मुले आई-वडिलांची म्हातारेपणातील काठी असतात तसेच आई-वडील मुलांच्या तरुण वयातील आधारस्तंभ. तरुण पिढीला नवनवीन संधी मिळतात. भविष्यात ते त्यांचे मार्ग स्वतःच निवडून अनेक छंद, कला जोपासत स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करतात. अनेक पालकांना वाटत असते की आपल्या पाल्यांनी यश गाठावे, आर्थिकदृष्ट्या कणखर व्हावे यासाठी व्यावसायिक क्षेत्र जसे डॉक्टर, इंजिनिअर, वकील, सी.ए, इत्यादी. निवडून त्यातच करिअर करावे. पण जेव्हा मुलांची इच्छा आणि पालकांची अपेक्षा विरुद्ध असतात तेव्हा पालक आणि पाल्यांमध्ये मतभेद निर्माण होऊ लागतात. पालकांनी मुलांना कला जोपासून आवडत्या क्षेत्रात यश मिळवण्यासाठी सहकार्य करावे, असा संदेश देणारे ‘जोकर‘ सादर करीत आहे ‘अनुमित नाट्य संस्था‘.
जोकर
‘जोकर’ ही एकांकिका २०१९ या वर्षी ‘पार्ले टिळक विद्यालयातून’ सादर करण्यात आली. या एकांकिकेचे लेखन व दिग्दर्शन सुमित तांबे यांनी केले आहे. अनेक कुटुंबात मुलांना कला क्षेत्रात करिअर करण्याची मुभा नसते म्हणून पालकांना मुलांची गोष्ट सांगणारी ही एकांकिका. विशेष म्हणजे या एकांकिकेत अनेक बाल कलाकार आहेत. या एकांकिकेचे संगीत निहार शेंबेकर याने केले आहे तर नेपथ्य आणि प्रकाशयोजना वैभव पिसाट यांनी केले आहे. निर्मिती आणि वेशभूषा अनुजा तांबे यांनी केले आहे.
दिनांक १६ जुलै २०२२ रोजी संध्याकाळी ६ वाजता प्रबोधन प्रयोगघर, कुर्ला (पूर्व) येथे ‘जोकर’ एकांकिकेचा शुभारंभाचा प्रयोग होणार आहे.
अधिक माहितीसाठी आणि तिकिटासाठी संपर्क क्र. — ८४५२९४६५५४ / ९९८७८७६५५४
तिकीट दर — १५०/-
अनुमित, मुंबई नाट्य संस्था