- अवनीश सदर करीत आहे, नाटक मंडळी निर्मित, अथर्व प्रकाशित
आमने सामने • मराठी नाटक
Comedy Natak
- लेखक: नीरज शिरवईकर
- दिग्दर्शक: नीरज शिरवईकर
- कलाकार: मंगेश कदम, लीना भागवत, रोहन गुजर, केतकी विलास (Previously: मधुरा देशपांडे)
- नेपथ्य: प्रदीप मुळ्ये
- प्रकाश: रवी करमरकर
- संगीत: विजय गवंडे
- वेशभूषाकार: अमिता खोपकर
- निर्माते: संतोष भरत काणेकर, लीन भागवत, महेश रामचंद्र ओवे
- सूत्रधार: दिगंबर प्रभू (९८९२२३६५९२)
Online Ticket Booking
Natak Info
- Synopsis: “Aamne-Saamne” is a light-hearted take on the complexities of marriage. The play explores the generation gap between a traditional marriage and a modern-day man-woman relationship; all presented in a hilarious, feel-good story of two couples living next door to each other.
नाटकाचे पुढील प्रयोग →
— जाहिरात —
Related Artist Profiles
User Submitted Ratings & Reviews
All Reviews
उत्कृष्ट
आमने सामने हे नाटक मी सर्वप्रथम एका छोट्याशा Instagram reel मध्ये पाहिलं, आणि तिथूनच ठरवलं की हे नाटक नक्की पहायचं. खरं सांगायचं तर मी फारशी नाट्यप्रेमी नाही किंवा नाटक पाहणं ही माझी नेहमीची सवयही नाही. पण वाटलं, चला एकदा तरी पाहून येऊ, आणि त्याच निमित्तानं माझ्या दोन्ही मुलांना ११ आणि १३ वर्षांच्या शिवाजी मंदिर हे नाट्यगृह आणि मराठी नाटक म्हणजे काय असतं हे दाखवता येईल.
शेवटी ३० जुलैची तिकीट बुक केली. माझ्या एका जवळच्या मित्राने तिकीट बुक करताना खूप मदत केली त्याचा मी विशेष उल्लेख करेन कारण त्याच्यामुळेच हा सगळा सुंदर अनुभव शक्य झाला.आम्ही सगळं कुटुंब पारंपरिक पोशाखात नटून थटून नाट्यगृहात पोहोचलो. आणि खरं सांगायचं तर माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच जास्त मिळालं.
माझ्या मुलांना सध्या K-pop, BTS, Anime अशा गोष्टींमध्ये रस आहे. पण जेव्हा त्यांनी हे नाटक पाहायला सुरुवात केली आणि मनापासून हसताना त्यांना पाहिलं तेव्हा माझ्या मनात एक वेगळाच आनंद दाटून आला. नाटक सुरू झालं आणि पहिल्याच अंकात माझी दोन्ही मुलं इतक्या खळखळून हसत होते की मला आश्चर्यच वाटलं म्हणजे इतके पटकन ते दोघे ही गुंतले होते. इंटरव्हल झाल्यावर त्या दोघानी विचारलं, मम्मी नाटक संपलं का? आणि मी म्हणाले, “नाही रे बाळा, अजून आहे.त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्सुकता पाहून वाटलं हेच तर हवं होतं.
दुसरा अंक सुरू झाला.
लीना भागवत,मंगेश कदम यांची संवादफेक, बोलण्याची शैली, त्यांनी ज्या सहजतेनं आणि हुशारीनं घरगुती विषय रंगमंचावर आणले ते पाहणं म्हणजे एक पर्वणीच होती. घरातल्या छोट्या छोट्या गोष्टी, नवराबायकोमधले संवाद, नवीन जुनी पिढी यांचा दृष्टिकोन हे सगळं इतक्या हलक्याफुलक्या पण परिणामकारक पद्धतीनं मांडलं होतं की त्यातून केवळ मनोरंजनच नाही, तर विचार करायलाही भाग पाडलं.
नाटक संपलं आणि माझा लहान मुलगा मला म्हणाला,
मम्मी, मला परत हेच नाटक पाहायचंय, माझा वाढदिवस ९ तारखेला आहे, आपण परत जाऊ या ना प्लीज. बस, याहून मोठं बक्षीस अजिबात काहीच नसेल.
हे सगळं लिहायचा हेतू एकच
आजची पिढी जी मोबाईल, गेम्स, सोशल मीडियाच्या दुनियेत हरवते आहे, त्यांनाही नाटकाची चव लागते, भावते आणि पचते फक्त ते त्यांच्यापर्यंत पोहोचायला हवं.
आमने सामने हे नाटक त्यासाठी उत्तम माध्यम ठरलं.विनोद, संस्कार, विचार, आणि भावनांची सुंदर गुंफण.
अशीच नाटकं अजून येत राहो आणि आपल्या पुढच्या पिढीलाही मराठी रंगभूमीची गोडी लागो हीच मनापासून प्रार्थना.
Excellent 👌👍
अप्रतिम आणि हास्य नाटक
लीना ताई आणि all artist
पुन्हा पुन्हा पहावे असे प्रयोग
Nad khula
Apratim Saadarikaran
What a refreshing experience. Khup khup dhanyawad to whole team… For taking such sensitive topic n handling it so carefully with best way ahead. Every one has done a great job in acting but Leena Bhagwat ..love you so much . You are tooch much
No Title
अप्रतिम आणि सुरवातीपासूनच हास्य नाटकची सुरुवात
लीना ताई आणि सर्व दर्जेदार कलाकार… 👍💐
पुन्हा पुन्हा पहावे असे प्रयोग 👍
Write a Review
To submit a review for this Marathi Natak, you need to be logged in. Please Register an account, or Log In if you already have one.
You must be logged in to submit a review.