पेजवर या स्पर्धेची सुरुवात झालेली आहे. आम्ही तमाम नाट्य प्रेमींना आवाहन करतो की त्यांनी या स्पर्धेमध्ये नक्की सहभाग घ्यावा.  

या स्पर्धेचे स्वरूप अतिशय सोपे आहे. सोमवार ते शुक्रवार आम्ही नाटकाशी संबंधित काही प्रश्न Instagram story मध्ये तुम्हाला विचारणार आहोत. या प्रश्नाचे स्वरुप ध्वनिफीत, जोड्या जुळवणे किंवा एखादी चारोळीही असू शकते. तुम्हाला त्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे. महिन्याच्या शेवटी जास्तीत जास्त अचूक उत्तरे देणाऱ्या @myrangabhoomi च्या Follower ला नाट्य रसिक of the month घोषित करण्यात येईल आणि या नाट्यरसिक विजेत्याला मिळेल एक आकर्षक पारितोषिक!

सूचना

  • स्पर्धकाने रंगभूमी.com च्या Instagram पेजला follow करणे अनिवार्य आहे.
  • तसेच, एकाहून अधिक स्पर्धकांनी सर्वात जास्त प्रश्नांची अचूक उत्तरे दिली तर सोडत काढून अंतिम विजेता ठरवण्यात येईल.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Nope! You cannot copy the content on this page, sorry.