Also Known As:
- सावरकर दर्शन प्रतिष्ठान निर्मित, नाट्य संपदा कला मंच सहनिर्मित
संगीत संन्यस्त खड्ग • मराठी नाटक
- लेखक: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
- दिग्दर्शक: हृषिकेश जोशी
- कलाकार: ओमप्रकाश शिंदे, मयुरा रानडे, केतकी चैतन्य, ऋत्विज कुलकर्णी, श्रीराम लोखंडे, गौरव निमकर, प्रद्युम्न गायकवाड, शंतनू अंबडेकर, परमेश्वर गुट्टे, निरंजन जाविर, आशिष वझे, ओंकार कुळकर्णी, आणि हृषिकेश जोशी
- नेपथ्य: संदेश बेंद्रे
- प्रकाश: अमोघ फडके
- वेशभूषाकार: मयुरा रानडे
- निर्माते: रवींद्र माधव साठे, अनंत वसंत पणशीकर
- सूत्रधार: दीपक गोडबोले
- पार्श्वसंगीत: कौशल इनामदार • नृत्य: सोनिया परचुरे • रंगभूषा: श्रीकांत देसाई • युद्ध तंत्र प्रशिक्षण: सुधीर कांबळे
Online Ticket Booking
Natak Info
- Synopsis: Written by Swatantrya Veer Vinayak Damodar Savarkar, the drama debuted in January 1931, staged by Balwant’s music troupe at Elphinstone Theatre in Mumbai. Set in ancient India, during Gautam Buddha’s time, the play explores the consequences of extreme non-violence. Savarkar contrasts pacifism with the need for righteous force, blending philosophical debate and historical narrative. Central to the theme is the tension between “ahimsa” (non-violence) and “shastra” (weapon), symbolised by Buddha and Shakya chieftains. Sangeet Sanyasta Khadga is directed by Hrishikesh Joshi.
नाटकाचे पुढील प्रयोग →
— जाहिरात —
Related Artist Profiles
User Submitted Ratings & Reviews
All Reviews
No Title
आजच बोरीवली येथे वि. दा. सावरकर लिखित *संन्यस्त खड्ग* हे नाटक पाहिलं. हल्लीच्या मोजक्या दोन तीन पात्रं असलेल्या नाटकांच्या काळात अशी मोठी भरपूर पात्रं असलेली नाटकं दुर्मिळच होत चालली आहेत. पडदा उघडल्याबरोबर असलेल्या आल्हाददायक नृत्यामुळे सुरुवात
छान होते. परंतु पहिल्या अंकापेक्षा दुसरा अंक जास्त प्रभावी वाटतो. सर्वप्रथम असे जाज्वल्य विचारांचे नाटक सादर करण्याचे धाडस दाखवल्याबद्दल दोन्ही निर्मात्यांचे मनःपूर्वक
अभिनंदन आणि कौतुक. हृषीकेश जोशी यांचे दिग्दर्शन आणि अभिनय दोन्हीही अप्रतिम. तिन्ही गाणी अतिशय
प्रभावीपणे सादर केली. प्रेक्षकांकडूनही गाण्यांना उत्स्फूर्तपणे दाद मिळते. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भाषेवरील
प्रभुत्वाबद्दल लिहावे तेवढे थोडेच. या नाटकातले त्यांचे विचार, दृष्टिकोन आजच्या काळातही सुसंगत वाटतात.
नाटकातले बुद्ध हे पात्र प्रेक्षकांना खरोखरच विचार करायला
प्रवृत्त करणारे आहे. प्रसंगांना साजेशी वेशभूषा आणि
आकर्षक नेपथ्य या नाटकाच्या जमेच्या बाजू आहेत. शेवटचा
लढाईचा प्रसंग तर डोळ्यांत पाणी आणणारा आहे. अहिंसा
आणि शस्त्र यांच्यातला संघर्ष हा सनातन विषय असून तो
असाच चालू राहणार.
रागिणी आणि रवींद्र बापट. नवी दिल्ली
Write a Review
To submit a review for this Marathi Natak, you need to be logged in. Please Register an account, or Log In if you already have one.
You must be logged in to submit a review.