tuji aukaat kaaye 2025 cover
tuji aukaat kaaye 2025 cover
सोशल मंच आणि टायनी टेल्स थिएटर कंपनी प्रस्तुत

तुजी औकात काये?

लेखक: वैदिका कुमारस्वामी  •  दिग्दर्शक: प्रतिक्षा खासनिस आणि निकिता ठुबे
5.0

Synopsis

वेदिका कुमारस्वामी लिखित, ‘गावनवरी’ पुस्तकावर आधारित, ‘तुजी औकात काये’ या नाटकाची कथा आहे देवदासींच्या वंशात जन्मलेल्या वेदिकाची, तिच्या प्रवासाची. लहानपणापासूनच देवदासींचं परंपरागत जगणं तिच्याही वाट्याला येतं. पण, ती तिच्या नशिबातून सुटून, तिचं घर सोडते. जगण्याच्या आणि आत्म-शोधाच्या प्रवासाला निघते. तिचा हा प्रवास म्हणजे जाचकतेच्या ठिकाणाहून अनिश्चित स्वातंत्र्याकडे जाण्याचा प्रवास आहे. या प्रवासात ती ज्याच्यासोबत लग्न झालं त्या देवाला घटस्फोट देण्याचे धाडस करते आणि तिच्या अस्तित्वाचा सर्वात मोठा भाग मागे सोडते. ती तिच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करते. विविध शक्तिपीठातल्या पवित्र देवस्थळी जाऊन त्यां देवींच्या कथांवर प्रश्नचिन्ह निर्माण करते आणि विद्रोहाच्या ठिणगीसह तिचे नशीब आणि सशक्तीकरण शोधते. तिची ही कथा, आत्म-शोधाचा मार्ग, नाटकात केवळ शब्दातून न मांडता, गाणी आणि कवितेच्या संगीतमय प्रवासात रंगवली जाते.

Cast

प्रतिक्षा खासनिस, निकिता ठुबे, कल्पेश समेळ, स्वप्नील भावे आणि दिप डबरे

Crew

  • नेपथ्य:
  • प्रकाश: ओंकार हजारे
  • संगीत: स्वप्नील भावे आणि दीप डबरे (संगीत दिग्दर्शन)
  • वेशभूषा: शरयू तायडे
  • निर्माते: मयुर देशमुख
  • सूत्रधार:
  • इतर सदस्य: निर्मिती व्यवस्थापक: अभिनव जेऊरकर, पोस्टर डिझाईन: कौस्तुभ हिंगणे

User Reviews

अप्रतिम

5 months ago

“तुझी औकात काय” हे मराठी नाटक अत्यंत प्रभावशाली आणि विचारप्रवण आहे. नाटकाच्या माध्यमातून समाजातील विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला आहे. अभिनेत्यांचे अभिनय कौशल्य आणि नाटकाची पटकथा व दिग्दर्शन यामुळे नाटक अधिकच गाजले आहे. सर्वांनी एकदा नक्की बघावे असे हे नाटक आहे.

निकिता ठुबे व टीम कडून भविष्यात अशाच दर्जेदार कलाकृती ची अपेक्षा

Yash

Write a Review

To submit a review for this Marathi Natak, you need to be logged in. Please Register an account, or Log In if you already have one.

 

तुजी औकात काये? मराठी नाटक • Marathi Natak Info

सोशल मंच आणि टायनी टेल्स थिएटर कंपनी प्रस्तुत

तुजी औकात काये • Marathi Natak Info

Tuji Aukaat Kaaye is a new Marathi Natak from the Drama, Musical genre. Based on the book ‘Gaavnavari’ written by Vedika Kumarswami, this marathi play has been adapted by Pratiksha Khasnis and Nikita Thube.

Tuji Aukat Kaaye?

Writer: Vedika Kumarwasmi
Dramaturgy and Direction: Pratiksha Khasnis and Nikita Thube
Music Director: Deep Dabare and Swapnil Bhave
Costumes: Sharayu Tayade
Light designing: Omkar Hajare
Set: Pratik Panchafula

Produced by: Social Manch
Producer: Mayur Deshmukh
Production Manager: Abhinav Jeurkar
Production Associate: Kalpesh Samel
Posters and creative support: Kaustubh Hingane

Performers: Kalpesh Samel, Nikita Thube, Pratiksha Khasnis, Deep Dabare, Swapnil Bhave


Mastodon