Sunday, October 25, 2020

नटसम्राट/नटसम्राज्ञी of the Month (Online Instagram अभिनय स्पर्धा) २०२०

नक्की वाचा

कलांश थिएटर, रत्नागिरी प्रस्तुत “बिराड” एकांकिकेचे Online सादरीकरण

सणासुदीला एखादं दर्जेदार नाटक बघण्याची प्रथा अस्सल नाट्यवेड्या प्रेक्षकांमध्ये अजूनही प्रचलित आहे. याच प्रथेचा मान ठेवत घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर कलांश थिएटर, रत्नागिरी ही...

थिएटर प्रीमियर लीग ऑनलाईन नाट्यमहोत्सव: अधिक भव्य स्वरूपात ‘सीझन २’ लवकरच तुमच्या भेटीला!

सर्वप्रथम तमाम मायबाप रसिक प्रेक्षकांचे खूप आभार! तुम्ही थिएटर प्रीमियर लीग च्या सीझन १ ला भरभरून प्रेम दिलंत. म्हणूनच, यावेळी आम्ही अधिक...

माझ्या आठवणीतील नाटक — इथं कुणी कुणाला सावरायचं

आमच्या लहानपणी मी ऐकलेली गोष्ट, घाऱ्या डोळ्यांच्या व्यक्तींशी मैत्री करु नये, का...? तर त्यांना भूत ह्या प्रकारातले (पिशाच्च) आत्मा वगैरे दिसतात म्हणे...

राहुल हणमंत शिंदे याचा ‘अज्ञात’ हा कथासंग्रह Online विक्रीसाठी उपलब्ध!

रंगभूमी.com चा प्रवास सुरू झाला तेव्हा नवनवीन कलाकार मंडळी आमच्याशी जोडली गेली. या कलाकार मंडळींमध्ये काही अभिनेते/अभिनेत्री होते तर काही लेखक/लेखिकाही होत्या....

सर्वप्रथम नाट्यरसिक of the Month स्पर्धेला दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल खूप धन्यवाद! नाट्यरसिक of the Month स्पर्धेमध्ये आम्ही नाटकाशी संबंधित काही प्रश्न विचारले होते. त्या प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन तुम्हाला नाटकांबद्दल असलेली ओढ तुम्ही सिद्ध केलीय. म्हणूनच या महिन्यात आम्ही तुमच्या भेटीला एक नवीन स्पर्धा घेऊन आलो आहोत. या स्पर्धेचं नाव आहे नटसम्राट/नटसम्राज्ञी of the Month. नावावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की ही स्पर्धा अभिनयाशी संबंधित असणार आहे. परंतु याही पलीकडे या स्पर्धेमागचा मुख्य हेतू असणार आहे तो म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रंगभूमी स्थगित झालेली असताना रसिक प्रेक्षकांना नाट्यसृष्टीशी बांधून ठेवण्याचा!

मंडळी! आपण बरीच नाटकं बघत असतो. काही नाटकं, त्यांची पुस्तकं आपण आपल्याजवळ बरीच वर्षे संग्रहित करून ठेवलेली असतात. याच आवडत्या नाटकांमधील तुमचा आवडता उतारा पाठ करून त्याच्या सादरीकरणाचा विडिओ तुम्हाला लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहोचवायचाय.

अभिनयाचा व्हिडिओ पाठवा आणि स्पर्धेत सहभागी व्हा!

 • सादरीकरणासाठी उतारा: स्पर्धेसाठी नाटक, एकांकिका अथवा स्वरचित लिखाणावरील सादरीकरण चालेल.
  मराठी नाटक Online या लिंकला भेट देऊनही तुम्हाला बरीच नाटकं मिळतील. तुम्ही YouTube वरील नाटकांचीही मदत घेऊ शकता.
 • Instagram IGTV: आम्ही तुमचे व्हिडिओज रंगभूमी.com च्या instagram अकाऊंटच्या IGTV चॅनेलवर upload करू.
 • Total Likes: तुम्हाला तुमच्या विडिओ वर जास्तीत जास्त Likes मिळवायचे आहेत.
 • First come, first served: ज्या क्रमाने स्पर्धक आमच्यापर्यंत व्हिडिओ पाठवतील त्या क्रमानेच ते IGTV वर upload होतील. ही प्रक्रिया आजपासून ३१ जुलैपर्यंत सुरू राहील. त्यामुळे जितका लवकर व्हिडिओ आमच्याकडे पाठवाल तेवढी जास्त views आणि likes मिळवण्याची मुदत तुम्हाला मिळेल.
 • निकाल: ३१ जुलैला रात्री १२ वाजेपर्यंत आलेले एकूण views आणि likes या स्पर्धेचा विजेता ठरवतील. निकाल ऑगस्ट महिन्यात जाहीर होईल.
 • वयोमर्यादा: स्पर्धेसाठी वयोमर्यादा नाही.
 • वेळमर्यादा: व्हिडिओची वेळमर्यादा २ मिनिटांपेक्षा कमी नसावी. कमीत कमी २ ते जास्तीत जास्त १० मिनिटांचा विडिओ ग्राह्य धरला जाईल.
 • एकपात्री अभिनय स्पर्धा नाही: ही एकपात्री अभिनय स्पर्धा नाही. त्यामुळे सादरीकरण एकपात्री असणे बंधनकारक नाही. एकपात्री, दोनपात्री किंवा बहुपात्री सादरीकरणही चालेल. म्हणजेच एकाच घरात नवरा-बायको, भाऊ-बहीण किंवा संपूर्ण कुटुंबही या स्पर्धेत सहभागी होऊ शकतं.
 • परीक्षक: रसिक प्रेक्षकच या स्पर्धेचे परीक्षक असणार आहेत. आवडत्या स्पर्धकाला भरभरून प्रेम देऊन रसिक प्रेक्षकच विजेता ठरवतील.
 • IGTV लिंक बंधनकारक: स्पर्धकांनी रंगभूमी.com वरील IGTV व्हिडिओच्या लिंकचाच प्रचार करावा. तसंच, आम्ही IGTV वर तुमचा विडिओ अपलोड करू तेव्हा स्पर्धकाचे username त्यामध्ये tag करण्यात येईल. त्यामुळे, विडिओ अपलोड झाल्यावर username तपासून बघा.

लक्षात ठेवा! ३१ जुलैला रात्री १२ वाजेपर्यंत आलेले एकूण likes या स्पर्धेचा विजेता ठरवतील. स्पर्धेचा विजेता एकच असेल. मुलगा असेल तर नटसम्राट आणि मुलगी असेल तर नटसम्राज्ञी of the Month. त्यामुळे जराही वेळ न दवडता लवकरात लवकर तयारी सुरू करा आणि तुमचे व्हिडिओज आमच्यापर्यंत पोहोचवा. पुढे दिलेला फॉर्म भरून तुम्ही तुमचा विडिओ आमच्यापर्यंत पोहोचवू शकता.

विजेत्या व्हिडिओला रंगभूमी.com कडून एक आकर्षक Goodie-Bag आणि त्याच व्हिडिओमधील उत्कृष्ट सादरकर्त्याला (Best Performer) “नटसम्राट/नटसम्राज्ञी of the month” हा किताब मिळेल!

नटसम्राट of the Month / Online Acting Competition

 • वैयक्तिक माहिती

 • सादरीकरण

 • तुम्ही तुमचा Video YouTube, Google Drive किंवा WeTransfer वापरून पाठवू शकता.

  तुमच्या सादरीकरणाचा व्हिडिओ दिनांक १ मार्च, २०२० च्या नंतर shoot केलेला असावा. तसेच, इतर कुठल्याही स्पर्धेमध्ये केलेल्या सादरीकरणाचा व्हिडिओ वैध मानला जाणार नाही.
 • पुढे दिलेल्या Social Media Accounts वर आम्हाला Like, Follow and Subscribe करा.

  1. Facebook.com/myrangabhoomi वर Like आणि Follow करा

  2. YouTube वर Subscribe करा

  3. Instagram: @myrangabhoomi वर Follow करा

  Like, Follow and Subscribe केल्यावर पुढे दिलेल्या जागेत तुमच्या या Accounts चे details द्या.
 • आम्ही IGTV वर तुमचा विडिओ अपलोड करू तेव्हा स्पर्धकाचे username त्यामध्ये tag करण्यात येईल. त्यामुळे, username तपासून बघा.
 • शेवटचं काही • १) स्पर्धेचे सर्व नियम व अटी आपण वाचले असून ते आपल्याला मान्य आहेत आणि ते पाळण्याचेही आपण मान्य करीत आहात.
  २) स्पर्धेच्या आपल्या अर्जात आपण दिलेली सर्व माहिती सर्वार्थाने खरी आहे.
  ३) स्पर्धेच्या आयोजकांनी घेतलेला प्रत्येक निर्णय अंतिम असेल आणि तो आपल्याला बंधनकारक असेल.
  ४) आपण स्पर्धेसाठी सादर केलेला व्हिडीओ आपण स्वतः बनवला असून तो व्हिडीओ या स्पर्धेसाठी सादर करण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे.
  ५) आपले सादरीकरण रंगभूमी.com च्या Instagram IGTV चॅनेलवर upload करण्यासाठी तुमची मान्यता आहे.
 • This field is for validation purposes and should be left unchanged.
- Advertisement -

More articles

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

- जाहिरात -

Latest Articles

कलांश थिएटर, रत्नागिरी प्रस्तुत “बिराड” एकांकिकेचे Online सादरीकरण

सणासुदीला एखादं दर्जेदार नाटक बघण्याची प्रथा अस्सल नाट्यवेड्या प्रेक्षकांमध्ये अजूनही प्रचलित आहे. याच प्रथेचा मान ठेवत घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर कलांश थिएटर, रत्नागिरी ही...

थिएटर प्रीमियर लीग ऑनलाईन नाट्यमहोत्सव: अधिक भव्य स्वरूपात ‘सीझन २’ लवकरच तुमच्या भेटीला!

सर्वप्रथम तमाम मायबाप रसिक प्रेक्षकांचे खूप आभार! तुम्ही थिएटर प्रीमियर लीग च्या सीझन १ ला भरभरून प्रेम दिलंत. म्हणूनच, यावेळी आम्ही अधिक...

TPL 2020 Online नाट्यमहोत्सव – तब्बल ४०० लोकांनी घर बसल्या बघितली खुमासदार नाटकं!

कोरोना आणि लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर गेले बरेच महिने तमाम रसिक प्रेक्षक रंगभूमीच्या दर्शनास मुकले आहेत हे आपण सर्वजण जाणूनच आहोत. त्यांना रंगभूमीकडे नेणे...

थिएटर प्रीमियर लीग २०२० – २४ सप्टेंबर पासून सुरू होणार Online नाट्यमहोत्सव (Theatre Premier League 2020)

लॉकडाऊनच्या कठीण काळात रसिक प्रेक्षकांना नाट्यगृहात जाऊन नवनवीन नाटकांचा आस्वाद घेता आलेला नाही. कोरोनाचे संकट संपून नाटकाचा रुपेरी पडदा लवकरच उघडावा अशी...

रातराणी नाटकाचे बहारदार Online अभिवाचन

ज्येष्ठ नाटककार प्र. ल. मयेकर म्हणजेच प्रभाकर लक्ष्मण मयेकर यांच्या समर्थ लेखणीतून जन्माला आलेल्या "रातराणी" या अप्रतिम नाटकाचे अभिवाचन करायला काही प्रख्यात...

Nope! You cannot copy the content on this page, sorry.